लग्नघरातून पळून गेलेली ( राधिका )...

Radhika


भाऊसाहेबाना लग्नाला पंधरा वर्ष झाल्यानंतर  मुलगी झाली होती त्यामुळे त्यांनी राधिका ला फुलासारखे जपलं होतं. राधिका अभ्यासात पण खूप हुशार होती, त्यामुळे भाऊसाहेबांनी तीला खूप शिकवले. कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही.  राधिका जी वस्तू मागेल ती आणून दिली. आज त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं राधिका चं लग्न होत.

लग्नघरात काही वेळातच मुलाकडची मंडळी येणार होती, म्हणून सर्वांची चं लगबग चालू होती. सीमा बघ जरा राधिका चीं तयारी झाली का?  कधीपासून खोलीत बसून मेकअप करतेय . असे बायकोला म्हणत भाऊसाहेब मंडपात आले. 

मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे. पण बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा राधिका मंडपात पोहोचली नव्हती. आता मात्र भाऊसाहेब  चिडले आणि ते आणि त्यांची पत्नी सीमा राधिका च्या खोलीकडे गेले. पण आतून दरवाजा बंद होता. बाहेरून सर्व तिला आवाज देत होते पण ती दरवाजा उघडत नव्हती.

थोड्या वेळाने काही नातेवाईकांच्या मदतीने दरवाजा तोडला पण आतमध्ये राधिका नव्हतीच. कुठे गेली काहीच पत्ता नव्हता. इकडे वऱ्हाडी आणि नवऱ्याकडची माणसे हजार प्रश्न विचारत होते. काय उत्तर द्यावे हे भाऊसाहेब आणि त्यांच्या पत्नीला कळतं नव्हते. अशातच ती सोडून गेलेली चिठ्ठी तिच्या आईला सापडली. त्यातला मजकूर वाचून भाऊसाहेब घाबरले.

मम्मी - पप्पा तुम्ही नेहमीच मला जे हवं ते दिले.  माझे खूप लाड केले, पण आता माझा  काही कारणामुळे नाईलाज आहे, म्हणून असं ऐन लग्नाच्या दिवशी पळून जावं लागत आहे.

कारण माझे एका दुसऱ्या मुलावर खूप प्रेम आहे.  त्याचे नाव आकाश आहे. आकाश चा पत्ता ह्या चिट्ठी मध्ये लिहून ठेवत आहे, मला नक्की भेटायला या.

पप्पा कधी हे सांगायची हिम्मत नाही झाली कारण तो सध्या कुठेच नीट नोकरीला नाहीये. मग असे असताना तुम्ही माझा हाथ त्याला दिला नसता. तुम्ही नाहीं चं म्हणाला असतात. तुम्ही माझ्या भविष्या च्या काळजीने चं माझं त्याच्या बरोबर लग्न नसतं लावून दिलत. म्हणून मला तुम्हाला हे नाहीं सांगता आले.

तुम्ही लग्न करत असलेला मुलगा खूप श्रीमंत आहे, घराणे चांगले पण आहे त्याचे, पण माझे दुसऱ्या चं मुलावर प्रेम आहे, मला प्लीज मला माफ करा मी आकाश सोबत पळून जाऊन लग्न करत आहे.

 भाऊसाहेब रडत रडत म्हणू लागले, एकदा बोलून तर बघायचं ना राधिका माझ्याशी, आजवर तुझी प्रत्येक गोष्ट पूर्ण केली ना आम्ही मग ही नसती केली का?

का नाही समजली तू तुझ्या या लाडक्या पप्पा ला ,? आपण आकाश च्या नोकरीं च्या विषयावर काहीतरी मार्ग काढला असता ना.

तोपर्यंत इकडे नवरदेवाच्या पाहुण्यांनी गोंधळ घातला. आमचे दोन- तीन लाख लग्नात खर्च झाले आहेत , त्यामुळे आम्हाला आमचा खर्च द्या असं सर्व म्हणू लागले. ते आताच्या आता आम्हाला द्या. नाहीतर आम्ही पोलीस केस करू तुमच्यावर. असं सर्व ओरडू लागले.

आधीच खूप तमाशा झाला होता म्हणून भाऊसाहेबांनी  पैसे जमवून नवऱ्याकडील मंडळीला पैसे देऊ केले. आणि ते लोक लग्न घरातून निघून गेले. भाऊसाहेबाना खूप वाईट वाटले, गेले कित्येक दिवस ते लग्नाची तयारी करत होते, सर्व गोष्टी कडे जातीने लक्ष घालत होते. आणि राधिका ने मला असं फसवून पळून जावं लग्नाच्या दिवशीच. ह्याच त्यांना खूप वाईट वाटत होत.

भाऊसाहेब बायकोला बोलले मी राधिका जो पत्ता चिट्ठी मध्ये लिहून गेली आहे तिथे जातोय, माझ्या लाडक्या लेकीने कोणाबरोबर लग्न केल तो मुलगा कसा, त्याची परिस्थिती काय आहे हे बघितल्याशिवाय मला आता चैन पडणार नाहीं ,त्यामुळे मी आता लगेचच निघतोय.

 भाऊसाहेब दोन तासांनी राधिका ने दिलेल्या पत्त्यावर पोचले, भाऊसाहेब पोचले तोवर राधिका आणि आकाश ने, दोघांनी मंदिरात जाऊन लग्न सुद्धा केले होते.

भाऊसाहेब राधिका शी बोलायला गेले तर आकाश ने त्यांना अडवलं आणि म्हणाला आता तुमचा राधिका शी काहीही संबंध नाहीये ती माझी आहे. त्यामुळे तुम्ही इथून जा, तीला फुस लावून इथून नेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका.

आकाश आपला नवरा   -  आपल्या वडिलांसोबत असा वागत आहे हे दिसत असून पण राधिका काही बोलत नाही गप्प उभी आहे ही गोष्ट पाहून भाऊसाहेबाना जास्त त्रास झाला आणि ते तिथून निघून आले. भाऊसाहेब घरी येऊन खूप रडले, राधिका चे सर्व लहानपणी चे फोटो एक एक करून शोकेस मधून काढून पाहू लागले. आणि त्यांना गहिवरून आलं.

पण काही महिन्यात व्हायचं तेच झालं, 

 राधिका सारखी सोन्या सारखी मुलगी आकाश च्या घरच्यांना नको वाटू लागली.

आकाश तर तिला मारायचां पण, सासू सासरे सुद्धा छळ करत होते. एक दिवस असा उजाडला  कि राधिका सरळ निघून भाऊसाहेबांच्या घरी आली.

भाऊसाहेबांनी सुद्धा मागचे सर्व विसरून तिला घरात घेतलं. शेवटी बापाचे काळीज ते मुलीसमोर पाघळणारच.  ज्या राधिका ला भाऊसाहेबांनी एकुलती एक लाडकी म्हणून तिच्यावर कधी हात हि उचलला नाहीं, त्या आपल्या मुलीला आकाश त्रास देतो हि गोष्ट भाऊसाहेबाना सहन चं झाली नाहीं आणि ते राधिका ला म्हणाले. आता तू परत त्या घरी जायचं नाहीस. राधिका पण म्हणाली पप्पा मी खूप मोठी चुकू केली. पप्पा मी चुकले. मला जमलं तर माफ करा.

आकाश कधीच परत तिच्याकडे आला नाही कारण त्याच्याबाजूने कधी प्रेम नव्हतेच फक्त वासना होती आणि ती कधी राधिका ला कळलीच नाही. काही दिवसांनी आकाश आणि राधिका चा घटस्फोट झाला. पण राधिका च्या नावाला बट्टा लागला तो कायम चा चं.

प्रेमाच्या ओघा पाई प्लीज कोणीही आपल्या कुटुंबाला, आपल्या आई - वडिलांना विसरू नका, प्रेम जरुर करा, पण सर्व गोष्टी नीट तपासून घ्या. जेणेकरून भविष्यात रडायची पाळी येणार नाहीं.

नमस्कार. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी ).