राधाकृष्ण..❤️

Relationsh of Radha Krishna

ओलीचिंब सर पावसाची
गाते गाणे सुगंधाचे....
बंध हे निराळे जणू
मुग्ध मृद्गंधाचे....
प्रेमात वेडी राधा
सूर स्मरते त्याच्या बासरीचे..
शाम रंगी रंगतो लेवूनी
डोईवर सुख मोरपिसाचे....
मन-अंगणी त्याच्या
राधा आनंदी नाचे...
होता शाममय राधा
सुखक्षितीजाच्या डहाळी
उमले फूल चांदण्याचे....!!!

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे