कथेचे शीर्षक - पुरूषासारखा पुरूष असून. . . !
लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी
पुरुषासारखा पुरुष असून!(भाग -९)
कथा पुढे-
"पण हे असं ? माझा नाही विश्वास!" मामी जेव्हा असं म्हणाली तेव्हा शोभितला खूप राग आला.
इतके दिवस अगदी लग्न ठरण्या अगोदर पासून आतापर्यंत इतक्या गोडीने बोलणाऱ्या मामी, आज एकदम त्यांचा सूर पालटला होता.
या दोघांमध्ये काहीतरी बिनसलय म्हणजे शर्वरी बरोबर आहे आणि जावईच चुकलेत असा पक्का समज त्यांनी करून घेतला होता.
परंतु आज शोभितने ठरवलं होतं की काहीही होऊ दे आज भीड किंवा भिडस्तपणा न ठेवता एकदाच बोलायचं. शिवाय सकाळी त्याची आई पण म्हणाली होती मनात जे असेल ते बोलून घे व मोकळा हो.
शर्वरीने काहीतरी सांगून त्याची प्रतिमा खराब होऊ नये याची काळजी तो घेत होता.
मग त्याने सहा महिन्यात जे काही घडलं ते सगळं व्यवस्थित त्याच्या बाजूने सांगितलं . त्यामुळे पुन्हा पुन्हा हा विषय चघळण्यात येवू नये व मोठ्यांसमोर वैयक्तिक गोष्टींची चर्चा करण्याचे संस्कार नसल्यामुळे त्याला अवघड वाटत होतं.
परंतु मामा मामींना सगळ्यात मोठा हा प्रश्न होता की त्याने शर्वरी असं कधीच का नाही बोलली नाही किंवा यापूर्वी फिरून आल्यावर , मांडव परतनी , मंगळगौर किंवा अगदी दिवाळीच्या सणलाही असं काही जाणवलं नाही किंवा दोघांपैकी कुणीच काही बोललं नाही.
आणि मग मामींच्या डोक्यात वेगळीच शंका घर करायला लागली. हे काहीतरीच बोलतायत पण मग ती काय म्हणते ते ही ऐकावं.
त्यांनी पुन्हा एकदा शर्वरी ला कॉल लावून पाहिला, यावेळी तिने उचलला आणि वैतागून म्हणाली "काय गं आई , किती बोर करतेस सारखेच का फोन करतेस गं . . नाही उचलला तर सोडून द्यायचं ना ! मला राहू द्या ना यार सुखाने!"
तिचं हे बोलणं ऐकून तिच्या आईचा वैताग झाला आणि ती म्हणाली "शर्वे तू कुठे आहेस ?"
"घरीच आहे अजून कुठे असणार?"
" अच्छा तर सुट्टी आहे मग कुणी आलंय का घरी?"
"घरीच आहोत गं , आवरतेय, कोण कोण आहे काय? घरी कोण असणार आम्ही दोघे जण आहोत"
" अच्छा तर सुट्टी आहे मग कुणी आलंय का घरी?"
"घरीच आहोत गं , आवरतेय, कोण कोण आहे काय? घरी कोण असणार आम्ही दोघे जण आहोत"
मग तिच्या वडिलांनी फोन घेतला आणि म्हणाले "बेटा शर्वरी ऐक ना आम्ही आलोय बर का इथे तुझ्या शहरात , तर घरी येणार आहोत."
ती एकदमच चिडली, " काय बाबा हे निघण्यापूर्वी फोन का नाही केला? तेव्हाच सांगायला हवं होतं ना ! "
"असू दे राहिलं अचानक ठरलं पण घरीच आहात ना तुम्ही?"
" नाही नाही आता आहोत पण आमचा सिनेमाला जाण्याचा प्लान ठरलेला आहे , तिकिटं बुक आहेत बाबा . तुम्ही गंमत करत असाल तर उद्या परवा निघा किंवा मला सांगितल्या शिवाय निघू नका अन जर खरंच सरप्राईज वगैरे म्हणून आला असाल तर मग दोन दिवस आत्याकडे रहा. मी कळवते तेव्हा या."
"का गं असं बोलतेयस ?"
"बाबा , मला ऑफिसचं खूप काम आहे. मी कळवते."
"बाबा , मला ऑफिसचं खूप काम आहे. मी कळवते."
ऍक्च्युली या सगळ्या गोष्टींमुळे मामा मामीच्या डोक्यात प्रकाश पडला की काहीतरी गडबड आहे परंतु स्वतःच्या मुलीची चूक मान्य करतील ते मुलीचे आई वडील कसले!
त्यांनी कशीतरी वेळ मारून नेली आणि शोभितला ती काय म्हणाली ते सांगितलं नाही. आता त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हत।
मग शोभितनेही असं सांगितलं की तो घरी येऊन आई-वडिलांशी बोलणार आहे , ते काय ठरवतील तो निर्णय घेऊ .
"ती अशी वागणार असेल तर खरंच आमच्या दोघांचं सोबत राहणं अवघड आहे."
" नाही जावई बापू असं टोकाचा निर्णय घेऊ नका! अल्लड आहे पोरगी. शिकलेली आहे , शिकायला असताना पासून इथे शहरात राहते , स्वातंत्र्य मिळालंय ना . . . तर बोलतो आम्ही तिच्याशी आणि समजून सांगतो तिला." असं बोलून थोड्यावेळ इकडचे तिकडचे विषय सांगून ते तिघेजण मामा मामी व शोभितचं मावस भाऊ परत गेले.
कितीतरी दिवसांपासून प्रत्येक वेळी सत्य लपवण्यासाठी एकट्या शोभेची चाललेली मरमर खूप त्रासदायक होती.
आज त्याला खरंचच आहे ते सत्य बोलल्यामुळे खूप चांगले वाटत होतं, हलकं वाटत होतं.
आज त्याला खरंचच आहे ते सत्य बोलल्यामुळे खूप चांगले वाटत होतं, हलकं वाटत होतं.
त्याच्या मित्रांनी त्याची खूप साथ दिली. दोन दिवस तो तिकडेच राहिला आणि कितीतरी दिवसानंतर इतका रिलॅक्स झाला.
निर्णय घेणं हे खूप वेळेला महत्त्वाचं असतं अगदी तो निर्णय चुकीचा की बरोबर हे वेळ ठरवते पण निर्णय घेता येणं ही खूप मोठी कला आहे.
दोन दिवसानंतर जेव्हा शर्वरी परत आली व तिचे आई वडील घरी भेटायला येणार होते ते कळालं आणि शोभित ने गावाकडचं तिकीट काढलं. ४ दिवसांची रजा टाकली .
आई-वडील घरी आले तेव्हा शर्वरी एकटीच होती आणि घरात खूप पसारा होता .
" का गं बेटा , जमत नाहीय का आवरायला अशी आईने चौकशी केली तर शर्वरी म्हणाली की "तो कामात काहिच मदत करत नाही. शोभित पसारा करतो आणि कामाला काहीच हात लावत नाही आणि तिला नोकरीमुळे वेळ मिळत नाही त्यामुळे फक्त वीकेंडलाच ती घर आवरू शकते."
आईल मुलीचं खरं वाटलं. असेलही काय माहित.
आईल मुलीचं खरं वाटलं. असेलही काय माहित.
आणि ती म्हणाली की , नोकरीच्या ऑड वेळा सांभाळूनही ती एवढं तेवढं सगळं करते पण त्याला तिची कदरच नाही."
मग आईने असंच थोडसं खोलात जाण्याचा प्रयत्न केला, तर शर्वरीने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि म्हणाली ऑफिसमधे दुसऱ्यांनी किती माझी स्तुती करून काय उपयोग आहे त्याला म्हणजे शोभितला माझी कदरच नाही. . कधी स्तुती नाही की कधी पार्टी व हॉटेलमधे नेत नाही."
"अगं पण तुला विचारूनच लग्न ठरवलं ना शर्वे तर आता काय ते शांततेने सोडवा बाई." अाई काळजीने म्हणाली.
" आई बाबा , तुम्ही सगळे म्हणालात म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं, त्याचं रंग रूप काहीच बघितलं नाही फक्त नोकरी , पगार व हुशारी पाहूनच मी लग्न केलं ना त्याच्याशी !मला काय ऑफिसमधे कमी मित्र होते का पण आपल्या गावात उगीच जातीबाहेर नको म्हणून मी तुमचं ऐकलं ना ! मला तर वाटतंय आता तो जो पर्यंत सगळं कबूल करत नाही तोपर्यंत त्याच्याकडे येणारच नाही मी. तो गेलाय का गावी तर मी पण येते तुमच्यासोबत."
तिनेही बॅग भरली आणि ऑफिसात आठ दिवसाची सुट्टी टाकून आई-वडिलांसोबत गावी माहेरी परत आली.
तिकडे शोभित त्याच्या घरी पोहोचला व त्याला पाहून आईचा जीव भांड्यात पडला.
क्रमशः
लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक २४. ११. २२