Jan 29, 2022
कथामालिका

रहस्य भाग २

Read Later
रहस्य भाग २

भाग २

सूचना :- हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ह्या कथेतील पात्रांचा तसेच स्थळांचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

भाग १ पासून पुढे.....

             “नाही हे नाही होऊ शकत. मला हे सर्वाना सांगावे लागेल. पण आता सगळे झोपले असतील. उद्या कॉलेज मध्ये भेटूनच सांगते.” मयुरी चिंतेत म्हणाली.

           सकाळ होते. मयुरी लवकर उठून तयार होते आणि कॉलेजसाठी घरातन निघते. मयुरीला कॉलेज मध्ये जाताना रस्त्यात साध्वी भेटते.

           “गुड मॉर्निंग मयुरी.” साध्वी म्हणाली.

             “गुड मॉर्निंग.” मयुरी.

           “काय ग चेहऱ्याचा रंग का उडालेला दिसतो आहे.” साध्वीने मयुरीला विचारले.

          “अग काल त्या इमारतीतन निघताना मी ती डायरी सोबत घेऊन आले होते. घरी गेल्यावर मी ती डायरी वाचली आणि मला त्या डायरी विषयी अशी काही माहिती मिळाली आहे कि जेव्हा मी तुला सांगेल तेव्हा तुझ्याही चेहऱ्याचा रंग उडेल.” मयुरी साध्वीला म्हणाली.

           “अशी काय माहिती तुला मिळाली आहे.” साध्वीने मयुरीला उत्सुकतेने विचारले.

           “आधी कॉलेजमध्ये चल. आपल्याला अजय आणि समीरला सुद्धा ह्या विषयी सांगाव लागेल.” मयुरी म्हणाली.

              अजय आणि समीर कॉलेजमध्ये केव्हाच पोहचले होते.

         “मॉर्निंग समीर.” अजय.

          “मॉर्निंग.” समीर.

         “तुझी अंगठी मस्त आहे रे. कधी घेतलीस.” अजयने समीरला विचारले.

         “अरे हि तर जुनी अंगठी आहे.” समीर.

          तेव्हाच तिथे साध्वी आणि मयुरी येतात.

          “मॉर्निंग साध्वी आणि मयुरी.” अजय.

           “मॉर्निंग.” साध्वी.

       “काय ग मयुरी एव्हडी टेन्शनमध्ये का दिसते आहेस.” अजय.

         “मला तुम्हाला या डायरी विषयी काहीतरी सांगायचं आहे.” मयुरी.

            तेव्हड्यात कॉलेज ची बेल वाजते.

          “तुला जे काही सांगायचं आहे. ते आपण कॉलेज सुटल्यावर कॅन्टीनमध्ये बसून बोलू.” अजय म्हणाला.

               अस बोलून चौघे लेक्चर करतात आणि कॉलेज सुटल्यावर कॅन्टीनमध्ये भेटतात.

        “बोल ग मयुरी. काय सांगायचं होत तुला.” अजय म्हणाला.

        “अरे थांब. समीरला तर येऊ दे.” मयुरी.

                  “त्याला यायला एव्हडा उशीर का होतोय. अजय समीर तुझ्याच सोबत होता ना.” साध्वीने अजयला विचारले.

               “अग नाही. तो चौथ्या लेक्चर पासून माझ्या सोबत नाही. आज सकाळी पण तो जरा वेगळाच वागत होता.” अजय म्हणाला.

                 “कदाचित त्याची तब्बेत बरी नसेल म्हणून तो घरी निघून गेला असेल.” साध्वी म्हणाली.

             “असच काहीस असेल. मयुरी तुला जे सांगायचं असेल ते तू आम्हाला सांग. मी समीर ला फोन करू सांगून देईन.” अजय म्हणाला.

                     “ठीक आहे. तर नीट लक्ष देऊन ऐका.” मयुरी सांगायला सुरवात करते.

                   जेव्हा आपण त्या इमारतीतन बाहेर आलो होतो. तेव्हा मी तिथून हि डायरी घेऊन आले होते. मी घरी गेल्यावर हि डायरी वाचली आणि मला तेव्हा समजल कि हि डायरी कोणी प्राध्यापक मधुरिमा यांची आहे. त्यांनी ह्या डायरीत त्या इमारती विषयी लिहिलेलं आहे.

          “काय लिहील आहे त्यांनी.” अजयने विचारले.

            “त्यांनी लिहिले आहे कि १९७५ मध्ये त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी प्रेतात्म्याना ह्या जगात बोलव होत. त्या प्रेतात्म्याची शक्ती इतकी होती कि त्यांनी त्या विद्यार्थ्यांना मारून टाकले. त्या प्रेतात्म्याना पुन्हा त्यांच्या जगात पाठवण अशक्य झाले होते. तेव्हा मधुरिमा यांनी काही सिद्धपुरुषांच्या मदतीने त्या प्रेतात्म्याचे तुकडे करून ह्या डायरीत आणि काही वस्तूंमध्ये बंद केले.” मयुरीने सांगितले.

          “पण त्यांनी त्या प्रेतात्म्याचे तुकडे का केले असतील.” साध्वीने विचारले.

          “त्यांनी ह्यात असे लिहिले आहे कि त्या प्रेतात्म्याची शक्ती इतकी होती कि त्या प्रेतात्म्याना ह्या डायरीत बंद करणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी त्या प्रेतात्म्याचे तुकडे केले. जेणे करून त्याची शक्ती कमी झाली आणि त्यांना ह्या डायरीत बंद करणे शक्य झाले.” मयुरी म्हणाली.

            “जर त्यांनी त्या प्रेतात्म्याचे तुकडे केले होते आणि ते तुकडे काही वस्तूंमध्ये बंद केले होते. तर त्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कुठे आहेत.” अजयने विचारले.

         “आपण त्या वर्गात ज्या वस्तू बघितल्या होत्यान.” मयुरी.

                “म्हणजे त्या सर्व वस्तूंमध्ये ह्या प्रेतात्म्याच्या शक्तीचे काही तुकडे आहेत.” अजय मधेच म्हणाला.

                   “हो..! आणि यांनी पुढे असे लिहिले आहे कि जर भविष्यत कोणी हि डायरी उघडली तर ते प्रेतात्म्या त्या डायरीतन मुक्त होतील आणि आपल्या शक्तीचे तुकडे शोधतील व जे त्यांना ह्या डायरीतन मुक्त करतील त्याचा ते जीव घेतील.” मयुरी म्हणाली.

        “म्हणजे आपण हि डायरी उघडली आहे आणि आता आपला जीव धोक्यात आहे.” साध्वी चिंतेच्या स्वरात म्हणाली.

          “मग आता आपण काय करायचं.” अजय म्हणाला.

            “घाबरू नका. त्यांनी ह्या डायरी मध्ये त्या प्रेतात्म्याना कसे हरवायचे ते लिहिलेलं आहे आणि त्यांची शक्तीचे तुकडे कोणत्या वस्तून मध्ये आहे हे हि त्यांनी ह्यात लिहून ठेवले आहे. हे बघ जस कि हि अंगठी.” मयुरी ती डायरी दाखवत म्हणाला.

            “एक मिनिट....मी हि अंगठी कुठेतरी बघितली आहे.” अजय विचार किअर्त म्हणाला.

         “अरे त्या इमारतीच्या पुतळ्याच्या हातात हि अंगठी बघितली होती” साध्वी म्हणाली.

           “नाही ग! मी आजच हि अंगठी कोणाच्या तरी हातात बघितली आहे. हा...! आठवल. मी हि अंगठी समीरच्या हातात बघितली होती. आज सकाळी जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा.” अजय म्हणाला.

             “काय ..! म्हणज समीर चा जीव धोक्यात आहे.” मयुरी म्हणाली.

समीर ने घातलेली अंगठी हि तीच अंगठी असेल का? जर तीच अंगठी असेल तर हे

तिघे समीरला वाचवू शकतील.? त्यासाठी वाचत रहा रहस्य. भेटूया पुढच्या भागात.

क्रमशः

एक नोंद घ्यवी :- हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. सगळ फक्त लेखकाच्या मनातील विचार आणि Imagination ने लिहिलेलं आहे. त्यामुळे ह्या कथेत अशी वेळ येईल कि कथेतील असलेले प्रसंग खऱ्या आयुष्यात शक्य नाही. पण तेच तर एका लेखकाच काम असत.... आपल्याला एखाद्या नवीन दुनियेत घेऊन जाण्याच. जे आपल्या खरा आयुष्यात अनुभवू शकत नाही ते आपण ह्या कथेच्या दुनियेत अनुभवू शकतो....तर लेखकाच्या ह्या विश्वात गुंतून ते एन्जॉय करा....! बाकी आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.

धन्यवाद.

रहस्य

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kartik Shekhar Gawali

Student

Gemini♊️ 13/06 अंत ही आरंभ है!