राधाला गरज सहकार्याची

Bitter Experience

आई वडिलांना राधा एकुलती एक होती.राधा अभ्यासात हुशार होती..त्यामुळे आई वडिलांनी भरपूर शिक्षण दिले.. तीसुद्धा इंजिनीअर झाली..राधाचे शिक्षण झाले.. चांगली स्थळ येवू लागली.एकदिवस तिला मंगेशचे स्थळ चालून आले..मंगेशसुद्धा उच्चशिक्षित होता,आई वडीलसुद्धा शिक्षित होते.. मंगेशही एकुलता एक होता...पहिल्या भेटीत मंगेशचं वागणं राधा आणि तिच्या घरच्यांना भावलं..


राधलाही मनातून वाटत होते की, मंगेश तिच्यासाठी योग्य जोडीदार होईल..दोघांच्या भेटीगाठी होत राहिल्या..कधी केफे, मॉल अश्या वेगवेगळ्या ठिकाणी दोघं एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटू लागली..एकमेकांच्या सहवासाने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.. राधाला मंगेशचे एक एक गुण आवडू लागले होते.. सतत काळजी घेणे... आई वडील जसे काळजी घेतात अगदी तसेच मंगेशही तिची काळजी घेत रहायचा..

राधाच्या आई वडिलांना अगदी असाच जावई हवा होता जो लेकीची काळजी घेईल.. कारण राधा एकुलती एक होती ..आपल्यानंतर राधाला मंगेश जपेल ही भावना होती....मंगेशचा तिला आधार वाटू लागला..

एक दिवस मंगेश तिला म्हणाला..
"राधा ,तू लग्नांनातर चूल आणि मूल ह्या साच्यात अडकून राहू नको, तुझ्या आई वडिलांनी तुला इतकं शिक्षण दिले आहे त्याचा वापर कर..मी स्त्री पुरुष समानता मानणारा आहे..आज माझ्या सोबतीला जेव्हा एखादी स्त्री काम करताना पाहतो तेव्हा फार कौतुक वाटते.. मला असं वाटतं की माझी होणारी बायकोसुद्धा अशीच असावी"..

राधाच्या मनाला मंगेशचे हे बोल भावून गेले..तिने त्याक्षणी मनोमन पती मानलं.. जर मंगेश इतका छान विचार करतो ,पुढारलेले तर नक्कीच तो आपल्याला बंधनात ठेवणार नाही..ती फार खुश झाली.....सरतेशेवटी तिने लग्नाला होकार दिला..


छान थाटामाटात मंगेश आणि राधा दोघांचे लग्न झाले.राधा स्वतःला नशीबवान मानू लागली...प्रेम करणारा,समजूतदार नवरा मिळाला ह्या भावनेने मोहरून गेली होती...लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मंगेश चिंतीत दिसू लागला....


राधाला मंगेश चिंतीत असल्याचे दिसले.. तो अगदी डोक्याला हात लावून बसला होता..नव्या नवरीप्रमाणे ती आशा लावून बसली होती की मंगेश त्या नवीन भिंतीत आपलंसं करेल..वाट बघत होती त्याच्या मिठीत शिरायची;पण झाले भलतेच तिचे मखमली स्वप्न जणू धुळीस मिळाले होते..…

ती स्वतःहून मंगेशकडे गेली...त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला म्हणाली

"मंगेश काय झाले???खूप चिंतीत आहे"

मंगेश:"काही नाही राधा, जरा डोकं दुखतंय"

राधा:"दे मी तुला डोकं चेपून देते"
राधाने त्याचे डोकं चेपून दिले...

दुसऱ्या दिवशी सकाळी राधा उठली पाहते तर मंगेश बाजूला न्हवता..
तिला वाटलं बाहेर असेल...पाहते तर बाहेरही न्हवता...तिने सासूला कुठे गेला विचारले तर सासू म्हणाली"माहीत नाही गं चेहरा पाडून सकाळीच गेला,त्याने काही खाल्ले नाही..तो निघून गेला "...

राधाला त्याची काळजी वाटू लागली हा असा कसा न सांगता गेला?मलाही काहीच बोलला नाही...राधा त्याची वाट बघू लागली..तेवढ्यात आईचा फोन आला..आईबाबा दोघेही तिची आणि जावयाची विचारपूस करत होते.. राधाच्या अगदी तोंडावर आले होते, आईवडिलांना सांगावं की मंगेश कुठेतरी गेला पण तिने स्वतःल सावरलं नको ,आई बाबांना उगाच त्रास नको..तिने मनातलं दुःख मनात ठेवलं आणि आवाजात उसनं हास्य आणून आईला मंगेशचं आणि सासरचं कौतुक सांगू लागली

गृहप्रवेश करताना किती छान स्वागत केले..सासूने किती छान भेटवस्तू दिली वैगेरे वैगेरे रंगून सांगू लागली...आई वडिलांचा जीव सुखावला..पोरीच्या सुखी संसाराला सुरवात झाली म्हणून आई बाबा निःशंक झाले..राधाच्या डोळ्यात आसू होते पण जन्मदात्यांना काही कळायला नको म्हणून तिने सगळंच मनात ठेवलं...


रात्रीचे दहा वाजले तरी मंगेश आला नाही...मनात वाईट साईट विचार येऊ लागले.कुठे गेला असेल हा??अजून आला नाही फोन करते तर फोन बंद ..सासू सासर्याना पण काहीच माहीत न्हवते..ते दोघेही तोंड पाडून बसले होते...राधा दिवसभर उपाशी होती..


रात्री बारा वाजता मंगेश आला..

राधा तिच्या रूममध्ये होती..
त्याला पाहिले तसे तिचा जीव भांड्यात पडला..
राधा:"कुठे गेला होता दिवसभर ??मला न सांगता, किती वाट पाहिली तुझी??कुठे होतास?तुला फोन करत होते तुझा फोनही स्विच ऑफ ??काय झाले मंगेश????

मंगेश नजर चॊरत म्हणाला काही नाही मित्राच्या घरी होतो..

राधा काकुळतीला येऊन म्हणाली..

"मंगेश, प्लिज मला सांग काही प्रॉब्लेम आहे का???आता मी तुझी बायको आहे तू मला सगळं काही मोकळ्या मनाने सांगू शकतो"..


राधाने असं बोलायला आणि मंगेशने तिच्या गळ्यात पडायला.. तो रडायला लागला..

राधाला अनपेक्षित होते...तिने त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली सांग मला आता.

मंगेश:\"मला कळत नाही राधा कसं बोलू,पण तुला मी सिंगापूरला फिरवायचे प्रॉमिस केले होते, पण आता माझ्याकडे पैसे नाही..मला समजत नाही मी काय करू??

राधा:"काय मंगेश इतकंच ना??त्यासाठी तू एवढं काय टेंशन घेतो..its ok.... काही गरज नाही सिंगापूरला जायची... आपण इथेच महाबळेश्वर ,गोवा जाऊ.....त्यात काय एवढं?सिंगापूरला नंतर कधी तरी जाऊ.....


मंगेश:"नाही राधा मी वचन दिलेले तुला..तू गैरसमज करणार नसशील तर एक विचारू ????

राधा:"बोल\"

मंगेश:"तुझ्याकडे जर पैसे असतील तर मला दे आपण तुझ्या पैशाने जाऊ आणि माझ्याकडे पैसे आले की मी परत देतो.,बघ जर तुला पटत असेल तर..नाही तर....प्लिज गैरसमज करू नको...."


राधा:"मंगेश का मी गैरसमज करून घेईल??ठीक आहे ना त्यात काय एवढं.चल ही ट्रिप माझ्याकडून..

मंगेश:"नाही नाही ही ट्रिप माझ्याकडून मी तुला सर्व पैसे नक्की देईल"....जे पण करतोय मी तुझ्यासाठीच करतो आहे गं..तुला खुश ठेवायचे आहे मला ..आपण आपल्या वैवाहिक जीवनाचे सुरवातीचे क्षण सोनेरी करु, ते कायम लक्षात राहिले पाहिजे....


मंगेशच्या चेहऱ्यावर हास्य आले..

मंगेश आणि राधा एकमेकांच्या मिठीत विरघळून गेले.....

मंगेश आणि राधा दोघेही सिंगापूरला गेले..तिथे एकेमकांसोबत सुंदर वेळ घालवला..त्या काळात दोघेही एकमेकांच्या जवळ आले...तिथे गेल्यावर मंगेशने राधाला पुन्हा एक गोष्ट सांगितली....

मंगेश:"राधा तू मोठं मन दाखवून स्वतःचे पैसे देऊ केले खूप thank you गं,मला जरा fevour हवा आहे गं,देशील????

तिचा हात हातात घट्ट पकडून त्याने विचारले...

त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या राधाने होकार दिला....ती म्हणाली"हक्काने बोल तुला जे हवं ते देईल"...

मंगेश:"खरंच राधा???

राधा:"हो खरंच"...

मंगेश:"राधा आता आपलं असंही लग्न झाले आहे,तुसुद्धा ह्या घरातली सदस्य आहे..आई बाबा म्हणत होते तू तुझा पगार घरात द्यावा..मला चुकीचे नको समजू पण आई बाबा तू माझी हक्काची बायको आहे म्हणून बोलत आहेत ..तू तर पाहते महागाई किती वाढते आहे ,माझ्या एकट्याच्या जीवावर सर्व घर चालू शकत नाही..आपण दोघांनी मिळून जर घर चालवावं असं मलाही वाटतं

राधा विचारात पडली.....

मंगेशने तिच्या केसावर अलगद हात फिरवला आणि म्हणाला.."राधा तू पगार घरात दिला तरी त्याचे काय करायचे हे तूच ठरवणार ना..शेवटी तू मालकीण आहे,सर्व तुझंच तर आहे ना ?ना तुला नणंद, दीर असं काही नाही ..एकटीच आहेस ना..कुठे आपल्या प्रॉपर्टीची विभागणी होणार आहे....


राधाला थोडसं खटकत होते.. ती त्याला म्हणाली "मी अर्धा पगार देईल बाकीचा मी माझ्या account मध्ये ठेवेल.,कारण माझ्याही गरजा आहे ...

हे असे बोलल्यावर मंगेश म्हणाला"राधा जाऊ दे तुला माझ्यावर आणि आई वडिलांवर विश्वास नाही"....


मंगेश तोंड पाडून बसला...
राधाला वाईट वाटलं..तिने विचार केला की घरात पगार ठेवला तरी वापरणार मीच मग आपण सहमती देऊया.....थोड्यावेळाने ती त्याला म्हणाली
" मंगेश मला तुझ्यावर आणि आई बाबांवर पूर्ण विश्वास आहे,चालेल मी देईल पगार..."...
मंगेशने तिला मिठीत घेतले आणि दोघेही संसाराची स्वप्न सजवू लागले....

सिंगापूरमधून येताना दोघेही गोड आठवणी घेऊन आले...राधाही कामाला जाऊ लागली...राधाचा पगार आला तिने पैसे काढून सर्व मंगेशच्या हातात ठेवले.. मंगेश म्हणाला"राधा thanks तू माझ्यावर विश्वास ठेवला..,तुझ्याठिकाणी कोणी दुसरी स्त्री असती तर तिने असे केले नसते..तू मला समजून घेतलंस हे पुष्कळ आहे माझ्यासाठी"


मंगेश एकुलता एक असल्याने त्याचे सर्व पुरवले जात होते.. त्याच्या आई वडिलांना एकुलता एक म्हणून त्याला हवं तसं होत राहायचे..मंगेश खरं तर फार हट्टी होता,रागराग करणं, मोठ्याने बोलणे,वस्तू अदळनं नेहमीचेच झाले होते... त्याच्या मनाच्या विरोधात काही झाले तर तो चवताळून जात...लहणपणापासून हवं ते मिळत गेले म्हणून त्याला कोणती गोष्ट भेटली नाही की कांगावा करत..त्याला हवं ते तसेच करायचे.... राधासुद्धा एकुलती एक होती पण तिचं वागणं मंगेशच्या विरुद्ध होते..

बायको म्हणून राधाला नेहमी वाटायचे की ,मंगेशने त्याचे सुख दुःख तिला सांगावे पण तसं न होता तो फक्त आईलाच सांगायचा.. राधा कधी आली तर तो गप्प बसायचा.. लपवाछपवी केल्यागत..राधाला असे वाटायचे त्याने आईला आणि मलाही आपलं म्हणून मानावं ,पण राधाला अगदी ती बाहेरची असल्यासारखी वागणूक दिली जात होती...राधाला जाणीव होऊ लागली की आपला आणि आपल्या पैश्याचा वापर होऊ लागला आहे .सुरवातीला गोड गोड वागणारा मंगेश राधाला किंमत देत न्हवता...राधा तुटून गेली ,ज्या मंगेशसोबत स्वप्न सजवली होती तो सर्व धुळीत मिळवेल.मंगेश आणि त्याच्या आई वडिलांना फक्त आणि फक्त राधाचा पैसे हवा होता..राधा नको...जर ह्याला असे वागायचे होते तर "का लग्न केले माझ्याशी??

असेच दिवस जात होते... एक दिवस एक ठिणगी राधाच्या आयुष्यात पडली..त्याने ती अजून कोलमडून गेली...


राधाच्या आई वडीलांना कोरोना झाला....त्यांना पैश्याची फार गरज होती ..राधाने मंगेशला आपण आई बाबांना मदत करू म्हणून सांगितले पण तेव्हा त्याने राधाला एकही रुपया दिला नाही..ज्या आई वडिलांनी शिक्षण दिले, पायावर उभे केले आणि आज त्यांच्याच आजारपणात मी मदत करू शकले नाही त्यामुळे राधा तडफडली..ती त्या क्षणाला लाचार झाली होती..तिला आता समजलं होतं की मंगेश तिला account मध्ये पैसे का ठेवू देत न्हवता. सगळं कोडं उलगडलं होतं...सर्व तुझंच म्हणणाऱ्या मंगेशने आता दाखवून दिले होते की, तिचे काहीच न्हवते....मेहनत तिची होती पण कमाई मात्र तिची राहिली न्हवती..


राधाचे डोळे उशिरा उघडले....खूप मोठा विश्वासघात झाला होता तिच्यासोबत..आई बाबांना सांगितले तर आई बाबा दुखावतील. आपल्या एकुलत्या एक पोरींचे असे झाले म्हणून त्यांना त्रासही होईल......ती अस्वस्थ झाली होती..


काय करणार राधा पुढे,ह्याची उत्सुकता असेलच ना ह्याचे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे???वाचकहो राधाला तुम्ही मदत करा ,ही कथा आहे आपल्यातल्या असंख्य राधाची ज्या मानसिक त्रासातून जात आहे त्यांना गरज आहे तुमच्या सपोर्टची..प्लिज तिला योग्य मार्ग दाखवा तिने काय करायला हवे??... माझी नम्र विनंती आहे कृपया करून negative comment नको...कारण ह्या राधा परक्या नाही ह्या अपल्यातल्याच एक आहे ,बहीण, मैत्रीण, मावशी ,आई ... समाजतल्या अश्या राधाला आधाराची गरज आहे ह्या क्षणाला.तो आधार आपण सर्व मिळून देऊया....तुमची एक कंमेंट एखादीला आशा देऊ शकते, मार्ग देऊ शकते...


©®अश्विनी ओगले...

लेख आवडल्यास जरूर लाईक, शेअर ,कंमेंट करा....




🎭 Series Post

View all