पुढचं पाऊल.... भाग 18

Madhavi abhinav chya chaha panyacha baghitlas ka? Nahi baba.... te aata jevunach jatil....

पुढचं पाऊल....
भाग 18

आधीच्या भागात,

माधवी, समीर आणि अस्मिताला जेवायला बोलावते, दोघेही येतात, जेवण निपटून गप्पा मारत बसलेले असतात ...तेवढ्यात अभिनव येतो, तो श्रीपत रावांना भेटायला येतो तिथे त्याची ओळख समीर आणि अस्मिता शी होते  ......तो बाबांना भेटतो त्यांची चौकशी करतो....

आता पुढे,

माधवी अभिनव च्या चहा पाण्याचं बघितलंस का?

नाही बाबा.... ते आता जेवूनच जातील..

नाही नाही, मी तुमच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो, मी आता निघतो.....

चहा तरी घ्या....

आता नको, येईल कधीतरी.....

नमस्कार करतो बाबा,
तो बाबांच्या पाया पडतो....

" सुखी रहा"

जातो......

जातो नाही, येतो म्हणावं ......

येतो...... अभिनव निघतो.....

थोड्यावेळाने समीर आणि अस्मिता ही निघतात..... दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकांतच सगळं निपटवून माधवी भाजी आणायला निघते.....
खाली वॉचमन काका बसलेले असतात...

काय काका ,काय चाललंय.?...

काही नाही बेटा, बसलो आहो.....

माधवी एक पाऊल समोर टाकणार तेवढ्यात तिचं लक्ष काकांच्या हातात असलेल्या पिशवीकडे जाते.... त्या पिशवीतून तिला आत मध्ये साडी सारखं काहीतरी आहे असं वाटतं....... ती थोडया विचारात पडते आणि न रहावून काकांना विचारते....

काका, त्या पिशवीत काय आहे ?

काका एकदम दचकतात ,अडखळतात ....नाही बेटा, काही नाही.... माझे कपडे आहेत त्यात....

कपडे?

काका मला असं वाटत,त्यात साडी आहे...... काकूंसाठी आणली आहे का?मग दाखवा ना......


नाही नाही, काही नाही..... काका पिशवी दाखवतच नव्हते....

शेवटी माधवी पिशवीत खेचते.... त्या झटापटीत पिशवीतला सगळं सामान खाली पडते..... माधवीला खाली पडलेल्या सामान बघून आश्चर्य वाटतं.....

खाली जमिनीवर विस्कटलेलं सामान ,त्यात साडी... केसांचा विग, पांढरे अब्रोज.....सगळं मेकअपचे सामान असतं..... माधवी डोक्यावर हात ठेवून...

" बापरे...... आता माधवीचा धीर सुटला तिने वॉचमन काका ला ठोसपणे विचारलं....

काका हे काय आहे? नीट सांगा.....

सांगितलं ना पोरी, माझ्या बायकोचं सामान आहे......

मुलगी म्हणता ना मला आणि वर खोटं बोलताय सगळं खरं सांगा मला नाहीतर मी आत्ता सेक्रेटरीला फोन करते मग ते पोलिसांना बोलावतील आणि तुमची नोकरी जाईल.......

नाही नाही पोरी मी तुझ्या पाया पडतो ....कुणाला काही सांगू नकोस.... ते माधवीच्या पायाजवळ डोकं ठेवून रडतात....

काका उठा, उठा.... मी कुणालाही काहीही सांगणार नाही पण तुम्ही मला सगळं खरं खरं सांगणार आहात....

हो ...

बसा.....शांत व्हा.... ती त्यांना चेअरवर बसवते.. पाणी देते ......सांगा हा सगळा काय प्रकार आहे?

तुमच्या साईडच्या फ्लॅट रिकामा आहे ना....

" हो मग ?"

तुम्ही जेव्हा गावावरून इथे आलात ना, तेव्हा श्रीबाबाला वाटलं की तुम्ही काही दिवसांसाठी आला आहात, परत जाल ......जेव्हा तुमच इथे राहण्याचं ठरलं तेव्हा ते खूप चिडलेत......

तुम्हाला कसं कळलं?

ज्या दिवशी तुमची आई बाबा गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीबाबा ऑफिसमधून आले,,, गेटपर्यंत आले मागे घेऊन ती मुलगी आली.....

" कोण मुलगी?

काका थोडे nervous झाले,,

तुम्ही समोर बोला निसंकोचपणे सगळं सांगा मला....

त्या दोघांनी मिळून हा सगळा प्लॅन तयार केला....

" कसला प्लॅन?

तुम्हाला काहीतरी विचित्र दाखवायचं आणि तुम्हाला घाबरवायचं.... काहीतरी कारण सांगून तुम्हाला गावी पाठवायचं..... तीन-चारदा त्यांनी हे केले ,ती मुलगीच मेकअप करून जायची तिथे....

आणि त्याची चाबी ?

चाबी मी द्यायचो....

काका तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती मोठी चूक केली, त्यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते ..

" नाही नाही पोरी ,याच्यानंतर अशी काही चूक करणार नाही..
" माफ कर, मला माफ कर, "

काका हात जोडू नका, तुम्हाला तुमची चूक कळली ना हेच तुमचं प्रायश्चित्त आहे.... उठा, शांत व्हा...

पोरी तू खूप चांगली आहेस पण श्रीबाबा, ते तुझ्याशी नाही ना चांगले वागत ....

असं नाही आहे काका ,

चेहर्‍यावर काही दाखवलं नाही ना तरी मला कळतं पोरी..... ती पोरगी श्रीबाबाच आयुष्य उध्वस्त करेल ,तिचं काही प्रेम -बिम नाही आहे, उनाळकी पोरगी आहे ती.....

काळजी घे पोरी ....

हो काका....
माधवी निघते बाजाराला, विचारांचे थैमान घेऊन.... स्वतःच्याच विचारात गुंतून.... रस्त्यावर बेभान चाललेली....कधी हॉर्न च्या आवाजाने दचकली तर कधी कुणाच्या सायकलला अडकली..... ती फक्त चालत नव्हती, तर बेभान चालत होती....

चालत असताना मागेहुन हॉर्न वाजतोय... खूप वेळचा हॉल वाचतोय... माधवीचं लक्षच नाही ....शेवटी तिच्या जवळ येऊन गाडी थांबते..... गाडी थांबली, माधवी ही थांबली..... गाडीचा काच ओपन करून त्यातून मान काढून एक व्यक्ती बोलते..

" मी किती वेळचा हॉर्न वाजवतोय ,तुमचं लक्षच नाही.... हॅलो ....." तो इतका बोलला तरी माधवीनी वळून बघितलं नाही....  तोच मग तिच्यासमोर जाऊन उभा राहिला तिच्या चेहऱ्याकडे पाहून दचकला...

" माधवी तुम्ही....

ती  मान वर करून बघते तर अभिनव .....

ती काहीच न बोलता अभिनवला बिलगून खूप रडते, तिला सावरण्यासाठी अभिनव हात वरती करतो पण पुन्हा मागे घेतो..... रडून झाल्यानंतर ती भानावर येते, तिच्या लक्षात येत आपण कुणा जवळ रडतोय, कुणाला बिलगलोय ..... बंद असलेले डोळे उघडते आणि त्याच्यापासून स्वतःला दूर सारते .....

सॉरी.... सॉरी.....

its ok....

काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का?

नाही, काही नाही .....तुम्ही जा...

नाही नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही, मी तुम्हाला घरी सोडून देऊ का? की तुम्हाला अजून कुठे जायचं आहे?

नाही नाही, तुम्ही जा प्लीज.....

मी जाणार नाही आणि तुम्हाला असं सोडून तर मुळीच नाही ...तो काहीही विचार न करता तिचा हात धरतो तिला गाडीत बसवतो , घरी येईपर्यंत ती अगदी गप्प बसलेली असते ,एकही शब्द बोलत नाही.... अभिनव तिला घरी आणतो तिला पाणी वगैरे देऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती काहीच बोलत नाही...  उलट त्याच्यावर चिडते....

" तुम्हाला कळत नाही का? तुम्ही प्लीज जा ...

अभिनव जातो...

अर्धा-एक तास माधवी तशीच बसून राहते.... विचाराचे थैमान निवळू लागले, माधवी आता शांत झाली.... तिला अभिनवची आठवण झाली...त्यानी आपल्याला मदत केली आणि आपण त्याच्याशी कसं वागलो याची तिला जाणीव होते.... ती लगेच अभिनवला फोन करते.... तो फोन उचलत नाही ती खूप ट्राय करते तो फोन उचलत नाही आता मात्र ती अस्वस्थ होते तिला अभिनवला भेटून सॉरी बोलायचं असतं तेच होत नसल्यामुळे तिची अस्वस्थता वाढते ती थोडं बरं वाटावं म्हणून गौरीला फोन करते तिला घरी भेटायला बोलवते...... तासाभरात गौरी घरी येते ..

"काय ग माधवी, एवढया अर्जंट का बोलवले? काही प्रॉब्लेम आहे का?

प्रॉब्लेम होता ....आता नाही...

" म्हणजे ?"

म्हणजे काही नाही....

तू सांगणार आहेस का काय झाले ते?

एक मिनिट मी रेवाला बोलावून घेते मग आपण बोलू सविस्तर ....माधवी रेवाला फोन करते...5-10 मिनिटात रेवा येते.... अरे गौरी पण आली आहे..

" हाय ......

हाय......

काय झालं? emergency बोलावलस....


बस सांगते,, मी मार्केटमध्ये जायला निघाली ना, खाली वॉचमन काका शी बोलत होते, तेव्हा जे घडलं त्याच्यावर माझा विश्वास बसत नाही आहे .. तुम्ही ऐकलं तर तुमचा पण विश्वास बसणार नाही....

पण झालं काय ते तर सांगशील ?...

माधवी सगळं सविस्तर पणे सांगते, दोघीही शॉक होतात... बापरे हद्द झाली कुणी असं कसं काय वागू शकतो  ...लिमिट क्रॉस झाली माधवी आता...

माधवी तू काय ठरवलेस? बोलणार आहेस ना श्रीकांतशी...

मला काहीच कळत नाही आहे, कशी बोलू, काय बोलु, कुठून सुरुवात करू.......

तू सगळ्यात आधी बाबांना सांग...

बाबांना माहिती आहे म्हणजे अगदी मोना बद्दल नाही पण एक मुलगी आहे यांच्या आयुष्यात हे माहिती आहे....

माधवी तू आधी श्रीकांतशी निवांत बोल, त्यावर त्याची काय प्रतिक्रिया आहे.... हे देखील बघ, तो काय खरं बोलतो, काय खोटं बोलतो..... कितपत खरं बोलतो हे सगळं आधीच जाणून घे ....

ओके.....

गौरी हे सुधारतील का ग? माणूस चांगलं किंवा वाईट नसतो ना परिस्थिती त्याला चांगलं किंवा वाईट बनवते.....

रेवा चकित होऊन..... यात काय परिस्थिती आली..... यात काही लॉजिक आहे काय.....

" पण माणूस बदलतो ना....


माणूस बदलतो, श्रीकांत नाही ...... तो माणसातच नाही ना .......दोघीही हसतात.....


हे काय बोलतेस....

सॉरी... सॉरी... त्या दोघी हसतात...


अभिनवला फोन करणार होतीस ना . 

हो ते फोनच उचलत नाही....

ok तुला आता relax वाटतय का.....

हो मला बरं वाटतंय, मी कॉफी बनवून आणते...

त्या तिघी कॉफी पित बसलेल्या असतात ....
माधवीचा फोन वाजतो.

हॅलो...

हॅलो.....  अभिनव बोलतोय....

अहो मी खूपदा तुम्हाला फोन केला,तुम्ही उचलला नाहीत....


सॉरी, मी मीटिंगमध्ये होतो आणि फोन सायलेंटवर होता...

oh....

बोला,काय बोलायचं होतं तुम्हाला.…?

मला...

तुम्ही इतक्यांदा फोन केलाय ना मला, म्हणजे काहीतरी बोलायचं असेल.... नाही का.....

अहो.....

तुम्ही एक काम करा, तुम्ही डोअर ओपन करा...

डोअर का?
ओपन तर करा हो....

माधवी दार उघडते .. 

समोर अभिनव उभा असतो...
दोघेही आमोरा- समोर
नजरेला नजर भिडलेली....

मागेहुन रेवा आणि गौरी दोघी उभी राहून बघतात...

रेडिओवर गाणी वाजत असते.....

           "नजरो से नजर मिली,
        दोनो एक दुजे मे खो गये,,
       ये कौनसा रिश्ता था जालीम
      दोनो एक दुजे के लिये रो दिये"

क्रमश:


माधवीच  डोक्यातल एक संशयाच भूत उतरलं,तिला आता सगळं कळलं , नाहीतर आधी भुताटकी काहीतरी वाटलं होतं, तिच्या डोक्यातली एक गुत्थी सुलझली.....
आता श्रीकांतच काय होते ते बघूया पुढल्या भागात....

तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कळवा, like, share and follow me......

🎭 Series Post

View all