राधाचा विरह...

एक हृदयस्पर्शी प्रेमकथा
*राधाचा विरह*

आज मीरा ग्रुप... मस्त पैकी महाबळेश्वरला फिरायला आला... होता.... समीरची स्वतःची फोरविलर गाडी होती त्यामुळे त्या इतर तीन जणांनी इंधन खर्च केला.....

मीराचा ग्रुप पाच जणांचा.... त्यांत स्वतः मीरा... समीर... मालिनी.. मोहन व नंदू.... असे इतर चार जण होते..... इंधनाचा खर्च तिघांनी केला म्हणजे.... त्यांच्या ग्रुपमध्ये...मोहनची आर्थिक परिस्थीती फार नाजूक होती..... त्यामुळे मीरा ग्रुप त्याच्या कडुन कोणत्याही कार्यक्रमा साठी... कॉन्ट्रीब्युशन घेत नसे..... मोहनला स्वतःला याविषयी फार वाईट वाटे... मात्र काय करणार त्याची परिस्थीतीच इतकी गरीब होती की, त्याचा नाईलाज होता.... तरी भविष्यात कधीतरी आपण आपल्या मित्रांचे उपकार फेडु अस ..त्याला नेहमी वाटे... तसं मीरा ग्रुप मोहन सोडला तर आर्थिक द्रुष्टीने सक्षम होता.... कोणाचे पालक मोठे अधिकारी होते तर कोणाचे पालक व्यवसायिक....... तसही त्या पाच जणांचा इतका ताळमेळ होता की, कधीही... ग्रुपसाठी केलेल्या खर्चावरून कधी वाद विवाद नसे...... हा कधी....मस्करी...किंव्हा विनोदात होई.....मात्र सिरियस मध्ये कधीच नाही.....


मीराच्या ग्रुपमध्ये मीरा दिसायला एकदम सुंदर व एक्टिव्ह म्हणून मित्रांनी ग्रुपचे नाव मीराग्रुप म्हणून ठेवले होते.... मीरा आईवडिलांची एकुलती एक लेक.... वडील मोठे सरकारी अधिकारी व आई देखिल एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होती.... मीरा अतिशय लाडात वाढलेली.... त्यामुळे काहीशी अहंकारी स्वभावाची होती.... मात्र आपल्या पाच मित्रांत तिचे वागणे चांगले होते..... पण कधी तीचा अहंकारी स्वभाव उफाळून येईल याचा नेम नव्हता..... कारण ग्रुपने त्याचा एकदोन वेळा याचा अनुभव घेतला होता.....

आज महाबळेश्वरच्या मस्त वादीत मोहनने मीराच्या सौंदर्यावर एक केलेली कविता ग्रुपला ऐकवली..... मीरा सह सगळ्यानी त्या कवितेला दाद दिली.....फार छान कविता होती....

मोहनला मीरा फार फार आवडायची.... मनातल्या मनात तो तिच्यावर फार प्रेम करायचा.... अर्थात ते प्रेम एकतर्फी होत.... याची खबर मोहन सोडुन ना ग्रुपला होती ना मीराला....

मीराचा ग्रुप कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता.... परीक्षा संपली तेंव्हा सगळे जण एकमेकाना भेटले.... सगळ्यानी आयुष्याचा शेवट पर्यंत एकमेकांशी संपर्कात राहण्याचा वादा केला.....

सरते शेवटी बळ एकवटून मोहनने ...सर्व ग्रुप समोर आपल्या प्रेमाचा इजहार मीरा समोर केलाच..... मोहनच्या ह्या प्रपोजने... मीरा शॉक झाली...... अरे!मोहन!!.....लायकी आहे का तुझी माझ्यासारख्या मुलीला प्रपोज करायची?.......मी तुला काय समजत होते! आणि तु काय निघालास?..... मी लग्न करीन तर एखाद्या श्रीमंत मुलाशी करीन तूझ्या सारख्या भिकार्ड्याशी नाही समजल?....मोहनच्या त्या प्रपोजने साऱ्या ग्रुपचे वातावरण बिघडले....... बाकीच्यांनीं मीराला समजावण्याचा प्रयत्न केला......की, तु... सरळ नकार दे ना!.... मोहनचा इतका अपमान करायची काय गरज?.... त्याला सॉरी बोल आणि प्रकरण मिटवून टाक!...... मीरा मोहनला....सॉरी म्हणाली असती की नाही..... पण हे ऐकायला मोहन तेथे थांबला नव्हता......

मोहन आपल्या होस्टेल वर गेला.... त्याची बॅग भरून तयारच होती..... तो तडक एसटीने आपल्या गावी निघाला...... ग्रुपच्या इतर मित्रांनी त्याला बरेचसे फोन केले... मात्र त्याचा फोन बंद दाखवत होता.....

एक दोन वर्षाचा काळ लोटला......मीराने तीच्या इच्छे प्रमाणे एका श्रीमंत मुलाशी लग्न केले..... मात्र त्या मुलाचा स्वभाव तिला अजिबात पटला नाही.... रात्र रात्र भर पार्ट्या करण.... मुली फिरवण.....बीजनेस च्या नावाने चारपाच दिवस बाहेर राहणे...... हे सगळं तिला असह्य झाल....होत.... शेवटी न राहवून तिने घटस्फोट घेतला.... व परत आई बाबांकडे रहायला आली....


. आठ दहा वर्षाचा काळ लोटला.... एव्हाना मीराग्रुपने वर्षाच्या शेवटच्या दिवशी केलेला वादा कालानुरूप सगळे विसरले.... आता कोणी कोणाशी फारस संपर्कात नाही..... मोहन तर त्या घटनेपासुन नाहीच नाही.... कुठे असेल तो? काय करत असेल तो??..... याची मीरा ग्रुपच्या कोणत्याच सदस्याला कल्पना नाही.......

समीर.... आता इंजिनियर होता.....एका धरणाची उंची वाढवायची होती त्याच्या सर्वेचे काम त्याच्याकडे आले...... आपल्या दोन इंजिनियर सहकार्या सोबत तो धरणगावात पोहचला... धरण बऱ्यापैकी मोठे होते.... आपल्या सहकार्या सोबत सर्वेचे काम आटपून तो..... त्या धरणाच्या रेस्ट हाऊस मध्ये पोहचला...... गेटवर वॉचमनने त्यांच्या गाडीला सलाम केला व उघडला.....

गेटवरच्या वॉचमनचा चेहरा समीरला काहीसा ओळखीचा वाटला..... त्याची दाढी आणि केस बरेचसे मोठे होते... एखाद्या साधु प्रमाणे..... गाडीतून उतरून समीरने वॉचमनला हाक मारली..... वॉचमन समीर जवळ आला... जी साहेब!.....बोलुन काहीशी नजर चुकवत होता..... समीरने त्याचे व्यवस्थित निरिक्षण केले...... तो दुसरा तिसरा कोणी नसुन.... मोहन होता तर..... अरे! मोहन तु?...... आणि इथे वॉचमन?..... होय साहेब! तो अदबीने म्हणाला......अरे! साहेब काय?.... मी समीर तूझा कॉलेज फ्रेंड......... हो! पण आता आपण साहेब आहात... तेंव्हा साहेबच म्हणायला हव..... . एस्क्युज मी फ्रेंड्स.....समीरने आपल्या सहकाऱ्यांना आत मध्ये जायला संगितले.......

अरे!.. मोहन कसा आहेस तु?...कॉलेजच्या शेवटच्या दिवशी पाठमोरा दिसला होतास आणि आज दिसतोस......ना खबर ना कोई पता?..... किती फोन करण्याचा मी प्रयत्न केला..... पण तूझा फोनच कधी लागला नाही........ मीरा कशी आहे?.... त्याचा पहिला प्रश्न........मीराच लग्न झाल.....मुलगा खुप श्रीमंत होता.... म्हणे!... तिने पत्रिका पाठवली होती..... पण मलाही जमलं नाही तीच्या लग्नांत जायला... नंतर मी फोनवर वगरै शुभेच्छा दिल्या... मात्र आता तिचा फोनच कधी लागत नाही.... तिने नंबर बदलला असेल कदाचित...... पण तीने नवऱ्याशी डिवोस घेतला अस मालिनी म्हणाली होती..... घटस्फोट!... बापरे !!..म्हणजे माझी मीरा आता फार दुःखी असेल... बिचारी!... मोहन हळहळ व्यक्त करत म्हणाला......मोहन! तु अजूनही मीरा वर प्रेम करतोस?..... होय ....... मी अजूनही तिच्यावर प्रेम करतोय.... आणि आयुष्यभर करत राहणार!...... म्हणजे तु अजुन लग्न?.......हो!.... नाही केल.... कारण मी फक्त नीं फक्त मीरावरच प्रेम केलंय..... पहिले आणि शेवटचे....... त्याच्या या वाक्याने समीर...अगदी निशब्द झाला.....

मग घरी कोण कोण आहे तूझ्या?..... समीरने थोडा विषय बदलण्याचा प्रयत्न केला...... आई आहे.बाबा ...गेल्याच वर्षी गेले........ओ!.... आय एम सॉरी!....... अहो! साहेब सॉरी काय त्यात?...... तशी बाबांची फार इच्छा होती की, मी आयुष्यात कोणीतरी मोठा व्यक्ती व्हावे...... पण मी नाकारा.... त्यांची ती इच्छा पुर्ण नाही करु शकलो!...... ..

आपल्या रेस्ट हाऊसच्या बाजूलाच कोटर्स आहेत.. त्यांत मी आई सोबत राहतो...... ठीक आहे!...चल तूझ्या कोटर्स वर जाऊ!.... त्या बहाण्याने तूझ्या आईला देखिल भेटता येईल!..... चालेल साहेब!........ मी तूझ्या बरोबर येईन पण एका अटीवर... कोणती अट साहेब?...... तु मला साहेब न सांगता आपली जुनीच समीऱ्या अशी हाक मारशील तेंव्हा!..... समीरच्या त्या वाक्यावर दोघंही खळखळून हासले..... हसता हसता मोहनच्या डोळ्यांत पाणी आले.... समीर समजला हा माणूस फार कधीपासून असा मनसोक्त हसला नसावा.....

आई हा समीर माझा कॉलेजचा मित्र.... आज मोठा इंजिनियर आहे!.......नमस्कार आई!.. कश्या आहात?.... मी बरी आहे!.... तुम्ही बसा गप्पा मारत मी चहा टाकते!......

खोली लहान होती मात्र दोन माणसांसाठी पुरेशी होती.... बाजुला टेबलवर वह्यांचा बराच मोठा गठ्ठा होता.... समीरने सहजच त्यातली एक वही उचलली..... मीराच्या विरहात लिहलेल्या कविता होत्या त्यांत.....समीरने सहज नजर फिरवत होता....... मिराशी प्रेमभंग झाल्यावर सहजच लिहल्या होत्या ह्या कविता!.... मोहन म्हणाला... इतक्यात आई चहा घेऊन आली.......साहेब!... तुम्ही तरी आता याला समजावा.... आजही एक दोन मुली सांगुन येत आहेत... पण हा काही लग्न करायला तयार नाही!.... आई! तुला किती वेळा सांगितलेय की, मी लग्न करणार नाही म्हणून!.... मोहन आईवर रागावून म्हणाला....... समीरने घड्याळ पहिले बराच वेळ झाला होता.... मोहन मी काय म्हणतो... तुला तर माहीतच आहे मला कविता वाचायला फार आवडतात......आता मी फार घाईत आहे.... मला तूझ्या या कविता वाचयला देशील?..... हो!का नाही?......... मोहनने तो सर्वच गठ्ठा उचलला व समीरच्या गाडीत आणून ठेवला......

....मीराचे जीवन सध्या ना घर का ना घाट का।.... अश्या स्वरूपाचे झाल होत.... तिला बऱ्याच वेळा मोहनचा केलेला अपमानाचा प्रसंग आठवे ........ तेंव्हा आपण मोहनला होकार दिला असता तर?....... तिला आता समजत होते...... मोहन गरीब होता मात्र तो तिच्यावर खरं प्रेम करत होता.. ..आता कुठे असेल तो?... काय करत असेल?..... असा विचार करून ती बैचेन होई.... पण आता विचार करून काय उपयोग...... वेळ तर निघुन गेली....असा ती आता विचार करी...

मीरा असच एकदिवस पेपर वाचता वाचता.... पुरवणी मध्ये \"राधाचा विरह\" नावाच्या एका कविता संग्रहाची माहिती तिने वाचली......तो कविता संग्रह बेस्ट सेलरच्या यादीतला होता..... आतापर्यंत त्याच्या दोनशेच्या वर पुनरावृत्ती निघाल्या होत्या.......कवीचे नाव - छोटा गालिब अस होत...... मीराला कविता वाचायची आवड होतीच.... ..

..मला आता तो नवीन आलेला कविता संग्रह पाहीजे होता!....... कोणता?... \"राधाचा विरह\" ना!.... हो तोच!.....माफ करा मॅडम तो आऊट ऑफ स्टॉक आहे!..... तुम्हांला बुकिंग कराव लागेल!.... फार फार मागणी आहे त्या पुस्तकाला.... जो येतो तो तेच पुस्तक मागतो मॅडम! ...पुस्तक विक्रेता म्हणाला..... ठीक आहे माझी ऑर्डर लिहून घ्या!..... कधी पर्यंत मिळेल?....... आम्ही स्टॉक मागवलाय दोन दिवसांत मिळेल!....ठीक आहे!...मग मी येते दोन दिवसांनी..... मीरा विनंती स्वरुपात म्हणाली...

आता मीराचीही त्या पुस्तकाविषयी आतुरता वाढली.... दोन दिवसांनी ती पुन्हा त्या पुस्तकाच्या दुकानात गेली... मी बुकिंग केल होत ते पुस्तक आले का?..... नशीब मॅडम वेळेवर आलात फक्त दोनच प्रती शिल्लक आहेत..... मीराला पुस्तक मिळाले.... कधी एकदा ते पुस्तक वाचते अस तिला झाल होत.....

मीराने पुस्तक उघडले..... त्यांतील पहिल्या एक दोन कविता तिने वाचल्या आणि ती सुन्न झाली...... काय त्या कवितांमध्ये विरहाचा दर्द होता..... इतक भावनाशील देखिल हा कोणी लिहू शकतो..... यावर मीराचा विश्वासच बसत नव्हता...... कारण आजपर्यंत तिने इतक्या हृदयस्पर्शी विरहाच्या कविता कधी वाचल्या नव्हत्या........ तिसरी कविता वाचता... वाचता... तर तीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या...... इतक भावस्पर्शी प्रीयेसीच्या विरहाचे वर्णन केलहोत........

.....चवथी कविता \"राधाचा नकार\" यात जर तिने नकार दिला तर?...या विषयी अतिशय.... निशब्द करणार वर्णन होत...... पाचवी कविता त्याची प्रीयसी राधाच्या सौंदर्याचे वर्णन करणारी होती.........मीराने ती कविता वाचली..... तिला नक्की आठवले... की, ही कविता तर आपल्या ग्रुपची ट्रीप महाबळेश्वरला गेली होती तेंव्हा मोहनने ऐकवली होती....... अस कस झाल...?....याचा अर्थ ह्या सगळ्या कविता मोहनच्या आहेत.... आणि ह्या सगळ्या कविता त्याने माझ्या विरहात लिहल्या आहेत तर?.. मग हा कवी छोटा गालिब कोण?...... याचा अर्थ मोहनच्या ह्या कविता नक्कीच कोणी तरी चोरल्या आहेत...... आणि त्याने स्वतःच्या नावावर प्रकाशित केल्या आहेत.......... मीराला काय करु आणि काय नको अस झाल....तिने पुस्तकाच पहिले पान उघडले त्यांत प्रकाशकांचा नंबर होता..... हॅलो !......प्रकाशक मधुसूदन बोलतोय... आपण..... मी मीरा!..... मीरा प्रधान बोलतेय!... तुम्ही जो \"राधाचा विरह\" कविता संग्रह प्रकाशित केला आहे त्या कविता कोणी दिल्या तुमच्या कडे?..... ...माझा भाचा समीर याने दिल्या त्या माझ्याकडे!.....का?..... काही अडचण?..... समीरच नाव ऐकताच तिने फोन खाली ठेवला.... ...


समीर इतक्या खालच्या थराला जाईल अस वाटल नव्हत..... मोहनच्या कविता त्याने छोटा गालिब या दुसऱ्याच्या नावाने प्रकाशित केल्या?...... समीर कॉलेजला असताना कविता करायचा पण मोहनच्या कवितेची धार नसायची त्याच्या कवितेत...... त्या वेळेस मोहनच्या कवितांवर तो जळायचा......हे देखिल मी अनुभवल होत....हे मात्र अतिच केले त्याने......दुसऱ्याच्या कविता नाव बदलून...प्रकाशित करायच्या म्हणजे काय?..... असा विचार मीरा स्वतः शीच करत होती.....

हॅलो !....मौरी धरण रेस्ट हाऊस?...... हो!.... बोला साहेब! मी वॉचमन मोहन बोलतोय!.......अरे!..... मोहन मी समीऱ्या बोलतोय!..... अरे!... मी तूझ्या मुद्दामून वाचायला म्हणून नेलेल्या कविता मी प्रसिध्द कवी आणि प्रकाशक मधुसूदन म्हणजे माझ्या मामांना दाखवल्या..... त्यांना तूझ्या कविता प्रचंड आवडल्या.... त्यांनी त्या लगेचच \"कवी छोटा गालिब\" या तूझ्या टोपण नावाने प्रकाशित केल्या....तूझ हे टोपण नाव मीच मामांना सुचवलं होत.......सध्या हे तूझ पुस्तक मार्केट मधे.. धूम चालतय!..... जो.. तो तूझ्या कविता वाचतोय..... सगळीकडे छोट्या गालिब ची... म्हणजे तुझी चर्चा होतेय...... आता तूझ्या पुस्तकाच्या रॉयल्टीचा चेक घेऊन मी स्वतः तुला उद्या भेटायला येतोय.. आहेस कुठे?..........समीर मोहनशी बोलत होता.... इतक्यात दोन तिने वेळा एक अननोन नंबर वरून फोन येत होता...... त्याने कॉल बॅक केले.....हॅलो !... कोण?..... मी मीरा बोलतेय!.... ओ!... मीरा!.... इतक्या दिवसांनी आठवण आली होय?....कशी आहेस?.... ते सगळं जाऊ दे!..... तु मोहनच्या कविता दुसऱ्याच्या नावाने का? प्रकाशित केल्यास ते सांग आधी!.... मीरा रागात बोलली........अग तसं काही नाही!..... तु एक शब्द बोलु नकोस... मी विचारले तूझ्या मधुसूदन मामांना!.... मीराचा पारा फारच चढला होता...... तु माझ्या मोहनच्या कविता दुसऱ्याच्या नावानं का छापल्यास का?... का?...... काय म्हणालीस तूझ्या मोहनच्या?....तु तर त्याला आमच्या समोर ...नाही नाही ते बोलुन अपमानीत केले होतंस.... आणि आज लगेच माझा मोहन?....... हो!..... झाली माझी तेंव्हा चुक.... मी त्याचे खरे प्रेम त्या वेळेस समजु शकले नाही.... त्याची शिक्षा मी भोगली आणि भोगतेय अजुन...... मीराच्या मनात मोहन विषयी प्रेम आहे..... हे ऐकून समीरला मनोमन आनंद झाला..... कारण मोहन अजूनही निस्वार्थ भावनेने तीची वाट पाहत होता........

आता स्वभावाप्रमाणे समीरला मीराची फिरकी घ्यावीशी वाटली...... व तो मीराला म्हणाला...... आता पश्चाताप करून काय उपयोग?..... आता तर त्याचा मस्त संसार आहे.... तो.... आणि त्यावर जिवापाड प्रेम करणारी त्याची ती......दोघं मस्त सुखात राहत आहेत! .... काय?.... त्याची ती.?..... मीरा आश्चर्याने म्हणाली....... पण त्याच्या कविता वाचुन तर मला अस जाणवते की ,तो अजुन माझी वाट पाहत असेल..?..... तुला खोटं वाटते?.... चल मी उद्या जाणारच आहे त्याच्या कडे... त्याला आणि तिला बघ स्वतः च्या डोळ्यांनी........समीर मनातल्या मनात हसत म्हणाला..

मीराला राहवले नाही..दुसऱ्या दिवशी ती समीर बरोबर त्या रेस्ट हाऊसला गेली...... साहेबांची गाडी आल्यावर सवई प्रमाणे मोहनने गाडीचा दरवाजा उघडला.... मीराला गाडीतुन उतरताना पाहून त्याला सुखद धक्काच बसला.... दोघंही एकमेकांकडे पाहतच राहिले...... तेव्हड्यात समीरने आवाज दिला..... मोहन राव आता तुम्ही पुस्तकामुळे 
प्रचंड लोकप्रिय आणि बऱ्यापैकी श्रीमंत झालात..... मोहनच्या हाती चेक देत समीर म्हणाला.... तो चेक पाहिल्या बरोबर मीराचा समीर विषयी दुसऱ्या नावाने पुस्तक छपाईचा गैरसमज मिटला.... समीर पुन्हा म्हणाला.... मोहनराव.... मीराला तुमच्या तिला पहायचे आहे.... त्यामुळे तिला कोटर्स वर घेऊन चल...... समीरच्या बोलण्यातील इशारा मोहन समजला...... तिघंही मोहनच्या कोटर्स वर गेले.... मोहनने हाक मारली.... हे बघ आपल्या साहेबां सोबत कोण आलाय?... जरा बाहेर ये...ना!.... त्या हाकेने मीराची ह्दयाची धडधड वाढली... कशी असेल ती?.... माझ्या पेक्षाही सुंदर असेल?.... असा विचार  मनातल्या ती मनात करत होती... इतक्यात...

समोर मोहनच्या म्हाताऱ्या आईला पाहून मीराला सुखद धक्काच बसला....... मोहनवर जिवापाड प्रेम करणारी... ती... म्हणजे त्याची.....आई... आणि आता तीची होणारी सासु आहे...तर.......

(कथा मोबाईलवर टाईप केल्याने बऱ्याच चुका आहेत त्या बद्दल माफी असावी....)

लेखन : चंद्रकांत घाटाळ...

संपर्क क्रमांक: 7350131480