पुढचं पाऊल.... भाग 19

Abhinav madhvichya ghari yeto, madhavi dar ughadate... doghehi darvajyat ekmenkankade baghat asatat, najrela najar bhidleli asate....


पुढचं पाऊल....

भाग 19

आधीच्या भागात,
आपण पाहिले की वॉचमन काका माधवीला, "श्रीकांत आणि मोनाच्या प्लॅनबद्दल" सगळ सांगतात.....माधवी ,रेवा आणि गौरीला बोलवुन सगळं सांगते, त्यांच डिस्कशन चाललेल असत...... तितक्यात तिथे अभिनव येतो .....

आता पुढे,
अभिनव माधवीच्या घरी येतो, माधवी दार उघडते... दोघेही दरवाज्यात एकमेकांकडे बघत असतात ,नजरेला नजर भिळलेली असते ...रेवाआणि गौरी हळूच निघून जातात ....बाबा खोलीतून जोरात.....

" माधवी..... माधवी बेटा" असा आवाज देतात ....
बाबांच्या आवाजानी दोघेही भानावर येतात ...

"आले बाबा

तुम्ही बसा प्लीज,मी आलेच..

"बाबा, तुम्ही आवाज दिलात ..."

हो ,कोणी आले का बाहेर....
हो बाबा, अभिनव आले आहेत..

"अरे वा"  मग त्याला बिना जेवण केल्यानी जाऊ देऊ नकोस ....

ठीक आहे बाबा...
बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे रात्री जेवण झाले की मग आपण बोलू....

"तुला जसं वाटतं तसं "
ठीक आहे...

ती अभिनव साठी coffee बनवून आणते, त्याच्यासमोर मग धरून..
" कॉफी"...
अरे वा, थँक्यू ...तुम्हीही घ्याना...

"नाही नाही ,तुम्ही घ्या आणि आज तुम्हाला जेवण करूनच जायचं आहे हं... बाबांची तशी order आहे...

तो हसतो आणि" ठीक आहे" असं म्हणतो....

तो बाबाच्या रूम मध्ये बोलायला जातो, थोड्यावेळाने श्रीकांत ऑफिस मधून येतो....अभिनव ला बाबांच्या रूम मध्ये बघून त्याला खूप राग येतो.....तो किचनमध्ये जातो माधवी स्वयंपाक करत असते. . तो माधवीचा हात जोरात पकडून.....हळू आवाजात,
" हा, इथे काय करतोय?"
तीही नाक फुलवत
"कोण?"

"मी त्या अभिनव ची गोष्ट करतोय...."

ते बाबांना भेटायला आलेत आणि आता जेवण करूनच जाणार आहेत, बाबांनी सांगितलं तस ...

" त्याचा आपल्या घराशी काय संबंध?
"तो का येतो इथे?

हे तुम्ही मला विचारताय, "तुमच्या बाबांचा जीव वाचवला त्यांनी "विसरलात.....

उद्याच्या उद्या पैसे आणतो आणि त्याच्या तोंडावर फेकतो म्हणजे त्याचं येणं तरी बंद होईल ...

"मग फेकाना कुणी अडवलयं .….. "
श्रीकांत चिडुन रूम मध्ये जातो, तो डायरेक्ट जेवायच्या वेळेस बाहेर निघतो.... डायनिंग टेबलवर छान गप्पा रंगल्या होत्या बाबांच्या आणि अभिनवच्या...... बाबांचं आणि अभिनवच मस्त जमतंय.. ते श्रीकांतशी पण कधी एवढे बोलायचे नाही पण त्याच्याशी छान जमत.... जेवण करून अभिनव जायला निघाला दरवाज्यात  त्याने हळूच विचारले..
" तुम्ही सांगितलं नाही, दुपारी काय झालं होतं?"

"  वेळ आली की सांगेन"
तो निघतो रात्री श्रीकांत झोपल्यावर, माधवी बाबांच्या रूममध्ये जाते बाबांना सगळं आधीपासून सविस्तर पणे सांगते.... मोना.... त्या शिंदे काकू.... ते सगळं सगळं सांगते ....बाबांना खूप धक्का बसतो ,त्यांच्या डोळ्यात अश्रु येतात....

" बाबा आता आपण काय करायचं ,मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोलायला हवं" .....श्रीपतराव माधवी समोर हात जोडून .....

"मला माफ कर पोरी, मला माफ कर.....

" बाबा तुम्ही का माफी मागताय.....please अस करू नका"

मला माफी मागायला हवी......
नाही बाबा प्लीज तुम्ही असे काही करू नका...

" माझ्या पोरानी तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं ...तू इतकी चांगली आहेत आणि हा....... ते बोलता-बोलता थांबतात आणि रडतात..
"बाबा प्लीज तुम्ही रडु नका, प्लीज....

तू एक काम कर उद्या सकाळी तुझ्या आई बाबांना फोन कर त्यांना इकडे बोलवुन घे.... आपण ठरवू काय करायचं ते..... दुसऱ्या दिवशी ती मनोहररावांना फोन करते...त्यांना तात्काळ इकडे बोलावून घेते.... तेही मिळेल त्या ट्रेन नी संध्याकाळी मुंबईत पोहचतात.... ऑटो नी घरी येतात....आल्या आल्या माधवीच्या आईचे सुरू होते ....

"काय झाले, माधवी ....?.का एवढ्या तातडीने बोलावून घेतलं....

" आई.. आई, शांत हो.... हे घे पाणी...  बाबा... पाणी घ्या....
मनोहर राव: काय झालं माधवी?

"काही एवढे झालेले नाही..... तुम्ही आधी जेवून घ्या मग आपण बोलू आरामात"...

मनोहरराव:  श्रीपतराव कुठे आहेत?

"बाबा आत आराम करत आहेत"

का? बरं नाही हे त्यांना.......

actually, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही उगाच काळजी करत बसाल म्हणून .....बाबांना हार्ट अटॅक आलेला होता....पण आता ते एकदम बरे आहेत....

"काय?"

"  तू एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही माधवी....

ते दोघेही झटपट श्रीपतरावांच्या रूममध्ये जातात...
" अहो श्रीपतराव ,कशी तब्येत आहे तुमची?"
अरे आलात तुम्ही..... मी बरा आहे .....

एवढी मोठी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितली नाही .....मनोहर राव तसं नाही उगाच तुमच्या जीवाला घोर नको म्हणून आणि मनोहरराव तुमची पोरगी एवढी गुणी आहे ना, एकटी सगळं सांभाळून घेते....


"तिच्यात खूप समंजसपणा आहे....."

"हो, पण माझाच सिक्का खोटा निघाला ...श्रीपतरावांच्या डोळ्यात पाणी येतं ....

"आता काय झालय? ,श्रिपतराव......

त्यांची गोष्ट कापत माधवी.....

" काही नाही बाबा, तुम्ही सर्व चला जेवायला आपण उद्या बोलु ... माधवीच्या जीवनातला खूप मोठा निर्णय आहे त्यामुळे तिच्या आईबाबांना बोलवणं भाग होतं...
त्यातही श्रीकांतच तोंड फुगलेलं......

"माधवी हे सगळं काय चाललंय?"
" हाच प्रश्न मीही तुम्हाला विचारू शकते"

just shutup ... आई-बाबा का आलेत?

" मला भेटायला.....
" खोटं बोलू नकोस..... हो भेटायला आले ते..... बाबांना भेटायला आले आहेत.....
" बाबांना?"
पण आपण त्यांना बाबांच्या heart attack बद्दल सांगितलं नव्हतं.....मग ते का आलेत....

" ऐकायच आहे खरं ?ऐकण्याची ताकत आहे तुमच्यात? तर एका..... हे जे काही तुमचं चाललंय ना ,त्याचाच काय तो सोक्षमोक्ष लावायला आलेत ......."
तुम्ही काही सांगितलं नाही तरी आम्हाला सर्वांना सर्व माहिती आहे .....तुमचे काय चाळे चाललेत ,काय planning चाललंय सगळं मला माहिती आहे..... सो आता गप्प बसा.......

सगळेजण जेवण करतात...... श्रीकांत रूममध्ये जायच्या आधीच माधवी आपल्या आईला घेऊन रुममध्ये निघुन जाते...... तो हॉलमध्ये झोपतो मनोहरराव सोबत.......

सकाळी ऑफिसला जायला तयार होतो.....
माधवी:आजची सुट्टी घ्या ,आज तुम्ही ऑफिसला जाणार नाही आहात .....

"का?, सुट्टी का घ्यायची ?कुठे जायचंय का?

" काहीही माहित नसल्या सारखे करू नका, आई-बाबांना तुमच्याशी बोलायचे आहे आणि त्यांना संध्याकाळी गावाला निघायचं आहे   ..म्हणून तुम्ही आज जाऊ नका..... तो बॅग सोफ्यावर टाकतो, नाही नाही फेकतोच.... ताडकन सोफ्यावर बसतो... माधवी सगळ्यांना आवाज देते ....सगळे हॉल मध्ये येउन बसतात.... बाबा बोलायला सुरुवात करतात...

" श्रीकांत तु हे काय चालवले आहेस?"
" काय झाले बाबा?"

" काय झाले,एवढी चांगली बायको घरात असताना तू बाहेर ऊनाळक्या करतोस.... तुला लाज वाटत नाही का....

"  बाबा तुम्ही काय बोलताय?

"तुम्ही बरोबर केलं नाही जावाईबापू "

पण मी काय केलं.....

" स्वतःला विचारा, आमची पोरगी साधी सरळ आणि तुम्ही तिचा गैरफायदा घेतला,"

"तुम्ही सगळे सांगणार आहात का?"

श्रीपतराव:मला तर बोलायला ही लाज वाटते पण तुला करायला नाही वाटली....
माझाच सिक्का खोटा आहे दुसऱ्याला तरी काय दोष द्यायचा.... घरात एवढी चांगली बायको असताना बाहेर चाळे करावेसे वाटतात....शी.... माझाच पोरगा नालायक निघाला .....

"हे बघा जावईबापू, तुम्ही काय ते खरं खरं सांगा.... तुम्ही नाही सांगितलं ना तरी आम्हाला सगळं माहिती आहे आणि आता आम्हाला आमची पोरगी तुमच्या घरात नांदवायची नाही आहे....

" अहो बाबा( मनोहररावांना) तुम्ही काय बोलताय?"

श्रीपतराव : ते खरं काय तेच बोलतायत आणि आम्हाला तुझ्या कडून काही अपेक्षा नाही.....आणि आता तुमच्या दोघांचे मार्ग वेगळे .... श्रीकांत शॉक झाला.... त्याला वाटलं नव्हतं असं काही होईल आणि गोष्ट इथ पर्यंत पोहोचेल.....

पण आता माधवीचे आई-बाबा आणि श्रीपतराव सुखावले आणि माधवी चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते...

क्रमश:


आपण पाहिले की वॉचमन काका,  माधवीला  श्रीकांत आणि मोनाच्या प्लान बद्दल सांगतात ,बालकणीत जी वृद्ध बाई माधवीला दिसते actually ती मोना असते, getup केलेली,पण हे माधवीला माहिती नसतं, मला इथे काही गोष्टी आवर्जून सांगावेसे वाटतात जेव्हा माधवी 'नवीन' राहायला आलेली असते,  तिच्यासाठी सगळं नवीन असत,त्यामुळे आजूबाजूची तिला माहिती नसते.... श्रीकांत याचाच फायदा घेतो, एका वृद्ध बाईचा गेटअप करून मोनाला उभं करतो, श्रीकांत scene creat करतो.. माधवी सगळे रेवाला सांगते ...त्यानंतर रेवा आणि शैलजा शिंदे काकू विषयी सांगतात, त्या दोघींना अस वाटत की शिंदे काकूच भूतबीत काही प्रकार आहे .....त्या माधवीला शिंदे काकू विषय सांगतात,  माधावीने शिंदे काकुला पाहिलं नसतं त्यामुळे ती त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि तिला असं वाटतं की मेलेल्या काकू आपल्याला दिसतात, हे तिच्या मनात पक्कं झालेलं असतं .....त्यात एक दिवस त्या घरी येतात तिच्याशी बोलतात, आधीच हिच्या मनात भीती निर्माण झालेली असते मग ती रेवाला बोलावते..... हिला दिसतं पण रेवाला दिसत नाही .....हा झाला नजरेचा खेळ "नजर हटी, दुर्घटना घटी" रेवा जशी वळायाची,त्या वृद्ध काकू ( म्हणजेच मोना)गायब... श्रीकांत नी तस दोघींना भासवल...रेवाने माधवी कडे मान फिरवली की ही सोफ्यामागे जाऊन लपायची..... श्रीकांत नी खूप विचारपूर्वक हा प्लॅन तयार केलेला होता, त्यामुळे माधवी ला काहीच कळलं नाही.... त्यानंतर तीघीही स्केच काढणाऱ्याकडे जाणार असतात पण मधातच बाबांना हार्ट अटॅक येतो आणि तिचं जाणं राहून जातं त्यानंतर त्यांना वॉचमन काका कडून सगळं माहिती होतं...... काही जणांना प्रश्न पडू शकतात म्हणून मी हे सगळे एक्सप्लेन करते आहे....

आजचा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.....

🎭 Series Post

View all