Jan 29, 2022
कथामालिका

रहस्य भाग ३

Read Later
रहस्य भाग ३

भाग ३

सूचना :- हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ह्या कथेतील पात्रांचा तसेच स्थळांचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

भाग २ पासून पुढे....

             “काय...! म्हणजे समीर चा जीव धोक्यात आहे. आपल्याला त्याला वाचवायला पाहिजे.” मयुरी.

            “पण तो आहे तरी कुठे.” साध्वी.

             “थांब मी त्याला कॉल करतो.” अजय.

          अस बोलून अजय समीरला कॉल करतो.

           “ओह...शीट! त्याचा फोन बंद येतो आहे.” अजय.

          “आता काय करायचं. कुठे शोधायचं त्याला.” मयुरी.

           “त्याच्या घरी कॉल करून बघ बर. कदाचित तो घरी गेला असेल.” साध्वी म्हणाली.

           “हो...माझ्या कडे त्याच्या घरचा नंबर आहे. मी करतो कॉल.” अस बोलू अजय समीर च्या घरी कॉल करतो. फोन समीरची आई घेते.

            “हॅलो...! कोण बोलत आहे.” समीरची आई.

             “हॅलो.....मावशी मी अजय बोलतो आहे. समीरचा मित्र.” अजय म्हणाला.

               “हो...बोल अजय.” समीरची आई.

             “मावशी समीर घरी आला आहे का.” अजयने समीरच्या आईला विचारले.

                “नाही रे...तो घरी नाही आला.” समीरची आई.

              “ठीक आहे. कदाचित तो कॉलेज मध्येच असेल.” अस बोलून अजय फोन ठेवतो.

              “तो घरी पण नाही गेला आहे.” अजय.

               “मग गेला तरी कुठे......”  साध्वी म्हणाली.

           “आपण त्याच्या दुसऱ्या मित्रांना विचारू. त्यांना माहित असेल तो कुठे आहे.” मयुरीच्या बोलण्याला दुजोरा देत अजय आणि साध्वी मयुरी सोबत त्याला शोधायला सुरवात करतात.

              “धनश्री तू समीरला बघितल का?” अजय

           “नाही रे....मी नाही बघितल त्याला.” धनश्री.

           “अक्षय तू समीरला बघितल का रे कुठे?” मयुरी

            “नाही ग....”  अक्षय.

           अस एक एक करत ते तीघ त्यांच्या सर्व मित्रांना विचारतात.

           “तुम्हाला काही समजल का?” अजयने साध्वी आणि मयुरीला विचारले.

           “नाही रे....कोणालाच नाही माहित तो कुठे आहे.” साध्वी म्हणाली.

           “ए.....आपण ह्याला नाही विचारल.” मयुरी प्रतिक कडे बघत म्हणली.

            “पण त्याला माहित असेल का?” अजय म्हणाला.

             “विचारून बघायला काय हरकत आहे.” मयुरी म्हणाली.

             “ठीक आहे.....चल विचारू.” अजय म्हणाल.

              “प्रतिक......तू समीरला बघितल का रे?” मयुरीने प्रतीकला विचारल.

              “हो....तो ना त्या जुन्या इमारतीकडे जात होता. मी त्याला आवज दिला तर त्याने माझ्याकडे बघिलच नाही.” प्रतीकचे बोलणे एकताच ते तिघे त्या जुन्या इमारतीकडे पळतच निघाले. तिकडे समीर त्या इमारतीत प्रवेश करणारच होत कि अजय ने त्याला मागे खेचले.

              “मी इथे कस काय आलो.” समीर शुद्धीवर येत म्हणाला.

             “तुझा.....तुझा हात बघू.” मयुरी.

                 समीरच्या हातात ती अंगठी होती.

              “हि अंगठी तुला कुठून मिळाली.” मयुरीने विचारल.

             “अग हि जुनी अंगठी आहे.” समीर थोडा अडखळतच बोलला.

              “खर खर सांग. कुठून मिळाली हि अंगठी तुला.” साध्वी समीरला धमकावतच म्हणाली.

               “हो सांगतो.....सांगतो. हि अंगठी मी त्या दिवशी मूर्तीच्या हातातून काढून घेतली होती.” समीरने सांगितले.

                अस बोलताच त्या जुन्या इमारतीचे दार धाडकन उघडतात. त्याच क्षणी इमारतीतन दोन हात बाहेर येतात आणि पापणी लावताच समीरला पकडून जोऱ्यात आत घेऊन जातात. ते इतक्या पटकन झाले कि अजय,साध्वी आणि मयुरीला समजलेच नाही कि तिथे काय घडले.

            “काय होत ते.” अजय आश्चर्यचकित होत म्हणाला.

            “नक्कीच ते त्या प्रेतात्म्याच काम असे.” मयुरी म्हणाली.

            “जर हे त्या प्रेतात्म्याच काम असेल तर आपल्याला समीरल वाचवाव लागेल.” साध्वी म्हणाली.

                   “पण आपण त्याला वाचवणार कस. ते प्रेतात्मा आपल्या पेक्षा जास्त शक्तिशाली आहेत.” अजय म्हणाला.

                “नाही....! ते प्रेतात्मा तेव्हाच शक्तिशाली होऊ शकतात तेव्हा त्यांना त्यांच्या शक्तीचा तुकडा परत मिळेल.” मयुरी म्हणाली.

             “म्हणजे अजय कडे जी अंगठी आहे ती त्या प्रेतात्म्याला हवी आहे.” साध्वी म्हणाली.

              “हो.....! आपल्याला त्या अंगठीला संपवावं लागेल. म्हणजे ते प्रेतात्मा नष्ट होतील.” मयुरी म्हणाली.

         “पण आपण त्या प्रेतात्म्याला संपवणार कस.” अजयने विचारले.

             “हे बघ. ह्या डायरीत त्या अंगठी विषयी लिहिलेलं आहे. त्यांनी ह्यात अस लिहिलेल आहे कि जर त्या अंगठीला संपवण्यासाठी त्या मूर्तीच्या हातातील सुरीने त्या अंगठीवर वार कराव लागेल.” मयुरीती डायरी दाखवत म्हणाली.

             “चला मग. लवकर त्या अंगठीला संपवून टाकू.” अजय म्हणाला.

               “हो...! पण आपल्याला सावध रहाव लागेल. तो प्रेतात्मा काहीही करू शकतो.” मयुरी म्हणाला.

               अस म्हणून ते त्या इमारतीत प्रवेश करता. त्या इमारतीत प्रवेश करताच त्या तिघांना असे वाटले कि कोणी त्यांच्यावर नजर ठेऊन आहे. ते तीघ आता त्या वर्गाच्या दिशेने जात होते कि अचानक अजय मागे वळाला.

             “काय झाल अजय.” साध्वीने अजयला विचारले.

              “नाही.... काही नाही.” अजय म्हणाला.

                 अस म्हणून ते पुन्हा त्या वर्गाच्या दिशेने चालू लागले. ते त्या वर्गात पोहचलेच होते कि ते समोर बघता तर काय....!  ती मूर्ती तिथून गायब होती.

              “इथे असलेली मूर्ती तर गायब आहे.” अजय म्हणाला.

            “आता आपण त्या मूर्तीला शोधायचं कस.” मयुरी म्हणाली.

             “सोप्प आहे...!” साध्वी.

             “कस काय?” मायुरीने विचारले.

             “हे बघ त्या मूर्तीला इथून जेव्हा नेण्यात आल असेल तेव्हा हे ओरखडे जमिनीवर पडले असावे. जर आपण ह्या ओरखाद्यांचा पाठलाग केला तर ती मूर्ती कुठे आहे समजेल.” साध्वी म्हणाली.

                मयुरी आणि अजय साध्वीच्या बोलण्या प्रमाणे त्या ओरखद्यांच्या दिशेने जाऊ लागतात. चालत चालत ते एका मोठ्या हॉलमध्ये पोहचतात.

             “ती बघ...... समोर आहे मूर्ती.” अजय मूर्तीकडे बघत म्हणाला.

                        अजय त्या मूर्तीच्या दिशेने जाऊ लागतो कि तो जोऱ्यात मागे फेकल्या जातो.

           तेव्हड्यात एक क्रूर हास्याचा आवज त्या संपूर्ण हॉलमध्ये पसाराला.

        “हाहाहाहाहा...........तुम्ही मारणार मला....! आधी तुमच्या मित्रालातर वाचवून दाखव.” ते प्रेतात्मा भेसूर आवाजात बोलत असत.

              “अरे जे डरपोक असतात ते लपून वार करतात.” अजय म्हणाला.

             “काय.....! तू मला डरपोक म्हणतो आहेस.”

                    असे शब्द कानावर पडताच तिथे जोऱ्याचा वारा सुटला. त्यांच्यासमोर एक अंधुकशी काळी आकृती त्यांच्यासमोर प्रकट झाली व जोरजोरात हसू लागली. ते तिघे त्याला बघून जरासे घाबरले.

             “तर तू आहेस तो.” अजय म्हणाला.

            “हो मीच आहे.” प्रेतात्मा

             “आमचा मित्र कुठे आहे.” साध्वी म्हणाली.

             “मारण्याच्या आधी त्याला बघायचं असेल ना..... घ्या बघून त्याला...... शेवटच.....!” अस बोलून ती प्रेतात्मा आपला हात हवेत फिरवते. तेव्हड्यात समीर हवेत प्रकट होतो.

           “वाचवा मला.......वाचवा.” समीर ओरडत होता.

           “अरे शेवटच कोण कोणाला बघत ते आपण बघूच.” अजय त्या प्रेतात्माला म्हणाला.

             अस बोलून अजय त्या प्रेतात्मा वर एक झडप घालतो कि इकडे समीर जमिनीवर पडतो.

               मयुरी आणि साध्वी समीरच्या दिशेने जातात.

             “समीर तू ठीक आहेस ना.” मयुरी समीरला म्हणाली.

             “हो मी ठीक आहे. पण....अजय!” समीर म्हणाला.

                      इकडे अजय त्या प्रेतात्म्याशी लढत असतो. प्रेतात्मा त्याच्या शक्तींनी अजयला हवेत इकडन तिकडे फेकत होता. पण अजय काय हार मानायला तयार नव्हता. प्रेतात्मा अजयशी लढण्यात व्यस्त असतानाच साध्वी लपून त्या मूर्ती जवळ पोहचते आणि त्या मूर्तीच्या हातातून ती सुरी घेते.

                           सुरी घेऊन साध्वी मयुरी आणि समीर कडे जाते. इकडे समीरने त्याच्या हातातन ती अंगठी काढून जमिनीवर ठेवलेली असते.

              साध्वी त्या प्रेतात्माला आवाज देते आणि जमिनीवर ठेवलेल्या त्या अंगठीवर वार करते. अंगठीवर वार करताच त्या अंगाठीतन मोठा प्रकाश बाहेर पडतो आणि ती प्रेतात्मा मातीसारखी हवेत गायब होऊन जाते.

क्रमशः

आता काय होणार पुढे...... समीर, अजय, साध्वी आणि मयुरी यांच्यावर अजून संकट येतील का? त्यासाठी वाचत रहा रहस्य . आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या भागात. 

 

           

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kartik Shekhar Gawali

Student

Gemini♊️ 13/06 अंत ही आरंभ है!