Mar 01, 2024
वैचारिक

राधेश्याम

Read Later
राधेश्याम


हे फक्त्त एक समीक्षण आहे माझ्या नजरेतून, तरी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास आधीच माफी मागते.कुणीतरी सांगितलं तुला राधेश्याम मुव्ही खूप आवडेल.
आता मूव्ही म्हणजे 2-3तास वेस्ट.

पण असं काय आहे या मुव्हीत म्हणून रात्री अमेझॉन प्राईम वर लावला. पोस्टर बघून मी सर्व कामं सोडून अगदी बैठक मारून बसले.
आता बघायचंचं आहे असं. मुव्ही बघताना मी मुव्ही कमी बघते आणि चुका जास्त शोधते ही माझी नेहमीची सवय.


असो, येऊया राधेश्याम वर, टायटल हे का घेतलं ते मला पुर्ण मुव्ही बघून कळलं नाही.
सुरुवातीला दाखवलं ते पोस्टर बघून आता मस्त काहीतरी बघायला मिळणार म्हणून उत्सुकता वाढलेली.
पहिला सीन मस्त, गुरुजी आपल्या शास्त्राने विज्ञानाला अचूक मात देतात.
कारण अश्या कितीतरी अनोख्या गोष्टी आपल्या शास्त्रात सांगितल्या ज्या इकडून गेल्या आणि तिकडून मॉडिफाय होऊन आल्या.
असो तो आपला मुद्दाच नाही.

येऊया मुव्हीवर.

नायक तो बाहुबलीवाला, एक सुप्रसिद्ध पाल्मसिस्ट असतो आपल्या भाषेत हस्तसामुद्रीक, शब्द भारी झाला, नाही का? अजून सोपं करूया हातांच्या रेषा बघून भविष्य सांगणारा.

आता हा विक्रम म्हणे प्रधानमंत्र्याला भेटून एमर्जन्सी सांगतो आणि देशातून बाहेर हाकलल्या जातो.

आता हे लॉजिक काही माझ्या पचनी पडलं नाही. प्रधानमंत्री अशी विक्रम सारख्या लोकांशी (भविष्य सांगणाऱ्या )भेट करेल तर ती जगजाहीर होणार नाही.
दुसरं, मग असं म्हणायचं का की विक्रमने सांगितलं म्हणून एमेर्जन्सी लागु झाली.

आता इथेच अजून एक लॉजिक हा हात बघतो भविष्य सांगतो मग हा हात बघून न सांगता आज्ञाचक्रला म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये ऍक्टिव्हशन करून काय बघतो. कारण चक्र ऍक्टिव्हेट करून भविष्य बघणे हे वेगळं शास्त्र आहे.
असो त्याला दोन्ही येत असावं
बरं याचे सात चक्र शरीरातले ऍक्टिव्ह आहेत असे मानू. पण अख्या जगात फिरणारा हा कामं काय करतो फक्त्त तिच्यामागे फिरायचं, ते ही आपल्या लाईफमध्ये प्रेम नाहीय माहिती असताना?

पुढल्या लॉजिकमध्ये एक सीन येतो एका पॉलिटिशिअनलां सांगतो की राजकारण नाही बिझनेस करा इथपर्यंत ओके, मग तो पळत काय जातो, लोकं मागे धावत काय जातात आणि बस समोर काय येतो.

पण यानंतर तिथले सगळे बेपत्ता होतात आणि हा बंदा रक्ताने माखलेला स्वतःच हॉस्पिटलमध्ये येतो, म्हणजे तो दिसल्यावरही कुणी त्याला पकडत नाही की काही नाही तो सरळ जाऊन पडतो हिरोईनच्या गळ्यात.

आता तिथे एकच हॉस्पिटल होतं का? लोकांनी त्याला उचलून का नाही नेलं, जाऊद्या डोक्याबाहेर गेलं ते.

आता हा स्वतःला हस्तरेखाचा एक्स्पर्ट समजतो आणि याला माहिती असते आपल्या लाईफमध्ये प्रेम नाही.
पण माझ्या माहितीप्रमाणे स्वतःच भविष्य स्वतः बघायचं नसतं, दुसरं हातावरच्या रेषा नेहमी बदलत असतात, आणि तिसरं म्हणजे एव्हढा गाढा अभ्यासक आता कुणीच नसेल.
100% अचूक सांगणारा म्हणजे देवच ठरेल की तो.

पण मग जे होणारच नाही त्यामागे हा का धावतो? म्हणजे नशिबात आहे त्याला तो रोखू शकत नाही, पण मग तो हे ही म्हणतो की 100% माझ्या म्हणणं खरं होतं, तो स्वतःच्या गुरुचं सुद्धा ऐकत नाही.


मुळात हे शास्त्र खूप खोल आहे आणि मानणारे मानो अथवा नाही हे 99% बरोबर निघत पण जो एक पर्सेंट असतो ना तो कलाटनी देऊन जातो. कारण तो एक टक्का आपल्या हातात असतो.

एक लव्हस्टोरी बनवायचीय तरं बनवायला स्ट्रगल टाकला पण चालेले म्हणून हे असं किस्मत अँड ऑल टाकून काय दाखवायचं आहे.

जो खरंच जाणकार असतो तो असा फिरत बसत नाही तो त्याच्या वेगळ्या दुनियेत असतो. दुसरं तो सिन अगदी खरां आहे ट्रेनमधला. लोकांना माहिती झालं तरं लोकं वेड्यासारखी गर्दी करतात. माझंही भविष्य सांगा म्हणून.


पण शास्त्रविषयीं यात काय सांगितलंय? हा प्रश्न पडलाच, राधे श्याम नाव का घेतलं ते ही कळेना.
म्हणजे शेवटी सांगायचं काय होतं त्यांना आपल्या हातात असतं सारं, हात नसलेल्याच भविष्य नसतं का?

पण मग सुनामी, सागर आणि त्यातूनही हिरो एकटाच येतो वापस. तसंच रक्तबम्बाळ स्वतः चालत.
ती नायिका तर अजूनच मोठं लॉजिक लावते मी मरेल तरं तो जगेल. असं कुठे असतंय व्हय...


हा पण या मुव्हीमुळे हस्त रेखा सांगणाऱ्यांचे चांगले दिवस येणार.

मुळात यां शास्त्राचे काही नियम असतात जो हे जाणतो तो फक्त्त बचाव करतो यापासून ते घडूच नये यासाठी प्रयत्न नाही, कारण घडणारे घडतेच.
यातला हिरो मात्र ट्रेनचा रस्ता अडवायला धावतो.
तो स्वतःला एवढा परफेक्ट कसं समजतो जणू तो देवच आहे. असं असतं तरं सगळे भविष्य सांगणारे आपल्या डायरीत लिहून ठेवत गेले असते. मृत्युंसारखं सत्य जो स्वीकारू शकत नाही तो भविष्य सांगणारा असूच शकत नाही.
केवळ दिशाभूल करण्यात अर्थ नाही यातून अर्धवट ज्ञान पसरतं.

मला हा शास्त्राचा अपमान वाटला, कारण फक्त्त चलती आहे म्हणून कथा जबरदस्तीने शास्त्राला जोडली आहे. दुसरं जेव्हा समर्पण असलेलं नातं येतं तेव्हा दोघांचे नशीब जुळतात, म्हणजे नवरा बायकोच्या नात्याचा एकमेकांवर प्रभाव पडतो.

100% भविष्य कुणीच सांगू शकत नाही, आणि हातावरून तरं नाहीच नाही. बाकी लव्ह स्टोरी म्हणून बघा पण शास्त्र काहीच नाहीय त्यात.


खूपच खटकलं म्हणून लिहिलं, बाकी माझा आणि मुव्हीचा छत्तीसचा आकडा.

कारण असे मुव्ही बघून समाजात गैरसमज पसरतो जागरूकतेऐवजी. मी भयपट कॉमेडी म्हणून बघायचे. हल्ली ते ही नाही.

असो एन्जॉय करा मुव्ही लव्हस्टोरी साठी.... माझ्या तरं डोक्यावरून गेलं सगळं नेहमीप्रमाणे...जसं साऊथ ची अवशन बघताना सगळं फिझीक्स फेल होतं तसं...

पहिलंच समीक्षण आहे, चुका असल्यास सांभाळून घ्या....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//