पुनर्विवाह आणि तो भाग १

ABout reality

श्यामराव एकटे पडले होते... बायको देवाघरी जाऊन एकच महिना झाला होता.. तसे धडधाकट होते, चालून फिरून मस्त .घर गोकुळासारखं होते ..दोन मुलं, सुना नातवंड सर्व घर भरलेले तरीही एकटेपणा खायला उठवायचा ....मुलं कामाला जायची, नातवंड शाळेत आणि सुना आपल्या कामात असायच्या.

श्यामराव आपले ,बायकोच्या अनेक आठवणी कुरवाळत बसायचे..एक दिवस सहज अल्बम चाळत बसले होते... तोच त्यांच्या बायकोचा सुंदर फोटो नजरेस पडला दोन वेण्या घातलेल्या .ब्लॅक अँड व्हाईट फोटो...फ्रॉक घातली होती गळ्यापाशी छान झालरची डिजाईन.. हाच फोटो होता श्यामरावांनी त्या फोटोलाच पाहून शेवंताला पसंत केली होती...ती आली आयुष्यात आणि आयुष्य जणू परिपूर्ण झाले होते त्यांचे.....

शेवंता आली आणि तिने तिच्या गोड स्वभावाने सर्वांची मन जिंकून घेतली... सासू जरा किचकीच करायची पण तरीही तिच्या सहनशक्तीने त्यातही तिने स्वतःला सिद्ध केले... नंदा, बाळाचं सुद्धा साफ मनाने केलं तिने...साक्षात अन्नपूर्णा होती दारी आलेल्याला कधीच उपाशी नाही पाठवलं... गोरगरिबांना मदत करायची...शेजारधर्मसुद्धा आपुलकीने पाळायची.... जादूच होती शेवंतांमध्ये.... शिकली न्हवती जास्त पण माणुसकीच उच्चशिक्षण घेतले होते तिने....सर्व रुपात सक्षम होती, मुलगी, बहीण,बायको,आई,आजी शेवटपर्यंत घरच्यांचं करण्यात कधी तीच आयुष्य सरलं.....

एव्हाना हातातला फोटो अश्रूंनी भिजला होता... वाईट ह्याच गोष्टीच त्यांना वाटलं ,जस शेवंताने त्यांची आवड निवड जपली तसं त्यांनी नाही जपली,जबाबदारी खांद्यावर होती, वेळ न्हवता...शेवंतीची एकच एक इच्छा होती,विमानात प्रवास करायची ..अनुभवायचं होत तिला ढगात जाताना विमानाचं रूप.....ती इच्छा राहिली.....

आता रिटायर झाले होते.. आलेले पैसे त्यांनी बँकमध्ये टाकले.. काही तरी मनाशीच ठरवलं... त्यांनी शिमल्याच विमानाचं तिकीट काढल,एकटेच निघाले प्रवासाला आणि अनेक गोड आठवणी शेवंतांच्या...तिथे गेल्यावर प्रत्येक वेळी शेवंताचा भास होत होता... खरंच आपल्या जोडीदाराच् महत्व तो नसताना जाणवत ते त्यांना जाणवत होते.... शेवंताची मनातल्या मनात माफी मागत होते....

आयुष्य होतं पण पोकळ झाले होते, दिवसेंदिवस तुटत चालले होते...मुलं पाहत होते त्यांची अवस्था...काय करावं आता हा सर्वांना प्रश्न  पडला..आधीच वयोमानानुसार अनेक आजार पाठी लागले होते..एकटक कुठे तरी पहात राहायचे... जणू काही शेवंतांला शोधायचे......

मुलांनी मिळून त्यांचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला....श्यामरावांना सांगितले तसे ,, ते चिडले... तुमच्या आईची जागा कोणती दुसरी बाई नाही घेणार...तुम्हाला काय मी जड झालो आहे का ..??मी बघेल माझं ...माझं काही करू नका.....मी  समर्थ आहे...

मुलं समजावत होती..त्यांचा उद्देश तसा न्हवता.. पण श्यामराव फार हळवे झाले होते...खूप काही डोक्यात विचार येत होते... पहिल्यांदा मुलांवर असे खेकसले होते...डोक्यात असंख्य विचार घोळत होते.......


तोच त्यांचा फोन वाजला .त्यांच्या जवळच्या मित्राचा फोन होता,राम शाळेतला मित्र ....त्याची बायकोसुद्धा दोन महिन्यापूर्वी आजाराने गेली होती...

राम:श्यामा, कसा आहे???

श्यामराव: मी मस्त ,तू बोल..खूप दिवसाने फोन केलास...बोल काय बोलतो...

राम: अरे ,मी चार दिवसाने  लग्न करतोय ..फक्त मोजकी माणस बोलवली आहे......

श्यामराव: खरं की काय??

राम: हो रे बाबा,न्हवतो करणार पण आता ...

श्यामराव: आता काय...

राम: एकटेपणा खायला उठतो रे..आणि असं वाटत की ,आपलं खरंच असाव......माझी बायको गेली.. आणि पोकळ झालं आयुष्य ..मन न्हवतं मानत दुसरं लग्न करायचं पण असं वाटत की,असावं आपल्या हक्काच माणूस..माझ्या बायकोच्या अनेक आठवणी आहेत,जगतोय पण घर खायला उठतं रे श्यामा.... असं वाटत की ,कुठे तरी पळून जावं..नको नको वाटायला लागलं..तेव्हा माझ्या मुलांनी पुढाकार घेतला.. नको नको म्हणणार मन एकाएकी तयार झाले...

श्यामराव: बरं असू दे,चांगला निर्णय घेतलास....येईल मी लग्नाला..अभिनंदन मित्रा.....

राम: बरं ,चल तू पण काळजी घे....  


रामचा फोन आला आणि ,श्यामराव विचार करू लागले. ...आपण पण करावे का लग्न????

लग्न करतील श्यामराव ??
काय होते पुढे पाहू पुढच्या भागात. 

अश्विनी पाखरे ओगले.
लेख आवडल्यास लाईक, कंमेंट आणि नावासाहित शेअर करा ..मला नक्की फॉलो करा...

🎭 Series Post

View all