पुनर्जन्म 2

Marathi Story
मंजिरी ने सांगितलेल्या रस्त्याने ड्रायव्हर ने गाडी घेतली, आणि बरोबर त्या ठिकाणी पोहोचले...मंजिरी ला रस्ता कसा माहीत होता हा अजूनच प्रश्न होता...सर्वजण विचारत तेव्हा "मला खरच माहीत नाही" हे एकच उत्तर तिला देता येत होतं...

सर्वजण बसमधून उतरले..

मंजिरी जमिनीवर पाय टाकताना थरथरत होती...

जसा तिने जमिनीवर पाय टेकवला तसा सुसाट वारा वाहू लागला, झाडांची जोरदार सळसळ व्हायला लागली, पक्षी आवाज करत वेगाने घिरट्या घालू लागली..जणू निसर्गालाही तिच्या पुनरागमनाची चाहूल लागलेली...

मंजिरी ने जसा पाय टेकवला तसं तिच्या अंगात एक वीज शहारून गेली, तिच्या आठवणी आणि जाणिवा हळू हळू जागृत होऊ लागल्या...

त्या सर्व शिक्षकांनी एक गाईड सोबत घेतलेला..

सर्वांनी एका ठिकाणी बसून चहा घेतला...

मग गाईड त्या सर्वांना महालाची ओळख करून देऊ लागला..

"महाल इसवी सन 1289 च्या काळातला होता..असं म्हणतात की राजा विरदत्त आणि त्याची राणी चित्रांगना इथे राज्य करत होता..देवनगर त्यांच्या राज्याचं नाव.. त्यांचा राज्यात प्रजा खूप सुखी होती..राजा आणि राणी अगदी पोटच्या मुलाप्रमाणे प्रजेला सांभाळायचे...विरदत्त नावाप्रमाणे वीर होता, प्रत्येक लढाई त्याने जिंकली होती आणि राणी चित्रांगना सुद्धा युद्धात तरबेज होती...

एकदा युद्धवरून परतत असतांना राजाचा मृत्यू झाला, तेव्हा राणीने ने शिताफीने हे राज्य सांभाळले, पण आजारपणामुळे त्यांचाही लवकर मृत्यू झाला..."

अशी तोकडी माहिती गाईड ने दिली..

"चित्रांगना...देवनगर..युद्ध..."

मंजिरी ला काही पुसटश्या गोष्टी आठवू लागल्या..."

आता तो महालाचा प्रत्येक कोपरा आणि त्याची माहिती देऊ लागला..

"या जागेवर विरदत्त प्रार्थना करीत असे, इथे राणी चित्रांगना स्नान करीत असे, तिथे राजा आणि त्याचे सैनिक युद्धाचा सराव करीत असत..."

"आणि हीच ती जागा जिथे राणीला ला मृत्यू आला" मंजिरी एक ठिकाणी थांबून किंचाळली...तिच्या डोळ्यातून संताप वाहत होता...डोळे लालबुंद झालेले..ती ओरडली तसे सर्वजण मागे झाले...

मंजिरीने दुसऱ्या जागेवर धाव घेतली...

"इथेच...हो इथेच...त्या राणीला वाचवायला आलेल्या शकुंतला बाई ला मारण्यात आलं"

मंजिरी ला आता सर्व आठवले..

मागच्या जन्माची एकूण एक गोष्ट अवगत झाली...

बरोबरच्या शिक्षिका घाबरल्या...काय चालत होतं कुणालाच समजत नव्हतं..

मंजिरी एका ठिकाणी बसून स्तब्ध झालेली, शून्यात नजर बसवून बसून होती, बरोबरीच्या शिक्षकांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला..पण ती काहीही प्रतिसाद देत नव्हती...

परिस्थिती गंभीर आहे हे ओळखून त्या सर्वांनी मंजिरी च्या नवऱ्याला खबर दिली..

मंजिरी चा नवरा मुलांना आजीकडे ठेवून तातडीने महालात पोचला..

संध्याकाळ झाली होती, मंजिरी च्या नवऱ्याने सर्वांना परत जायला सांगितले...

तो मंजिरी जवळ गेला तशी मंजिरी रडू लागली...

"तुम्हाला सांगत होती ना काहीतरी बाकी होतं, काहीतरी मी भूतकाळात मागे सोडून आलेली...ते हेच होतं... याचसाठी कित्येक जन्म मी वाट पाहिली...कित्येक वर्षे याच गोष्टीसाठी मी थांबुन राहिलेली..."

मंजिरी च्या नवऱ्याला सर्व हकीकत कळली तसा त्याला धक्का बसला...आपण मंजिरी च्या जाणिवांना हसण्यावारी नेट होतो पण त्या जाणीवा एका पूर्वजन्मीच्या अधुऱ्या राहिलेल्या गोष्टीसाठी होत्या याची जाणीव त्याला झाली...

तो म्हणाला,

"मंजिरी, जे झालंय ते अगदी अतर्क्य आहे, तू एका मोठ्या इतिहासाचा एक भाग होतीस, आणि आज तुला त्याची पुन्हा एकदा ओळख झाली, पण तो भूतकाळ होता आणि या जन्मात तुला एक नवीन आणि वेगळं आयुष्य मिळालंय... आता ते नवीन पद्धतीने जग..."

"नाही समीर, गोष्ट एवढीच नव्हती...त्या गाईड ने जे सांगितलं तेवढाच इतिहास लोकांना माहीत आहे, त्या पलीकडे खूप काही राजकारण घडलं होतं..जे आजतागायत अंधारात होतं...विरदत्त युद्ध जिंकून आलेला पण येताना त्याचा हाती एक मोठी गूढ गोष्ट तो घेऊन आला, पण वाटेतच त्याला कोणीतरी मारले आणि विरदत्त सोबतच ती गोष्ट एक गूढ बनून राहिली, परत येत असतांना वाटेतल्या लोकांना तो भेटत होता आणि सर्वांना सांगत होता की चित्रांगना पर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे, नाहीतर अनर्थ होईल... "

ती गोष्ट आता मला या जन्मात शोधायची आहे...त्याचसाठी निसर्गाने पुर्वजन्मीची जाणीव माझ्यामध्ये जिवंत ठेवली...

कोणती गूढ गोष्ट होती ती? खरा इतिहास काय होता?? मंजिरी ती गोष्ट परत मिळवू शकेल काय...वाचा पुढील भागात...

__

ही कथा चार भागात असून सर्व भाग एकाच दिवशी एकाच वेळी वाचण्यासाठी ईरा चे सबस्क्रिप्शन घ्या महिना केवळ 15/- रुपये. यात तुम्हाला खालील कथांचे रोज एक भाग वाचायला मिळतील.

स्वीकार
द बॉस
माझिया प्रियाला प्रीत कळेना
अजब प्रेमाची गजब गोष्ट
कामिनी ट्रॅव्हल्स
अंतरिक्ष
स्पर्श
लग्नगाठ द ऍडव्हान्स बुकिंग
___
ईरा सबस्क्रिप्शन कसे घ्यावे?

1.
फेसबुक पेजवरुन तुम्ही गेला असाल तर उजव्या बाजूला प्रोफाइल दिसेल, त्यावर क्लिक केले की लॉगिन ऑप्शन येईल. त्या खाली sign up with google वर क्लिक करा. तुम्हाला gmail आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. तो टाकल्यानंतर 10 sec वाट बघा, आपोआप लॉगिन होईल. लॉगिन झाले की "सदस्य व्हा" वर क्लिक करा. तिथे तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल. डेबिट कार्ड, नेट बँकिंग अथवा UPI ने तुम्ही पेमेंट करू शकता.

अथवा

तुमच्याकडे android फोन असेल तर प्ले स्टोर वर जाऊन ira blogging app इन्स्टॉल करा.

https://play.google.com/store/apps/details?id=neuro.monk.irablogging

2. App मध्ये लॉगिन ऑप्शन येईल, तिथे sign up करा. OTP तुम्हाला मेल मध्ये येईल (spam फोल्डर बघा) मग डायरेक्ट google लॉगिन करा.
3. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ईरा चे सर्व ब्लॉग दिसतील. वरील पट्टीवर वेगवेगळ्या कॅटेगरी दिसतील, latest, trending इत्यादी. त्यात pro blog कॅटेगरी मध्ये जाऊन कुठल्याही एका ब्लॉग वर क्लिक करा, तुम्हाला सबस्क्रिप्शन चा मेसेज येईल. तिथून तुम्ही ऑनलाइन पेमेंट ने 15 रुपये भरू शकता.
4. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर app बंद करून पुन्हा सुरू करावे, तुम्हाला pro blog वाचता येतील. सबस्क्रिप्शन घेऊनही वाचता न आल्यास 8087201815 या नंबर वर आपला मेल आयडी पाठवावा.

iOs user साठी
1. तुम्ही irablogging.com या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता, त्यानंतर तुम्हाला एक otp येईल (मेल मधील spam फोल्डर मध्ये चेक करा)
2. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा, कुठल्याही एका pro blog वर जा आणि तिथून ऑनलाइन पेमेंट ने 15 रुपये भरा.
3. सबस्क्रिप्शन घेऊनही वाचता न आल्यास 8087201815 या नंबर वर आपला मेल आयडी पाठवावा.

___

वरील पैकी काहीही न जमल्यास सरळ आम्हाला 8087201815 वर गुगल पे/फोन पे ने 15 रुपये पाठवा आणि त्याच नंबर वर आपला मेल आयडी आणि पेमेंट चा स्क्रिनशॉट पाठवावा. आम्ही सबस्क्रिप्शन सुरू करून देऊ.

🎭 Series Post

View all