पुनर्जन्म..

Punarjanm

 पुनर्जन्म


प्रीती सकाळ पासून फेऱ्या मारत होती...

इकडून तिकडे ,तिकडून इकडे..हातात पेन होता आणि काही तरी शोधत होती.. तिला ते सकाळी टेबल वर ठेवले आहे हे माहीत होते पण आता ते नेमके कुठे गायब झाले हेच कळत नव्हते..

तिने घर भर शोधले ,कपाटात ठेवले तर नाही ना चुकून, की बेड खाली उडाले असावे.. सकाळी प्रशांत रद्दी देत होते त्यात तर नाही ना गेले ते..अरे किती महत्वाचे होते ते...

मला नीट कोणती वस्तू जागच्या जागी सापडेल तर नशीब, माझे कुठे लक्ष नसते..मी कुठे ठेवते आणि कुठे शोधत बसत असते...मे बी मी आतल्या खोलीत ठेवला असेल आणि इकडे हॉल मध्ये शोधत बसले...की एकदा प्रशांत ला विचारून बघू जर त्याने ठेवले असेल तर मी उगाच इकडे तिकडे शोधत बसत राहील..

आता त्याला कॉल लावावा आणि विचारावे म्हणून तिने फोन घ्यावा म्हणून परत बेड रूम मध्ये गेली तर तिथे ही फोन सापडत नव्हता..तो ही नुकताच तर इथे ठेवला होता..कुठे जाणार हा असा..हेट बाबा ही तर जणू जादू खाली ,आधी पेपर सापडत नाही आणि तो सापडावा म्हणून प्रशांत ला कॉल लावू तर तो फोनही सापडेना..हे माझ्या अडचणी च्या वेळीच का होते रे देवा..

ती अजून शोध मोहिम सुरू करते,इकडे तिकडे शोधला पण काही सापडेना..शेवटी डोक्याला
हुश ssss करून हात लावून बसते.. दमले बाबा ही काय कटकट..सकाळी सकाळी कोण समोर आले आणि मी त्याच्या चेहरा पहिला...

ती आता घामा घुम झाली होती, गर्मीने अजून चीड चीड करत होती,आता फॅन लावते म्हणून उठली तर light नाही..मग परत वैतागली, हातात एक मॅगझीन घेऊन स्वतःला हुशsss हुशss करत हवा घालत बसली ...थोडे बरे वाटले..

तर तितक्यात त्या मॅगझीन मधून तो कागद जो घरभर शोधत होती तो खाली पडला आणि तिला तो सापडला शेवटी.. ह्याला म्हणतात विसमरण, वय झाले नाही तरी विसरण्याची सवय आधीच येऊन बसली..डोक्याला हात मारत.."किती हा विसरळू पणा, कसे होणार माझे..म्हणून बदाम खाते पण ते ही असर करत नाहीत मेले.. डुप्लिकेट असतील म्हणून जमत नाही आणि मेंदू पर्यंत पोहचत नाही..."

तो फॉर्म सापडला आणि तिच्या जिवात जीव आला, एक नवी उमेद तिच्या मध्ये निर्माण झाली.. जणू हवेची झुळूक यावी आणि गारे गार वाटावे तसे काही...तिच्या आईच्या जीवनात ही हीच झुळकू आणणार मी...तिच्यासाठी काही ही करणार मी..

मी किती ही मोठी होऊ दे मला आई अजून ही हवी आहे, तिची सवय मला स्वस्थ बसू देणार नाही.. ती जर नसेल तर काय होईल ही कल्पना ही मी करू शकणार नाही... मला कोणत्या ही वयात ती हवीच आहे... ती शक्ती आहे माझी.. हर प्रॉब्लेम च सोल्युशन आहे ती, मोठी भले ही झाले मी पण इतरांसाठी, आईसाठी तीच अल्लड आहे मी...

एकच ध्यास आहे,माझ्या सोबत बरेच जगायचे आहे तिला, हाल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तिला हरेक प्रकारे सुखी ठेवेन.. मी करेन तिची सेवा.. मग बघू पुढच्या पुढे..पण आता तिला ह्या mothers dayला नवीन जीवन देणार आहे..

तिने प्रशांतला विश्वासात घेऊन आईला एक किडनी डोनर शोधायला सांगितला होता,ज्यासाठी तो डोनर मागेल तितका पैसा द्यायला तयार होती ..तिच्या आयुष्यातील तिने पहिल्यांदा सक्षम पणे हा निर्णय घेतला होता, या आधी साधी साडी घ्यायची तर ती प्रशांत शिवाय ती बाजारात जात नसे... पण खूप विचारांती तिने हा निर्णय घेतला होता ,कारण तिच्या आईसाठी तीच एक होती ,बाकी आईला बघणारी ,तिची काळजी करणारी तीच एकटी होती ,भाऊ ना बहीण, ना बाबा ,जे काही होती ती प्रीती होती..बाबा जातांना सांगून गेले होते प्रीतीला तुला एक जबाबदारी टाकून जात आहे, तिची काळजी घेशील, तिला ती आहे तोपर्यंत सांभाळून घे... ही कळकळीची विनंती समज ह्या बापाची..

आईला जपणे हीच तिची एक जबाबदारी होती जी माहेरची ठेव म्हणून सोपवली होती ,बाबांच्या डोळ्यात मरते वेळी आईसाठी ची काळजी होती ,त्यांना तेव्हाच कावळा शिवला जेव्हा प्रितीने आणि तिच्या नवऱ्याने बाबांच्या पाठी आईला आम्ही सांभाळू हे वचन दिले होते...

बाबांच्या नंतर आई खूप खचली होती ,तिला जगण्याची इच्छा उरली नव्हती ,पण प्रितीने तिला तिची शप्पथ देऊ देऊ पुन्हा नव्याने जगण्याचे बळ निर्माण केले ,भावूक होऊन ती म्हणत ,"आई तुझ्याशिवाय मला कोणी नाही, माहेर म्हणून फक्त तूच आहेस आणि तूच जाण्याच्या गोष्टी करत असशील तर मला ही, जगणे अर्थहीन वाटेल, बाबा नाही तू ही नसशील तर मी कोणाकडे पाहू.. तू मला अनाथ करून जाण्याची धमकी नको देऊ.."

आईला समजून सांगून तिने कुठे परत उमिदीने जगायला भाग पाडले.. तोच काही दिवसात त्यांनी हाय खाल्ली तशी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली, मग प्रीती ने तिला डॉक्टर कडे नेले ,तिच्या चाचण्या केल्या .

डॉक्टर काय झाले...प्रीती

डॉक्टर ने आईला तसे फार serious काही झाले नाही असे सांगितले ,तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल ,तुमचे रिपोर्ट मी प्रशांत कडे पाठवून देतो.. डॉक्टर

प्रीती...डॉक्टर खरंच काही serious नाही ना नक्की !!

डॉक्टर... नाही ,आपण इलाज करू शकतो कारण कोणत्या ही आजारावर आजकाल सहज treatment केली जाते ,आणि रुग्ण बरा ही होतो, मी प्रशांत सोबत बोलेन मी "

प्रीती काळजीत असते... आईला ही तसे सांगते जे डॉक्टर बोलून गेले होते.. आई तिलाच सांगते, "तूच काळजी करू नकोस ,जे नशिबात आहे ते कोणी बदलू शकले नाही, जितकी माझी सोबत असेल तितकेच मी जगेन.."

प्रीती दवाखान्यातून बाहेर पडताच प्रशांत ला फोन लावते ,आणि त्याला लगेच डॉक्टर सोबत बोलायला सांगते.."हॅलो ,मी आत्ताच बाहेर पडले आहे दवाखान्यातून, पण रिपोर्ट बद्दल डॉक्टरांना बोलले,तर ते म्हणाले जे काही सांगायचे असेल ररपोर्ट बद्दल ते तुला कळतील ,तर तू बोलशील please, कारण मला काही तरी serious matter आहे जे डॉक्टर clearly सांगायचे टाळत आहेत.. त्यांच्या समोर file दिसली ,त्यात आईचे नाव ही होते ,पण ते म्हणाले ,रिपोर्ट आल्यावर तुम्हाला कळवले जातील "

प्रशांत ला डॉक्टरने आधीच सगळे रिपोर्ट सांगितले होते ,आणि त्याला समजले होते..प्रीती साठी ही दुःखाची बातमी होती ,पण तो गप्प होता, तिला तो ही बातमी फोन वर सांगू शकत नव्हता, त्याला तसे करायचे ही नव्हते... प्रीती खूप हळवी होती आईच्या बाबतीत, आणि तिला हे सांगणे म्हणजे तिच्या मनावर आघात करण्यासारखे होईल...ती पुरती कोलमडून जाईल ,ते ही आई समोरच...मग परिस्थिती हाताळणे कठीण होऊन बसेल..आणि आईला ही जे कळायचे नाही ते समजून जाईल.. त्याही खचून जातील आणि हेच नेमके मला अश्या प्रकारे सांगायचे नाही..

प्रीती जरा चाचरत आणि मनात अनामिक भीती घेऊन घरी आली,चेहरा उरलेला होता, तरी बळेच आईसाठी हसत होती जणू काही झाले नाही ,जणू मला काही समजत नाही डॉक्टर काही बोलले नाही.. आईला कळत होते..कारण तिचे बाबा जाण्याचा काही महिने आधी दोन्ही किडणी खराब झाल्यामुळे आणि वेळीच निदान न झाल्यामुळे ,आणि काळजी घ्यायला जवळ कोणी नसल्या मुळे ,आणि इलाज वेळीच न झाल्या मुळे दगावले होते... तेव्हा हातात खूप कमी वेळ शिल्लक होता.. ओपेशन होऊ शकत नव्हते ना ऐन वेळी कोणी डोनर मिळत होता... आईची किडनी देण्यासाठी आई ही तयार झाली होती पण त्यांना ही हेच कळवले होते... पण त्यांच्या किडनी खराब झाल्या आहेत हे फक्त प्रीतीच्या बाबांनाच माहीत होते.. त्यांनी कोणाला आपला त्रास नको म्हणून स्वतः त्रास सहन करत होते.. आणि तिच्या आई बद्दल ही कोणालाच काही कळवले नव्हते.. खुद्द आईला ही नाही...

बाबांना वाटत होते जो भयानक त्रास त्यांनी सहन केला तो बायकोला सहन करावा लागू नये ,आणि लागला तरी तिच्या सोबत कोणी तरी असावे..किंवा तिला प्रितीने सोबत घेऊन जावे म्हणून त्यांनी मारताना प्रीतीकडून आईला शेवटच्या आयुष्यात सोबत करावी आणि तिला सांभाळून घ्यावे ही विनंती केली होती... त्या विनंतीचा किती ध्यास तिने घेतला की ती आईला स्वतःची एक किडनी द्यायला तयार झाली होती..


प्रीती घरात आली तशी प्रशांत ला शोधत होती,बॅग तशीच खांद्यावर होती ,आईला तिच्या खोलीत जायला सांगितले..तशी ती प्रशांत कडे धावली,तिला एक चाहूल लागली होती,तिला ती चाहूल अस्वथ करीत होती... ती तेव्हाच खोटी किंवा खरी ठरणार होती जेव्हा प्रशांत तिच्या समोरच डॉक्टरला फोन लावून रिपोर्ट बद्दल विचारणा करणार होता, तिला कुठे तरी शंकेची पाल तिच्या अधीर मनात चुकचुकली जेव्हा डॉक्टर तिच्याशी न बोलता ते प्रशांत सोबत बोलणार होते... जर सगळे ठीक असते तर मला सांगितले असते.. काहीच ठीक नसेल म्हणून तर त्यांना मला काही सांगावेसे नाही वाटले.. ते ही आई समोर असतांना, त्यांनी तसा एक इशारा ही केला होता..

तिला आता बाबा आठवत होते त्यांना ही असेच काही लक्षण त्यांच्या शेवटच्या काही महिन्यात जाणवत होते.. तसेच काही आईला ही जाणवत आहेत,पण ती मला कधीच काही सांगत नाही.. पण जी चूक बाबांच्या बाबतीत हलगर्जी पणा करून माझ्या कडून झाली ती आईच्या बाबतीत नाही होऊ देणार ,कदापी ही नाही..

ती लगेच रूम मध्ये आली आणि तिने प्रशांतला हाताला धरून डॉक्टर ला फोन करण्याचा आग्रह धरला, तिने त्यांना नंबर डायला ही केला तितक्यात त्याने तो फोन कट करत तिला दोन्ही हाताने पकडून आणि जोरात हलवून बेड वर बसवले,आणि जरा शांत व्हायला सांगत त्याने तिला ,डॉक्टर ने पाठलेल्या pdf रिपोर्ट ची प्रिंट दाखवली...

तिने ते बघितले आणि तिच्या नजरे समोर अंधाऱ्या आल्या ,तीला गर गरले काही वेळ..तिने जे वाचले ते अनाकलनीय होते... तिची हिम्मत गळून पडली ..तेव्हा निदान जे केले गेले त्याने प्रीती पुरती हादरली होती...तिच्या पाया खालची जमीनच सटकली जणू...त्यानुसार आईच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहे असे नमूद होते..

एका अवघड मोड वर आईचे आयुष्य येऊन थांबले होते, आणि प्रीतीचे ही जग काही दिवसात थांबणार होते.. आई गेली की तिचे माहेरच जणू संपणार आहे असे तिला वाटू लागले होते..तिला काहीच सुचत नव्हते...

प्रशांत ने तिला सावरण्याचा प्रयत्न केला ,पण तिला आई शिवाय काहीच कळत नव्हते.. आई ला वाचू का रे आपण असे ती काकुळतीला येऊन प्रशांत ला म्हणत होती, त्याला काही सुचत नव्हते.. पण तिला समजवण्याच्या नादात तो म्हणून गेला ,"अग आई वाचेल ,आपण तिला वाचू, तू सावर बघ जरा इकडे.. सगळ्या आजारावर इलाज आहे, तिची treatment सुरू करू.."

प्रीती...अरे नुसती treatment म्हणजे गोळ्या औषध घेऊन नाही पूर्ण होत, हा आजार किडनी दिल्याने/ च / बरा होईल ,आणि त्यासाठी मी स्वतः किडनी डोनर शोधणार.. काही करेन मी, माझे सोने नाणे ,पैसे, fd सगळे गेले तरी हरकत नाही..."

तो... "कोण आणि कुठे कसा शोधणार ,म्हणजे त्याला खूप कटकटी असतात, कोण इतक्या सहजासहजी मिळेल का ?? नाही मिळाला तर..."

ती... तू असा कधीपासून बोलायला लागलास, तू धीर देत नाहीस तर तू आता असे समजतो की आता काहीच उपयोग नाही...आईला मी असेच मरण यातना सहन करू देऊ, तू माझ्या जागी असतास तर काय केले असतेस...आणि माझ्या आईच्या जागी तुझी आई असती तर तू काय केले असतेस.. काढले असते ना कर्ज ,की असाच म्हणाला असता तू.. ?"

प्रशांतला एक चपखल उत्तर देऊन तीने गप्प केले होते, आणि विचार करायला भाग पाडले होते. त्याला त्याच्या बोलण्याचा पचतावा होत होता..

त्याने तिला पुन्हा जवळ घेतले आणि तिला ह्या क्षणी खरा आधार दिला आणि वचन दिले की आपण पूर्ण प्रयत्न करूच...आई ला वाचवू..कोणी ना कोणी डोनर मिळणार..

खूप प्रयत्न केले पण कोणी डोनर सापडला नाही, दिवस कमी होते... मग स्वतः प्रितीने एक निर्णय घेतला ,की ती डोनर होऊन तिच्या आईला किडनी देणार...तिने हा निर्णय प्रशांत ला ही कळवला होता,ती आयुष्यभर एका किडनी वर राहणार होती पण आईला वाचवणार हे निश्चितच होते..

तपासण्या करून झाल्या आणि तिची किडनी आईला चालणार हे निश्चित झाले होते.. पण प्रितीने आईला किडनी मिळावी म्हणून स्वतःच डोनर होने हे प्रशांतला रुजले नव्हते... त्याने अबोल विरोध दर्शविला होता... त्याला आईपेक्षा प्रीतीची काळजी वाटत होती, आईचे आयुष्य ,आणि प्रीतीचे किती तरी आयुष्य बाकी आहे मग तिने हा निर्णय का घ्यावा इतक्या घाईत ,आणि भावूक होऊन हे त्याला पटत नव्हते..

"मला तुझा हा निर्णय नाही पटला, अग आपण अजून शोधू कोणी ,आणि सापडेल कोणी गरजू तोपर्यंत थांबू " तो

तोपर्यंत थांबू ,तुला कळतंय का अरे किती कमी वेळ आहे आपल्या हातात ,त्याचा विचार कर ,कारण आता मला कोण्या डोनर चा विचार करायला वेळ नाही...आणि हरकत काय मीच माझ्या आईच्या आयुष्यासाठी डोनर होऊन आले तर... आईसाठी ही नको का..हे आयुष्य हे तिची देण आहे हे विसरून जाऊ का ?? तिने जीव धोक्यात घालून मला जन्म दिला आहे, तेव्हा ती म्हणाली होती मी मेले तरी चालेल पण माझी मुलगी वाचवा... तिने जर तेव्हा मला वाचवले नसते तर आज मी ह्या जगात नसतेच..मला कृपया त्या कर्जाची फेड करू दे..आणि तसे ही लोक राहतात ना एका किडनी वर ही जिवंत..मग मी ही राहीनच की..!! "

त्याला आता काहीच सुचत नव्हते.. वेळ कमी होता... सगळी तयारी झाली होती...किडनी देण्याची तारीख ठरली होती...ती तारीख 8 मे ही होती.. आणि तो दिवस खास होता...mother day होता...

ती फॉर्म काही औपचारिक माहितीसाठी घेऊन आली होती.. निर्भीड झाली होती ही लेक, आज एक लढाई आईसाठी लढणार होती ही लेक..

तो फॉर्म कसला होता ज्याला ती इतक्या उतावीळपणे शोधत होती.. तो किडनी डोनर साठी चा फॉर्म होता..तिने तजोड करायची नाही असे मनाशी अगदी पक्के केले होते. जर आई हवी असेल तर, मग काही ही किंमत मोजावी लागली तरी चालेल, तिच्या जिवापेक्षा जास्त काहीच नाही..

-----------------------


तिला प्रशांत कितीदा म्हणत होता ,"तू विचार कर ,ह्या निर्णयामुळे तुला पचतावा करायची वेळ येऊ नये हेच माझे म्हणणे आहे ,आईचे तसे ही वय झाले आहे ,तर तुला खूप जगायचे आहे.. तुला साधी सुई टोचली तरी त्रास होतो, तर हे कसे पेलवशील, त्यात आपल्या मुलांचा विचार कर, तुझ्या तब्येतीचा विचार कर ,मगच फायनल निर्णय घे. "

--------------

प्रशांत नेटकाच खालून आला होता ,त्याच्या हातात तिचा मोबाइल होता, तिला आता हरवलेला आणि ती शोधत असलेला मोबाईल सापडला होता...


"कुठे घेऊन गेला होतास मोबाईल " ती

तो "अग जरा त्याला repair केला ,आता बघ तो छान clear voice देतो ,ज्याने छान गाणे ऐकता येतील ,आईला, हरिपाठ ही टाकला आहे मी त्यात..त्यांना काही दिवस जेव्हा आराम करण्याची सक्ती करतील तेव्हा त्यांना अगदी बोर व्हायला नको म्हणून ही तजबीज केली आहे मी. "


ती...."प्रशांत मला आज तुझा अभिमान वाटत आहे... तू अशी सोबत करणार असशील तर मी कोणते ही दिव्य पार करेन ते ही अगदी सहज ,हसत खेळत.."

तो... "मग उद्या साठी तयार आहेस ना, उद्या तुला एक नवा जन्म द्यायचा आहे तुझ्या आईला ,आणि सोबत तू ही नव्याने जन्म घेणार आहेस..."

ती आईला किडनी देऊन सुखरूप बाहेर येते... आई ही सुखरूप असते... तीने आईला मात्र ह्यातील काही एक सत्य सांगितलेले नसते... तिला आईची काळजी वाढवायची नसल्याने.. ती स्वतः डोनर आहे ही बाब ती लपवून ठेवते...



जेव्हा आईवडील त्यांच्या जीवावर उदार होऊन मुलांचे जीव वाचवतात तर मग मुलांनी ही असे मोठेपण दाखवून आई वडिलांना जीवन दान दिले तर काय हरकत आहे...

तुम्हाला पटला का प्रीतीचा हा निर्णय..