Jan 29, 2022
कथामालिका

रहस्य

Read Later
रहस्य

भाग १

 

  सूचना :- हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ह्या कथेतील पात्रांचा तसेच स्थळांचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

टीप :- हि कथा कथामालिका पद्धतीची आहे.

१ जुलै २००५, J.B.T. कॉलेज, नाशिक

           “अरे अजय कुठे चालला आहेस इतक्या घाईत.” समीरने अजयला विचारले.

              “अरे त्या साध्वीने काहीतरी गोधळ घातला आहे. चल लवकर.” अजयने समीरला सांगितले.

            अजय,समीर आणि साध्वी हे तिघ चांगले मित्र होते आणि ते J.B.T. कॉलेजमध्ये सोबतच शिकत होते.

          “बाजू...बाजू व्हा!”  अजय गर्दी बाजूला करत आत घुसला. आतमध्ये साध्वी आणि तिच्यासोबत मयुरी होती.

                मयुरी! मयुरी हि ह्या तिघांची जवळची मैत्रीण. मयुरी हि अभ्यासत हुशार होतीच पण थोडी घाबरट होती.  

          “साध्वी काय झाल.” अजयने साध्वीला विचारल.

          “अरे हा रॉकी मयुरीची छेड काढत होता.” साध्वी थोडी चिडत म्हणाली.

               रॉकी ह्या चौघांचा सिनीअर होता आणि तसाच तो गुंड हि होता.

रॉकी : छेड नाही. मी तर फक्त तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करता होतो. पण हि काय बोलतच नव्हती.

         “अग साध्वी जाऊ दे चल इथून नको लागू ह्याच्या नादी.” समीर साध्वीला म्हणाला.

            “नाही रे समीर ह्याची कमप्लेंट मी प्रिन्सिपॉल कडेच करते. म्हणजे तो मुलीची छेड काढण बंद करेल.” साध्वीने रागाने रॉकी कडे बघितल आणि म्हणाली.

            “प्रिन्सिपॉल..! नाही नको.” रॉकी घाबरल्याच सोंग घेऊन म्हणाला.

             “का.....घाबरलास.” साध्वी म्हणाली.

          “नाही ग! त्यांच्या कडे इतक्यावेळा जाऊन आलो आहे कि आता नको वाटत. कश्याला उगाच त्यांना त्रास. तुला हेच पाहिजे आहे ना कि मी मुलीची छेड काढण थांबव. तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे.” रॉकी म्हणाला.

          “काय सोल्युशन आहे.” साध्वीने रॉकीला विचारले.

           “सोल्युशन अस आहे कि तू आपल्या कॉलेजच्या त्या बंद पडलेल्या जुन्या इमारतीत जाऊन दाखव. जर तू त्या इमारतीत जाऊन परत आली तर मी मुलींची छेड काढण सोडून देईल.” रॉकीने साध्वीला सोल्युशन सांगितले.

          “ठीक आहे. फक्त त्या इमारतीत जायचं आहेना मी जाऊन येईल.” साध्वीने त्याचे बोलणे ऐकले आणि ती त्या इमारतीत जायला तयार झाली.

          “साध्वी त्या इमारतीत जायला कोणाला परवानगी नाही आणि तसही ती इमारत हॉटेड आहे.” मयुरी थोडी घाबरत म्हणाली.

           “हे बघ....मी कोणालाही घाबरत नाही आणि भूताना तर अजीबात नाही. त्या मुळे तुम्हाला जर माझ्यासोबत यायच असेल तर या नाहीतर मी एकटी जाऊ शकते तिथे.” साध्वी म्हणाली.

            “नाही! आम्ही तुला एकट नाही जाऊ देणार तिथे. आम्ही पण येऊ तुझ्या सोबत.” अजयने साध्वीला थांबवत सांगितले.

           “हो.....आम्ही पण येऊ तुझ्यासोबत.” समीरही त्यांच्या सोबत जायला तयार झाला.

                अजय आणि समीर सुद्धा साध्वी सोबत त्या इमारतीत जाणार होते.

    “मी तरी इथे एकटी का थांबू.” असा मनाशीच विचार करून मयुरी सुद्धा त्यांच्या सोबत जायला तयार झाली.

            ते चौघ आता त्या इमारती बाहेर उभे होते.

            “किती भयानक वाटते आहे हि इमारत.” अजय त्या इमारतीवर नजर टाकतच म्हणाला.

              साध्वी त्या इमारतीच्या दरवाज्य जवळ गेली आणि दरवाजा उघडला. दरवाजा कर्रर्रर्रर्र आवज करत उघडला. दिवस असूनसुद्धा त्या इमारतीत सर्वत्र काळोख पसरला होता. सगळीकडे धूळ पसरलेली होती.

            “किती वर्षांपासून बंद असेल हि इमारत.” अस बोलतच साध्वी आत शिरली. साध्वीच्या पाठोपाठ ते तिघेही आत गेले.

            “किती अंधार आहे इथे.” समीर आपल्या मोबाईलची टॉर्च लावत म्हणाला.

              ते चौघ एका वर्गा जवळ पोहचले. समीरने त्या वर्गाचा दरवाजा उघडला आणि आत गेले. त्या वर्गामध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवलेत्या होता. इमारत बंद करत्या वेळी त्या वर्गाचा स्टोर रूम करण्यात आला होता असे वाटत होते.

            “ए हि मूर्ती किती सुंदर आहे आणि ह्या मूर्तीच्या बोटातली हि अंगठी पण.” समीर त्या मूर्तीला बघून म्हणाला. 

          “हो.. पण ह्या मूर्तीच्या हातात हि सुरी का असेल.” अजय कुतूहलाने म्हणाला.

          “अजय हा मुकुट तर बघ एखाद्या राणीच असेल कदाचित.” मयुरीने अजयला बोलावून सांगितले.

             “हे पण त्या राणीच आहे वाटत.” अजय वरती लटकवलेल्या लॉकेट कडे बघत म्हणाला.

             “हे बघा मला काय सापडलं.” साध्वी तिच्या हातातली डायरी दाखवत म्हणाली.

           “मला बघू ती डायरी.” मयुरी साध्वीच्या हातातन ती डायरी घेत म्हणाली.

          “उघडून बघ बर ती डायरी.” अजय म्हणाला.

             मयुरी समीरच बोलन एकूण ती डायरी उघते. ती डायरी उघडतच भिंतीवर लटकलेल्या लंबकामध्ये (घड्याळात) टोल पडला. अचानक जोऱ्यात हवा वाहू लागली. दरवाजे खिडक्या हवेने आपटू लागले. तेव्हाच मयुरीच्या हातातील डायरीतन मोठा प्रकाश झाला आणि त्यातन ४-५ धुरकट अश्या आकृत्या बाहेर पडल्या.

            “हे काय होत!” मयुरी चकित होऊन म्हणाली.

            “आपण हि डायरी उघडून काही चूक तर नाही केली ना.” अजय घाबरत्या स्वरात म्हणाला.

           “सर्वात आधी आपण ह्या इमारतीतून बाहेर जाऊ आणि मग ह्याचा विचार करू.” साध्वी म्हणाली.

                साध्वी अस बोलून त्या वर्गांतन बाहेर पडते. तिच्या पाठोपाठ अजय,समीर आणि मयुरी पण त्या वर्गातन बाहेर येतात आणि पळत पळत त्या इमारतीतन बाहेर निघतात.

                  इमारतीतन बाहेर पडतातच त्या इमारतीचे दरवाजे धाडकन बंद होतात.

           “त्या रॉकीच्या सांगण्यावरून आपण उगाच ह्या इमारतीत गेलो.” अजय वैतागत म्हणाला.

               “पण जाऊ दे. आता तरी तो मुलीना छेडन बंद करेल.” साध्वी म्हणाली.

                    असे बोलून ते सर्व तिथून निघून जातात. मयुरीच्या हातात अजून पण ती डायरी होती. इमारतीतन बाहेर पडताना तिने ती सोबत आणली होती. घरी गेल्यानंतर सुद्धा मयुरीच्या डोक्यात त्या डायरी विषयी विचार चालू असतात. रात्र होते. मयुरी झोपण्यासाठी आपल्या खोलीत जाते. खोलीत गेल्यावर तिला तिच्या स्टडी टेबल वर तिने आणलेली ती डायरी दिसते. मयुरी ती डायरी उघडते आणि वाचायला सुरवात करते.

         “नाही हे नाही होऊ शकत. मला हे सर्वाना सांगावे लागेल.” मयुरी चिंतेत म्हणाली.

क्रमशः

तुमच्या मोलाच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका! तुमच्या प्रतिक्रिया मनोबल वठवणाऱ्याच असतील. माझ्या आधीच्या कथांना जस तुम्ही भरभरून प्रेम दिल अशा करतो कि ह्या कथेला तेव्हडच प्रेम द्याल! आपली प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये लिहून कळवा.

धन्यवाद.

 


         

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kartik Shekhar Gawali

Student

Gemini♊️ 13/06 अंत ही आरंभ है!