पुनर्विवाह आणि तो भाग ५

partner is life

जरा मोठी सुनबाई नाराजच होती,धाकट्या सूनबाई तर स्वतःच्या गुंगीत असायची......

श्यामरावच्या मोठ्या मुलाला ,बाबांची तळमळ समजत होता....त्यालाही बाबांचा एकटेपणा पाहवत न्हवता...

श्यामराव आता शांतच झाले होते, कधी तरी रामकडे जायचे.. गप्पा मारायचे आणि मग पुन्हा घरी...रामसोडून बाकी कोणाशीही जास्त बोलत न्हवते.

एकदिवस राम त्याला बोललाच ....."श्याम,तू लग्नाचा विचार करतो की नाही आता ते सांग"......


श्यामराव: कशाला तू पाठी लागतो  सतत माझ्या ..नाही करायचे लग्न ...आणि माझी तब्येत ही अशी आज जातो की उद्या काही भरवसा नाही.....मग कशाला कोणाच्या बंधनात अडकायचे,आणि एखाद्याचे आयुष्य का उध्वस्त करायचे मी...सांग ना????

हे रामच्या बायकोने ऐकले....

ती म्हणाली.."श्यामभाऊ ,चुकीचा विचार करत आहात...आयुष्य काय हो ..पिकलं पान. आज नाही तर उद्या ते गळणार... पण जोपर्यंत श्वास चालू आहेत तोपर्यंत तरी जागून घ्या....शेवंता ताई नाहीत आता,त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही...पण माझ्यावरून सांगते तुम्हाला... उतारवयात जोडीदार हा खुप मोठा आधार असतो.थकलेल्या देहाला आणि मनालाही आपल्या हक्काच्या माणसाचा आधार हा हवा हवासा वाटतो....

श्यामराव फक्त ऐकत होते... खरं तर त्या अगदी मनातलं बोलत होत्या,श्यामराव एकटेच पडले होते... मुलं ,सुना, नातवंड जरी होती तरी एकटेपणा खातच  होता..

पुन्हा त्या बोलू लागल्या....
श्यामभाऊ तुमची जर हरकत नसेल तर बोलू का ???

श्यामराव: बोला ताई...

"माझी एक मैत्रीण आहे,तिचा नवरा गेल्यावर्षी अपघातात मरण पावला आहे.....तीसुद्धा एकाकी आहे...खरं तर ती आश्रमात राहते..... तिलाही गरज आहे आपल्या जवळच्या माणसाची...खूप गुणी आहे माझी मैत्रीण ,ती सर्वांना आपलंस करते ,तुमच्याही घरात ती सर्वांना ती आपलं मानेल..आणि तुम्हाला एक छान जोडीदार मिळेल..कांता नाव आहे तीच.... तिची एकच इच्छा आहे,तिला आश्रमात मरण नको आहे तीला तिचा शेवटचा काळ कुटुंबासोबत घालवायचा आहे.....
तिला कुटुंब हवे आहे,कोणीतरी तिला आपलं म्हणणारे हवं आहे...बघा एकदा विचार करा.....

रामने श्यामरवांच्या खांद्यावर हात ठेवला....
राम:श्याम,बघ बाबा आता तरी विचार कर ह्याबाबतीत.... ह्या जगात आपल्यासारखे एकाकी खूप आहे.आणि कांताताई सुद्दा त्यातल्याच एक.....बघ त्याही असुरल्या आहेत, आपलं कोणीतरी असावं म्हणून.... बघ विचार कर....वेळ नको वाया घालवू...

श्याम एकही शब्द बोलला नाही,तोच श्यामरावांचा मोठा मुलगा त्यांना घ्यायला आला..... बोलला.."बाबा, कशाला एकटे बाहेर पडता, मी म्हणालो होतो ना,कुठे जायचे असेल तर मला सांगा, मी आलो असतो ना ...चक्कर येत आहे ना तुम्हाला....

राम ,श्यामच्या मुलाला बोलला, बेटा तुला नंतर फोन करतो ..महत्वाचे काम आहे तुझ्याकडे
त्याने मान हलवली  आणि श्यामरावांना घेऊन गेला....

श्यामरावांना कल्पना आली, महत्वाच्या कामाची.....

शमरावांनी निरोप घेतला....

काय असेल महत्वाचे काम, रामकडे???

पाहू पुढच्या भागात....

लेख आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कंमेंट करा....

अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडला असल्यास फॉलो करा..

🎭 Series Post

View all