Jan 29, 2022
कथामालिका

रहस्य भाग ४

Read Later
रहस्य भाग ४

भाग ४सूचना :- हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ह्या कथेतील पात्रांचा तसेच स्थळांचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.भाग ३ पासून पुढे.....                  ती अंगठी नष्ट केल्यानंतर ते चौघ तिथून निघून घरी जातात. घरी गेल्यानंतर साध्वी तिचा कॉलेजचा अभ्यास करते. तर मयुरी त्या डायरीत अजून काय लिहिलेलं आहे हे बघत असते. इकडे समीरला आज त्याच्यासोबत जे घडले होते ते बघून तो भांबावून गेला होता. त्या मुळे तो घरी आपल्यावर आपल्या बिछान्यावर पडताच झोपी गेला होता आणि अजय हा घरी गेल्यावर मेडिटेशन करायला बसला होता.                 अजय साधारण ७ ते ८ वर्षांपासून मेडिटेशन करत होता. इतक्या वर्षाच्या मेडिटेशन मुले त्याला एक विद्या प्राप्त झाली होती. ती विद्या म्हणजे तो मेडिटेशनद्वारे तो कोणाच्याही अंतर्मनात प्रवेश करू शकत होता. तर एखादी वस्तू कुठे आहे ते बघू शकत होता. ४ तासाच्या मेडिटेशन नंतर आपल्या कामत व्यस्त झाला.                   रात्रीचे ११:३० वाजले होते. मयुरी एका बंद खोलीत होती. मयुरीला त्या खोलीमध्ये भीती वाटत होती. भीती मुळे तिच्या कपाळावर घामाचे थेंब आले होते. त्यातलाच एक थेंब तिच्या कपाळावरून ओघळत तिच्या गालावरून खाली पडला. त्या खोलीत एवढी शांतता होती कि त्या खाली पडलेल्या थेंबाचा आवज पूर्ण खोलीत घुमत होता. अचानक तिला समोर काहीतरी चमकत आहे अस जाणवल. मयुरी त्या दिशेने चालत जात होती. ती चमकणारी वस्तू आता हळूहळू तिच्या जवळ येत होती. मयुरी त्या वस्तू जवळ पोहोचली होती. ती वस्तू म्हणजे तो मुकुट होता.            “हा मुकुट इथे कस काय?मयुरी.                  तेव्हड्यात तिच्या मागू कोणीतरी गेल अस तिला जाणवल आणि तिने मागे वळून बघितल. पण तिथे कोणीच नव्हते. तीने पुन्हा त्या मुकुटावर नजर वळवली. आज तो मुकुट त्या दिवशी पेक्षा जास्त चमकत होता. त्या मुळे मयुरीला तो मुकुट हातात घेण्याचा मोह आवरेनासा झाला आणि तिने तो मुकुट हातात घेतला. मुकुट हातात घेता तिला असे वाटले कि तिच्या कडे कोणीतरी बघत आहे. तेव्हड्यात तिथे कसलातरी आवज झाला आणि तिने मागे वळून बघितले. मागे वळून बघताच तिच्यावर कोणीतरी झडप घातली आणि ती घाबरून झोपेतून उठली.          “खूपच वाईट स्वप्न होत.” मयुरी मोठमोठ्याने श्वास घेत स्वतःशीच बोलली.                मयुरीने आपला मोबाईल बघितला. सकाळचे ७ वाजले होते. मयुरी बेड वरून उठली आणि कॉलेजला जाण्यासाठी तयार होण्यासाठी गेली. मयुरी कॉलेजला जाण्यासाठी तयार होती. पण तिच्या मनात तिला पडलेल्या स्वप्नाविषयीचे विचार चालू होते. मयुरी कॉलेजमध्ये पोहोचली होती.                वर्गात मानसशास्त्र या विषयाचे लेक्चर चालू होते. मयुरी आपल्याच विचारात गुंग होती. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे ह्याच्या कडे तीच लक्ष नसाव बहुतेक.            “काय ग मयुरी काय झाल. कसला विचार करते आहे एव्हडा.” साध्वीने मयुरीला विचारले.              “अ... नाही काही नाही.” मयुरी.                मयुरी, साध्वी काय गप्पा चालू आहे तुमच्या. वर्गात गप्पा मारण्यासाठी आल्या असाल तर वर्गातन बाहेर जा...! जोशी सर त्यांना ओरडले.             जोशी सर.! वयाने ५५ – ५६ वयाचे असतील. केस थोडे पिकलेले. डोळ्यांवर चष्मा. गेल्या कोत्तेक वर्षांपासून या कॉलेज मध्ये ते मानसशास्त्र हा विषय शिकवत होते.             “सर मला एका विचारायचं होत.” मयुरी म्हणाली.             “विचार....काय विचारयच आहे.” जोशी सर.             “सर आपल्या कॉलेजमध्ये एक प्रशस्त असा हॉल आहे का? जो खूप वर्षांपासून बंद आहे.” मयुरीने विचारले.              “अ.....नाही! आपल्या कॉलेजमध्ये तरी असा कुठलाही हॉल नाही जो खूप वर्षांपासून बंद आहे. पण बहुतेक त्या जुन्या इमारतीत असेल एखादा हॉल. पण तुला का पाहिजे आहे त्या हॉलची माहिती.” जोशी सर बोलले.           “काही नाही...... असच विचारल सर!” मयुरी म्हणाली.                       ट्रिंगऽऽऽऽऽऽऽऽऽ. तेव्हड्यात लेक्चर संपल्याची बेल वाजते.            “काय ग.....तू त्या हॉल विषयी का विचारल सरांना.” साध्वीने मयुरीला विचारले.            “आधी अजय आणि समीरला बोलावून घे.” मयुरी म्हणाली.                          थोड्या वेळाने.............           “काय ग.....काय झाल. अस अचानक का बोलावल.” अजय म्हणाला.           “मला एकाप्रेतात्मा विषयी माहिती मिळाली आहे.” मयुरी म्हणाली.            “काय.......कुठे आणि कस काय समजल तुला.” समीरने विचारले.            “अरे काल रात्री मला स्वप्नात दिसल सगळ.” मयुरी म्हणाली.            “काय दिसल तुला स्वप्नात.” अजय.             “मी एका मोठ्या हॉलमध्ये आहे आणि माझ्या समोर तो मुकुट ठेवलेला आहे. पण तिथे अजून कोणीतरी होत.” मयुरी सांगते.             “ओ.... म्हणून ती सरांना हॉल विषयी विचारत होतीस.” साध्वी.             “हो.....पण मला समजत नाही कि तो हॉल आपण शोधायचा कसा. ती इमारत केव्हढी मोठी आहे. त्यात तो हॉल कुठे असेल.” मयुरी म्हणाली.                इतक्या वेळ अजय शांतपणे सगळ एकत होता.           “मी शोधू शकतो.” इतक्याव वेळ शांत असलेला अजय म्हणाला.

           “कस काय?” मयुरी म्हणाली.           “मी मेडिटेशन करतो आणि मेडिटेशन मुळे मला एक विद्या प्राप्त झाली आहे.” अजय म्हणाला.            “कोणती विद्या आहे?” मयुरीने विचारले.            “मी ह्या विद्येने कोणाच्याही अंतर्मनात बघू शकतो किवा एखाद्या वस्तूचा शोध घेऊ शकतो.” अजयने सांगितले.         “जरी आपण त्या खोलीचा आणि त्या मुकुटाचा शोध घेतला. पण आपण त्या मुकुटाला आणि प्रेतात्माला संपवणार कस.” समीर म्हणाला.        “त्यासाठी आपल्याला एक चाकू आणि गंगाजल लागेल.” मयुरी म्हणाली.        “चाकू आणि गंगाजल......!” साध्वी म्हणाली.         “हो...! त्या चाकुला गंगाजलने शुद्ध करायचं आणि हा मंत्र म्हणून तो अभिमंत्रित करावा लागेल. तेव्हाच आपण त्या मुकुटाला आणि प्रेतात्माला संपवू शकू.” मयुरी म्हणाली.       “अजय तुला त्या हॉलचा शोध घ्यायला किती वेळ लागेल.” साध्वीने अजयला विचारल.         “मला किमान एक दिवस तरी लागेल.” अजयने सांगितले.            “ठीक आहे तर. आपण उद्या ह्या सगळ्या वस्तू घेऊन इथेच भेटू. तोपर्यंत अजय तू त्या हॉलचा शोध घे.” मयुरी म्हणाली.क्रमशः               काय होईल पुढे? अजय त्या हॉलचा शोध घेऊ शकेल? ते चौघ मिळून त्या प्रेतात्माला संपवू शकतील.....? तो पर्यंत वाचत रहा रहस्य. आणि हा भाग कसा वाटला हे कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kartik Shekhar Gawali

Student

Gemini♊️ 13/06 अंत ही आरंभ है!