राहिलेलं माहेरपण...
दारावरची बेल वाजली..
"आता या वेळेस बाई कोण आले असेल? अहो जरा दरवाजा उघडता का?" शोभाताईंनी आवाज दिला..
" मी पेपर वाचतो आहे.. तूच उघड.." समोरून उत्तर आले.. शोभाताईंनी हात धुवून दरवाजा उघडला.. समोर समिधा, त्यांची लेक उभी होती.. थोडी त्रासलेली.. अंगावर खरचटलेले.. स्वतःला पेलत नसलेली बॅग धरून..
" किती वेळ दरवाजा उघडायला?" तिने त्रासिक आवाजात विचारले..
" अग हो.. स्वयंपाकघरात होते.. यायला वेळ लागला.. पण तू अशी अचानक कशी? योगेश आणि मुले कुठे आहेत?"
" बाबा नाही का घरात? आणि मी एकटीने यायचे नाही का? आता घरात घेशील कि बाहेरच उभी राहू?"
" अग ये ना.. अहो.. बघा कोण आले आहे ते.." एव्हाना त्या दोघींचा संवाद घराने ऐकलेला असतो.. समिधाच्या भाचरांनी "आत्तू, आत्तू" असे म्हणत तिच्याभोवती नाचायला सुरुवात केली होती..
"माझ्यासाठी काय आणले?"
" त्या बॅगेत आहे.. उघडा आणि घ्या.."
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा