पुढचं पाऊल.... पर्व 2 रे, भाग 1

Madhvi, tiche aai- baba ani shripatrav kahi divasasathi gavala jatat.... madhvi pradipchya contact madhe asate, tyachya marfat ti 1BHK flat book karun thevate pan rent ni....

पुढचं पाऊल....
पर्व 2 रे ,
भाग 1
आधीच्या पर्वात आपण पाहिले की श्रीकांतने माधवीला फसवलं ,त्याचे मोनाशी रिलेशन होते ,माधवीने त्याच्याशी घटस्फोट घ्यायचं ठरवलं,  माधवी आणि श्रीपातरावांनी वकीलासोबत भेट घेतली, वकिलाकडून दोन दिवसांनी घटस्फोटाचे पेपर येणार होते ,या दोन दिवसात श्रीकांत घरी आलाच नाही तो दोन दिवस मोनाकडेच होता, त्याला आनंद साजरा करावा की दुःख हेच कळत नव्हते... आनंद यासाठी की तो पूर्णवेळ मोनासोबत घालवु शकेल आणि दुःख यासाठी की त्याला त्याच्या बाबांना सोडाव लागेलं, दोन दिवस त्याने मोनाकडेच मुक्काम केला, घरी आला तेव्हा खूप दारू प्यायला होता पूर्णपणे नशेत धूत होता, माधवी घटस्फोटाचे पेपर सही करून त्याच्या हातात ठेवून घरून निघते , तो थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती थांबत नाही......माधवी नवीन आयुष्यात पुढचं पाऊल ठेवते, जीवनाचा नवीन प्रवास सुरू करायला......

पर्व दुसरे
भाग 1
माधवी , तिचे आई - बाबा आणि श्रीपतराव काही दिवसांसाठी गावाला जातात.... माधवी प्रदीप च्या कॉन्टॅक्टमध्ये असते, त्याच्यामार्फत ती 1BHK flat  बुक करून ठेवते पण रेंट नी ,कारण फ्लॅट घेण्यासाठी सध्या  ती सक्षम नसते, माधवीच मधुन मधुन अभिनव शी बोलणं सुरू असते, अभिनव मदत करायला तयार होतो पण माधवी त्याला नकार देते.... पूर्ण एक महिन्यानंतर माधवी पूर्ण तयारीनिशी पुन्हा मुंबई गाठते.... प्रदीपने त्याच्या बाजूच्या बिल्डींग मध्ये वन बीएचके फ्लॅट बुक केलेला असतो.... माधवी मुंबईला गेल्या गेल्या अभिनवला फोन करते पण अभिनव फोन उचलत नाही....

थोड्यावेळाने तोच फोन करतो...

हॅलो ...

हॅलो... "माधवी,सॉरी माधवी मी तुमचा फोन रिसीव करू शकलो नाही, मी मीटिंगमध्ये होतो...."

"अरे त्यात सॉरी काय, तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका..... मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला की, मी मुंबईला आले ....."


तो आनंदाने "कधी? कोणा सोबत? आणि मला आत्ता सांगताय ....."

" मी आत्ताच आले आणि बाबा आहेत माझ्या सोबत, मी आज पूर्ण घर arrange करून घेते , तुमची काही हरकत नसेल तर आपण उद्या भेटू शकतो का ?"

"हे काय विचारणं झालं, नक्की.... कुठे भेटायचं?"

"घरी... घरीच या तुम्ही म्हणजे बाबांची पण भेट होईल"

" ओके, पण ऍड्रेस?...."

"जुन्या बिल्डिंगच्या बाजूची बिल्डिंग फ्लॅट नंबर चार "

"मी येतो उद्या,...

" हॅलो.... ऐका....
" बोला .....
"तुम्ही मला प्लीज तुम्ही वगैरे म्हणत जाऊ नका, माधवी म्हटल तरी चालेल ...."

"हो चालेल पण एका अटीवर.....

" काय?"

"तू पण मला अभिनव म्हणायचं...."

"अहो पण ....
"पण बिन ,काही नाही चालणार असेल तर बोला.....
ok, अभिनव ....आता चालेल....

ह.... चालेल...

"बाय अभिनव.....

दोघांचं संभाषण होत......

दुसऱ्या दिवशी अभिनव घरी येतो.... घरी आल्यावर दारातूनच ...

"कसे आहात बाबा ?....."

"अरे तुला  कस काय कळलं आम्ही आलोय ते......"

"  माधवीनी फोन केला होता मला ,तुला भेटायचं आहे म्हणाली,घरी ये बाबांची भेट होईल.....

" कुठे गेली माधवी?

"ती खाली असेल, येईल... तू बस..... "

थोड्यावेळाने माधवी येते, अभिनव कडे बघून .....

"आलात तुम्ही......"
तो उठतो..... नाही जातो मी, तू जर तुम्ही तुम्ही करणार असशील तर जातो मी .....

"सॉरी ..सॉरी तू बस, मी हे सामान ठेवून येते..... ती चहा घेऊन येते ......

"बोल, तुला काय बोलायचं होतं महत्वाचं .....

"अभिनव मला बोलायचं, मला तुझी मदत हवी आहे, माझा सध्या नाईलाज आहे ,मी दुसरीकडे नोकरी शोधली असती पण त्यात वेळ जाईल म्हणून विचार केला की आधी तुझ्याशी  बोलून बघाव ...."

"अग मग बोलना, एवढी काय संकोच करतेस...

" तू जर तुझ्या कंपनीत मला एखाद छोट मोठ  काम दिलस तर.... माधवी अडखळत बोलू लागली....
"अगं मग त्यात एवढं काय ?"

"नाही तसं नाही.... इथे राहायचे आहे तर मला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव लागेल  ......गावाला काहीच उपयोग नाही म्हणून मी इथे आले, विचार केला काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभ राहाव ....  तुझी जर काही मदत झाली तर खूप बर होईल ....."

" तू उद्या ठीक दहा वाजता ये माझ्या ऑफिस मध्ये..."
ऍड्रेस मेसेज करतो तुला...."

" ठीक आहे....
" ओके, मी निघतो....

श्रीपतराव हाथ जोडून ,"तू जर माझ्या लेकीला काही काम दिलंस तर तुझे खूप उपकार होतील "....

" अहो बाबा, उपकार काय त्यात.... मदत करतो मी, उपकाराची भाषा करणार असाल तर मी जातो आणि परत कधीच येणार नाही "असं म्हणत उठतो...

" नाही ....नाही ...असं करू नकोस, बस रे बाबा... त्याचा हात धरत श्रीपतराव त्याला बसवतात .....

"मी आता बसत नाही ,उशीर झालाय आई वाट बघत असेल..."

" तुला कधी विचारन झाल नाही, तुझ्या घरी कोण कोण असतं?

" माझे आई-बाबा ,मी आणि माझा लहान भाऊ ....

चला मी निघतो, माधवी किचनमध्ये असते म्हणून तो जोरात ..
" माधवी.... येतो... उद्या दहा वाजता ये ...."

" ओके ...ओके ...थांब ,बाहेर येते मी .... ती किचन मधून बाहेर येऊन त्याला by करते.....

दुसऱ्या दिवशी छान तयार होऊन माधवी बरोबर दहा वाजता ऑफिस ला पोहचते,  ऑफिस बघून मनातल्या मनात "एवढं मोठं ऑफिस", ती रिसेप्शनिस्ट कडे जाऊन हळूच...

" हॅलो, मला अभिनवला भेटायचं आहे, त्यानी मला दहा वाजता बोलावलय......."

"सरांनी तुम्हाला बोलावलय? अपॉइंटमेंट आहे का तुमच्याजवळ?
"नाही.....
" तुमचं नाव काय?"

" माधवी इनामदार ".....

ती फोन कनेक्ट करते.....

"हॅलो ....

"हॅलो सर... कुणीतरी माधवी इनामदार तुम्हाला भेटायला आल्या ,पण त्यांच्याकडे अपॉइंटमेंट नाही आहे .....

"त्यांना पाठवून दे...."

ती त्याच्या केबिनमध्ये जाते....may i come in....

अग ये.. ये... ये...
" बस, काय घेणार ... चहा, कॉफी....."

"नाही, काही नको....
"अग संकोच करू नकोस..."

" नाही खरच काही नाही....."
" ओके, चल बाहेर .....

तो तिला स्टाफ रूम मध्ये घेऊन जातो ....सर्व स्टाफ समोर,,, excuse me, listen guys....आज पासून आपल्याला एक नवीन व्यक्ती जॉईन करतीये....

" माधवी इनामदार....."

आजपासून  infact आत्तापासून  ही माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करेल..... सगळे  clap करून माधवीच स्वागत करतात आणि काँग्रॅजुलेशन करतात ...

माधवी मात्र फक्त अभिनवच्या चेहऱ्याकडे बघत असते.... तिला त्याच खूप आश्चर्य  वाटतं  की ,आपलं कॉलिफिकेशन चेक न करता , सरळ पर्सनल सेक्रेटरी बनवतो,,, तिला खूप आनंद होतो.... माधवी खूप भारावून जाते ......

क्रमश:

🎭 Series Post

View all