एक चूक आयुष्य बदलून टाकणारी

विचारपूर्वक घेतलेला निर्णय शक्य तोवर चुकत नाई


एक चूक आयुष्य बदलून टाकणारी

(गोष्ट एका राधा ची) भाग १

चुका करणारे चुका करून निघून जातात आणि भोग इतरांच्या पदरात पडतात!
असच एका अत्यंत जवळच्या माणसाने धोका दिल्यावर पदरात पडणार दुःख???? म्हणजे एखादी मुलगी घरातून पळून गेल्यावर तिच्या त्या वागण्याचे परिणाम होतात कुटुंबावर अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लग्न आणि प्रत्येक आई वडिलांना वाटत आपल्या मुलीचं सगळ व्यवस्थित व्हावं तिला सुखाच आयुष्य जगायला मिळावं पण काही मुली असतात त्यांच दुर्भाग्य (अशीच एक सत्य घटना)
राधा अतिशय हुशार आणि बाबांची लाडकी मुलगी वयाच्या २९ व्य वर्षी लग्न झालेल्या माणसासोबत त्यात पण त्याला दोन मुलं असताना म्हणजे दोन मुलांचा बाप असणाऱ्या एका दृष्ट माणसाबरोबर पळून जाते?
मग तिथून पुढे???
जे घडतं ते खूप भयंकर असत! आधी थोड राधाचं वर्णन दिसायला सुंदर आणि चांगल्या पगाराच्या नोकरी हे असताना अजून जास्त सुख काय? पैस्याच्या मोहापायी चुकीच्या व्यक्ती सोबत आयुष्य घालवाव लागेल याची थोडीही खात्री न करता सरळ निर्णय घेऊन मोकळी !
पण पुढचे परिणाम फार वाईट! कारण वेळ आणि परिस्थिती दोन्ही चुकीच्या आणि तीच नशीब सुद्धा कारण जो माणूस निवडला मुळात तो चांगला नाही याची खात्री वेळ निघून गेल्यावर पटली पण पर्याय बंद झाले या चक्रव्यूह मधून बाहेर पडण्याचे!
तर खरी गोष्ट इथून......
राधा शुक्रवारी सकाळी ९ वाजता घरा बाहेर पडली ऑफिस ला जाते म्हणून , नेहमी प्रमाणे तीच काम आटपून ऑफिस वरून संध्याकाळी ७ पर्यंत रोज घरी यायची ही वेळ ठरलेली पण त्या दिवशी आधी फोन करून घरी अस कळवल की ऑफिस मद्ये मीटिंग आहे घरी यायला उशीर होईल पण फार वेळ झाला काळजी वाटली म्हणून परत फोन केला तर राधा तिच्या मार्गाने मार्गस्थ झाली होती.
पुढे ९ वाजता तिने वडिलांना कळवलI लग्न करते आहे आणि आता मी नाशिक ला पोहचली. आणि तिथून सुरू झाली खरी परीक्षा ती म्हणजे कुटुंबाची तशी राधा ने आदल्या रात्री पूर्व कल्पना दिली होती की अस आहे आणि मला लग्न करायचं तर आईला तिचा निर्णय आवडला नाही तिने विरोध केला म्हणून राधाने दुसऱ्या दिवशीच तिचा निर्णय पक्का केला आणि तिच्या निर्णयावर खरी उतरली , आता पुढे याचे परिणाम काय होतील याची तिला काहीच भीती नव्हती ना तिने केलं त्याची खंत पण कुटुंबाला काळजी होती मग पोलीसतक्रार झाली मग रविवारी संध्याकाळ पर्यंत फक्त प्रश्नचिन्ह होत की काय झालं असेल कारण कशाचाच काहीच पत्ता नव्हता ना संपर्क होत होता. रविवारी सकाळी इतक्या प्रयत्न नंतर कळलं की ते परत येत आहे हळू हळू मन शांत होत होत आणि रविवारी रात्री ८ वाजता ते पोहचले तिचे वडील तिला घ्यायला गेले गाडीतून बाहेर काढलं! अक्षरशः ओढल आणि तिला घेऊन घरा कडे आले
खुन्नस होती म्हणून तिच्या भावाने आणि मित्रांनी मिळून तिच्या झालेल्या नवऱ्याची चांगलीच पिटाई केली मग रात्री २ पोलिस चौकी मधे वाजले! त्यांनी धमकी दिली म्हणून घर सोडून दुसऱ्याकडे राहायला जायची वेळ आली मग राधाला घेऊन पूर्ण कुटुंब दुसरीकडे राहायला गेले हळूहळू सगळ सावरू लागलं असेच ८ दिवस बंद खोलीत गेले, मग जस जस सगळ बदलत गेलं तशी तिने संधी साधून तीच्याच वडिलांना ऑफिस मद्ये अर्ज द्यायचं कारण सांगून तिथे घेऊन गेली ऑफिस मधे गेल्यावर त्याला फोन केला तिथं चांगलाच तमाशा केला तिचा आणि तिच्या जन्म देणाऱ्या बापाचा सगळ एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं आणि ती परत त्याकडे निघून गेली. गेल्यानंतर आरोप सुरू झाले मग यांनी तिला कस छळल हे मुळात न झालेल्या गोष्टीवर पुन्हा वाद उभा राहिला आई बाबा आणि २न भाऊ यांच्यावर पोलिस केस केली. (पुढे काय झालं ते पुढच्या भागात )

🎭 Series Post

View all