पुरुष प्रेग्नंट राहिले तर ...

" माई बाळ म्हणजे काय वस्तू आहे का मार्केटमधून आणायला .. मी विचार नाही केला बाळाचा आणि तुझ्या नातसुनेला तर मोठं होऊ दे! ... जी अजूनही लहान मुलांसारखी वागत असते."… अमन ब्रेकफास्ट करत म्हणाला …. " ओ बिल्ला महाशय मी लहान मुलांसारखी वागते काय ? " .. सारंगी त्याच्या समोर उभी राहून डोळे बारिक करून नाक तोंड वाकवून म्हणाली ."माई तुला किती वेळा सांगितले की हिच्या समोर मला बिल्लू नको म्हणत जाऊ ... हिला आयता चान्स भेटतो मला चिडवण्याचा ... " अमन वैतागत म्हणाला .."स्वतः खडूस, आकडू, बागड बिल्ला आहे अन् मला म्हणतोय

 
    पुरुष प्रेग्नंट राहिले तर …
 


"बिल्लूss .. स्वर्गात जायच्या आधी पंतुला खेळावयचं 
 आहे". ..माईसाहेब नाश्ता करत म्हणाले. .
 
बिल्लूची आजी म्हणजेच घरातील कर्त्याधर्त्या माईसाहेब देशमुख ज्यांनी पतीच्या निधनानंतर ऑफिस आणि घर सांभाळले . सर्व कर्तव्य पार कडून त्यांना आज नातवाच्या मुलाला पंतुची ओढ आहे. त्यांचा नातू म्हणजेच अमन देशमुख जो आता देशमुख एम्पायर चा थोरला मुलगा सर्वेसर्वा आहे . त्याच्या परवानगी शिवाय तर घरात काहीही होत नाही .. पांढऱ्या शुभ्र गोर्‍या कांतीवर व्हाईट शर्ट आणि ब्लॅक जॅकेट जिममध्ये कसलेली वेल बिल्ट बॉडी , कॅट आईज आणि जेल लावून सेट केलेले केस, हॅण्डसम असा आणि आजीचा लाडका ... नुकतेच सहामहिने झाले अमनच्या लग्नाला …. शांत स्वभावाचा कमी बोलणारा खडूस टाईप असा त्याऊलट सारंगी जी बोलकी सतत बडबडणारी खोडकर उचापत्या करणारी हा 'शेर तर ती सव्वाशेर' एकापेक्षा एक वरचढ ...दोघेही एकमेकांना तडी देणारे तडीबाज … 'टॉम अण्ड जेरी '...


" माई बाळ म्हणजे काय वस्तू आहे का मार्केटमधून आणायला .. मी विचार नाही केला बाळाचा आणि तुझ्या नातसुनेला तर मोठं होऊ दे! ... जी अजूनही लहान मुलांसारखी वागत असते."… अमन ब्रेकफास्ट करत म्हणाला …. 


 " ओ ...बिल्ला महाशय मी लहान मुलांसारखी वागते काय ? " .. सारंगी त्याच्या समोर उभी राहून डोळे बारिक करून नाक तोंड वाकवून म्हणाली .



"माई तुला किती वेळा सांगितले की हिच्या समोर मला बिल्लू नको म्हणत जाऊ ... हिला आयता चान्स भेटतो मला चिडवण्याचा ... " अमन वैतागत म्हणाला ..


"स्वतः खडूस, आकडू, बागड बिल्ला आहे अन् मला म्हणतोय सडू कुठचा " … सारंगी ओठात पुटपटत म्हणाली तरीही अमन ने ऐकलचं .


"ये बिल्ला बिल्ली सारखे भांडू नका ! तुम्ही दोघही शांत व्हा! " तो पुढे काही बोलणार तर मध्ये माईसाहेब बोलून हसू लागल्या . आई , बाबा, काका काकू अमिता अमित ही जोरजोरात हसू लागले .त्यांना पाहून सारंगी ही हसू लागली . तिला पाहून अमनच्या चेहर्यावर स्मित पसरलं ... नाश्ता संपवून तो ऑफिसला निघून गेला .



"सारंगी तुमच्या मध्ये आणखी एक मेम्बर आला ना तेव्हा तुमचे भांडणे बंद होतील .. तो आला या घरात सगळीकडे त्याचाच आवाज येईल . या अंगणात तो दुडूदुडू चालेल आणि आम्ही त्याच्या मागे धावू ".. अमनची आई बाळ येण्याच्या आधीच स्वप्नात हरवून बोलत होती .. 

सारंगी छान गोड लाजली.


" आई मला खूप भिती वाटते हो माझ्या मैत्रिणीला खूप त्रास झाला होता ... उलट्या व्हायची , चक्कर येणे, पाय सुजणे, कंबर दुखणे डिलिव्हरीच्या वेळेच होणारा त्रास म्हणून " .. सारंगी भितभित बोलते .


"सारंगी कशाला एवढा विचार करते . आई होण ही एक सुखद भावना आहे स्त्रिला मिळालेलं देवाच वरदान आहे. बाळाच्या चाहूल लागल्यावर त्यांच्या साठी आई काहीही त्रास सहन करायला तयार होते .. आणि आम्ही आहोच नं सर्व तुझ्यासोबत" ..आई तिच्या डोक्यावरून हात फिरवून प्रेमाने समजवत म्हणाली .तशी सारंगीने मान डोलावून होकार दिला 

"आई जर स्त्री ऐवजी पुरुष प्रेग्नंट राहिले असते तर .. किती छान झाले असते" ...सारंगी तिच्या मनातील प्रश्न बोलून गेली ...तिच्या या वाक्यासरशी सर्व तिच्याकडे अवाक होऊन पाहू लागले… त्यात बाबा काकांचा आणि अमित चा चेहरा तर पाहण्यालायक होता .. सर्व महिलामंडळ त्यांच्या चेहकर्‍याकडे बघून हसायला लागले .

"म्हणून बिल्लू यांना अतरंगी म्हणतात" . … माईसाहेब हसून म्हणाले . सर्व पुरुष मंडळी त्याचं काही खरं नाही या विचाराने तिथून निघून गेले ….

" बाळा स्त्रियांना मातृत्वाचं वरदान आहे . स्त्रियाची सहन करण्याची शक्ती अफाट आहे. पुरुष सहन नाही करू शकत . त्यांना थोडसं सर्दी ही झाली की किती चिडचिड करतात … बायकांना महिन्यांच्या त्या पाच दिवस किती त्रास होतो एवढं पुरुष सहन करतील "... माईसाहेबांनी तिला समजविले .सारंगीने होकारार्थी मान हलवली .
  
"आता तुम्ही फक्त बाळ आणण्याचा विचार करा !"..आई म्हणाली तशी सारंगी लाजून पळाली . .. 

"दोघही अतरंगीच आहे " निघून गेल्यावर आई म्हणाली ..



रात्री सर्वांसोबत जेवण करून सारंगी रूममध्ये आली तिची आई होण्याची भावना जागृत झाली . त्याच बरोबर तीला वाटले खरचं यार पुरुष प्रेग्नंट झाला असता तर ... पुन्हा एकदा तिच्या मनात विचार येवून तिच्याच विचारावर टपली मारून हसून डोळे मिटले. ..

अमनची मिटिंग असल्याने तो बाहेरच जेवणकरून रात्री उशिरा आला . तर ही गाढ झोपेत होती ..फ्रेश होऊन तिला कुशीत घेऊन झोपी गेला .
 सारंगी सकाळी उठली... अमन ची कसरत करून फ्रेश होऊन बाहेर ब्लॅक कॉफी पित बसलेला होता .. एकदम त्याला मळमळल्यासारखे होते तो पटकन बाथरूम मध्ये जातो .. बाथरूम मधून बाहेर आल्यावर इनइजी फिल होते तसच तो बेडवर बसतो ... त्याला तस पाहून सारंगी जवळ येऊन विचारते .

"अमन काय झाल तुला ".. ती कपाळाला हात लावत बोलली

" नाही गं मळमळतय उल्टीसारखा होतयं बहुतुके एसिडीटी झाली वाटते काल बाहेर जेवल्यामुळे झाली असेल "

"ही असिडिटीची गोळी घे ! बर वाटेल तुला .. हल्ली जास्तच मळमळतय .. बाहेर खाणं बंद कर आधी! " ....सारंगी गोळी आणि पाणी त्याच्या हातात देत म्हणाली.

"हम्म ! "बोलून त्याने गोळी घेतली.

डायनिंग टेबलवर ही अमन शांत होता त्याला अस्वस्थ वाटत होत त्याला कशातच लक्ष लागत नव्हतं खाण्यातही नाही . त्याला पुन्हा उमेटिंग व्हायला आलं तो वॉशबेसिन ओकून आला ... सारंगी त्याच्या पाठोपाठ गेली .. तो बाहेर येत असतांनाच त्याच डोक गरगरायला लागले . हे पाहून सारंगी ने धावून त्याला पकडून घेतल . तीने बेडवर त्याला झोपवल आणि डॉकटरांना बोलावून घेतले.. ... एव्हाना सर्व मंडळी रुममध्ये हजर झाली .. डॉकटरांनी अमनच चेकअप केले . सर्व विचारून घेतले. . पोट ही चेक करून डॉक्टरांना दरदरून घाम फुटला .. नाडी चेक करून झाली ... डॉक्टर विस्फारलेल्या डोळ्यांनी कधी अमन कधी सारंगी कधी त्याच्या पोटाकडे पाहत होते . 

 "माझ्या मेडिकल करियर मध्ये असे कधी घडलेच नाही " डॉक्टर मनातल्या मनात विचार करत होते आणि बेशुद्ध झाले …



"च्याआयला यांना चेक करायला आणखी एक डॉक्टर आणावे लागेल ". अमित अमनचा भाऊ मस्करी करत हसत म्हणाला. तशी अमन ने त्यांच्या कडे रागात पाहिले .तसा अमित हाताची घडीतोंडावर बोट ठेवून एकदम लहान मुलांसारखा गप्प बसला …सारंगीने डॉक्टरांच्या चेहर्यावर पाणी शिंपडून उठवले .  

ते उठून म्हाणाले "मी कुठे आहे ?"

 "यांना एवढा काय धक्का बसलाय की हे सगळ विसरले" . .. अमित अमिता आणि सारंगी जवळ म्हणाला 

"डॉक्टर अस काय करताय ...तुम्ही देशमुख मॅन्शन मध्ये आहे " … सारंगी म्हणाली. .. 
डॉक्टरांनी स्वतःला चिमटा काढला आणि ओरडले . "आई sss गं …"

 "हा टकलू पुरता येडा झाला वाटतंय.. याचा फ्यूज उडाला .. बघ कसा झाला आहे हा डॉक्टर !.. आधी कसा आला आणि आता कसा झाला .. स्वतःला चेक करतोय ...वहिनी तू दादाला दुसऱ्या चांगल्या डॉक्टराकडे दाखव नाहितर... दादाचं काही खर नाही 'क्या से क्या हो गयाsss' हे सुर लावून गुणगुणत होता !"
 या अर्विभावात अमित कसानुसा चेहरा हावभाव करत म्हणाला .. 
 
 "मी येतो ! "...डॉक्टर उठत बाहेर जात म्हणाले
 "डॉक्टर याला काय झाले ते तरी सांगा ? " …. सारंगी डॉक्टरांना थांबवत म्हणाली . डॉक्टर जिथे होते तिथेच थांबले .. 
मि देशमुख यांना हॉस्पिटलला घेऊन या ! असे बोलून डॉक्टर बाहेर पडले . डॉक्टर गेले त्या दिशेने सर्व पाहत होते. . . त्या दिवशी अमन ने घरनूच काम केले
दुसऱ्या दिवशी सारंगी अमन संजीवनी हॉस्पिटला आले.
रिसेप्नशिस्ट ला सांगून अमन सारंगी आत गेले …

 "या मिस्टर अँड मिसेस देशमुख .. या बसा" .... डॉक्टर कुलकर्णी त्यांची मिसेस ज्योती कुलकर्णी जी गायनोलॉजिस्ट आहे. त्या हाताने बसण्याचे इशारा करत म्हणाले ..

 "मि देशमुख तुमचे टेस्ट करायचे आहे … मी लिहून देतो ती " ... डॉक्टर म्हणाले .

युरिन , ब्लड टेस्ट भरून घेतली .. सोनोग्राफी केली ..
रिपोर्ट हातात घेऊन डॉ.ज्योती आणि डॉ. प्रकाश चेक करत होते आणि बोलत होते …
 "डॉक्टर काय आहे रिपोर्टमध्ये ते स्पष्ट सांगा !" ... अमन घाबरून म्हणाला 

"मिस्टर देशमुख तुम्ही प्रेग्नंट आहात ! डॉक्टर 
 हे ऐकून अमनला आठशे चाळीस काय त्यापेक्षा जास्तच वोल्टचा शॉक बसला होता . अमन मूर्तीसारखा नुसता स्तब्ध होता ..डॉक्टरांनी हलवून त्याला भानावर आणले .. अमन जोरजोरात हसायला लागला … अमन वेडा व्हायचाच बाकी होता    

"तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे .. मीच काय कुणीच आजवर पुरुषाला प्रेग्नंट होतांना पाहिलेल नाही अस कुठेच घडलेलं नाही . पृथ्वीवरील आश्चर्य आहे हे! " .. डॉक्टर 

"काय sssss डॉक्टर तुमच डोक बिक खराब झालयं का? वेडे झाले का? ...काहीही काय बरबळताय . नॉन्सेन्स " अमन चिडून मोठ्या आवाजात बोलत होता .. अमन ला एवढा राग येतोन नं की उठून डॉक्टरांचे कॉलर पकडून म्हणाला 
 
सारंगी त्याचं तोंडावर एक हात ठेवून दुसऱ्या हाताने गुदगुदल्या करते ... तसा डॉक्टराचा कॉलर सोडून देतो.

 "सॉरी डॉक्टर "... सारंगी डॉक्टरांना म्हणते

"अमन चिडू नको रे !आपल्या बाळासाठी हे अस चिडणं रागवणं बरोबर नाही … आपल बाळ पण चिडक होईल तुझ्यासारखं चिडकाब्बू ... शांत हो !" त्याला शांत करत सारंगी म्हणाली .

 "तुला चेष्टा वाटते आहे का ही .. डॉक्टर काय म्हणताय कळतय नं तुला … कसं शक्य आहे हे ... अमन चिडून म्हणाला
 
"मिस्टर देशमुख मी जे बोललो ते शब्द शब्द खरा आहे ... हा एक चमत्कारच आहे परमेश्वराने अद्भूत देलेली देणगी आहे. आठवा अजूबा आश्चर्य आहे मि देशमुख .. पहिल्यांदाच अस घडले . ते ही व्टिन्स ... जुळे आहेत . हे बघा! सोनाग्राफित हे दोन फिट्स दिसताय .. डॉक्टर सोनाग्राफी रिपोर्ट दाखवून म्हणाले .
रिपोर्ट पाहून बाळाचे ठोके ऐकून तर ते दोघही शॉक झाले
डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या सर्व रिपोर्ट घेऊन ते जड मनाने घरी निघाले . घरी आल्यावर सर्व हॉलमध्येच बसून होते . अमन ने बाबांना रिपोर्ट दाखवले एक एक करून सर्वांनी पाहिले .. अमित ने पाहून हसायलाच लागला ..

"हे कसं शक्य आहे . .. दादा तुम्ही दोघांनी असं जगावेगळं काय केलं रे !… काय तडीबाज प्रेम आहे वहिनी तुझं की तुझी प्रेमाची निशाणी दादाच्या पोटात आहे. दादा प्रेग्नंट आहे. . .अमित चिडवून हसत म्हणाला . 
 "इश्श sss "सारंगी लाजून म्हणाली ..

" पण आता काय करणार आहे." .. सर्वांनी एकसाथ म्हणाले . .

" म्हणजे बाळाला जन्म देणार न काय करणार माझं बाळ आहे ते मी आई बाबा आहे त्याची .. सारंगी आई बाबा मध्ये या शब्दांत गोंधळून म्हणाली …

सर्व एकसाथ बोलायला लागले नुसता गोंधळ घालत होते .
 
"लोक काय म्हणतील ! समाज काय म्हणेल याचा विचार मी नाही करत !" .. सारंगी म्हणाली 

"अरे मला तर कुणी बोलू द्या "अमन ओरडून बोलला .. तसे सर्व शांत बसले ..याच बाळ आणि यालाच बोलता येईना .
 
"बाळ माझ्या पोटात आहे ते ही टिवन्स आहे . पुढे काय करायचं मला ठरवू द्या ... गर्भपात करणे अशक्य आहे. होऊच शकत नाही . तरी जन्म देण्याशिवाय पर्याय नाही पुढचे पुढे बघू .. अमन म्हणाला …
  अमित ढोल ताशा घेऊन आला आणि सारंगी जोरात नाचू लागली तिचा उत्साह पाहून सर्व आनंदात सामील झाले 



तिसरा महिना पूर्ण झाला आहे. . 
"अमन मी सोनोग्राफीत पाहिले आहे आपले बाळ ." … सारंगी 

"सारंगी कसं होईल गं ... दोन महिन्यांनी पोट दिसेल ... तेव्हा सर्व काय विचार करतील बिझनेस वर्ल्डमध्ये माझी काय चर्चा होईल याचा विचार करतोय .. अमन सारंगी जवळ म्हणाला 

"अरे बिल्लू कशाला एवढा विचार करतोस .. आपलं प्रेम जगावेगळं म्हणून जगावेगळा रिझल्ट लागलाय आपल्याला .. भारी ताकद आहे माझ्या प्रेमात .".. सारंगी स्वतःच्या दंडांना थोपटत म्हणाली .

हळू हळू दिवस जात गेले . .. सर्व अमनची काळजी घेत होते. सारंगी तर त्याला सोडून कुठेच जात नव्हती .. अमनचे हार्मोन्स चेंज झाल्यावर मुड स्विंग होत होते .. सतत चिडचिड त्यावर सारंगी त्या साठी काहीही करायची ... थोड पोट दिसू लागले . . अमन ने ऑफिसला जाणे बंद केले... घरूनच तो काम करू लागला . चौथा संपून पाचवा महिना लागला . तेव्हा पासून त्याला डोहाळे लागले . . सर्व त्याचे डोहाळे पूर्ण करत होते . . चिंच, कैरी, लोणचे आंबट चिंबट पदार्थ चालू होते ... त्याला काळी मात खाण्याचे डोहाळे लागले .. सर्व त्याचे वेगवेगळं डोहाळे पूर्ण करत होते ... ..
आधी जे पदार्थ आवडायचे ते आता नको होते ... त्याच्या शरिरातही बदल जाणवत होते .. कुठे त्याची व्यायाम केलेली वेल मन्टेन बॉडी कुठे आता पोठ पुढे आलेल थोडा स्थुल झालेला .. चेहर्यावर मात्र बाळ येण्याच तेज दिसत होते . दर महिन्याला चेकअपसाठी जाऊन यावे लागत होते .. बाहेर पडल्यावर सर्व विचारात पडत की हा माणूस असा कसा ... इतका कसा जाड झालेल्या .. बॉडी मेन्टेन करणारा .. सुटाबुटात असणारा व्यक्ती . आज टिशर्ट आणि नाईट पॅन्ट मध्ये त्याच पोट जास्त सुटलय .. चालण्यात अवघडलेपणा येतोय ... नवल वाटत होते .. जो पाहिलं त्याचे डोळे फक्त बाहेर येण्याचे बाकी होत ... सहावा महिना लागला .. आणि ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली .. टिव्ही, वृत्तपत्र सोशल मडिया सर्वीकडे अमन देशमुखच्या बातम्या ... चक्क घराबाहेर लोकांची गर्दी , मडियाची गर्दी … देशमुख परिवाराने आधीच पोलिस प्रोटेक्शन घेतले होतेब्रेकिंग न्यूज मिस्टर अमन देशमुख आठवा अजूबा म्हणून सगळीकडे झळकत होता …. कोणी हासले वाईट काहीही बोलले ... अमन ला आणि त्याच्या परिवाराल काहीही बोलण्यात येत होते .. त्याच्या बिझनेसवर परिणाम होत होता .. पोलिस याचा त्रास सर्वात त्रास अमनला होत होता .... सारंगीला त्याचा त्रास पाहवला नाही ... आणि तीने प्रेस कॉन्फरस घेण्याचा विचार केला ... सर्व प्रसारमाध्यमांना बोलावून घेतले. .. बाहेरील गार्डन एरियात सर्व अरेंजमेंट करण्यात आली ... सारंगी अमनला घेऊन त्यांच्या अंगावर शाल ओढून त्याला घेऊन आली ... बाहेरची गर्दी पाहून त्याला घाबरायला होत होत . अमनला बसवून पाणी दिल त्याला धीर दिला .... कैकपटीने आत्मविश्वास सारंगीच्या डोळ्यांत दिसत होता ... ती तेवढयाच आत्मविश्वासाने बोलण्यास सज्ज झाली …
 
"नमस्कार मित्रांनो . तुम्हाला इथे का बोलावण्याचं उद्देश्य काय आहे हे तर माहीतच आहे "... सारंगी उभी राहून बोलायला सुखात केली तर पलीकडून एक आवाज आला 

"आठवा अजूबा मिस्टर अमन देशमुख प्रेग्नंट आहेत ".. तो व्यक्ती तुच्छतेने बोलला …
 हो आम्ही प्रेग्नंट आहो .. जगावेगळ नाही पण भरपूर प्रेम करतो आम्ही एकमेकांवर ...आमचं बाळ माझ्या नवऱ्याच्या पोटात वाढत आहे .. आम्ही कोणताच प्रकृतीचा नियम तोडलेला नाही . ... हा खरतरं दैवी चमत्कारच म्हणावा लागेल … देवाने वरदान दिले आहे माझ्या नवर्‍याला ... अस कुठे घडले ना कधी असे घडणार ... न भुतो न भविष्यती ! खरं तरं पुरुषांना वाटत असते की स्त्री प्रेग्नंट असते . तेव्हा काय काय सहन करते. .. बाळाची चाहुल लागताच तीला उलट्या त्रास होतो .. गरगरते , जेवण जात नाही , हार्मोन्स चेंजमुळे तीची होणारी चिडचिड , शरिरात बदल , मध्येच दुखणे खुपणे आणि हे सर्व असून सुद्धा ती पूर्ण परिवाराला सांभाळते. . प्रसुतीवेदना सहन करून ती बाळाला जन्म देते. ...कधी तीला मुल जन्माला घालण्याची मशीन समजली जाते . तर मनाविरुद्ध तीचा गर्भपात करून तिला वारंवार प्रेग्नंट राहण्यास मजबूर केले जाते . मुलगी असल्यास पुन्हा गर्भपात अस करून तीचा जीव धोक्यात घातला जातो . . अस करणाऱ्या सर्व पुरुषांना ही वार्निंग आहे . . जरं तुम्ही हे नाही थांबवल तर भविष्यकाळात महिला प्रेग्नंट राहणार नाही पुरुष प्रेग्नंट राहतील . . आणि हा देवाचा आर्शिवाद गोड प्रसाद म्हणून स्विकारला आहे . . आमच्या बाळाला आर्शिवाद द्यायला नक्की या …" सारंगी स्मित करून स्पष्टपणे आत्मविश्वासाने म्हणाली तशीच तिथे टाळ्यांचा कडकडाट ऐकू येवू लागला ... अमन तिच्या कडे पाहत स्तब्ध झाला .. सर्व शुभेच्छा देऊन नाश्ता करून निघून गेले .. आणि देशमुख फॅमिली रिलॅक्स झाली . . आता या गोष्टीला महिना झाला होता ... अमनला सातवा महिना लागला होता ... 
   आधी स्त्रियांना जसे डोहाळे लागता तसेच जाणवले पण हे स्त्री चे डोहाळे नव्हते हे तर एका पुरुषाचे डोहाळे होते थोडेकार वेगळे तर असणारच नं ... अशातच त्याला एक दिवस सिग्रेट पिण्याचे होहाळे लागले .. नाही म्हणून ही तो
एकवेळेस रात्री सारंगीला सिगरेट ओढताना दिसला .. सारंगी ओरडून बोलली तर अमन डायरेकट रडायलाच लागला ... रडून रडून घर डोक्यावर घेतले .. 
 
"डॉकरांनी अजिबात स्मोकिंग करायला सांगितली नाही ना बिल्लू आपल्या बाळासाठी हे ठिक नाही त्या धुराने बाळाला श्वास घेण्यास त्रास होईल .. सारंगी लहान बाळाला समजवता तसे अमनला समजवले. .. अमन शहाणा बाळासारखा समजून घेतले आणि शांत झोपला .. त्याला पाहून सारंगीही झोपली .. हल्ली सारंगीची झोप कच्ची झाली होती .. आठ दिवसानंतर अमनला पुन्हा ड्रिंक करण्याचे डोहाळे लागले …
 डॉक्टरांनीच तुला स्मोकिंग ड्रिकींग करायची नाही सांगितली आहे लक्षात आहे ना ! तुझ्यासाठी आपल्या बाळांसाठी हे बरोबर नाही नाहीतर मी तुला अडवल असत का? ड्रिक करण्यापासून ती त्याला समजावत म्हणाली ... पण त्याला हवं होतच त्याने उठून एका सिक्रेट कप बर्डमध्ये ठेवलेली एक बाटली काढली ..

"नही sss ... सारंगी धावत जाऊन अमनच्या हातातील बाटली घेऊन आणिम्हणाली 

" हवं तर मी पिते अस म्हणून बॉटल ओठांना लावली .. डोळे बंद करून गटागट संपूर्ण पिऊन घेतली ... आणि तीला आता अमन दोन दोन दिसायला लागला .. अमन ने त्याच्या कपाळावर हाथ मारला ... हीने अख्खी बॉटल गटकवली ... आता हीच काही खरं नाही .. मनातच म्हणाला …
 " बिल्लोराणी ! तुला पिऊ न देण्यासाठी मीच स्वतः पिऊन घेतली . बिल्लो राणी काय भारी दिसतेय .. एकदम स्वीट दिसतोय . शुगरक्युब असं वाटत खाऊन घ्यावं . सारंगी नशेत त्याच्या जवळ जात डोळ्यात खट्याळ भाव ओठांचा चंबू करत म्हणाली .. तसा अमन मागे सरकला तिच्या नजरेतील भाव त्याला कळले . ..आणि बाहेर आला सारंगी त्याच्या मागे आली .. 
 "गाववालो और घरवालो ये जो बिल्लोराणी हे ना मला पप्पी देत नाहिये !.. सारंगी नाराज होत म्हणाली 
तिच्या आवाजाने सर्व हॉलमध्ये आले . आवाज येतोय पण दिसत नव्हती .तर ही वरती झुंबर वर जाऊन बसली .
"गाववालो ही बिल्लो राणी मला पप्पी देत नाहिय …. सारंगी नशेत बोलेत होती तिला पाहून सर्व हसायलाच लागले . 
 
"एका पप्पी साठी एवढा गोंधळ घातला " माईसाहेब म्हणाल्या 
 
"माई सांगा ना या बिल्लोराणी ची पप्पी पाहिजे म्हणजे पाहिजे !
पप्पी नाही तर इथून जम्पिंग मी.. सारंगी माईसाहेबांना म्हणाली ...तिला समजवून खाली आणले . ती अमनजवळ गेली आणि खाली वाकून त्याच्या पोटावर पप्पी करून तिथेच पडली . आईने आणि अमिताने पकडून तिला बेडवर झोपवले . 'आठव्या अजुबाचे डोहाळे ही अजुबेच होते'!.. 
****


अमनचे बेबीशावर करण्यासाठी पूर्ण घर फुलांनी सजवले .. अमन ला हिरवा कलरचा सैलसर कुर्ता आणि पैजामा ..पोटांवर फुलांच्या माळा , डोक्यावर मुकूट फुलांनी सजावलेला झोपाळा .. झोपळ्यावर बसलेला अमन आणि झोका देणारी सारंगी ... 

'कुणीतरी येणार येणार गं ' या गाण्यावर धम्माल केली .. सारंगीने भरपूर डान्स केला .
आता अमनला नववा महिना लागला होता . खालचे काही दिसत नव्हते. पाय सुजल्यामुळे चालता ही येत नव्हते . सारंगी पायांची मालिश करून देत होती .. अमनला कळा यायला लागले . त्या कळेने तो विव्हळत होता .. 
"वाचवा वा! मेलो रे!" अमन प्रसुती कळेने आरोड्या मारत होता 
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ... बाहेर मिडियावाले ही आहे त्यातील एक व्यक्ती लपून छपून अमनच्या फ्लोवर आलेला होता .. जेणे करून ही बातमी कव्हर करण्यासाठी ... तिथे आलेला होता .. डॉकटरांनी सी सेक्शन करण्याचे ठरवले. .. ओटीच्या बाहेर आई बाबा माईसाहेब काका काकू अमित अमिता बसून होते . सारंगी अस्वस्थ होऊन येरझाऱ्या घालत होती. बाळाच्या रडण्याचा आवाज आला .  
नर्स मुलगा झाला म्हणून शुभेच्छा देत बाळाला पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळून बाहेर घेऊन आली . सारंगी ने बाळाला घेऊन त्याच्या कपाळावर किस केले . तीन मिनटानंतर दुसऱ्या ही बाळाला बाहेर घेऊन आले . 
 "वेलकम माझे गब्बू डब्बू … नर्स अमन कसा आहे ." सारंगी बाळाला सोबत बोलून नर्सला उद्देशुन म्हणाली .
 "ते ठिक आहेत येतील थोड्यावेळात शुद्धीवर " नर्स 
 तिकडून एक रिपोर्टर धावत येऊन नर्सच्या हातातून बाळाला हिसकवून पळाला . आणि सारंगी जोरात ओरडली 
 
"माझं बाळं sss …." सारंगी घाबरून बेडवर उठून बसून ओरडत होती ….

"काय झालं एवढं घाबरायला माझं बाळं म्हणून का ओरडली . आपल बाळ कुठं आलयं !"अमन सारंगीला म्हणाला 
सारंगी अमनकडे आश्चर्यचकित होऊन ...त्याला पोटाला हात लावून पाहत होती ... 
 नुसतं बाळ बाळ म्हणत होती .. 
अमन ला काही समजत नव्हते. 'ही अशी काय पाहते आहे माझ्याकडे माझ्या पोटाला हात का लावते ' अमन मनातल्या मनात म्हणाला ..

"आपल्याला बाळ झालेल नाही . तू स्वप्नातून घाबरून ओरडून उठलीस !"
एक दोन मिनिट ती विचार करत बसली आणि तीला समजले म्हणजे तीने जे पाहिले ते स्वप्न होते तर आणि कपाळावर हात मारला ...अमनला स्वप्न सांगितले .. अमनचे तर डोळे बाहेर यायचे बाकी होते .
 "अंतरंगी आहे नुसती असं कोणी स्वप्न पाहते का ? हे बघ मला किती घाम आला आहे " तो ऐकूनच गार झाला ..
फ्रेश होऊन खाली आले .. अतरंगी सारंगीचे स्वप्न सांगून घरात हास्याचे कारंजे उडत होते ... सगळे बोलते होते मध्येच सारंगी मळमळायला लागले आणि ती वाॉशबेसिन कडे जाऊन उल्टी केली. . डॉकटरांनी तपासून आई होणार आहे! ही गोड बातमी दिली. आणि अमनचा जीवात जीव आला ... बातमी ऐकून 
" वाचलास दादा !" अमित म्हणाला आणि सर्व हसायला लागले .

समाप्त !

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे . याचा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही. सदर कथा मनोरंजन हेतू लिहिली आहे , कुठलीच चुकीची माहिती पुरवणे कथेचा हेतू नाही.