राणीचे युध्द...

लपलेला इतिहास
राणीचे युद्ध....

शंखनादा बरोबर... तलवारीचे भिडणारे आवाज ...हत्तींचे चीत्कार.. घोडय़ांचे किहलने..जखमी सैनिकांच्या किंचाळ्या ....माझ्या कानावर पडायला लागल्या... झाली एकदाची युध्दाला
सुरवात तर!... मी तंबूत बसल्या बसल्या स्वतःशीच ....
आज युध्दाचा पहिला दिवस.. किती दिवस युध्द चालेल याचा नेम नाही.. पाच दिवस.. पाच आठवडे.. पाच महिने..युध्द कितीही काळ चालु दे जो पर्यंत मी जीवंत आहे तो पर्यंत मी युध्दाचा मी एक भाग आहे....असा विचार करत करत
मी लोखंडी तबकडीत चंदनाच्या लाकडांचे तुकडे ठेवले..... कुपी काढली.. कुपीचे झाकण उघडले.. त्यांत असणाऱ्या सुगंधी द्रव्यांचे चारपाच थेंब तबकडीत टाकून....चंदनाचे तुकडे पेटवले.... त्यांतून धूर निघू लागला...त्या जळणाऱ्या तबकडी जवळ उभी राहुन.... मी घागरा वर केला आणि माझ्या गुप्ताअंगाला तो धूर दिला..... रात्रीची तयारी.......
चंद्रकला किती सुंदर दिसतेस!..गुरुमाता म्हणाल्या... आश्रमातील सखीं देखिल नेहमी माझ्या सौंदर्याची वाहवा करत.. मी आता सोळा सतरा वर्षाची असेन नक्की माहिती नाही... वयच काय?.. मला तर माझे आई वडील कुठूंब...या विषयी देखिल काही माहिती नाही.... लहान पणा पासुन माझ्या सखीं प्रमाणे मी जंगलातील या आश्रमात आहे.या आश्रमाविषयी महाराज व काही निष्ठावंत राजदरबारी यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही माहिती नाही...हा आश्रम महाराजांच्या कृपेने चलतो... याचा सारा खर्च राजकोषातुन होतो.. आश्रमात शिक्षण व संस्कार फक्त राजनिष्ठे विषयी दिले जाते... मी आणि येथील सर्व सखीं ह्या राजदासी आहेत....वयात आल्या की त्यांची रवानगी राजमहालात होते.. आमच्या पालनकर्त्या महाराजांमुळे राजनिष्ठा हेच आमच्या जीवनाचे लक्ष ...
आश्रम अतिशय घनदाट जंगलात मात्र निसर्गरम्य ठिकाणी राजधानी पासुन फ़ार दूरवर होता... जाण्या येण्या साठी फक्त पायवाट त्या वाटेने महिन्याकाठी चारपाच सैनिक घोडयावर लादून अन्न धान्य व इतर गरजेच्या वस्तु घेऊन येत...ते देखिल रात्रीच्या प्रहरी.. आश्रमाच्या रक्षणासाठी लहानपणीच दूरदेशांतून आणलेले दोन बलशाली गुलाम होते.... त्यांचे कान व लिंग जालीम औषधांने बालपणीच बधीर केले होते...
गुरुदेव व गरुमाता दोघांचाही स्वभाव अतिशय प्रेमळ होता...आम्हा सगळ्याना त्यांच्या मुलांप्रमाणे वागवीत पण कधी आमच्या भविष्याचा विषय निघाला की, दोघंही दुःखी होत.... आमच्या भविष्या विषयी ते नेहमी काळजीत दिसत.अस काय भविष्य होत आमचे?....
एका रात्री गुरुदेव आम्हा सखींना एक बोधपर गोष्ट सांगत होते.,. इतक्यात एक घोडेस्वार महाराजांचे पत्र घेऊन आला.... पत्रात लिहले होते..येत्या एकदोन दिवसांत परकीय आक्रमणाविरुध्द युद्ध सुरू होईल.. ..त्या साठी एक युद्धराणी त्वरीत पाठवा....पत्रातील मजकूर वाचुन गुरुदेवांनी माझ्या कडे नजर टाकली... चंद्रकला महाराजांचा संदेश आला आहे... त्यांना युध्दराणीची आवश्यकता आहे... आश्रमातील तूझ्या इतर सखीं वयाने तूझ्यापेक्षा फ़ार लहान आहेत त्यामुळे तुलाच जायला हव!... चेहऱ्यावरचे दुःख लपवत गुरुदेव म्हणाले.... जशी आज्ञा गुरुदेव!.... मी लागलीच तयारी केली... घोडेस्वाराच्या मागे घोडयावर बसले तेंव्हा.... राजमाता व माझ्या लाडक्या सखींचे अश्रू थांबत नव्हते....
रात्रीचा अखंड प्रवास करत आम्ही सूर्योदयाच्या वेळेस राजभवनात पोहचलो....मी पहिल्यांदाच राजमहल पाहत होते.... सगळं अगदी अदभुत होते... तसं राजमाता आणि गुरुदेव यांच्या मुखातून वर्णन ऐकले होते... मात्र आज सर्व प्रतेक्षात पाहत होते..... प्रवासाच्या थकव्यामुळे मला दासी कक्षात आणले.... मी थोडा आराम केला.. काही वेळाने दोन दासी आल्या त्यांनी नवीन कपडे ....थोडा शृंगार करून मला महाराजांसमोर हजर केले...माझ्या पालनकर्त्याचे मी पहिल्यांदाच दर्शन घेत होते.. पोरी!नाव काय तूझ? महाराजांनी मायेने विचारले...... चंद्रकला महाराज!... मी मुजरा करून म्हणाले.... चंद्रकला आम्ही आजपासून तुझी नेमणूक युध्दराणी पदावर करत आहोत!.... आम्हांला आशा आहे हे काम तु निष्ठेने करशील... अस सांगुन महाराजांनी एका जेष्ठ दासीला इशारा केला....
जेष्ठ दासी मला राजमहालातील एका गुप्त खोलीत घेऊन आली....युध्दराणीचे जीवन आणि अंत दोन्ही फ़ार दुःखदायी असतात.... आगामी एकदोन दिवसांनी सुरू होणाऱ्या युध्दात तुझी युध्दराणी म्हणून नियुक्ती झाली आहे तेंव्हा काळजी घे पोरी!... जेष्ठदासी फ़ार जड आवाजात म्हणाली.....पोरी चंद्रकला! युध्दराणी बाबत काही रहस्य आहेत जी युध्दराणी व माझ्या सारख्या वैदिणीलाच माहित आहेत...आणि ती सर्व रहस्य या गुप्त खोलीत आहेत....
ही निळी कुपी यात जे औषध आहे त्यामुळे मासिक धर्म बंद होतो.... याचे दोन थेंब घेतल्यावर त्या महिन्याचा मासिक धर्म येत नाही..... युध्द जर महिन्याच्या वर चालले तर पुढच्या महिन्यातही दोन थेंब घ्यायचे.... या औषधामुळे तुझा मासिक धर्म महिनेच काय पण कितीतरी वर्ष रोखू शकतेस...मात्र.,.. मात्र या औषधाचा दुष्परिणाम म्हणजे तु आयुष्यात कधीही आई होऊ शकणार नाही....तसंही युध्दराणीला आई होण्याचा अधिकारच नाहीच!....ही लाल कुपी... जेष्ठ दासीने कुपी हातात घेऊन तिचे बुच उघडले.... तेंव्हा अतिशय मनमोहक सुगंध त्या कुपीतुन दरवळला .... युध्दात तुला ऐक लोखंडी तबकडी दिली जाईल.. त्यात चंदनाच्या लाकडांचे तुकडे पेटवायचे त्यांवर हे सुगंधी द्रव्य चार पाच थेंब टाकायचे... तेंव्हा जो धूर निघेल त्या धुराचा शेक तूझ्या गुप्तअंगाला द्यायचा....
हे मद्य सोबत असलेला हा लहान ग्लास भरून संध्याकाळी युध्द समाप्ती चा शंखनाद झाल्यावर प्यायचे......ऐक ना अनेक रहस्य जेष्ठ दासी माझ्या समोर उलगडीत होती..... तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाली ...आज पासुन तु युध्दराणी आहेस! युध्दराणी!! ......
युध्दराणी फारसा माहीत नसलेला शब्द ..युध्द आणि राणी हे नेहमीचे कानावर पडणारे शब्द.... पण हे. दोन्ही शब्द एकत्र फारसे तुम्ही आजपर्यंत कधी ऐकले नसतील... याचे कारण...इतिहासाने माझी म्हणजे माझ्या युध्दराणी पदाची दखल हवी तशी घेतलीच नाही.अपवादात्मक कधीतरीच छोटासा उल्लेख दिसतो...म्हणून माझ्या कामा बद्दल..माझ्या जीवना बद्दल.... माझ्या योगदानाबद्दल .......फारशी कुणाला माहिती नाही.... या बद्दल मी इतिहासाला कधी माफ करणार नाही...युध्दराणी काय तर पडद्या मागची कलाकार.. आणि पडद्या मागच्या कलाकारांना कोण महत्व देतो...तेच आमच्या बाबतीत इतिहासाने देखिल केले..... त्याने जर आमची अजुन थोडी जरी दखल घेतली असती तर... माझ्या सारख्या भूतकाळात आणि भविष्यात होणाऱ्या युध्दराण्यांची जीवन व्यथा लोकांना माहिती झाली असती. की,युध्दराणी म्हणजे नक्की काय?...तिचे काम काय?... युध्दात तीचे योगदान काय? .......
......युध्दासाठी आपल्या परिवारा पासुन दूर झालेल्या.. थकलेल्या....चिडलेल्या.. कंटाळलेल्या....तुंबलेलल्या...... सैनिकांची रात्री वासना भागवण्यासाठी नेमलेली स्त्री म्हणजे युध्दराणी.....हो!... हिच तीची व्याख्या... उद्देश सैनिकांची वासना भागवून त्यांचे लक्ष युध्दात ठिकुन रहावे या साठी ......कारण युध्द किती दिवस किती वर्षे चालेल याचा नेम नसे... या परिस्थीतीत सैनिक युध्द सोडुन घरी जाऊ नये... म्हणून सैनिकांसाठी राजमान्य सोय....म्हणजे युद्धराणी ...खरतर युध्दराणी हा राजमान्य शब्द वास्तवात बोली भाषेत... xxxराणी हा प्रचलित शब्द..... हा अतिशय अश्लील शब्द सांगायला देखिल मला कसतरीच वाटते....मग तो नेहमी कानावर पडायचा तेंव्हा मला कस वाटत असेल?.....
युध्दाची घोषणा झाली..
युध्दाच्या रात्रीच माझा तंबू सैनिक शिबिराच्या बाजुला उभारला. त्या रात्री युद्ध साहित्याची वाहतूक व इतर कामांमुळे सगळे सैनिक व्यस्त होते.....युध्द उद्या पासुन सुरू होणार होते.... सैनिकांचे आणि माझे युध्दराणीचेही......
हो!... युध्दच म्हणावे लागेल त्याला... युध्द आपल्या शरीराच्या वेदनेशी.. ..युध्द आपल्या मनाशी.... युध्द आपल्या भावनेशी......... युध्द आपल्या जीवनाशी......
त्या धुरामुळे गुप्तअंगाला बराच थंडावा मिळाला..युध्दराणी म्हणून माझा पहिलाच अनुभव रात्री काय आणि कस होणार याचा विचार मी करत होते.... तसं मरणाची भीती नव्हती कारण माझ जीवन मी आधिच राजनिष्ठा व राज्य रक्षणासाठी अर्पण केले होत..
सुर्यास्त झाला..युध्द समाप्तीचा शंखनाद झाला... आणि माझ्या मनाची धाकधूक वाढली.... मी मोठ्या कुपीतील मद्य काढुन ग्लासात भरले.... एक घोट घेतला..फारच मधूर चव होती त्याची...त्या चवीमुळे पुढच्या दमातच ग्लास रिकामा केला.... ......
शंखनाद ऐकून जेमतेम डोळे उघडले. डोक ठणकत होते.. छातीवर सहज हात फिरला तेव्हा जाणवले... अंगावर कपडे नव्हते. ... फक्त चादरीने शरीर झाकले होते.....चादरीतुन पाय काढला तेंव्हा संपूर्ण शरीरात असह्य वेदना झाल्या....त्यांत गुप्ताअंगाचे वेदनेचे तर काय सांगु?.... कसतरी उठुन बसले.. पलंगाच्या बाजुला माझ्या रात्रीच्या कपड्यांचा चोळामोळा दिसला... ते काढले होते की, फाडले होते.. कुणास ठाऊक?... कारण ते मद्य पिल्यानंतर जी बेशुद्ध झाले ती आता कुठे शुद्धीवर आले... त्यामुळे मला रात्रीच काहीच आठवत नाही... पण जे काही घडले असेल ते फ़ारच भयानक असेल याची कल्पना होणाऱ्या वेदना करून देत होत्या..
सकाळी होणाऱ्या वेदना पाहता आज रात्री आपला जीव नक्की जाईल असा विचार करत करत मी जेव्हा धूर घेतला तेंव्हा जणू चमत्कारच झाला... काही क्षणात माझ्या वेदना कमी झाल्या.... फारच कमालीच औषध होते ते....जेष्ठ दासीने त्याचे गुण संगितले होते..मात्र ते इतके प्रभावी असेल असे वाटले नव्हते...
संध्याकाळ झाली मी ग्लासभर मद्य पिऊन पलंगावर .....
शंखनाद.....आज देखिल वेदना जाणवत होत्या पण आजच्या वेदना कालच्या पेक्षा नक्कीच कमी होत्या.....युद्ध अजुन किती दिवस चालेल आणि या नरक यातनातुन माझी कधी सुटका होईल?....या युध्दात मी वाचेन?.. की शहीद होईन?.... दिवस चालले होते....युध्दाला आता महिना झाला होता....रसद संपत आली होती... आणि माझे मद्यही
त्या संध्याकाळी मद्याची फ़ार थोडीच मात्रा शिल्लक होती.. .. ... त्या रात्री मी बऱ्यापैकी शुद्धीवर असल्याने बाहेर मद्यदुंद सैनिकांचे हसणे खिदळन्याचे आवाज येत होते... वीरगतीला प्राप्त झालेल्या आपल्या मित्रांचे त्यांना फारस दुःख नव्हते.... कारण याची सवयच झाली होती त्यांना.... . मध्ये रात्रीचा प्रहर होता .. एक सैनिकांचा तांडा माझ्या तंबू बाहेर आला....त्यांतील सगळे सैनिक मद्यधुंद अवस्थेत होते.... काय ते त्यांचे अश्लील संवाद...त्यांची माझ्या तंबूत शिरण्यासाठी चढाओढ... सगळं सगळं माझ्या कानावर पडत होते.... त्यां चढ़ा ओढीत चार जण एकत्र माझ्या तंबूत शिरले..... त्या चारही सैनिकांनी एकत्र माझ्यावर हल्ला चढवला... त्यांच्या विरुध्द लढताना काही वेळाने माझ शरीर निपचित पडले..... माझी सहनशक्ती पुर्णपणे संपली...तरिही आणखी दोन.... . एक.... तीन.... दोन.......कोंबडा आरवला... आता तरी माझ युद्ध संपेल अस वाटत होते.. पण नाही... एक सैनिक पुन्हा माझ्या तंबूत आला.... मी अर्धमेल्या स्थितीत होते.... तो जवळ आला... आणि.... आणि.... त्याने माझ्या डोक्यावर हात फिरवला.... तो नेहमीचा स्पर्श नव्हता... त्या स्पर्शात फ़ार वेगळेपण होते.... त्याही स्थितीत मला ते प्रकर्षाने जाणवले...... त्याने बाजुला असलेल्या चादरीने माझ नग्न शरीर झाकले ...त्याने पुन्हा माझ्या डोक्यावर हात फिरवला व तसाच निघुन गेला.... कोण बरं असेल तो?..... माझ्या शरीराला रोज तोच तर झाकत नसेल? ......
शंखनाद ...आज निर्णायक युध्द होत... .......दुपारचा प्रहर होता... आमच्या विरुध्द लढणाऱ्या राजाने माघार घेऊन संधी केली....संपले एकदाचे युद्ध ...मी तात्पुरत्या का होईना सुटकेचा श्वास टाकला.... सैनिक सामानाची आवरा आवर करत होते.. ... माझी नजर त्या...सैनिकांला शोधत होती........कसा असेल तो दिसायला?... तरुण असेल की वयस्क?.... त्याला मी काल रात्री... बाहेर जातांना पाठमोरे पाहिले... त्यामुळे त्याचा चेहरा दिसला नाही..... तसही त्या वेळेस वेदनेने माझी नजर इतकी अंधुक झाली होती..की त्याचा चेहरा लक्षात राहणे अश्यक्य होत...... कोण असेल तो?... माझ्यावर प्रेम करत असेल?..... तो भले माझ्यावर प्रेम करत असेल... पण मी तर युध्दराणी .... मला कसला आला अधिकार प्रेम करण्याचा?.... माझ जीवन तर आधिच मी राजनिष्ठेला अर्पण केलंय.....
युद्ध संपले.. म्हणून आता मी दासी म्हणून म्हणुन राजमहालात काम करते होते..... महालात मी युद्धराणी नाही तर दासी...... त्या असह्य वेदने पासुन मुक्त... निधान पुढील युध्दापर्यंत तरी...
डोक्यावर फिरलेला त्या हाताचा स्पर्श कधीतरी आठवायचा आणि माझे अंग शहारून जायचे.....परत भेटल का तो कधीतरी?.. या कल्पनेने मन बैचेन व्हायचे..
दिवस चालले होते... एक दिवस असाच हलका ताप अंगात आला..कामाचा थकवा असेल म्हणून. ..तो दिवस मी काढला.. पण दुसऱ्या दिवशी.... तापाने शरीर...अगदी आगीसारखे तापले होते...... अश्यातच गुप्तांअंगातुन. काळा काळा.. द्रव बाहेर येऊ लागला..... आणि असह्य वेदना सुरू झाल्या त्या वेदना युद्धातील वेदना पेक्षाही भयंकर होत्या .... जेष्ठ दासी ने पाहिले..तिला लगेच समजले म्हणून तिने बाजुला असलेल्या सैनिकाला डोळ्याने इशारा केला... व एक कुपी त्याच्या हातात दिली.... मी वेदनेने ओरडत असताना त्याने मला खांद्यावर उचलले....आणि त्याच गुप्त खोलीत नेले ..ज्या गुप्त खोलीत मला पहिल्या दिवशी जेष्ठ दासीने आणले होते... त्या गुप्त खोलीतील एक कळ त्या सैनिकाने दाबली तशी भिंत फाकली.... समोर खोलवर जाणारे भुयार दिसत होते..... याने मला त्या भुयारात नेले..... भुयार फ़ार फ़ार खोल होते... आतमध्ये मशालीचा मंद प्रकाश होता. भुयारात ज्या ठिकाणी मला त्याने खांद्यावरून उतरवले .... तेथे एक मोठी विहीर होती... त्या विहिरीतील मगरींचा आवाज मला स्पष्ट येत होता..... त्या सैनिकाने कुपी माझ्या तोंडात..रिकामी केली....तेंव्हा मला क्षणार्धात जाणवले आता माझे युद्ध संपले... ..डोक्यावर पुन्हा एकदा हात फिरला... तोच तो स्पर्श....हो! तोच स्पर्श होता तो.... त्या स्पर्शाने माझ्या वेदना बंद झाल्या......व काही वेळाने कानावर पडणारे मगरींचे आवाजही बंद झाले.....

(सदर कथा काल्पनिक आहे)

लेखन : चंद्रकांत घाटाळ
संपर्क क्रमांक : ७३५०१३१४८०राणीचे युद्ध....

संपर्क क्रमांक : ७३५०१३१४८०