पुढचं पाऊल.... भाग 17

Don divas shrikant ani madhavi aalipaline davakhanyat jayache nantar doctoranni"ghari gheun gele tari chalel, pan kalaji gyavi lagel"ase sangitale....

पुढचं पाऊल
भाग 17

आधीच्या भागात,

माधवी बाबांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करते, कशीतरी पैशाची जुळवाजुळव करून डिपॉझिट भरते, बाबांची सुरळीतपणे ट्रीटमेंट सुरू होते ......श्रीकांत माधवीला ॲप्रिसिएट करतो आणि दोघेही घरी निघतात.......

आता पुढे ,

दोन दिवस श्रीकांत आणि माधवी आळीपाळीने दवाखान्यात जायचे नंतर डॉक्टरांनी "घरी घेऊन गेले तरी चालेल ,पण काळजी घ्यावी लागेल" असे सांगितले.... दोघे बाबांना घरी घेऊन येतात, हळूहळू बाबांची तब्येत सुधारते..... माधवी खूप काळजी घेते बाबांची.... त्यांच पथ्यपाणी ,औषधे ,वेळच्यावेळी खाणं पिणं सगळं खूप श्रद्धेने करते ...कोणी आपल्या वडिलांसाठी करणार नाही तेवढं ते आपल्या सासऱ्यासाठी करते.....

आपण एकदा त्यांना वडील मानलं ना की मग सगळ्या गोष्टी सोप्या होतात .....वडील मग ते बाबा असो किंवा सासरे दोन्ही आपल्यासाठी सारखेच असतात...
बाबांच्या मनात आता माधवीची जागा पक्की होत चालली आहे ..तिची काळजी,तीच प्रेम, ते बघतात ....ती इतकं सगळं करते त्यांच्यासाठी.....
श्रीपतरावांना माधवी आता सुन नाहीतर मुलगीच वाटायला लागली..

...........................


बाबांची औषधांची वेळ झाली माधवी औषध घेऊन येते रूम मध्ये आणि सोबत सोजी पण बनवून आणते....

"बाबा उठा ,गोळ्या खायची वेळ झाली आहे बाबा.....

श्रीपतराव माधवीच्या चेहऱ्याकडे बघत स्मितहास्य करून उठतात
" बाबा हे घ्या, मी सोजी बनवून आणली आहे, आधी ही खाऊन घ्या आणि मग गोळी घ्या "

"आता हि रोज रोज सोजी खाऊन कंटाळा आलाय....."

"बाबा ,काही दिवस आपल्याला पथ्यपाणी पाडाव लागेल त्यानंतर तुम्हाला हवे ते खा..... हे घ्या .....
माधवी बाबाला सोजी चा घास भरवते..... श्रीपतरावांचे डोळे पाणावतात....

" हे काय बाबा? तुमच्या डोळ्यात पाणी,रडताय की काय?ती बाबांच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून गम्मत करते.....


"नाही पोरी हे तर आनंदाचे अश्रू आहेत...... तुझ्या रूपात मला एक मुलगी मिळाली आणि आई सुद्धा....."

"आई ?" ती किंचाळून

हो ,आई कशी आपल्या मुलांची काळजी घेते तशी तू माझी काळजी घेतेस ना म्हणून......

बाबा तुम्ही पण ना, दोघेही हसतात......
" हो पोरी माझं सगळं सुख तुला मिळो आणि तुझी सगळी दुःख मला मिळोत......

बाबा असं काही नसत हो...... ते जाऊ द्या, तुम्ही गोळ्या घ्या आणि आराम करा मी स्वयंपाकाचं बघते.........

"माधवी बस ना माझ्याजवळ, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे बेटा.....

"बोलाना बाबा"

"श्रीकांत तुझ्याशी चांगला वागतो का ग?"

हो बाबा, का तुम्ही असं का विचारताय .....?

त्या काटकर बाईंच्या भाच्यानी सांगितलं होतं ना, याच बाहेर कोणाशी तरी......

बाबा सोडा तुम्ही ,,इतका विचार नका करू.... समोर बघू आपण काय करायचं ते...... बाबा मी जरी खेड्यातली, कमी शिकलेली असले ना तरी समंजसपणा आहे माझ्यात... आणि कस आहे ना बाबा आपण समोरच्याला देत राहायचं त्याच्याकडून परत मिळण्याची अपेक्षा करायची नाही जिथे अपेक्षा केली तिथे नेमका अपेक्षाभंग होतो........ प्रेमाने माणूस बदलतो बाबा ....

बाबा कस आहे ना ,एखाद्या लहान मुलाला तुम्ही जर म्हणालात की, बाळा रे.... हे करू नकोस तर तो नेमका तेच करतो......ती एक phase असते त्या काळापुरती....... आता आपण यांना हे दाखवतोय की आपल्याला काहीच माहित नाही पण जेव्हा यांना कळेल की हे आपल्याला माहित आहे तेव्हा ते सैरभैर होतील, मनात विचारांचे थैमान सुरू होईल आणि तुम्ही जर यांना सांगितलं ते चुकीच आहे ते कदाचित त्यांना कळेल पण वळणार नाही......

होतं असं कधी कधी आपल्याला कळतं की हे चुकीचे आहे पण तरीही आपण ते करतो, आपण त्यांना कितीही सांगितलं तरी त्याचा उपयोगनाही, त्यांच त्यांना ते कळायला हवं बाबा ... ..

त्या दोघांचे प्रेम नाही आहे ते केवळ अट्रॅक्शन आहे काही काळापुरतं ,,तुम्ही एवढा विचार नका करू बाबा, तुम्ही आराम करा मी स्वयंपाकाला लागते..... हे येतील इतक्यात.......माधवी किचन मध्ये जाते.. .

" ही पोरगी एवढा समजूतदारपणा दाखवते पण हिला याच फळ मिळेल की नाही  देवच जाणे" श्रीपतराव स्वतःशीच पुटपुटतात....

............................


श्रीकांत येतो फ्रेश व्हायला रूममध्ये जातो तितक्यात त्याचा फोन वाजतो.... . माधवी फोन उचलते... .


हॅलो.... हॅलो.... हॅलो....

समोरून कुणाचाच आवाज येत नाही, कुणीच बोलत नाही म्हणून ही फोन ठेवते आणि पुन्हा किचनमध्ये जाते.....


पुन्हा फोनची रिंग वाजते, नंबर सेव्ह नसल्यामुळे नावही दिसत नव्हत, फोन उचलते, पुन्हा तेच.....कुणीच बोलत नाही.....

आता मात्र माधवी चिडते, 'मला माहितीये, तू कोण बोलतेस आता जर जास्त शहाणपणा केलास तर गाठ माझ्याशी आहे ,ठेव फोन..... असं म्हणत फोन कट करते आणि टीपाय वर ठेवते आणि पुन्हा किचनमध्ये जाते.....

श्रीकांत फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसतो .....माधवी किचन मधून ...."तुमचा फोन बरेचदा वाजला म्हणून उचलला पण कोणीच बोललं नाही".....

" मग?"

काय नाही, आता तो फोन काही पुन्हा येणार नाही...

" बघू दे "

तो बघत असतानाही मधातच,
" कुणाचा आहे ?"

"माझ्या मित्राचा "

"मित्राचा?"

"मग बोलला का नाही ,मी तर पाच-दहा शिव्याही घातल्या..... अरे देवा आता तो मित्र काय विचार करणार"

तू बिन्डोक आहेस का ग? कुणासमोर काय बोलायचं साधी अक्कल नाही आहे तुला.....

अहो पण फोनवर कोणी बोललच नाही....
हिला माहिती होत की फोन तिचाच आहे......पण ही काही बोलली नाही....

गप्प ग, डोकं खाऊ नको, जा मला काहीतरी खायला आण....

ती बाबांना जेवण भरवते, त्यांच्य औषध पाणी करते आणि श्रीकांतला जेवायला वाढते आणि स्वतःही घेते दोघेही डायनिंग टेबल वर सोबत जेवायला बसतात....

" उद्या सुट्टी आहे ना तर समीर भाऊजी आणि अस्मिताला बोलवायचं का जेवायला, तसे ते बाबांना बघायला येणार होते तर जेवायलाही सांगून देऊ त्या निमित्ताने बसण बोलणं होईल......

" बघू?"

बघू नाही, मी आत्ताच फोन करते भाऊजीना आणि त्यांना उद्याचं आमंत्रण देते..

"hello भाऊजी....."

ह वहिनी बोला....

उद्या तुम्ही सगळे आमच्याकडे जेवायला या...

"अस अचानक?"

हो त्या निमित्यांनी अस्मिताच येण होईल....

"ठीक आहे येतो आम्ही सकाळी ओके बाय"

"बाय"

दुसऱ्या दिवशी समीर आणि अस्मिता आणि त्यांचा मुलगा असे तिघे घरी येतात माधवी veg... जेवण बनवते

"पुरण पोळी, वरण भात, कळी ,पोळ्या ,मसाला वांगी कांदे भजे ,मस्त महाराष्ट्रीयन जेवण बनवते.....
सगळे जेवायला बसतात, समीर भाऊजींना जेवण खूप आवडत,, तो खुप स्तुती करतो माधवी नी बनवलेल्या जेवणाची....

" वहिनी ,जेवण खरंच खूप छान झालं आहे..

अस्मिता: हो हो खरच छान झालय ....

समीर: वहिनी एक सजेस्ट करू का ,तुम्ही तुमचा एक छोटासा गृहउद्योग सुरू करा,, खूप छान response मिळेल तुम्हाला, .....

" भाऊजी हे तुम्ही काय बोलता, असं तर कधी माझ्या मनातही आलं नाही आणि मी विचारही केलेला नाही...

मग विचार करा,मी खरं सांगतो तसे तुम्हाला वेळ मिळतो ना.....

काय रे श्री छान आयडिया आहे ना..... श्रीकांत गप्प असतो .....काय रे श्री ऐकतोस का ?

हो हो छानच होईल.... सगळ्यांच्या गप्पा छान रंगात आलेल्या असतात, चौघांची छान धमाल सुरू असते तितक्यात दारावरची बेल वाजते माधवी दार उघडते....
समोर तीच अनोळखी व्यक्ती उभी असते ज्याने हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरलेलं असतं....

" तुम्ही ?"

हाय....

"तुम्ही इथे ?"

हो मी हॉस्पिटलला गेलो होतो बाबांच्या भेटीला पण तिथे माहिती झालं की बाबांना डिस्चार्ज मिळाला म्हणून मी इथे आलोय.....

"तुम्हाला ॲड्रेस कसा माहिती झाला?"

तो मिश्किल पणे हसतो
"तुम्ही असे हसताय काय?"

काही नाही हॉस्पिटल मधून ॲड्रेस मिळाला...

" सॉरी ,माझ्या लक्षातच नाही आलं...

अच्छा आता दारातच बोलणार आहोत आपण की, आत बोलावणार आहात मला...

हो हो या ना.....

अहो ते त्यादिवशी तुम्हाला सांगितलं होतं ना हॉस्पिटलमध्ये पैशाचं ..... हेच आहेत ते...

तो हात पुढे करून....

हॅलो ,मी अभिनव देशमुख.....

हॅलो, बसा......

माधवी सगळ्यांची ओळख करून देते..  हे माझे मिस्टर श्रीकांत इनामदार, हे यांचे मित्र समीर आणि त्यांच्या पत्नी अस्मिता तो सगळ्यांना हाय-हॅलो करतो.....

श्रीकांत आणि समीर त्याच्याकडे बघतच राहतात कारणही तसंच आहे अभिनव उंच पुरा, धाकटा, अगदी रुबाबदार त्याची पर्सनॅलिटी सगळ्यांना आवडेल अशीच होती..... सगळे बसतात ...

अभिनव श्रीकांतला - "तुमचे बाबा कुठे आहेत ?कशी तब्येत आहे त्यांची?....

ते बरे आहेत आत रूम मध्ये आराम करत आहेत

माधवी: मी तुम्हाला नेते त्यांच्या रूम मध्ये....

बाबा, हे अभिनव तुम्हाला भेटायला आलेत, बाबा यांनी ऑपरेशन साठी पैशाची मदत केली...

" हे काय अशी ओळख करून देणार आहात तुम्ही माझी"

" मग अजून काय?"

काही नाही ,जाऊ द्या .....

"बाबा कशी आहे आता तुमची तब्येत?

"मी बरा आहे आणि आता लवकरच ठणठणीत होऊन फिरायला लागणार आहे...."

" अरे वा"

"माझी लेक काळजी घेते ना माझी लवकरच बरा होणार आहे मी"

" लेक?"

पण ह्या तर म्हणाल्या की तुम्ही यांचे सासरे आहात ...

" नात्याने ती माझी सून आहे पण खरं तर मनाने ती माझी लेक आहे आणि ही अशीच लेख मला जन्मोजन्मी मिळू दे हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी.....

तिघेही खळखळून हसतात......


क्रमश:

🎭 Series Post

View all