पुष्पा

Entertainment
पुष्पा

~ ©® कीर्ती
मागच्या आठवड्यातील गोष्ट . ऑफिस च्या कामा निमित्त बाहेर गावी गेले होते त्यामुळे माझा नेहमीचा मॉर्निग वॉक असा झालाच नव्हता
चांगली आठवडा भर सुट्टी झाली होती वॉकला .
त्या दिवशी रविवार असल्याने आमच्या जवळच्याच येऊर च्या टेकडी वर जायच ठरवलं. मी येऊरला जाण्याची एकही संधी शक्यतो हुकवत नाही.
शहरी गजबाजाटा पासून दूर, हिरवाईने नटलेल व शांत असं माझं आवडत ठिकाण.
सावकाश वरती चढत जाणारा दगडी रस्ता , दुतर्फा असलेली वृक्षराजी फार चढ नसला तरी सवय नसल्यास दमवणूक करणारा. पण एकदा वर चढल्यावर सगळे श्रम विसरायला लावणारा निसर्ग . डोळे निववणारी अशी गर्द झाडी आणि शांतता .

रमत गमत माझी प्रभात फेरी सुरु झाली. नुकतीच एक पावसाची सर येऊन गेल्या मुळे हवेत हवाहवासा गारवा होता. इकडे तिकडे बघत बघत चालले होते
रस्त्याच्या बाजूने एक लहान मुलगा व मुलगी वय सुमारे 10 -12 वर्षे चालले होते. व्यायामासाठी निघाली
माझ्या पुढेच चालत होते . त्यांच्यात काही तरी चेष्टा मस्करी चालू होती . मुलीने त्या मुलाची काही तरी खोडी काढली असावी.
दोघे ही अगदी खळखळून हसत होते. मनात विचार आला किती दिवसात आपण असे खळखळून हसलोच नाही.
या रोजच्या धावपळीत आपल्या हातून असे निरागस सोनेरी क्षण निसटून जात आहेत असं वाटून गेलं.

मला त्याच्यात चाललेला संवाद कानावर पडला
मुलगा हातवारे करत तिला म्हणाला , "पुष्पा नाम सुन के फ्लॉवर समझी क्या? फ्लॉवर नही फायर है पुष्पराज झुकेगा नही सा ss ला "
तिथे त्या अलू अर्जुनचं काय व्हायाच ते होईल .पण इथे गल्ली बोळात बरीच पुष्प उगवली होती. अगदी शेम्बडी पोर पण शायनीग मारतात
मला संवाद समजायला जरा वेळच लागला . तशी ही घरी मी लेट करंट महपून प्रसिद्ध आहे?

जाऊ दे . आत्ताची पिढी जरा ओवर स्मार्ट अस काहीसं माझ्या मनात आलं .तशीच पुढे चालत राहिले
ती दोन्ही मुलं कशा साठी तळ्याच्या बाजूला थांबली होती. ती माझ्या पुढे होती
" त्यातलं पुष्पा व त्याची मैत्रीण भेदरलेल्या नजरे ने माझ्या कडे बघत म्हणाला हमे जरा रास्ता क्रॉस करने मे help किजीये ना . तिथे रस्यात कुत्री बसली आहेत.
"अरेच्चा काय झालय पुष्पाला? " मी
हसत विचारल?
"आम्हाला तेवढं क्रॉस करून पुढं जायच आहे."
त्यांनी रस्त्या मधे आराम करत बसलेलया श्वान पथकाकडे बोट दाखवून म्हण्टल.
मला काही कळायच्या आत माझ्या दोन्ही हाताला पकडून ती मुलं चालू लागली.
" आरडा ओरडा न करता सरळ चला का ऽ ऽ ही कोणी चावत नाही. शांतपणे चला." आम्ही सावकाश चालत पुढे गेलो.
मंडळी नी एखादा गड जिंकल्याचा आवेश होता.
ती दोघं मला बाय करत पुढे jog करू लागली
" आंटी पुष्पा के तरफ से थँक्यू सो SS मच . बा SS ....य" पुष्पाने मला ओरडून थॅक्यू सांगीतले.
~©® कीर्ती