रात पुनवेची आली भाग 12
मागील भागात आपण पाहिले की राधा कौल लावायला म्हातारबा पाटलांकडे वेळ मागते . काशी आणि दौलती एकमेकांच्या प्रेमात पडतात . इकडे धरण बांधण्यासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या . आता पाहूया पुढे .
दुसऱ्या दिवशी गावातील निवडक लोकांसोबत ब्रिटिश अधिकाऱ्यांची बैठक झाली . पुढील सहा महिन्यात काम सुरू होणार होते . त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी टप्पा टप्प्याने गावे पाण्याखाली जाणार होती . शेरगाव पहिल्याच टप्प्यात पाण्याखाली जात होते . ब्रिटिश सरकार धरण बांधणारच त्यामुळे विरोध करायचा झाला तर जिवावर उदार व्हावे लागणार होते .
धरणावर मजुरीची कामे दिली जाणार होती . पर्यायी जमीन आणि घरे सरकारी पैशांतून मिळणार असल्याचे अधिकारी सांगत होते . बैठक संपली आणि आज संध्याकाळी पुन्हा सर्वांनी एकत्र जमायचे ठरले . पौर्णिमा अजून आठ दिवसांवर असल्याने कौल आठ दिवसांनी मिळणार होता .
संध्याकाळी गावाच्या मारुती मंदिराच्या बाहेर पारावर गावकरी जमले .
" पाटील आपल्या मातीला सोडून जायचं पटत न्हाय . "
एक म्हातारा म्हणाला .
एक म्हातारा म्हणाला .
" समद खर आज्या पर आपल्या फूड दुसरा उपाय न्हाई . " म्हातारबा पाटील नाराज होऊन म्हणाले .
" मला लई भ्या वाटतंय . "
दौलतीच्या केसातून आपली मऊ बोटे फिरवत काशी बोलत होती .
" अस्स, भ्या आणि कशाच? "
तिच्या टपोऱ्या डोळ्यात बघत दौलती म्हणाला .
तिच्या टपोऱ्या डोळ्यात बघत दौलती म्हणाला .
" पुरुषाची जातच मेली तसली . "
काशी रागावली .
काशी रागावली .
" आगी समोर ठेवलं म्हणजी लोणी पाघळणारच की ."
दौलती तिच्या मांडीवर डोके टेकवून म्हणाला .
दौलती तिच्या मांडीवर डोके टेकवून म्हणाला .
" तसं नव्ह , आपल्याला कुणी बघितलं तर ? आस रोज भेटायला नग . "
काशी हळवी झाली .
काशी हळवी झाली .
" मला भेटली न्हाई तर झोप लागलं? " दौलती खट्याळ हसला .
" जावा तिकड ."
काशी लाजली .
काशी लाजली .
दोघेही बराच वेळ गप्पा मारत बसले . शेवटी नाईलाजाने दौलती निघाला . तितक्यात सरकन कुऱ्हाडीचे पाते दंडाला चाटून गेले .
दौलती सावध झाला . खाली वाकून त्याने मागे लाथ मारली आणि किंचाळण्याचा आवाज झाला . तोंडावर फडके बांधलेला एकजण पुन्हा उठून हल्ला करू लागला . ह्यावेळी दौलती सावध होता .
त्याने वार चुकवला आणि मागून मानेभोवती हाताने पकड आवळली . पोलादी हाताची पकड मानेवर पडल्याने हल्लेखोर गडबडला . त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली पडली . काशीने झटकन कुऱ्हाड उचलून घेतली . दौलती तोंडावरचे फडके काढणार इतक्यात हल्लेखोराने त्याला जोरात ढकलले आणि पळ काढला .
उजव्या दंडातून येणाऱ्या रक्ताने सगळा सदरा भिजला होता . काशी तशीच दौलतीच्या मिठीत शिरली . तिच्या काळजाची धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती . इथे थांबणे धोक्याचे असल्याने दौलती वेगाने काशीला घेऊन गावाच्या दिशेने निघाला . आपल्यावर हल्ला करू शकतील अशी काही नावे तो मनात आठवत होता .
काशी वेगाने घरात शिरली . तिच्या कपाळावर रक्त लागलेले होते . ती पटकन न्हाणीघरात गेली आणि तिने पटपट आपल्या अंगावरचे रक्ताचे डाग पाण्याने धुवायला सुरुवात केली . कसेबसे सगळे आटोपून काशी अंथरुणात पडली . तिच्या डोळ्यासमोरून अजूनही ते दृश्य जात नव्हते .
दौलती मात्र वाड्यावर न जाता राधाच्या घराकडे निघाला . असेच घरात गेल्यावर उगीच आरडाओरड होणार . त्यासाठी त्याने राधाच्या घराचा रस्ता पकडला .
" राधा ! राधा ! दरवाजा उघड . " दारावर थाप पडली .
दौलतीचा आवाज तिने ओळखला आणि त्याला आत घेतले . रक्ताने भिजलेला दौलती बघताच राधा घाबरली . दौलतीने अंगरखा उतरवला . दंडावर मोठी कापल्याची जखम होती .
" पाटील , काय व हे ? "
राधाने घाबरलेल्या आवाजात विचारले .
राधाने घाबरलेल्या आवाजात विचारले .
" राधे, समद सांगतो पर आधी सगळ आवर . "
दौलती कसेबसे म्हणाला .
राधा पटकन गरम पाणी आणि सुती कापड घेऊन आली . ओल्या फडक्याने पाठीवर, छातीवर पडलेले रक्त राधा पुसत होती . आजवर तिने किती वेळा दौलती कडे लांबून पाहिले होते . आज पहिल्यांदा म्हातारबा पाटलांचा लेक तिच्यासोबत होता .
राधाचा मुलायम हात छातीवर फिरत होता आणि हळुहळू दौलती तिच्याकडे आकर्षित होत होता . थोड्याच वेळात राधा त्याच्या बाहुत होती . तिच्या ओठांवर ओठ टेकवताना तो. काशी म्हणाला आणि झटकन दूर झाला .
दुसऱ्या क्षणी राधा देखील भानावर आली . त्यानंतर तिने जखम साफ केली आणि हळद पट्टी बांधून त्याला पांघरूण देऊन आत निघून गेली .
दौलतीने काशीचे नाव घेतले . राधाच्या अंगावर नुसत्या विचाराने काटा आला . कासू आक्का आणि म्हातारबा पाटील दोघांना कदापि सगळे मान्य होणार नाही . उद्या सकाळी दौलती उठल्यावर त्याच्याशी बोलायचे ठरवून राधा झोपली .
उन्हे अंगावर आली आणि दौलती जागा झाला . आपण राधाच्या घरात असल्याची त्याला जाणीव झाली . तो उठून जायला निघाला .
" पाटील थांबा , तुमचं आबा दोन दिस हिकडं फिरकायचं न्हाई . "
राधाचा गोड आवाज कानावर आला आणि दौलती थांबला .
आत आजीला चहापाणी सांगून राधा बाहेर आली .
" आजपतर राधाच्या जवळ आलेल्या पुरुषाने तिला दूर केलं न्हाई . पण पाटील तुम्ही मागं फिरला . काशी पासून दूर रहा . तुमच्या आणि तिच्या दोघांच्या भल्याच हाय ते . "
राधा म्हणाली .
" अस्स , आता तू आमासनी शिकवणार व्हय? "
दौलती किंचित आवाज वाढवत म्हणाला .
दौलती किंचित आवाज वाढवत म्हणाला .
" पाटील , आपल आवडतं माणूस सुखात असल पायजे . तुम्ही अन् काशी ह्या आगीत वाचणार न्हाय . "
राधा डोळ्यातले पाणी थोपवत म्हणाली .
" राधा , मला काशी पायजे . हे गाव , पाटीलकी समद सोडावं लागलं तरी चाललं . "
दौलती म्हणाला .
" म्या मदत करील . पर तुम्ही बाहेर कुठं भेटू नगा . देवीचा कौल घेई तवर जपून रहा ."
राधा त्याला समजावत होती .
दौलती राधाच्या घरातून बाहेर पडला . तिने दिलेला इशारा खरा असला तरी प्रेमात अडकलेले मन त्याच्या ताब्यात नव्हते .
" पंच मंडळी , कौल घ्यायच्या आधी देवळात सात दिवस उत्सव करतो आपून . आजपासन उत्सव सुरू व्हईल . "
म्हातारबा पाटील बोलत होते .
म्हातारबा पाटील बोलत होते .
त्याचवेळी दौलती वाड्यात शिरला . दौलती आत जाताना त्याच्या हातावर एका व्यक्तीचे लक्ष गेले . पण दौलती थांबताच ती व्यक्ती पटकन दूर झाली .
" पाटील , कासू आक्का कौल लावलं. तिची थोरली पोरं न्हाती झाली हाय . राधा तिला देवीच पातळ दिल . "
पंच सांगत होते .
" व्हय , पर काशी न्हाय म्हणली तर ? "
म्हातारबा म्हणाले .
" कासू आक्का ठरवल फूड काय करायचं . " बैठक संपली . पंच मंडळी निघून गेली .
दौलतीवर कोणी हल्ला केला असेल ?
देवीचे पातळ कशासाठी दिले जात असेल ?
वाचत रहा
रात पुनवेची आली
©® प्रशांत कुंजीर
रात पुनवेची आली
©® प्रशांत कुंजीर
अष्टपैलू 2025 स्पर्धा
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा