राहिलेलं माहेरपण.. अंतिम भाग

कथा माहेरपणाला आसुसलेल्या माहेरवाशीणीची

राहिलेलं माहेरपण... भाग ३



हि अशी अचानक एकटी का आली असावी? योगेशला विचारावे का? असा विचार बाबा करत असतानाच त्यांचा फोन वाजला.. शोभाताईंनी खुणेने त्यांना बाहेर जायला सांगितले..
" बोल पार्थ.. आता अचानक फोन केलास.."
" बाबा शांतपणे ऐका.. पॅनिक होऊ नका.." पार्थ बोलताना रडत होता..
" काय झाले? पटापट बोल.."
" बाबा.. ताई.."
" तुला कसे कळले ती इथे आली आहे ते.."
"कसे शक्य आहे ते बाबा?"
"म्हणजे?"
" आताच जिजूंचा फोन आला होता.. आपल्याला सरप्राईज द्यायचे म्हणून ते सगळे निघाले होते.. मुलांना आईस्क्रीम हवे होते म्हणून ताई ते घ्यायला खाली उतरली.. तर पाठून येणाऱ्या गाडीने तिला उडवले.. ती जागच्या जागीच गेली.."
बाबांच्या हातून फोन गळून पडला.. ते आत गेले तर समिधा शांतपणे आईच्या मांडीवर झोपलेली दिसत होती.. तिने आणलेले सामान तसेच पडले होते.. त्यावरचे ओले रक्ताचे डाग काही वेगळेच सांगत होते.. काय खरे न काय खोटे हे समजेनासे होऊन ते तसेच बसले.. पण नंतर आपल्या लेकीच्या माहेरपणात बाधा येऊ नये म्हणून स्वतःच्या खोलीत जाऊन मूकपणे रडू लागले......





ही एक काल्पनिक कथा आहे.. कृपया तशीच घ्यावी.



सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई




🎭 Series Post

View all