Rahasya premanandache bhag 3

Prem katha

( दुसऱ्या भागात आपण पाहिले  आजोबां मुळे आश्रमात खूप चांगले बदल झाले होते. आता आजोबा आश्रमात येऊन 4-5 वर्ष झाली आहेत. ते आता कोणाचीतरी सतत वाट पाहत आहे त्याबद्दल जानवी आजोबांना विचारणार आहे )

        जानवीने ठरवले आता आपण आजोबांना विचारू या. नक्की तुम्ही कोणाची वाट पाहतात? पण महिना झाला तरी अजूनही तिने आजोबांना काहीच विचारले नव्हते. आज मात्र आजोबांना पाहिल्यावर तिला आजोबांची काळजी वाटू लागली. आश्रमात आलेल्या दिवसापासून चे आजोबा तिला आठवू लागले. आत्तापर्यंतचा आजोबांचा उत्साह पाहून सगळे खूप आनंदी होते.  पण गेल्या दोन महिन्यात ते कोणाची वाट पाहत आहे हे कस आजोबांना विचारायचं याचा ती विचार करत होती. तितक्यात तिला आठवलं आपण आश्रमात येणाऱ्या प्रत्येकाचा भूतकाळ जाणून घेतला, त्यांच्या आवडी निवडी जपल्या, त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण आजोबांना कधीच आपण काही विचारले नाही. त्यांनाही काहीतरी दुखः असेल, त्यांची काहीतरी इच्छा असेल आणि आता ती आपणच पूर्ण केली पाहिजे.          दुसऱ्याच दिवशी ऑफिस मध्ये तिला आजोबा पेपर वाचताना दिसले. पेपर वाचत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात पाणी आले होते. जानवीला पाहताच आजोबांनी पेपर ठेवून दिला आणि ते कामात मग्न झाले. संध्याकाळी आजोबा पाच वाजता गेट जवळच्या बेंचवर जाऊन बसले तशी जानवी त्यांच्या जवळ जाऊन बसली. तिने ठरवले होते आजोबांचा मनात काय आहे ते जाणून घ्यायचे.
       जानवी म्हणाली, आजोबा तुम्ही मला लेक म्हणताना, म्हणजे तुम्ही माझे बाबा झालात. तुमच्या आयुष्यातला भूतकाळ मला ऐकायचा आहे सांगता का? तसे आजोबा सांगू लागले, माझं नाव प्रकाश. मी माझ्या आई-वडिलांचा लाडका एकुलता एक मुलगा होतो. माझे शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झाले. कॉलेजमध्ये मी जरा उनाड पोरगा होतो. सुरवातीला अभ्यासाकडे कानाडोळा करायचं आणि मित्रांबरोबर फिरायचं. असे चालायचे. पण नंतर माझ्या काही नवीन मुलींशी मैत्री झाली.  त्यातलीच एक मैत्रीण. माझ्या अगदी जवळची. तिचं नाव किरण आणि आणखीन एक जवळचा मित्र त्याचं नाव राजेश. मजा-मस्ती राजेश बरोबर आणि अभ्यास, गप्पा किरण बरोबर असा माझं निवांत आयुष्य चाललं होतं. किरण मुळे अभ्यासाला लागलो. मला माझ्या कर्तव्यांची, जबाबदारीची, आई वडिलांच्या प्रेमाची जाणीव झाली. कदाचित जर ती माझ्या आयुष्यात नसती तर मी आज इतका चांगला माणूस म्हणून जगलो नसतो. ती एका गरीब कुटुंबातून होती. लहान मुले तिला खूप आवडायची. लहान असो नाहीतर म्हातारा असो कोणाशीही  लगेचच पटायचं तिचं. तिच्यातला कामाचा उत्साह पाहून मी उत्साहीत झालो. कोणतीही मोठी गोष्ट करताना लहानातल्या लहान गोष्टीचा विचार करायची ती. आमची मैत्री अगदी घट्ट झाली होती. मैत्रीच्या पलीकडचं नातं आमच्यात निर्माण झालं होतं. माझे मित्र मला आडून आडून तिच्यावरुन चिडवायचे. मलाही खूप आवडायचं. मी तिच्या प्रेमात पडलो होतो. पण आता मी जबाबदारही झालो होतो. माझ्या घरात प्रेमविवाहाला अजिबात मान्यता मिळणार नव्हती आणि तिच्या मनातलं माझं स्थानही मला माहित नव्हतं.
      शेवटच्या वर्षाला असताना एक दिवस आम्ही दोघ खूप वेळ गप्पा मारत होतो. कॉलेजच्या आवारात बसलो होतो. त्या दिवशी मी तिला विचारलं, समज, "एका मुलाचे एका मुलीवर प्रेम आहे पण त्यालाच माहित नाही तो तिच्याशी लग्न करू शकतील का नाही? अशा वेळी त्याने त्या मुलीकडे प्रेम व्यक्त करावे का नाही करावे."
 तशी किरण म्हणाली, 'सरळ त्या मुलीकडे जा आणि जसे मला सगळं सांगितलं तर तिला सांग.' त्यांचे प्रेम व्यक्त होईल आणि इतर परिस्थिती पण तिला समजेल.
 मी म्हणालो, अग पण ती माझ्यावर रागावली तर?
 अरे इतकं खरं बोलणार मुलावर कोण रागवेल. किरण म्हणाली. तसा मी तिला म्हणालो," किरण माझं तुझ्यावर प्रेम आहे पण लग्नाचा माझ्या हातात नाही ग." किरण हसली आणि म्हणाली, मग ज्या गावाला जायचं नाही तिकडची गाडी पकडायची कशाला?
 मला काही समजलं नाही मी विचारलं, म्हणजे ?
तशी ती म्हणाली "प्रकाश माझं तुझ्यावर प्रेम आहे पण माझ्या घरात प्रेमविवाह मान्य नाही." आणि माझ्या कुटुंबाला दुखावून मी आनंदी होऊ शकत नाही. त्यामुळे आता हा विषय फक्त मानतच ठेवायचा आणि आपली निरागस मैत्री कायम जपायची. आता निघते मी असे बोलून ती निघून गेली. पण मी सुन्न झालो होतो. तिचे शब्द मनात घोळवून  पाहत होतो. तिला पण मी आवडतो हे ऐकून मी खूप सुखावलो. माझे मन आनंदाच्या  झोक्यावर झुलू लागले.  रोज तिला पाहणे, तिच्या गप्पा, तिच्या बरोबर अभ्यास, तिचा सहवास कधीच सुटू नये असं वाटू लागलं आणि इतक्यातच माझ्या काकांनी माझ्यासाठी एक मुलगी पाहिली. तिचं नाव मोना. मुलगी सुंदर होती.  श्रीमंत होती. थोडी हट्टी होती पण मनाचं सौंदर्य नव्हता तिच्याकडे.
      परीक्षेचे दिवस होते त्यामुळे प्रेम, लग्न सगळे बाजूला ठेवून आम्ही आता परीक्षेच्या अभ्यासाला लागलो. शेवटची परीक्षा होती आणि या परीक्षा नंतर आम्ही कॉलेज बाहेर पडल्यावर किरण बरोबर च्या भेटी संपतील असा विचारही माझ्या मनात आला नाही. सगळे पेपर चांगले गेले. शेवटचा पेपरच्या दिवशी सगळे मित्र मैत्रिणी खूप वेळ गप्पा मारून पार्टी केली. गप्पा गप्पांमध्ये माझं लग्न ठरलंय हे सुद्धा राजेशने सगळ्यांना सांगितले. मी रागाने त्याच्याकडे पाहीले आणि मग किरण कडे पाहिले.  ती शांत होती. सगळे गेल्यावर आम्ही दोघेही थोडा वेळ गप्पा मारत थांबलो. तिने मला सांगितले माझे लग्नाचे पाहत आहेत. मी थोडासा चिडलो. म्हणालो, "आपण सगळ्यांचा विचार का करायचा? तू तयार असेल तर मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला."
 तशी ती म्हणाली, " नाही ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांचा विश्वासघात करून आपण सुखी होणार नाही." तू मला प्रॉमिस कर तू मोना शी लग्न करशील, तिच्यावर प्रेम करशील ,  नवऱ्याची सगळी कर्तव्य पार पाडशील, एक सुखाचा संसार करशील, आई-वडिलांचा जपशील आणि माझी मैत्री मनात जपशील.
 पण आपण आता भेटायचं, बोलायचं कसं? मी विचारलं
 तशी ती हसून म्हणाली, सध्या तरी आपण आता रिझल्ट ला भेटू आणि मग नंतर वृद्धाश्रमात भेटू. आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांना सोबत करू. आपल्या आयुष्याचे सुखदुःख वाटू. तेव्हा एकमेकांना भेटताना आपल्या मनात गिल्ट नसेल. आपली मुले छान मोठी होऊन स्वतःच्या पायावर उभी असतील आणि आपण सर्व कर्तव्यातून मुक्त असू.
तिचे विचार ऐकून मलाही हसू आले आणि मग आम्ही घरी निघालो .
उन्हाळी सुट्टीत माझे लग्न झाले. मोना चांगली होती. पण एखादी गोष्ट नाही पटली की  चिडायची, टोमणे मारायची , नवीन नवीन या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. जूनमध्ये माझा रिझल्ट होता. रिझल्टच्या दिवशी मी किरणची खूप वाट पाहिली. पण ती काही आलीच नाही. तेव्हा मात्र मला काहीतरी चुकल्यासारखे जाणवले. मी दुखावलो होतो. रात्री उशिरा घरी आलो. बायकोने मला खूप विचारले त्यामुळे मला रडूच कोसळले आणि मी तिच्याजवळ माझ मन मोकळं केलं,  तिला सांगितलं माझी जवळची मैत्रीण किरण आज आलीच नाही. म्हणून मी दुखावलो. तिने मला समजावलं, शांत केलं, जेऊ घातलं आणि झोपवलं. माझं मन थोडं मोकळं झालं पण तीच मात्र भरलं. संशयाने, तिरस्काराने. आता ती मला सतत छळू लागली.
     किरण च्या नावावरून संशय घेऊन भांडू लागली. खूप समजावले पण ती समजून घेईना. आम्हाला एक मुलगी झाली. तिचे नाव कार्या ठेवलं. तर   क वरूनच का नाव ठेवलं? यावरून ती माझ्याशी भांडली. थोडक्यात काय किरण नावाचं नसलेल वादळ मनात घेऊन मोना माझ्याशी सतत वाद घालू लागली. त्यामुळे आमच्या नात्यांमध्ये एक बारीक भेग निर्माण झाली होती. मुलगी मोठी झाली. कॉलेजला गेली. तिच्या लग्नाचं वय झालं तरी मोनाकडून आमचं नातं सुधारण्यासाठी  काहीच तयारी नव्हती.  मी तिच्या नेहमीच्या मागण्या नेहमी पूर्ण करायचो . माझ्या बाजूने सणाला साडी, इतर हौस, तिची काळजी, मुलीची काळजी, प्रेम, शिक्षण, चार लोकात बायकोचा मान जपणे.  ही सगळी कर्तव्य पार पाडत होतो. पण आमच्या नात्याची घट्ट वीण विणली गेलीच नाही. कार्याचे लग्न झाल्यावर वर्षभरातच आजारपणात मोना वारली. ती गेल्यावर मोकळं घर खायला उठायचं. कशी असली तरी माझ्या सगळ्या गोष्टी अगदी जागेवर नीट ठेवायची. कपडे इस्त्री करून तयार असायचे. वेळेत जेवण तयार असायचे.  आता तिची उणीव भासू लागली. एक दिवस जरा ताप आला होता त्यामुळे मी झोपून होतो. ते ऐकून कार्या घाबरली आणि मला त्यांच्या घरी घेऊन गेली. तिच्याकडे पाच-सहा महिने राहिलो. पण मन काही रमेना. ती आणि तिचा नवरा दिवसभर ऑफिसला. त्यांना एकत्र मिळणारा थोडावेळ माझ्यामुळे मिळेनासा झाला असं वाटायचं. आणि त्यातच एक दिवस किरण ला मी टीव्हीवर न्यूज मध्ये पाहिले. थोर समाजसेविका झाली आहे ती. त्याच्याबद्दलची बातमी आली होती. तेव्हापासून परत मी कॉलेजच्या आठवणीत रमलो आणि तिची शब्द  आठवले, "वृद्धाश्रमात भेटू " म्हणून मी इथे येऊन राहायचं ठरवलं. पण आता असं वाटतंय कदाचित ती मला विसरली असेल. आजोबांचे डोळे भरून आले. 
    जानवीने त्यांचे डोळे पुसले आणि म्हणाली  बाबा तुमची किरण तुम्हाला नक्की भेटेल. तुम्ही काय काळजी करू नका.
विद्या मेटे

🎭 Series Post

View all