या मनीची आस तू
या जीवाचा ध्यास तू
माझा हरएक श्वास तू
चराचराचा नि:श्वास तू
माझ्या बासरीची धुन तू
रोमरोमातील चैतन्य तू
निखळ प्रीतीची साक्ष तू
ह्रदयातील तसबीर तू
मला छळणारा आभास तू
हवाहवासा सहवास तू
जगताचा पालनहार तू
माझ्यासाठी प्रियसखा तू
माझ्या निळाईची शान तू
अंतरंगातील जाणीव तू
हळव्या प्रेमाची फुंकर तू
अद्वैताचे मुर्तरुप तू
-------सौ.गीता गजानन गरुड.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा