Jan 26, 2022
नारीवादी

राधाला गरज सहकार्याची भाग ३ शेवट

Read Later
राधाला गरज सहकार्याची भाग ३ शेवट
सकाळी आई सोबत गप्पा मारत असताना वडिलांचा संवाद कानावर पडला ..फोनवर बोलत होते..हळूहळू बाबांचा आवाज चढला राधा आणि तिची आई दोघीही वडिलांकडे उभ्या राहिल्या आणि लक्ष देऊन ऐकू लागल्या...
ते बोलत होते " सांग त्याला नाही पाठवणार पोरगी,पोरी बापाला कधीच जड होत नाहीत. राधाने हे वाक्य ऐकले;आणि तिच्या काळजात धस्स झाले. बाबांना कसं कळलं???
कोणी सांगितले असावे? प्रश्नांनी डोकं बधीर झालं होतं....
विचाराच्या तंद्रीत असतानाच वडिलांनी तिच्या पाठीवर हात ठेवला तशी भानावर आली...

वडिलांनी तिला सांगायला सुरवात केली.
" राधा तुला तुझी मैत्रीण आशा आठवते का? जी तुझ्याबरोबर क्लासला यायची?

राधा :- " हो बाबा,आठवते ना....
वडिल :-वर्षभरापूर्वी तिचं लग्न लावून दिले होते.चांगला सुशिक्षीत मुलगा पाहून घरदार पाहून लग्न केले आणि नंतर कळाले की तो मुलगा व्यसनी निघाला.. त्याच्या सर्व चुकांवर
घरातलेच पांघरून घालत होते.आशाच्या घरच्यांकडून ही बाब लपवण्यात आली होती की तो व्यसन करतो त्यांना वाटत होते लग्न झाल्यावर तो सुधरले.. आशा आता मानसीक रुग्ण बनली आहे . आई-वडीलांना त्रास नको म्हणून तीने काहीच सांगितले नाही. एकटीच
चार भिंतीत रडत राहिली. आज उदया सर्व सुधरेल घ्या खोट्या आशेवर जगत राहिली
आई-वडील फोन करायचे तेव्हाही ती सर्व लपवून ठेवत होती काहीच सांगत न्हवती.तिचा नवरा नशेत तिला मारहाण करू लागला होता. घरातले फक्त बघ्याची भूमिका घेत होते; पण एकदिवस आशाला आई - वडील भेटायला गेले
तेव्हा त्यांनी जे द्रुश्य पाहिले ते पाहून त्यांनी आशाला तत्काळ माहेरी आणली..


मला तर कळत नाही एवढं सगळं होऊन
गप्प कशी राहिली कळलंच नाही??
माहेरचे तिला इतके परके झाले का?
लग्न लाउन दिले म्हणजे पोरीचे आणि जन्मदात्याचे संबंध तुटतात का ? ह्या पोरी आईवडीलांच्या
काळजाचा तुकडा असतात.

लग्न आम्ही यासाठी करत नाही की
आयुष्यभर दुःखी रहावे. मी आता तिच्या वडिलांना सांगितले आहे अजिबात पाठवायचे नाही.राधा एक एक शब्द मन लाउन ऐकत होती.वडिल जणु आशाला
नाही तर मलाच बोलत आहेत असे त्या क्षणाला तिला वाटले....


आई :- काय गं बाई आशाचं असं झालं? किती ती सरळ मार्गी पोरगी किती वाईट वाटत असेल आई वडिलांना.
राधाचे वडील:"हो वाईट तर वाटत असणार तिला त्रास झाला त्याचा,
आणि आई वडिल ज्यांनी तिला जन्म दिला त्यांनाच परके केलं तिने.
आईवडील काय इतके कमजोर वाटले का ह्या पोरांना????
राधा - कदाचीत तिला वाटलं असेल की, आई-वडीलांना त्रास होईल म्हणून तिने सांगितले नसेल.
वडिल:- चुकिचे केले तिने . खूप मोठी चुक केली.
आई वडिलांना वाईट वाटणं स्वाभावीक आहे, पण अजून वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा लहाणपनी खरचटलं तरी आई वडीलांकडे लगेच येतात पोरं. त्यांना विश्वास
असतो आई - वडील त्यांना औषध लावतील. मग जेव्हा लग्न होते तेव्हाही त्रास झाला तर येऊ नये काय????ही मुलं अशी का करतात समजत नाही???....

ह्यांच्यापेक्षा अनुभव खमका असतो आई वडिलांना ,चार पावसाळे जास्त बघितलेले असतात, मुलं संकटात असताना उलट आम्ही त्वेषाने लढतो...शेवटच्या श्वासापर्यंत मुलांना त्रास होऊ देत नाही.. मुलांसाठी कोणता मार्ग
निवडायचा? त्यांच्या आयुष्याची विस्कटलेली घडी कशी बसवायची हे आम्हा पालकांना चांगलं जमतं,म्हणून मुलांनी आम्हाला वाईट वाटेल हा बुरसटलेला विचार सोडून व्यक्त होणे गरजेचे..

वडिलांच्या धिराच्या शब्दाने राधाला गहिवरून आले . ती वडिलांना काही बोलणार तेवढ्यात मंगेश आला होता. मंगेशला पाहुन राधा भांबावली हा असा अचानक ???

राधाचे वडील : या या जावईबापू बसा .

आईने पादर खोचला आणि पाहुणचार करायला सज्ज झाली....
राधाचे वडील असं अचानक येणं केलं ?
मंगेश - राधाला घ्यायला आलो आहे.जरा आईची तब्येत बिघडली आहे.

राधाचे वडील :- बरं बरं घेऊन जा....


राधा चवताळून म्हणाली " मी अजिबात त्या घरात पाउल ठेवणार नाही"

मंगेश तिच्या अश्या वागण्याने जरा बिथरलाच. तो हसण्यावारी घेऊन बोलू लागला तो तिच्या आई-वडीलांना ती माझ्यावर रुसली आहे असे सांगू लागला ..राधाला बाहेर फिरवायचे प्रोमिस केले होते आणि कामामुळे
जमलं नाही म्हणून राधा रुसून आली आहे. हो ना राधा???

राधा :- " अजून किती मुखवटे धारण करणार आहेस मंगेश????

मंगेश: काय बोलते राधा किती चिडली माझ्यावर,रागाच्या भरात काहीही बोलते आहेस हा तू ..तुला कळतंय का काय बोलतेस?


मंगेश:"माफी मागतो तुझी,sorry राधा परत असे होणार नाही"

राधा- मंगेश तूझी नाटक बंद कर ,असंही सर्वच आई बाबांना सांगनार होते तू वेळेवर आलास बरं झालं .

राधाचे वडील - काय
झाले राधा ? का इतकी चवताळलीस??
मध्ये मंगेश बोलणार तोच राधाच्या वडीलांनी
"तुम्ही जरा थांबा तिला बोलू द्या म्हणत थांबवलं

राधा बोलू लागली,आई बाबा सगळ्यात आधी सॉरी मी आधीच सांगायला हवे होते पण सांगितले नाही...
" आई - बाबा मला वाटलं होतं मंगेश पुढारलेल्या विचारांचा आहे पण तस न्हवतं. माझा सर्व पगार जबरदस्तीने घेत
राहिला. त्याने मला बायको म्हणून किंमत दिली नाही.पगार माझा जरी असला तरी त्याच्यावर माझा अजिबात अधिकार न्हवता..
माझ्या पगाराचे तो
काय करतो हे विचारण्याची मुभा न्हवती
न्हवती. सगळं त्याच्या मनासारखं हवं.
अगदी तुम्ही दोघं आजारी होता तेव्हा पण हयाने मला तुम्हाला पैश्याची मदत
करू दिली नाही.उलट तुम्ही नेहमी त्याच्याशी ,त्याच्या आई वडिलांशी नीट राहिला, मान सन्माम दिला तरी तूम्ही माझे कान भरता हे आरोप लावले...आई , काल जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा तुला वाटलं,की मंगेशचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून मला बोलवत आहे ...पण तसं न्हवतं.. घरी जरी असला तरी माझ्याशी नीट बोलत सुद्धा न्हवता कधी.....

माझ्या पगाराची तारिख लक्षात असते . काल माझा पगार झाला
म्हणून त्याने पैसे त्याच्या account मध्ये ट्रान्स्फर करावे म्हणून फोन केला होता.मी पैसे ट्रान्सफर केले नाही म्हणून तो घरी घेऊन जायच्या बहाण्याने आला आहे...


मंगेश मध्येच बोलू लागला
" राधा का माझ्यावर नको ते आरोप लावतेस??मी कधी तुझा पगार मागितला??

मंगेश मला माहित आहे तू मला खोटं
ठरवणार ...माझा आत्तापर्यंतचा पगार तुलाच देत आले....record आहे माझ्याकडे ...असे म्हणत तिने आई वडिलांना स्वतःचा फोन मधला रेकॉर्ड दाखवला...


मंगेशला कल्पना न्हवती त्याला वाटलं राधा आतापर्यंत गप्प राहिली होती... आणि नेहमी अशीच गप्प राहिल..

मंगेशच्या कपाळावर आता घाम आला.खिशातून रुमाल काढला आणि पुसू लागला ...

मंगेश:" तू आरोप लावलेच आहेस
तर अर्थ नाही. मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही".

त्याला वाटलं राधा विणवणी करेल; पण तसं झालं नाही

राधा:- "मंगेश हुशार आहेस की तू ...म्हणून तर मला सुरवातीला गोड गोड बोलून फसवलं.मी खरंच मूर्ख ठरले, तुझ्या बोलण्याच्या जाळ्यात फसले.. तुला सर्वस्व मानले... नवरा म्हणून पूर्ण विश्वास ठेवला..खरंच आंधळं प्रेम केलं मी तुझ्यावर .....आता तू
माझ्या मनातलं बोललास बघ...मलासुद्धा सोडचिट्ठी हवी आहे..

राधा आणि मंगेशचा संवाद आई वडील ऐकतच बसले. आईला तर शब्द
फुटत न्हवते.

राधाचे वडील पुढे सरसावले मंगेशला म्हणू लागले
मंगेश तुम्ही माझ्या पोरिशी असे वागला ? मी सुन म्हणून तिला पाठवली.
पण तुम्ही तर मोलकरीण केले तिला : तुमच्या
गोड गोड बोलण्याला फसलो आम्ही का बनाव करत राहिलात ?

मंगेश :- अहो बाबा राधा खोटे आरोप लावते आहे.

वडील:"ते दिसतंय मला सर्व राधा खोटं बोलते आहे का खरं..

राधा पुढे आली " हो आता ते सर्व कोर्टात
सिद्ध होईल. खोटं कोण बोलतंय??


मंगेश साळसूदपणाचा आव आणतच होता.
राधाला प्रचंड राग आला तिला त्याक्षणाला माहित नाही काय झाले.??

ती मंगेशच्या अंगावर सुसाट धावली त्याची कॉलर हातात पकडून तिने त्याला खेचलं सटासट त्याच्या कानाखाली वाजवली.तिची
सहनशीलता संपली होती. प्रेम संपल होतं
सर्वच संपलं होतं , समोर असलेला मंगेश
तिचा नवरा नसून ती व्यक्ती होती जिने
तिची कुचंबना केली
होती.तिचा जगण्याचा जणू हक्क
हिसकावून घेतला होता. जन्मदात्यांपासून
दूर केले होते. तिच्या वाट्याला खोटे आरोप,मानसिक त्रास, अवहेलना, दुय्यम दर्जा
दिला होता..

तेवढ्यात बाबांनी तिला थांबवलं . मंगेश तीचे
रूप पाहून पळून गेला.....

आज किती मोकळं वाटत होतं.
डांबून ठेवली होती तिने अनेक दुःख मनाच्या
गाभार्यात ;पण आज आई बाबांच्या पाठींब्यामुळे ती सावरली होती.
राधाने मंगेशच्या विरोधात केस केली,त्याने स्वतःच्या बचावासाठी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले;पण तरिही राधा डगमगली नाही. तिला सत्य माहित होते.राधाच्या सत्याचा विजय झाला होता.. शेवटी तिने सोडचिट्ठी दिली आणि मुक्त झाली.....मुक्त झाली होती अश्या बंधनातून जिथे फक्त नी फक्त लाचारीचे जिवन जगत होती ...

राधा आई-वडीलांसोबत राहू
लागली. कामाला जाउ लागली . आता ती स्वच्छंदपणे जगू लागली.मनाला खंबीर केले..जुन्या आठवणींचे ,भूतकाळाचे पाढे गिरवत रडत बसायचे नाही मनाशीच ठरवलं.थोडा काळ लोटला...

एक व्यक्ती अशी आयुष्यात आली
ज्याने राधाला पुन्हा स्वतःवर प्रेम करण्याची
संधी दिली . राधाचा भूतकाळ
त्याला माहिती होता. राधाशी
मनोमन प्रेम करू लागला, राधाचे वडील
त्याला चांगले ओळखत होते. महत्वकांक्षी होता
राधाच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा. एकदिवस त्याने घरी येऊन राधाला मागणी घातली....

राहुल एक असा व्यक्ती होता ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले होते.. वडील गेल्यावर घराचा डोलारा त्याने सांभाळला होता... राधाच्या आई वडिलांनी राधाचं लग्न लावून दिले... राधा आणि राहुलच्या संसाराला सुरवात झाली..असा संसार जिथे फक्त किंमत होती प्रेमाला.......

असा संसार जिथे प्रेमापुढे पैसा, संपत्ती सगळं शून्य होते....

राधाने धाडसाने पाऊल उचललं म्हणून ती सुखाने जगते आहे...जर का ती अशीच फक्त शांत बसली असती तर रोज घुसमट होत राहिली असती नाही का???


राहुलने राधाच्या आयुष्यात इतके सुंदर रंग भरले की पाठचा भूतकाळ ती विसरून नव्याने जगू लागली......राहुल,आई,बाबाच्या सहकार्याने राधा पुन्हा सावरली....सहकार्य मिळाले म्हणून तिला बळ मिळाले...


आशा करते असेच सहकार्य प्रत्येक व्यक्तीला मिळो, जी व्यक्ती कठीण प्रसंगांना सामोरे जात आहे..मग ती स्त्री असो वा पुरुष असो...आपल्या माणसांची साथ,त्यांचा मिळालेला प्रेमाचा हात आपल्याला संकटावर मात करण्याची अफाट शक्ती देतो..नाही का??कथा पूर्णतः काल्पनीक होती....कशी वाटली कथा नक्की कंमेंटमध्ये सांगा... कथा अवडल्यास लाईक, शेअर जरूर करा..मला फॉलो करायला विसरू नका..
©® अश्विनी ओगलेईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

अश्विनी ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..