पुरुषवादी

Purush


पुरुषवादी

आई सकाळी सकाळी मुलाच्या कानावर पडतील असे शब्द बोलत होती.. मुद्दाम जोरात बोलत होती.. त्याला आणि तिला ऐकू जाईल असे..

हो काल लग्न करून आलेल्या बायकोचा गुलाम झालास, आता बैल होऊ नकोस...तिच्या पदराला बांधून राहू नकोस म्हणजे मिळवले रे..

तो न रहाता बाहेर आला, त्याची बायको ही बाहेर येणार तावा तावाने हे माहीत होते त्याला..आणि ती निघणारच होती..तितक्यात त्याने तिला इशारा केला डोळ्याने...रागाने भरलेले डोळे...


लगेच दार रागातच उघडले...आणि आईला बघताच तो नरमला... शांत झाला...आणि ती जे म्हणेन ते ऐकून घेतले ही...पण पारा चढला होता.. .

तिकडून बायको बघत होती...इशारे करत होती..जणू सांगत होती...तू गप्प का तू ही बोल ना त्यांना...ऐकव त्यांना...

त्याने बायकोला त्याच रागात गप्प बसायला सांगितले...अगदी गप्प...पुन्हा जर बोलशील तर मी सहन करणार नाही..

मग आई हे बघून म्हणालीच... लागला तिचे इशारे समजायला.. ती सांगेन तेच कर आता...बोल तू ही आईला...शेवटी आई पेक्षा बायकोची किमया ..

तो न रहाता आईला हात धरून म्हणाला, अग मी तुझाच आहे...मग तुला विसरून मी जाणार कुठे...पण तुला ही एक सांगायचे आहे...जे मी पुन्हा सांगणार नाही...मी तिचा गुलाम ही झालो नाही...ना मी बैल होईल...मी माझ्या डोक्याने आणि मनाने माझे आयुष्य जगणार...मग कधी तिच्यासाठी असो तर कधी तुझ्यासाठी...मी सारखाच असणार... ना मी बैल होणार जो तिच्या दावणीला बांधला जाणार ना मी वासरू होणार जो तुझ्या मागे मागे सारखा फिरत रहाणार.. मी माणूस आहे... तुमच्या बाजारातला प्राणी नाही..


आईचा आवाज आता खाली आला होता... आणि बायकोला ही समजले होते...आपण आपल्या मर्यादित रहाणे ह्यात आपला मान आहे... सासुबाई साठी त्याचे कर्तव्य माझ्या मुळे त्याने विसरून जाता कामा नये.... तर सासुबाई कळले तिला सोडून तो फक्त माझा मुलगा व्हावा हा विचार आता सोडून देण्यात मोठेपण समजावे...


त्याला हे बोलायचे नव्हते पण दोघींना आज काहीच बोलला नसता तर त्यांनी त्यांच्या मर्यादा ओळखल्या नसत्या... आणि मग रोज हेच वाद निर्माण झाले असते...