Jan 23, 2022
कथामालिका

रहस्य भाग ६

Read Later
रहस्य भाग ६

भाग ६

सूचना :- हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ह्या कथेतील पात्रांचा तसेच स्थळांचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

भाग ५ पासून पुढे.....

               सगळी कडे काळोख पसरला होता. काय तो फक्त चंद्राचा प्रकाश जमिनीवर पडत होता. त्या काळोखातून एक सावली जात होती. ती सावली एका घरा समोर जाऊन उभी राहिला. ती सावली आता त्या घराच्या दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागली. एका क्षणात ती सावली त्या दरवाज्याच्या आरपार झाली आणि त्या सावलीने घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच त्या सावलीने घराच्या चारही बाजूना आपली नजर फिरवली आणि एका खोलीच्या दिशेने जाऊ लागली. त्या सावलीने खोलीत प्रवेश केला. समोर बेडवर अजय झोपलेला होता. ती सावली हळू हळू अजयच्या दिशेने जाऊ लागली आणि एका क्षणात त्या सावलीने अजयच्या शरीरात प्रवेश केला.

            अजयला जाग आली. त्याने मोबाईलमध्ये बघितले तर सकाळचे ७ वाजले होते. अजय आपल्या बेड वरून उठला. बेड वरून उठताच त्याच्या डोक्यात एक तीव्र सनक गेली. तो जरावेळ त्याच्या बेडवरच बसून राहिला. थोड्या वेळाने तो फ्रेश होऊन कॉलेजसाठी घरातन निघाला.

           “गुड मॉर्निंग अजय...!” समीर म्हणाला.

           “मॉर्निंग...” अजय.

           “अरे ते बघ मयुरी आणि साध्वी पण आल्या.” समीर.

           “गुड मॉर्निंग.....” साध्वी.

           “मॉर्निंग....” समीर.

             “काय रे अजय काय झाल....आज चेहरा जरा पडलेला दिसतोय. तब्बेत तर बरी आहे ना.” मयुरीने अजयला विचारले.

           “हो अग....फक्त जरा डोक दुखतंय.” अजय म्हणाला आणि सर्व लेक्चर करायला निघाले.

            “आह........” अजय आपल्या डोक्याला हात लाऊन जोऱ्यात विव्हळला. अजयच्या डोक्यात पुन्हा एक तीव्र सनक गेली होती. त्यामुळे त्याच्या डोक्यात असह्य वेदना होत होत्या. तेव्हाच अजयच्या डोळ्यासमोर चित्र विचित्र दृश्य दिसू लागले. अचनाक त्याच्या डोळ्यासमोर ती जुनी इमारत दिसू लागली. त्यानंतर त्याला याच्या डोळ्यांसमोर एक प्रयोगशाळा दिसली. नंतर एक लॉकेट......

            “अजय तू ठीक तर आहेस ना........” साध्वीने अजयला विचारले.

            “मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. आपण कॅन्टीन मध्ये जाऊ.” अस बोलून ते सर्व कॅन्टीन मध्ये गेले.

             “हं....बोल काय सांगायचं आहे तुला.” मयुरी म्हणाली.

            “मला वाटत कि मला एका प्रेतात्माच्या शक्ती विषयी समजल आहे.” अजय म्हणाला.

            “काय....!” समीर.

            “हो!” अजय.

           “कस काय समजल तुला.” मयुरी थोडी काळजीच्या स्वरात बोलली.

            “मगाशी जेव्हा मी डोक्याला हात लाऊन खाली बसलो. तेव्हा माझ्या समोर मला काही दृश्य दिसले.” अजयने सांगितले.

           “काय दिसल तुला.” साध्वीने अजयला विचारले.

          “प्रयोगशाळा आणि लॉकेट......” मयुरी थोडी आश्चर्याने बोलली.

           “हो प्रयोगशाळा आणि लॉकेट.......” अजय म्हणाला.

          “पण आपण त्या प्रेतात्म्या कस हरवायचं.” समीरने विचारले.

          “ते त्या डायरीत लिहिलेलं असेल ना.” साध्वी मयुरीकडे बघून म्हणाली.

          “हो....लिहिलेलं असेल. पण त्यासाठी आपल्याला माझ्या घरी जाव लागेल.” मयुरी म्हणाली.

          “घरी का.........तू तर ती डायरी सोबतच ठेवते ना.” साध्वी.

         “ हो....पण आज मी ती डायरी मी घरीच विसरले.” मयुरी म्हणाली.

         “आपण आत्ताच जायचं का तुझ्या घरी.” समीर म्हणाला.

         “ठीक आहे. चला.” मयुरी म्हणाली आणि सगळे मयुरीच्या घरी जायला तयार झाले.

             सगळे मयुरीच्या घरी पोहचले. मयुरीने त्या तिघांना तिच्या खोलीत नेले. मयुरीने ती डायरी उघडली.

             “हे बघा....त्या लॉकेट विषयी इथे लिहिलेलं आहे.” मयुरी म्हणाली.

             “काय लिहिलेलं आहे. वाच बर.” अजय म्हणाला.

             “ह्यात अस लिहिलेलं आहे कि......त्या लॉकेट मध्ये असलेली शक्ती हि एखाद्याच अंतर्मनावर ताबा मिळवते आणि त्या शक्तीला जे मिळवायचं आहे ते त्या व्यक्तीच्या मार्फत मिळवते.” मयुरीने त्यात लिहिलेलं वाचत होती.

             “म्हणजे ती शक्ती अजयच्या अंतर्मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.” मयुरीला मधेच थांबवत साध्वी म्हणाली.

             “पुढे काय लिहील आहे...कस हरवायचं त्या शक्तीला.” समीरने विचारले.

             “ह्या डायरीत एव्हडच लिहिलेलं आहे. ह्या पुढे काहीच लिहिलेलं नाही.” मयुरी हळू आवाजात म्हणाली.  

             “आता काय करायचं.” समीर म्हणाला.

             “जर आज त्या प्राध्यापक मधुरिमा असत्या तर त्यांना तरी आपण विचारू शकलो असतो.” साध्वी म्हणाली.

             “पण ते हि शक्य नाही. त्या आता ह्या जगात नाही.” मयुरी म्हणाली.

             “प्लॅनचेट......” समीर म्हणाला.

             “प्लॅनचेट.....” साध्वीने प्रश्नार्थक नजरेने समीरकडे बघितले.

             “हो प्लॅनचेट........ प्लॅनचेट च्या मदतीने आपण कोणत्याही व्यक्तीच्या आत्म्याला काही वेळासाठी आपल्या जगात बोलावू शकतो.” समीर म्हणाला.

             “पण आपण ते करायचं कस.” मयुरीने विचारले.

             “मला माहित आहे. मी मोबाईलवर बघितलं होत.” समीर म्हणाल.

             “कुठे आणि कधी करायचं.” अजयने विचारले.

             “उद्या करू शकतो आपण. माझे आईल वडील उद्या गावाला जाणार आहे त्या मुळे मी घरी एकटाच असेल तेव्हा आपण करू.” समीर म्हणाला.

             “ठीक आहे. आपण उद्या समीरच्या घरी भेटू...” साध्वी म्हणाली.

             “आह........” अजयला पुन्हा तसाच त्रास सुरु झाला. त्याला पुन्हा तीच प्रयोगशाळा आणि ते लॉकेट दिसत होत.

             “अजय तू ठीक आहेस ना.” मयुरीने काळजीच्या स्वरात अजयला विचारले.

            “हो....पण पुन्हा तसाच त्रास झाला. तेच दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले.” अजय स्वतःला सावरत म्हणाला.

            “अजय तुला फक्त उद्या पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल.” मयुरी त्याला धीर देत म्हणाली.

क्रमशः

              उद्या समीरच्या घरी त्यांना मधुरिमा यांच्या आत्मा बोलवता येईल? जरी मधुरिमा तिथे आल्या तर त्या ह्यांना काही मदत करू शकतील? काय घडणार पुढे. त्यासाठी वाचत राहा रहस्य. आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.

         

  

                   

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kartik Shekhar Gawali

Student

Gemini♊️ 13/06 अंत ही आरंभ है!