Login

पुरी भाजी रेसिपी इन मराठी.

Recipe
पुरी भाजी म्हटलं आपल्या माहित आहे ती फक्त बटाट्याची भाजी तीही पिवळी. महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी आज तीच भाजी आणि पुरी आपण पाहणार आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती पाहूया.

पुरी साठी लागणार साहित्य -

1 वाटी गव्हाचं पीठ.
तेल.
साखर चिमूटभर.
पाव चमचा रवा.
पाणी.
मीठ.

भाजीसाठी लागणार साहित्य -

5 बटाटे.
कडीपत्ता.
कोथंबीर.
मीठ.
तेल.
पाव चमचा मोहरी.
5-6 लसूण पाकळ्या.
अर्धी वाटी कांदा.
हळद.
चिमटीभर साखर.
5-6 हिरव्या मिरच्या.

पुरीची कृती -

सर्वात आधी एका पसरट भांड्यात 1 चमचा तेल, चिमटीभर साखर, पाव चमचा रवा, मीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घ्या. आणि त्याला चांगल मिक्स करा.

घट्ट मळून घ्या, गरजेनुसार पाणी घाला.

आणि चांगल मळून घ्या.

काही वेळाने त्याचे गोळे करा, आणि पीठ न लावता त्याच्या पुऱ्या लाटा.

आता एका कढईत तेल गरम करा आणि लाटलेल्या पुऱ्या तळून घ्या.


भाजी ची कृती -

सर्वात आधी बटाटे कुकर मध्ये शिजवून घ्या. थंड झाले कि त्याच्या साली काढून कुस्करून घ्या.

एक कढई घ्या, त्यात तेल गरम करा.

तेल गरम झाले कि त्यात मोहरी, कडीपत्ता, लसूण आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या.

फोडणी जरा तडतडली कि त्यात कांदा घाला, कांदा चांगला परतून घ्या.

आता ह्यात हळद, चविपुरती साखर आणि मीठ घाला. पुन्हा त्याला मिक्स करा.

थोडं तेल सुटलं कि त्यात कुस्करलेली बटाटी घाला आणि पुन्हा त्याला वाफवून घ्या.

आता झाकण काढा आणि वरतून कोथंबीर घाला.

झाली तुमची पुरी भाजी तयार आहे. तुम्ही गरमा गरम सर्व्ह करू शकतात.

******************************************


फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या

Subscription Plan

0