पुढचं पाऊल.... भाग 20 (अंतिम)

Madhvichya cheharyavar vegalech samadhan disate, kontyach baila vatat nahi aapla divorce vhava pan kadhi kadhi paristhiti nirman hote ki aaplyala nat todav lagat..

पुढचं पाऊल....

भाग 20 ( अंतिम )


आधीच्या भागात,

"माधवी तिच्या आई-बाबांना तात्काळ मुंबईला बोलावून घेते" ....सगळे श्रीकांतशी बोलतात ,त्याला जाब विचारतात ...मनोहरराव सगळे सांगतात ...
"आम्हाला आमची पोरगी इथे नांदवायची नाही आहे, श्रीकांत शॉक होतो...पण माधवीच्या चेहर्‍यावर समाधान असतं ....

आता पुढे,

माधवीच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसते, कोणत्याच बाईला वाटत नाही आपला divorce व्हावा पण कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्याला नातं तोडावं लागतं ....माधवीच एकच स्वप्न होतं आपला होणारा नवरा "गरीब" असला तरी चालेल पण "मनाने श्रीमंत" असायला हवा...... दोन घास कमी मिळाले तरी चालतील पण "प्रेम करणारा" असावा.... "काळजी घेणारा" असावा.... आपलं मन ओळखणारा असावा...

प्रत्येकच मुलीचे असे स्वप्न असतात, पण प्रत्येकाचेच स्वप्न पूर्ण होत नाही ना..... माधवीच्या बाबतीतही तेच घडलं ....

"माधवीची बाजू पक्की होती पण श्रीकांत डगमगला.... दोन चाकं समांतर असायला हवी एक डगमगला तर एक्सीडेंट होणारच आणि माधवी च्या बाबतीतही तेच झालं .....श्रीकांतनी सगळ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला ....तो खोट्या वर खोट बोलून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होता ...पण त्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ झाले...

माधवीचे आई-बाबा आणि श्रीपतराव ,यांनी ठरवून टाकलं की दोघांचे divorce करायचा ....दुसरे वडील असते तर आपल्या मुलाची बाजू घेतली पण श्रीपतरावांनी असं नाही केलं ....त्यांनी आपल्या सुनेची बाजू घेतली .....

ते तिघे माधवीच्या रूम मध्ये गेले.... माधवी स्तब्ध बसलेली .....डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओसंडत होत्या.... दुःखामुळे नाही तर आपल्याच बाबतीत हे का घडते ?या विचाराने.... आई तिच्या खांद्यावर हात ठेवते, ती पटकन डोळे पुसते....

"ये आई बस, बाबा  बसा"

माधवी आमचा निर्णय झालाय ,"तू जावईबापू सोबत घटस्फोट घेतीयेस"

बाबा कडे पाहून, ती बाबा..... म्हणत रडते....

बाबा, हे कुठे गेलेत....

तो निघून गेला घरातून.... गेला असेल त्या सटवीकडे..

" चल तू झोप बाळा ....
आम्ही जातो.... रात्रभर माधवी आईच्या मांडीवर डोकं ठेवून लेटली होती, डोक्यात विचार सुरु होते...पण निर्धार पक्का होता.... पण आता पुढे काय करायचे हाही एक प्रश्नच होता .....

माधवी सकाळी उठून सगळ्यात आधी  बाबांच्या रूममध्ये जाते,

"बाबा......बाबा...

"माधवी, ये बेटा...

"बाबा...मला तुम्हाला सोडून नाही जायचं....  मी तुम्हाला एकट सोडून नाही जाणार..... मी जिथे जाईन तिथे तुम्हाला घेऊन जाईल...."

बघू आपण काय करायचे ते ....आपण आधी वकीलाला भेटून घेऊन....

प्रदीप च्या मदतीने ते वकिलाला भेटतात,  ते दोन दिवसात घटस्फोटाची कागदपत्र तयार करून देतो असे सांगतात ..


हे दोन दिवस माधवीसाठी खूप जड जातात...ती गौरी ला फोन करून सगळं सांगते.....
रेवाला पण भेटून येते... अभिनव ला पण सगळी कल्पना देते  आणि त्याचे सगळे पैसे परत करेल असं प्रॉमिस ही त्याला देते.....

अभिनवला राहवत नाही तो लगेच तिला भेटायला येतो ...
दोघेही एकमेंकासमोर उभे असतात, मनात खूप काही असत, पण ओठावर काहीच येत नाही...दोघांचेही डोळे भरून येतात.... ती अश्रू आवरले नाही म्हणून रूम मध्ये धावत जाते( अभिनवला डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून)..... अभिनव तिच्या मागोमाग जातो.. ती पाठमोरी बसलेली असते.. हा तिच्या खांद्यावर हात ठेवून..
"माधवी...
" तुम्ही काहीच बोलू नका please...
अस म्हणत त्याचा कमरेला घट्ट पकडून ढसाढसा रडते...
दोघे काहीही न बोलता, खूप काही बोलून जातात....

"भावनांना शब्दाची गरज नसते
हृदयाला जोडणारी ती एक तार असते
कधी कधी खूप बोलण्याला पण अर्थ नसतो
आणि कधी कधी एका शब्दात सर्वस्व असते"

अभिनव काहीही न बोलता तिथून निघून जातो ..

श्रीकांत दोन दिवस घरी आलेलाच नसतो.... माधवी मन घट्ट करते ... सगळी पॅकिंग करून ठेवते,  बाबांची सुद्धा बॅग भरते..... तिसऱ्या दिवशी सकाळी प्रदीप वकिलाकडून divorce पेपर घेऊन येतो ... त्याच दिवशी  दुपारी श्रीकांत घरी येतो तोही अगदी नशेत धूत झालेला असतो ......माधवी पेपर वर sign करते.....

एकदा आत जाऊन चारही बाजूंनी नजर फिरवते ,की काही राहिलं तर नाही हे बघते ....बाबांच्या रूम मध्ये पण जाऊन चेक करते .....आई बाबाही तयार झालेले असतात..... श्रीकांत सोफ्यावर पाय ताणून पसरलेला असतो.... सगळे हॉल मध्ये येतात... माधवी आतून रूम मधून निघाली, एक मोठी बॅग घेऊन....

" पंजाबी सूट,मोकळे केस, मंगळसूत्र रहित गळा, माथ्यावर छोटीशी टिकली... बाहेर आली तेव्हा सगळे बघतच राहिले तिच्याकडे ....

तिनी श्रीकांतला आवाज दिला .. तिच्या तोंडातून अहो.. निघणारच होत, पण स्वतःला आवरत "श्रीकांत उठा" अशी हाक मारते ....
ती दोन-तीनदा त्याला हालवते पण तो उठत नाही... बाजूला टीपाय वर पाणी भरलेला ग्लास असतो माधवी क्लास उचलते आणि त्यांच्या तोंडावर पाणी ओतते....तो ताडकन उठतो ...डोळ्यासमोर माधवीला बघून तीन-तीनदा डोळे कूचकरतो.. माधवीला बघून त्याला विश्वास बसत नाही...

" माधवी तू ?" तो आश्चर्य व्यक्त करतो

साईडला  एवढी मोठी बॅग बघून...

"हे काय ,कुठे चाललीस तू ....

"येताना मी तुम्हाला सांगितलं होतं ....पण आता जाताना सांगणार नाही ...."
"हे divorce paper यावर सही करा" आणि प्रदीपला द्या... तो देईल वकीलाकडे....
श्रीकांत चिडतो ...

" माधवी तू हे काय करतेस ,वेड लागले का तुला?"

" नाही, वेळ लागणार होतं मला... वाचले मी सुदैवाने... आणि आता मी तुमच्या आयुष्यातून नेहमीसाठी चाललेय, मीच नाही तर बाबासुद्धा .....

"बाबा.... बाबा... हे माझे बाबा आहेत...."

" होते ....आता ते माझे बाबा आहेत, आणि मी माझ्या बाबांना तुमच्या भरवश्यावर नाही ठेऊ शकत.....

त्याच्या हातात पेपर ठेवते आणि घराचा"" उंबरठा"" ओलांडते...

" आज माधवीनी तिच्या आयुष्यातल ""पुढचं पाऊल"" टाकलं ....नवीन आयुष्याची सुरुवात करायला....

          मी जन्माला आली, चालायला लागली..
             तेव्हा मी माझ्या आयुष्याचं
            पहिलं "पुढंच पाऊल" टाकलं

           शाळेत जेव्हा एकटं जायचं होतं
       तेव्हा स्वतःहून एक "पुढचं पाऊल" टाकलं

          कॉलेजच्या पहिल्या दिवशी
        तारुण्यातलं "पुढचं पाऊल" टाकलं

          लग्नाच्या गाठी बांधल्या गेल्या तेव्हा
      उंबरठा ओलांडून पहिलं "पुढचं पाऊल" टाकलं

           आता लग्नाच्या गाठी तुटल्यावर
     नवीन आयुष्यासाठी "पुढचं पाऊल" टाकलं

                मुक्त संचार करायला
                मोकळा श्वास घ्यायला

समाप्त...

🎭 Series Post

View all