पुनर्जन्म 4 अंतिम

Marathi Story


समीर ला सर्व कहाणी समजली.

पण इतक्या वर्षांपूर्वीचं गुढ आज कसेकाय उकलणार??

त्या काळातली एकही व्यक्ती इतक्या वर्षानंतर हयात असणं अशक्य होतं, मंजिरी आणि समिर ने महालात शोध घेतला...पण तो इतका जीर्ण झालेला की काही सापडेना...

दोघेही हताश झाले, समीर म्हणाला,

मंजिरी, हाती काहीच लागत नाहीये, काहीच क्लू मिळत नाहीये, मला वाटतं आपण याचा विचार सोडून द्यावा...आपण परत जाऊया..

"समीर, देवाने पूनर्जन्माची जाणिव जागी ठेवली, इथपर्यंत आणलं ते यासाठी?? पुढेही आपल्याला तोच मदत करेल...आपण प्रयत्न चालू ठेऊ..."

दोघेही पुढे गेले...महालाच्या बाजूला एक छोटंसं घर होतं.. समीर आणि मंजिरी दमले होते, दोघेही म्हटले की त्या घरी जाऊन थोडं पाणी घेऊ..

मंजिरी ने जसा घरात पाय ठेवला तसा सुसाट्याचा वारा सुटला..अप्पासाहेबांनी दोघांना पटकन मध्ये यायला सांगितलं आणि दार लावून घेतलं..

"असलं वादळ आजतागायत नाही आलेलं हो या गावात, काय माहीत आज का वातावरण असं झालय...बरं तुम्ही बसा, मी पाणी आणतो..."

असं म्हणत घरमालक आप्पासाहेब पाणी आणायला आत गेले...

मंजिरी घरातल्या वस्तूंकडे बघत होती, अचानक तिचं लक्ष देवघराकडे गेलं, तिथे एक प्राचीन शिलालेख ठेवला होता...मंजिरी जवळ गेली आणि तिने तो हातात घेतला...

आप्पासाहेब पाणी घेऊन आले,

मंजिरी च्या हातात शिलालेख बघून ते म्हणाले..

"केवळ याच कारणासाठी आम्ही आजतागायत या गावात राहतोय.."

"म्हणजे?? आम्ही समजलो नाही..."

आमचे पूर्वज पुजारी म्हणून एका मंदिरात काम करत होते, एकदा विरदत्त नावाचा राजा मंदिरात आलेला, तिथे त्याला साक्षात भगवान शंकराने दर्शन दिले, त्या दिवशी महाशिवरात्री होती...बाबांना जाग आली नाही, आमचे पुजारी बाबा रात्री तिथेच झोपले होते, राजाला काही मारेकऱ्यांची चाहूल लागली...तसं त्यांनी पुजारी बाबांना उठवलं आणि सांगितलं की माझा जीव धोक्यात आहे, त्यांनी पटकन एका दगडावर काही मजकूर लिहिला...आणि बाबांना सांगितलं की भगवान शंकरांनी दिलेल्या संकेतानुसार ऋणानुबंधने आमच्यातील एक पूर्णजन्म घेईल...तो जेव्हा जन्म घेईल तेव्हा हा शिलालेख त्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, यात खूप महत्त्वाचं आणि अद्भूत अशी गोष्ट आहे..आता ही जबाबदारी तुमच्यावर मी सोपवतो..असं म्हणत राजा तिथून निघाला आणि वाटेतच काही मरेकऱ्यांनी राजाला मारले...त्या नंतर बाबांनी आमच्या पुढील पिढ्यांना हा शिलालेख जपून ठेवायला सांगितला...आणि आजपर्यंत आम्ही तो संभाळतोय...पण त्याचा शोध घेत कुणीही आलं नाही...काय माहीत आता अजून किती पिढ्यांना हा सांभाळावा लागतोय...यातील मजकूर एका गूढ लिपीत आहे आणि तो कोणालाच समजलेला नाही.."

मंजिरी ताडकन उठली..

"ती वेळ आली आहे, मीच चित्रांगना...विरदत्त ची पत्नी... याच एक क्षणासाठी मी थांबले होतें"

समीर ने आप्पासाहेबांना सर्व हकीकत सांगितली, अप्पासाहेबांचा विश्वास बसेना...त्यांनी शिलालेख मंजिरी च्या ताब्यात दिला...

"हे भाग्य आमच्या पिढीला मिळालं याचा आनंद झाला, आमचं आयुष्य सार्थकी लागलं..."

मंजिरी आनंदित होऊन तो शिलालेख घेते, आणि दोघेही परत महालात जातात...आता त्या शिलालेखेवरील मजकूर आणि त्याचा अर्थ शोधायचा होता...

समीर म्हणाला...

"इथपर्यंत आलोय ठीक, पण हा मजकूर आता ओळखायचा कसा?, हा मजकूर तर त्या पुजाऱ्यालाही कळला नाही, मग आजच्या काळात कोणाला समजेल?"

मंजिरी ने तो शिलालेख हातात घेतला..आणि ती आपल्या स्मरणशक्तीवर ताण देऊ लागली...

काही वेळ विचार करुन ती म्हणाली..

"सापडला, अर्थ सापडला.."

"मंजिरी, कसकाय? ती भाषा तुला तरी येते का?"

"समीर, विरदत्त आणि मी युद्धाची रणनीती आखतांना आम्ही आमची एक गूढ भाषा अस्तित्वात आणली होती, शत्रूला ना समजता एकमेकात कसा संवाद साधायचा अशी संकेतार्थ भाषा ही होती ती केवळ आम्हा दोघांनाच माहीत होती..."

"मग लिहिले काय आहे त्यात नक्की?"

"त्यात लिहिले आहे की भगवान शंकराने एकमुखी रुद्राक्ष विरदत्त ला दिलेला आणि संगितले की याचा नीट सांभाळ कर आणि याची उत्तर दिशेला एका मंदिरात स्थापना कर, जो ही स्थापना करेल त्याचा उद्धार होईल आणि चुकीच्या हाती हा रुद्राक्ष लागला तर सृष्टीचा विनाश होईल, जाताना विरदत्त ने एका भक्कम पेटीत हा रुद्राक्ष ठेवला आणि एका खोल खड्ड्यात पेटी पुरली....त्याची दिशा सुद्धा यात नमूद केली आहे..."

"अद्भूत, मंजिरी हे सगळं आपल्या आयुष्यात होतंय यावर माझा विश्वासच बसत नाहीये..."

"आता आपल्याला रुद्राक्षाचा शोध घ्यावा लागणार"

दोघेही सांगितलेल्या दिशेला रुद्राक्ष शोधण्यासाठी जमीन उकरू लागतात, अप्पासाहेबही त्यांचा मदतीला येतात...

मंजिरी ला एक पेटी दिसते, त्यातून येत असलेल्या लक्ख प्रकाशाने समीर आणि अप्पासाहेबांचे डोळे दिपले, ते लांब गेले...मंजिरी ला त्या प्रकाशाने काहीही झाले नाही, ती जवळ गेली आणि पेटी हातात घेतली, ती उघडली, त्यात रुद्राक्ष होता...तिने तो हातात घेतला आणि माथ्याशी लावून नमस्कार केला...

"भगवंता, आज इतक्या वर्षांची माझी प्रतीक्षा संपली...मी भरून पावले..."

रुद्राक्षाला तिने आपल्या अश्रूंनी अभिषेक घातला...योगायोगे त्या दिवशीही महाशिवरात्री होती...वादळ थांबले, मंजिरी ज्या झाडाखाली उभी होती त्या वृक्षाने तिच्यावर फुलांचा अभिषेक केला...निसर्गाने जणू हा सोहळा साजरा केला...

आप्पासाहेब आणि समीर ही अद्भुत आणि विस्मयकारी गोष्ट डोळ्यात प्राण आणून बघत होते...

मंजिरी महालात गेली, आपला भुतकाळ डोळ्यात प्राण आणून पाहत होती, विरदत्त, युद्ध, प्रजा...सगळं आठवून तिच्या अश्रूंना बांध फुटला...तो भूतकाळ जीर्ण अवस्थेत तिच्या समोर तिला दिसत होता..  तिला सद्य जन्माची जाणीव झाली तसं तिने स्वतःला सावरलं...

सगळे घरी गेले, त्या रात्री कुणालाही झोप आली नाही...

मंजिरी ने महालाच्या जवळच मंदिर स्थापून तिथे रुद्राक्षाची स्थापना केली आणि तो रुद्राक्ष कोणाच्याही हाती येणार नाही अशी सुरक्षित रचना तीने करवून घेतली...

मंजिरी च्या जन्माचे गूढ आता उकलले गेले होते, तिला पडणारी स्वप्न, भास आता संपले होते...आता तिला शांत झोप येऊ लागली होती...

एक शेवटची आठवण म्हणून तिने समीर ला महालात जायला विचारलेझ यावेळी समीर, मंजिरी आणि त्यांची मुलं.. सर्वजण महालात गेले, तिथे विरदत्त च्या मूर्तीकडे मंजिरी एकटक पाहत होती..

समीर ला असुरक्षित वाटू लागले..

"ए मंजिरी, चल ना, तिकडे जाऊ.."

थांबा हो...

"मंजिरी ती मुर्ती बघ, तुझ्या सासऱ्यांची आहे वाटतं..."

"नाही, सैनिकांची आहे.."

ना राहवून शेवटी समीर बोलला..

"तू त्याच्याकडे पाहू नको अशी...मला नाही सहन होत आता..."

मागून मुलांचा आवाज आला,

"काही जळालं का? धुराचा वास येतोय..."

मंजिरी ने मुलांकडे पाहिले, त्यांनी समीर कडे पहिलं... आणि परत येताना पूर्ण वाटेत सर्वजण पोट धरून हसत होती..

🎭 Series Post

View all