Jan 29, 2022
कथामालिका

रहस्य भाग ५

Read Later
रहस्य भाग ५

भाग ५ 

सूचना :- हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ह्या कथेतील पात्रांचा तसेच स्थळांचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

भाग ४ पासून पुढे.....

           “ठीक आहे तर. आपण उद्या ह्या सगळ्या वस्तू घेऊन इथेच भेटू. तोपर्यंत अजय तू त्या हॉलचा शोध घे.मयुरी म्हणाली.

             अस बोलून ते चौघ तिथून आपापल्या घरी जातात. घरी गेल्यावर समीर आणि साध्वी त्यांच्या घरी असलेल गंगाजलची बाटली आपल्या बॅग मध्ये ठेवतात. जेणे करून उद्या कॉलेजला जाताना ते विसरणार नाहीत. इकडे मयुरी सुद्धा तिच्या घरात असलेला चाकू तिच्या बॅग मध्ये ठेवला होता. आता उरलेलं काम अजयला करायचं होत. त्याल त्याच्या विद्येने त्या हॉलची माहिती काढायची होती.

                      अजय घरी आपल्यावर फेश झाला व लगेच मेडीटेशन करायला बसला. अजय ने डोळे बंद केले. खाली जमिनीवर पद्मासन घालून, गुठ्घ्यावर हात ठेऊन तो मेडिटेशन करायला बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. अजय त्या स्तीतीत एक सिद्धपुरुष भासत होता.

               अजयला मेडिटेशनला बसून किमान एक तास उलटून गेला होता. अजयला आता त्याच्या डोळ्यांसमोर ती इमारत दिसत होती. हळू हळू तो त्याने इमारतीमध्ये प्रवेश केला. त्या इमारतीत प्रवेश केल्यावर तो चालत चालत त्या वर्गाजवळ गेला. जिथे ते पहिल्या दिवशी गेले होते. अजयने हळूच तो दरवाजा लोटला. दरवाज कर्रर्रर्रर्र आवाज करत उघडला.

                 त्याला तो वर्ग थोडा बदलल्या सारख्या वाटत होता. तो वर्ग त्यांच्या कॉलेजच्या वर्गासारखा वाटत होता. त्या वर्गात आता त्या सर्व वस्तू नव्हत्या. तो वर्ग एकदम व्यवस्तीत आणि नीटनेटकेपणे आवरलेला होता. अजयच लक्ष त्या वर्गात असलेल्या कॅलेंडरवर नजर गेली. ते कॅलेंडर १९७५ चे होते. तो ते कॅलेंडर बघतच होता कि त्याला मग्न कसला तरी आवाज आला आणि त्याने मागे वळून बघितले. मागे वळून बघताच त्याला एका सावली त्याला दिसली. ती सावली वरच्या मजल्याच्या दिशेने जात होती. अजयने त्या सावलीला वरच्या दिशेने जाताना बघितले.अजय सुद्धा त्या सावलीच्या पाठीमागे गेला. ती सावली ३ऱ्या मजल्यावर पोहोचली होती आणि त्या सावलीचा पाठलाग करत अजय सुद्धा ३ऱ्या मजल्यावर पोहचला. ती सावली तिथे असलेल्या एका मोठ्या दरवाज्याजवळ येऊन उभी राहिली होती. त्या सावली अजयच्या दिशेने वळली आणि अजय कडे बघून एक स्मित हास्य देत हवेत विरून गेली.

                    ती सावली नेमक कोण होती आणि ती इथे येऊन का थांबली. काय असेल ह्या दरवाज्याच्या मागे. असे प्रश्न अजयला पडू लागले होते. अजय हळू हळू त्या दरवाज्या जवळ गेला. अजयने हळूच तो दरवाजा ढकलला. तो दरवाजा उघडला आणि समोर एक मोठा हॉल होता. अजयने त्या हॉलमध्ये प्रवेश केला. त्या हॉलच्या चारही बाजूना अंधार पसरला होता. अजयने इकडे तिकडे बघितले. त्या त्या हॉलच्या एका दिशेला काहीतरी चमकणार दिसल. अजय त्या दिशेला जाऊ लागला.

               आता त्याला ती वस्तू स्पष्ट पणे दिसत होती. तिथे ठेवलेली वस्तू म्हणजे तो मुकुट होता.

                “म्हणजे हाच तो हॉल आहे. ज्याच्या बद्दल मयुरी सांगत होती.” अजय म्हणाला.

           अजयला आता तो हॉल कुठे आहे हे समजले होते. अजय मेडिटेशन मधून बाहेर आला. त्याने मोबाईल बघितला तर सकाळचे ७ वाजले होते. अजय फ्रेश झाला आणि कालेजला जायला घरातन बाहेर पडला.

            इकडे मयुरी, समीर आणि साध्वी सुद्धा त्यांच्या घरून निघाले होते. तोड्याच वेळात सगळे कॉलेजमध्ये पोहचले. आज कुठलेच लेक्चर करायचे नाही हे त्यांनी आधीच ठरवले होते.

              “अजय तुला त्या हॉल विषयी काही समजल.” मयुरीने अजयला विचारले.

             “हो..! तो हॉल त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे.” अजयने सांगितले.

             “ठीक आहे.... तुम्ही दोघांनी गंगाजल आणल.” मयुरीने समीर आणि साध्वीला विचारले.

             “हो...” समीर आणि साध्वीने होकार दिला.

          “चला तर मग......” समीर एक्साईट होऊन म्हणाला.

           “एक मिनिट.......” मयुरी समीरला थांबवत म्हणाली.

            “काय झाल.” साध्वीने विचारले.

            “त्या इमारतीत जायच्या आधी आपल्याला ह्या चाकुला मंत्रित करून घ्यावे लागेल.” मयुरी म्हणाली.

            “ठीक आहे.....” अस बोलत समीरने त्याच्या बॅगमधून एक बाटली काढली. अर्थातच त्या बाटलीत गंगाजल होते.

                मयुरीने तिच्याकडे असलेला चाकू बाहेर काढला. मयुरीने समीरकडे असलेली बाटली घेतली आणि समोर असलेला चाकुवर ते गंगाजल टाकले. त्यानंतर मयुरीने ती डायरी उघडली आणि त्यात लिहिलेला मंत्र पुटपुटू लागली. मंत्र पुटपुटताच तो चाकू काही मिनिटासाठी सोनेरी रंगाचा झाला. त्या चाकुवर आता एक वेगळीच चमक होती. मयुरीने तो चाकू हातात घेतला आणि ते त्या इमारतीच्या दिशेने जाऊ लागले.

                    त्या चौघाने आता इमारतीत प्रवेश केला होता. तो हॉल कुठे आहे हे माहित असल्याने अजय सगळ्यांच्या पुढे चालत होता. अजयच्या पाठीमागे मयुरी चाकू घेऊन चालत होती. तर मयुरीच्या मागे साध्वी आणि साध्वीच्या मागे समीर अश्या क्रमाने ते चालत होते. अजय दबक्या पावलाने वरती जात होता. अजयच्या मागे हे तिघे जात होते.

                ते चौघे आता त्या हॉलच्या दरवाज्य समोर येऊन उभे राहिले. अजयने पुढे होत तो दरवाजा उघडला. त्या हॉलच्या चारही बाजूना अंधार पसरला होता. समीरने त्याच्या मोबाईलची टॉर्च लावली. समीरने त्या टॉर्चचा प्रकाश आजूबाजूला फिरवला असता त्याला तिथे एक स्वीच बोर्ड दिसला. समीरने त्या स्वीच बोर्ड वरील काही बटन दाबताच त्या हॉलचे लाईट सुरु झाल. लाईट लागताच मयुरीने आपली नजर त्या हॉलच्या चारही बाजूना फिरवली. तेव्हड्यात तिला एका बाजूला तो मुकुट ठेवलेला दिसला.

                    मयुरी त्या मुकुटाचा दिशेने जाऊ लागली. मायुरी त्या मुकुटाजवळ पोहोचणारच होती कि तिला कोणीतरी जोऱ्यात धक्का दिला आणि ती ३-४ फुट मागे जाऊन पडली. तिच्या हातातला तो चाकू बाजूला जाऊन पडला. सगळे मयुरीच्या दिशेने गेले. तेव्हड्यात त्यांच्या समोर एक काळी सावली प्रकट झाली. त्या सावलीने जणू काही संपूर्ण अंगावर काळ्या रंगाचे कपडे घातले होते. त्या सावलीचे फक्त लाल डोळे त्या काळ्या रंगावर उठून दिसत होते.

            “तुम्ही काय मारणार मला..... आता काही वेळातच त्या मुकुटात असलेली माझी शक्ती मला परत मिळणार आहे.” ती सावली म्हणाली.

           “तुला तुझी शक्ती परत मिळायच्या आत आम्ही तुला संपवून टाकू.” अस बोलून अजयने बाजूला पडलेला चाकू उचलला आणि त्या मुकुटाच्या दिशेने पळाला.

              अजायला त्या मुकुताच्या दिशेने जाताना बाघातच. त्या सावलीने आपला एक हात हवेत भिरकावला कि अजय जोऱ्यात मागे एका भिंतीवर गेऊन आदळला.

                 आता ती सावली त्या मुकुटाच्या समोर जाऊन उभी राहिला. आपले हात हवेत वर करत ती सावली काहीतरी मंत्र पुटपुटू लागली. मंत्र म्हणताच तो मुकुट हवेत उडू लागला आणि त्या मुकुटातून एक कळपट रंगाचा धूर बाहेर निघून त्या सावलीच्या शरीरात जाऊ लागला.

             मयुरीला वाटले कि आता आपण हरलो. कि तेव्हड्यात साध्वीने तिच्या कडचे गंगाजल त्या सावलीवर फेकले. गंगाजल त्या सावलीवर पडताच ती सावली जोऱ्यात किंचाळली. तो मुकुट आता हवेतून खाली पडला होता. त्या सावलीने साध्वी कडे वळून बघितले आणि तिच्यावर झेप घेतली आणि गळा पकडला. त्या सावलीने साध्वीला जमिनीपासून ३-४ फुट वर उचले होते.

                    ती सावली त्या मुकुटापासून दूर झालेली बघतच समीरने तो चाकू हातात घेतला आणि त्या मुकुटा जवळ गेला. समीरने त्या सावलीला एक शेवटची हाक मारली. सावलीने मागे वळून बघितले. समीरला त्या मुकुटा जवळ बघताच त्या सावलीने साध्वीला बाजूला फेकले आणि समीर कडे झेप घेणारच कि तेव्हड्यात समीरने त्या चाकूने मुकुटावर वार केला. त्या मुकुटावर वार करताच जोऱ्यात एक आवाज झाला आणि ती सावली हवेत विरून गेली.

             साध्वीने वेळेवर त्या सावलीवर गंगाजल फेकून हरलेली बाजी अर्धी जिकून घेतली होती. त्या नंतर समीरने संधी साधून तो मुकुट नष्ट केला आणि उरलेली बाजी त्याने जिकली.

क्रमशः

त्या चौघांनी मिळून  प्रेतात्माना संपवले होते. पुढे येणारा काळ त्यांच्यासाठी संकट घेऊनच येणार असेल का? त्या संकटावर चौघे मात करू शकतील का? जाणून घेण्यासाठी वाचत राहा रहस्य. भेटूया पुढच्या भागात आणि हो... आपली प्रतिक्रया कळवायला विसरू नका.             

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kartik Shekhar Gawali

Student

Gemini♊️ 13/06 अंत ही आरंभ है!