पुढचं पाऊल.... भाग 14

Madhavi aata purnpane bari zali, shrikant ne hi office madhe jane suru kele...

पुढचं पाऊल ...
भाग 14

(आधीच्या भागात,
गौरी माधवीला भेटुन जाते, गौरी च्या नावावरून दोघेही खळखळून हसतात.... माधवीला खूप बरं वाटतं की श्रीकांत तिची काळजी घेतोय ....
त्याच्या मनात तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे..)

आता पुढे ...


माधवी आता पूर्णपणे बरी झाली, श्रीकांतने ही ऑफिस मध्ये जाणे सुरु केले... माधवी बरी झाली खरी पण तिच्या मनात त्या काकुंचे विचार सुरुच आहेत ...ती गौरीला फोन करते आणि रेवाला भेटून सगळं सांगण्याचं ठरवते... श्रीकांत ऑफिसला गेल्यावर गौरी येते... ह्या दोघी रेवाकडे जातात ...

हाय रेवा..
अग, माधवी तू... ये ना..
हो ...ही माझी मैत्रीण गौरी ..

हॅलो...
हॅलो .....
माधवी:  मला तुझ्याशी बोलायचं होतं ...
मग बोल ना.... काय झाल...

कुठून सुरुवात करू आणि काय बोलू ते हेही कळत नाही आहे आणि हे सगळं ऐकल्यावर तू काय रिऍक्ट करशील याची जास्त भीती वाटते...

काय आहे गंभीर?
गंभीरच आहे ...तुला आठवतं त्यादिवशी मी तुला त्या काकूबद्दल विचारायला आले होते ..

हो ,त्याचं काय?

अग मला आदल्या संध्याकाळी, मी सहजच बाल्कनीत उभे होते तर मला काकू पुस्तक वाचताना दिसल्या आणि त्यानंतरच सगळं माधवी रेवाला सांगते ..

रेवाला पण शॉक बसतो , असं कसं घडू शकतं... तीही विचारात पडते ...तिघींच बोलणं होते, आणि आपण बघू एक-दोन दिवस काय होते ते,, मग विचार करू... असं म्हणत दोघीही आपापल्या घरी जातात..

श्रीकांत संध्याकाळी घरी येतो सोबत समीर पण असतो...

माधवी बाहेर ये, समीर आलाय ..

अरे समीर भाऊजी, याना बसा ,कसे आहात?
बरा आहे मी ....
पाणी आणते, बसा...

तू बस समीर, मी फ्रेश होऊन येतो..

भाऊजी पाणी.. कशी आहे तुमच्या आईची तब्येत... आईची तब्येत ठीक आहे पण तुम्ही अचानक आईच्या तबे त्तीबद्दल का विचारताय?

ऍडमिट केलं होतं ना तुमच्या आईला...

नाही कोणी सांगितलं ?मी तर उलट तुमची चौकशी करायला आलोय तुम्हाला बरं नाहीये ना, आता कशी तब्येत....

आहे मी, बरी आहे, माधवी विचारात पडते... काय ग माधवी काय झालं ?..

काही नाही, बाबा ....

मागेहून श्रीकांत येतो, "माधवी काहीतरी बनव चमचमीत खायला.."
हो आणते, तुम्ही लोकं मारा गप्पा...
आणि गरम गरम भजी आणि चहा आणते... तिघेही नाश्ता करतात ...

"अरे ,वहिनी छान झाली भजी" ..अगदी कुरकुरीत.. मस्त..

thank you..
माधवीच्या लक्षात येतं की श्रीकांत खोटं बोलतोय ..

ती दुसऱ्या दिवशी समीर च्या फोनवर श्रीकांतच्या फोनवरून फोन करते श्रीकांतच्या नकळत...

हॅलो समीर भाऊजी..मी माधवी बोलतीय..
ह, बोला वहिनी...

काल मी तुम्हाला तुमच्या आईबद्दल विचारलं, तेव्हा तुम्ही सांगितलं की त्या ठीक आहेत ....

"त्यांना खरंच ऍडमिट केलं नव्हत का?"

नाही, वहिनी माझी आई खरच बरी आहे.....
काय झालं वहिनी, हा प्रश्न तुम्ही मला तिनदा विचारलं...

भाऊजी तुम्ही यांच्याजवळ काही बोलणार नसाल तर मी विचारते ...

भाऊजी म्हणताय ना मला तुम्ही, मग मी तुमचा भाऊ झालो ..

सांगा भावाला निश्चिंतपणे ...

"आम्ही मागच्या आठवड्यात मॉलमध्ये गेलो होतो तिथून हे अचानक दिसेनासे झाले रात्री पण उशिरा घरी आले"

यांना विचारलं तर ते यांनी... तुमच्या आईची तब्येत बरी नाही, त्यांना हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं आणि तुमच्या जवळ कोणी नाही म्हणून थांबलो" असं सांगितलं...

"हे खोट का बोलले असतील भाऊजी?"
तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा मला..

नाही वहिनी मला तरी काही कल्पना नाही मी श्रीकांत कडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मला जर काही कळल तर तुम्हाला सांगतो...

श्री नी माझ्या बद्दल तुम्हाला काय सांगितलं माहिती नाही पण मी आता माझ्याबद्दल सांगतोय..
माझ्या घरी मी, माझी बायको, माझा मुलगा आणि आई बाबा असतो ....अस्मिता ला घेऊन येतो मी एखाद्या दिवशी म्हणजे तुमची आणि तीची ओळख होईल....
तुम्ही आता इथे नवीन आहात तुम्हाला पण कंपनी मिळेल...

" ठीक आहे भाऊजी, फोन ठेवते"
मागेहुन श्रीकांत , माधवी माझा फोन दिसला का तुला?
हो ...हो..इथे टी पाय वर ठेवलेला आहे...

चल मी निघतो, मला उशीर झालाय... by
श्रीकांत घाई घाईत निघतो, माधवी दार लावून घेते...
रूम मध्ये नाही जात तर ,,दरवाज्याची बेल वाजते....

"अरे हे काही विसरले तर नसतील" अश्या विचारात ती दार उघडायला जाणार तितक्यात,
"तू थांब, बघतो मी "...

ठीक आहे बाबा ...इतक्या वेळी कोण आलं असेल ती स्वतःशीच बोलते...

श्रिपतराव दरवाजा उघडतात पण समोर कोणीच नसतं....

"अरेच्या" इथे तर कोणीच नाही.... ते स्वताशीच बोलतात

"कोण आहे बाबा?"
कोणीच नाही आहे ग... ते दार लावतात आणि आराम करायला रूममध्ये जातात...

पुन्हा दाराची बेल वाजते ...माधवी दार उघडते... दारासमोर त्या काकू उभ्या...

माधवी तोंडावर हात ठेवून एक एक पाऊल मागे जाते .... तिचे पाऊल जसे जसे मागे जातात तसे तसे काकूचे पाऊल समोर येतात ....

माधवी सोफ्याला धडकुन सोफ्या वर पडते...
काकु समोरच्या सोफ्यावर  बसतात ...

"काय ग पोरी, दचकलीस का ? मीच आहे अजून कोण आहे ,आणि मी किती वेळची बेल वाजवत आहे कुणी दार उघडत नव्हत... काकूच बोलणं सुरु असताना माधवी रेवा ला मेसेज करते

  "काकू आल्या आहेत,.. तू घरी लवकर ये... "

रेवा घरी येते ,दार उघड असल्यामुळे ती सरळ आत येते... माधवी घाबरलेली भांबावलेली सोफ्यावर बसली असते..

" काय ग माधवी, कुठे आहे त्या काकू?

त्या सोफ्यावर बसल्या आहेत... ती हातवारे करून सांगते...
रेवा वळून बघते मात्र तिथे कुणीच नसत....
माधवी तिथे कुणीही नाही आहे.

आहेत,,तू बघ ना एकदा , त्या तिथेच बसल्या आहेत...  कशा माझ्याकडे बघत आहेत...

" माधवी सांभाळ स्वतःला, तिथे कोणीच नाही आहे आणि असतं तर कुणी , मग मला का दिसत नाहीये?

तू बघ ,बघ तिकडे ,,

माधवी हळूच मान  वळवते तर तिकडे कोणीच नसतं... अंग आत्ताच तिथे होत्या त्या ...

कोणीच नाहीये माधवी..

माधवी रेवाला बिलगून खूप रडते..
शांत हो माधवी, तू बस शांत, मी पाणी आणते,आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया बघूया त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे .....

तू आता शांत हो ,बस.... ती पाणी आणते ह्या दोघींच्या आवाज ऐकू श्रीपतराव येतात ...

"काय झालं? ऐवढा आवाज का येतोय?"

काही नाही बाबा...

ही कोण आहे?
ही आपल्या शेजारी राहते,रेवा...
तुझा चेहरा असा का दिसत आहे रडल्या सारखा ?

नाही बाबा, काही नाही... डोळ्यात कचरा गेला ना म्हणून..
"बाबा मी चहा करू?"

नको मी आराम करतो थोडावेळ, तुमच्या दोघींचा आवाज ऐकला म्हणून आलो , बाबा रूम मध्ये जातात..
चल माधवी, मी निघते ...तू आराम कर..by..
by....

माधवी आत जाऊन शांत पडते...

  क्रमश:

🎭 Series Post

View all