पुढचं पाऊलं.... भाग 8

Madhavi fakt shrikant chya dolyat baghat hoti.. to kahitari boltoy hehi tila kalat navhat.... tyane haluch tila dur kel, ticha hat sodla ani Madhavi.... ye madhavi.....

           " बावरा मन देखने
            चला एक सपना,
           बावरा मन देखने
            चला एक सपना,
         बावरे से मन की देखो
             बावरी हे बाते"

माधवी फक्त श्रीकांत च्या डोळ्यात बघत होती .... तो काहीतरी बोलतोय हेही तिला कळतं नव्हतं .....त्याने हळूच तिला दूर केलं, तिचा हात सोडला आणी

माधवी.... ये माधवी.... ती फक्त बघत होती भान हरपून, श्रीकांत शेवटी जोरातच ओरडला ,माधवी........
माधवी भानावर आली....
ह....  सॉरी .....अहो पण  तुम्ही एवठ्या जोरात  का ओरडलात,  मग काय करणार होतो , तुझ्या कानात आवाज जात नव्हता ,चल आता लवकर.... ते लेडीज कॉर्नर मध्ये जातात तिथे

दादा, ड्रेस दाखवा...

कुणासाठी? ...

कुणासाठी काय ही उभी आहेना तुझ्यासमोर..…

कोण आहे?
कोण आहे म्हणजे?...

कोण आहे म्हणजे बायको की गर्लफ्रेंड आहे ?...तुला काय करायचे नसत्या चौकशा....
दाखवा ड्रेस...
ड्रेस पाहायला सुरुवात करतात.... तू बघ तुला कोणता ड्रेस आवडते, तुम्ही सांगा ना तुम्हाला कोणता आवडला, अग पण तुला घालायचा आहे ना मग तू निवड, ठीक आहे हा घेते, ती ड्रेस वरचा लेबल पाहते ,"पंचवीस शे रुपये" अहो हा खूप महाग आहे मी दुसरा पाहते, काही गरज नाही आहे असू दे, छान दिसेल तुझ्यावर, घे पटकन आणि चल....

मग केले जीन्स सेक्शन मध्ये, त्याने जीन्स आणि टी-शर्ट घेतला आणि चेंजिंग रूम मध्ये चेंज करून आले ....
आधी साडी आणि शर्ट-पॅन्ट मधले माधवी- श्रीकांत सलवार सूट आणि जीन्स टी-शर्ट वेगळेच दिसु लागले...... दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं आणि निघाले, माधवी बोलत बोलत समोर आली श्रीकांत मागे होता एक्झिट मधून माधवी बाहेर येत होती, तिने मागे वळून पाहिलं तर श्रीकांत गायब..... तिने चारही बाजूंनी नजर फिरवली, आवाज दिला पण श्रीकांत दिसलाच नाही ,ती खूप घाबरली...... एक तर ती मुंबईत पहिल्यांदा आली आणि आता एवढा मोठा मॉल मध्ये आली, तिला आता रडू यायला लागलं, फोन केला असता तर तिच्याजवळ मोबाईल नव्हता, दुसरीकडून लावायचा तर श्रीकांत चा नंबर पाठ नव्हता...… जवळ जवळ अर्धा तास त्याला शोधत होती कितीतरी वेळ त्याची वाट पाहिली पण श्रीकांत आलाच नाही, ती रडत रडत एका कोपऱ्यात बसली, सगळे तिच्याकडे बघत होते, कोणी विचारपूस करत होते,कोणी पाणी देत होतं, तर कोणी विचारपूस करत होते.....

गर्दीतून एक पंचविशीची तरुण मुलगी समोर आली, तिनी माधवीला उठून उभे केले आणि मॉलमधल्या कॅन्टीनमध्ये घेऊन गेली ,चेहऱ्यावर पाणी मारायला सांगितले आणि तिच्यासाठी कॉफी मागवली....

हाय ,मी गौरी... तुम्हाला असं रडताना पाहवलं नाही म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आली, तुम्ही कॉफी घ्या मग आपण बोलू, माधवी शांत झाली थोडी कॉफी घेतली... आणि मग माधवीला विचारलं काय झालं ,का रडत होतात..... तिनी सगळे सांगितले.....

मी माधवी , मी माझ्या मिस्टरांसोबत शॉपिंग ला आले होते, शॉपिंग करून झाल्यावर आम्ही निघालो , पण थोड्या वेळाने माझे मिस्टर दिसेनासे झाले ,मी खुप शोधलं पण नाही दिसले, मी इथे नवीन आहे म्हणून मला भीती वाटली,,, ठीक आहे,  तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे मी तुम्हाला नेऊन देते ,तुमचे मिस्टर येतीलच घरी....
तिकडे माधवीचे सासरे ,आई-बाबा नलू उद्यान फिरतात, थोड खाणं पिणं करतात आणि झाडाच्या सावलीखाली बसतात ,

काकू ,अजून माधवी आली नाही तिला फोन लावून बघू का ?
नाही ती फोन घेऊन नाही गेली तिचा फोन माझ्याजवळ आहे ...
तुझ्या भाऊजी ला फोन लावून बघ....
नलु फोन करते पण श्रीकांत फोन उचलत नाही, ती खूप वेळा ट्राय करते पण तो काही फोन उचलत नाही.

काकू दोन तास झाले ते दोघे आले नाही आपण किती वेळ वाट पहायची आता ऊन्ह खूप होत आहे ..

येतील बेटा, वाट पाहू थोड्यावेळ दुसरा पर्याय नाही- माधवीचे सासरे बोलले......

तिकडे गौरी माधवीला म्हणते ,आपण जाऊया का ?
मी नेते तुम्हाला ... नाही आपण थोड्या वेळ वाट बघूया.... माधवी आणि गौरी दोघेही श्रीकांतची थोडावेळ वाट बघतात....  अर्धा तास होऊनही तो येत नाही मग दोघेही जायला निघतात ,गौरी माधवीला आरे कॉलनीचे उद्यान पर्यंत नेऊन देते माधवीला आत मध्ये जाण्यासाठी पैसे नसतात गौरी तिकीट काढून देते आणि तिला स्वतःच्या मोबाईल नंबर देते ,

काही गरज पडली तर मला फोन करा ...असे सांगते आणि निघते,... आत मध्ये येऊन माधवी आई-बाबांना शोधते, ते झाडाखाली बसलेले असतात ,माधवी जाते आणि आई ....... अस म्हणत रडायला लागते,
...........

अगं काय झालं? अशी रडतेस का? काय झालं? आणि तू एकटीच आली श्रीकांत राव कुठे आहेत ?

आई आम्ही खरेदी केली आणि मॉलमधून बाहेर येतच होतो मी मागे वळून पाहिलं तर हे गायब, अंग मला दिसलेच नाही, आई मी खूप शोधलं पण हे नाही दिसले.... मला आता येथे एका मुलीने आणून दिले, आणि तिकिटाचे पैसेही तिनेच दिली ,आई आपण घरी जाऊया, ते येतील...

श्रीकांत जेव्हा गायब होतो ऍक्च्युली तो माधवीच्या मागेच असतो, मागेहून त्याला कोणीतरी  त्याचा हात धरत स्वतःकडे उडतो आणि थोड्या दूर कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी घेऊन जातं .....आता ती व्यक्ती कोण आहे ,श्रीकांतला कशासाठी नेल आहे..…

हे आपण पुढल्या भागात पाहू या......

🎭 Series Post

View all