पुन्हा आठवण झाली त्या क्षणाची
आज रक्षाबंधन भावाला राखी बांधायला जाण्याकरिता नभा भराभर कामे आवरत होती,खूप दिवस झाले माहेरी जायलाच मिळाले नाही म्हणून सारखी नवरोबा जवळ कुरकुर करत होती,आणि काही झाले तरी भावाला राखी बांधायला मीच जाते,यावर्षी भावाला न बोलवता स्वतःच जायचे तिने ठरविले, नवरोबंनी ही संमती दिली....
नभा आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी जायला निघाली,बस मध्ये बसताच तिला अचानक काही तरी आठवले,पण स्वतःच दुर्लक्ष करत ती माहेरची वाट पाहत होती,मनामध्ये आनंदाची लहर सारखी उमलत होती,माहेरी जाऊन आई बाबा भाऊ वहिनी भाचा सर्वांची भेट होईल याचा आनंद तर होतच होता पण मनामध्ये एक नकळत काहीतरी भीती सुध्धा तिला वाटत होती...
जास्त विचार न करता ती फक्त केव्हा माहेरी पोहचणार याची वाट बघत होती,आणि ज्या क्षणाची ती आतुरतेने वाट पाहत होती तो क्षण म्हणजेच नभाचे माहेर आले,बस स्टँड ला पोहचताच तिला समोर तिचा दादा दिसला,दादकडे आपल्या मुलीसोबत ती जायला रस्ता क्रॉस करत होती तोच तिच्या समोरून भरधाव वेगाने एक स्कूटी गेली व काही अंतरावर जाऊन त्या स्कूटी ला मोठा अपघात झाला....
तिचा दादा आणि ती लगेच स्कूटी जवळ गेले तर एक नवीन च लग्न झालेली बाई दिसायला खूप देखणी नाजूक अशी रक्तबंबाळ होऊन पडली होती,नभाला तर तिला बघून चक्कर च आले,ती स्वतःला सावरत मुलीला घट्ट पकडून उभी होती,तोच तिचा दादा म्हणातो अग, नभा तुला आटो करून देतो तू जा घरी मी येतो नंतर,तर नभा विचारते...का दादा या बाईला तू ओळखतो का?
अग...हो ना ग,तो आपल्या घरा शेजारी राघव राहतो ना त्याची बायको आहे ही,....एक वर्ष झाल फक्त लग्नाला,....हो का...दबक्या आवाजात नभाने उत्तर दिले....
अन् नभाच्या समोर सार विश्व उभ राहाल,....काही वेळ न लावता तिने दादाला सांगितले की मी पण इथेच थांबते तुझ्या सोबत,...अग पण यांना आता दवाखान्यात नायचे आहे...
हो मी पण दावख्यानात येते दादा...नभाने हळू आवाजात सांगितले,अन् लगेच त्या बाईला नभा व तिचा दादा जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले,तिथे गेल्यावर दादाने अपघाताची सर्व कल्पना राघव ला फोन ने दिली,...आणि लागलीच राघव आला....
राघव आला अन् नभा आणि राघव यांची नजरानजर झाली,तर राघव च्या डोळ्यात अश्रू वाहत होते,.... नभा राघव ला म्हणाली ,,,घाबरु नकोस सर्व काही सुरळीत होईल,काहीच अनपेक्षित घडणार नाही,... नभा च्या तोंडून हे शब्द ऐकल्या वर त्याला रडू सावरत नव्हते,त्याने चेहरा हलवत हो म्हटले अन् थोड्या अंतरावर जाऊन कदाचित तो रडत असावा...
.................... ...................... ..................
नभा ला देखील राघव चे दुःख सहन होत नव्हते,अन् तिच्या ही डोळ्यात अश्रू वाहू लागले,,,
आणि मग तिला तिचा भूतकाळ आठवला,अन् पुन्हा त्या क्षणाची आठवण झाली....हो राघव अन् ती एकमेकांना आधी पासूनच ओळखत होते,,,केवळ ओळखत च नाही तर एकमेकांसाठी जीव ही द्यायला तयार होते,,,
राघव अन् नभा लहानपणा पासूनच एकमेकांना ओळखत होते, लाहण्याचे मोठे सोबत च झाले,आणि अशातच दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते,दोघेही एकमेकांना सोडून अजिबात राहत नसत...खूप प्रेम होते दोघांचे..पण काही अडचणी मुळे दोघांना लग्न करता आले नाही,,,आणि दोघांची ताटातूट झाली,आणि कदाचित याच भीतीने नभा माहेरी यायला थोडी संकोचत होती....
आपल लग्न होऊ शकले नाही याची दोघांना खंत तर होतीच,पण एकमेकांचा राग न करता अगदी दोघांनी मिळून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता...त्यामुळे दोघांना फक्त एकमेकांसमोर येण्याची कायम भीती असायची,....कारण असे की कशाला हव्यात त्या आठवणी,ते दिवस,तो भूतकाळ,....भूतकाळात एकदा जर का माणूस गेला की अश्रूंनी ओला होत बाहेर पडतो....म्हणून नकोच त्या आठवणी असे दोघांचे विचार होते....
नभा आणि राघव दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी होते,पण आज रोजी घडलेले खूप भयानक होते,या भयानक प्रसंगातून राघव कसा बाहेर निघणार याची काळजी सारखी नभाला लागली होती,.....नभाने पुन्हा एकदा राघव ला धीर दिला आणि सांभाळ स्वतःला सगळं काही ठीक होईल असे म्हणत तिथून निघून घरी जायला निघाली...राघव देखील केविलवाण्या नजरेने उत्तर देत हो म्हणाला...
नभा आता घरी म्हणजेच माहेरी आली होती,सगळं वातावरण नभा च्या येण्याने आनंदी होते,पण नभा अजिबातच आनंदी नव्हती,का कुणास ठाऊक तिला कदाचित राघव च्या पत्नीची काळजी वाटत असावी,...काही दिवस माहेरी राहिल्या नंतर पुन्हा गावाला जाण्याअगोदर तिला राघव व त्याच्या पत्नी ची भेट घ्यावीशी वाटली...पण मनाची समजूत काढत तिने न भेटलेले च बरे असे ठरविले व आपल्या गावी परत आली...
तिथून काही दिवसांनी तिला कळले की राघव ची पत्नी आता पूर्णपणे बरी झाली,तेव्हा तिने सुटकेचा श्वास घेतला व राघव च्या असणाऱ्या चींतेतून ती मुक्त झाली....
नभा विचार करत होती की भूतकाळातील राघव हा वर्तमान व भविष्यात न आठवणीत आलेला च बरा...शेवटी भूतकाळ हा विसरलेला बरा....आणि पुन्हा असा क्षण न आलेलाच दोघांसाठी चांगला असे मनोमन म्हणत तिने मुलीला जवळ घेतले आणि आता आपलेच हेच भविष्य असे ठरवत नेहमी प्रमाणे कामे करण्यास सुरुवात केली...
आणि लगेच आवाज आला,,,,झाला का ग चहा...हो आले,आले....म्हणत नेहमीप्रमाणे कामाला लागली....
Ashwini Galwe Pund