ती अजूनही पाण्यातच होती. तिची हालचाल थांबली होती पण डोळे मात्र सताड उघडे होते. किनाऱ्याकडे पाहून जणू मदतीची विनवणी करत होते. आपण आता मरणाच्या दारात आहोत तिला कळून चुकल होत. त्या शेवटच्या घटकेला तिला किनाऱ्यावर अमानवीय आकृती दिसली. अगदी पुसटशी, अंधुकशी. जी तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसत होती. त्या आकृतीच्या डोळ्यातून रक्त ओघळत होतं. काहितरी गवसल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या विचित्र आकृतीच्या गळ्यात कॅमेरा अडकवला होता. तोच... तोच कॅमेरा जो तिच्याकडे होता.
शेवटी ती आकृती तिचा फोटो घेते आणि लागलीच एक विचित्र आवाज तिच्या कानात घुमू लागतो....
"डोन्ट टच माय कॅमेरा"...
"डोन्ट टच माय कॅमेरा"...
"हेल्प हेल्प. मुक्त कर मला यातून. तूच करु शकते हे. प्लीज हेल्प..."
हळूहळू तिची जीवनयात्रा संपते आणि ती सागराच्या गर्भात विलीन होऊन जाते.
हळूहळू आवाज कमी होत जातो तशी ती खाडकन डोळे उघडते. हॉस्पिटल मधल्या त्या स्ट्रेचर वर पडलेलं तिचं शरीर तडफडत होत. काही नर्सनी तिचे हातपाय घट्ट आवळून ठेवले होते. तिला श्वासात अडथळा येत होता. शरीर पूर्णपणे घामाने भिजल होत. तोंडाला लावलेलं ऑक्सीजन मास्क बाजूला झालं होतं. डाव्या हातावर चढवलेली सलाईन आणि त्याची सुई कधीच गळून पडली होती आणि आता त्या ठिकाणी शरिरातल रक्त ठिबकत होत. त्या भयंकर स्वप्नाहून ही भयंकर तिची अवस्था झाली होती. तिला श्वास घ्यायला देखिल त्रास होत होता.
डॉ. साने लगबगीनं झपाझप पावलं टाकत एक एक वार्ड पाठी मागे टाकत होते आणि हॉस्पिटल मधला सगळा स्टाफ त्यांच्या पाठीमागे धावत होता. त्यांना आता ती खोली गाठायची होती.
"निखिल, काय झालं आहे माझ्या आनंदीला? ती ठीक होईल ना?" एक साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षाची बाई डोळ्यात पाणी घेवुन अगतिकपणे विचारत होती.
"हे बघा काकू, तुम्ही आधी बसा इथे शांत. आम्ही होईल त्या परीने प्रयत्न करतच आहोत. आनंदी नक्कीच होईल ठीक." डॉक्टर साने निर्मला काकूंना धीर देत होते खरे पण आनंदीची परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर चालली होती. गेली चार दिवस झाले तिच्या परिस्थितीत किंचित ही सुधारणा झाली न्हवती म्हणुन ते स्वतः देखील हतबल झालेले. डोळ्यांनीच काकूंना आश्र्वासित करून ते घाईने आनंदीच्या खोलीकडे गेले.
"काकू, मी आणलय ब्लड हे निखिलकडे देवून येते पटकन. " नेहा धापा टाकत येते.
"आताच गेला आहे आनंदीच चेकअप करायला" निर्मला काकू पदराने डोळे पुसत सांगतात. तशी नेहा ही तिथून लागलीच निघून जाते.
डॉक्टर निखिलला आनंदीची अवस्था बघून जास्तच टेंशन आल होत. तिच्या शरीराची तडफड त्याला बघवत नव्हती. तिने डोळे उघडताच नाईलाजाने तो गुंगीच इंजेक्शन तिच्या शरीरात सोडतो तशी ती पुन्हा शांत होते आणि निपचित पडून राहते.
दरवाजाला असणाऱ्या त्या काचेच्या तावदानातून निर्मला काकू एकटक तिच्याकडे बघून अश्रू गाळत होती. त्याचवेळी निखिल दरवाजा उघडुन बाहेर येतो.
"निखिल काय होतय तिला?" डोळे पुसत काकू विचारतात.
"काकू मला तुमच्याशी थोड बोलायचं आहे." निखिल वरवर खंबीर दिसत होता खरं पण आतून तो पुरता घाबरला होता. कारण ही पहिलीच केस अशी होती की पूर्ण मेडिकल, फिजिकल टेस्ट करुन सुद्धा पेशन्टला काय त्रास होतोय हे कळत नव्हतं. एक डॉक्टर असूनही त्याच्या डोक्यात वेगळाच विचार चालु होता. हो, त्याला वेगळच काहितरी जाणवतं होत जे मानवाच्या आकलनाबाहेर आहे. डॉक्टरी पेशा असूनही त्याला आता अश्या गोष्टींवर विश्वास ठेवावा लागणार होता आणि तेच जाणून घेण्यासाठी तो काकूशी बोलणार होता. तोच आता आनंदी आणि तिच्या भयानक परिस्थिती मधला दुवा ठरणार होता...
काय कारण असेल आनंदीच्या या गूढ अवस्थेच? कशाप्रकारे निखिल याचा छडा लावेल?? जाणून घेण्यासाठी वाचत रहा... 'रहस्य कॅमेऱ्याच'.
क्रमशः—