पुढचं पाऊल.... भाग 13

Madhavi dar ughdun aat yete, ticha shwas phulalela asato ti tashich daha minite darala tekun ubhi asate.... thodya wel rilax hote ani room madhe jaun padate...

पुढचं पाऊल.....
भाग 13

आधीच्या भागात,

( माधवीला धक्का बसतो साईडच्या फ्लॅट बद्दल ऐकून ,ज्या बाईसोबत आपण बोललो ती हयातच नाही... या गोष्टीने माधवी पुरती हादरून गेली)

आता पुढे...

माधवी दार उघडून आत येते, तिचा श्वास फूललेला असतो ती तशीच दहा मिनिटे दाराला टेकून उभी असते..... थोड्या वेळ रिलॅक्स होते आणि रूम मध्ये जाऊन पडते......

एखाद तासाने गौरीला फोन करते ,तिला सगळे आपबिती सांगते .....गौरीला ही आश्चर्य वाटतं.. असं कसं होऊ शकत...

" हे बघ माधवी तू रिलॅक्स हो" आणि एक काम कर तू पुन्हा आज संध्याकाळी बाल्कनीत तू उभी राहा आणि त्यानंतर तुला कोण दिसत, कोण नाही हे मला सांग...... काळजी करू नकोस संध्याकाळी मला फोन कर मग आपण ठरवू काय करायचे ते.....

संध्याकाळी श्रीकांत येतो....
" काय ग माधवी ,चेहरा का असा झालाय? तब्येत बरी नाही का?

बरी आहे मी .....

मग चेहरा का पडलेला?

काही नाही.....

तो तिच्या माथ्यावर हात लावून चेक करतो...

"अगं हे काय, तुला तर ताप आहे" ते ठेव हातचं काम आणि चल डॉक्टर कडे... श्रीकांत तिला डॉक्टरकडे नेतो...... डॉक्टर चेक करून तीन दिवसाच औषध देतात आणि आराम करायला सांगतात .....

माधवी आणि श्रीकांत घरी येतात.... तू बस, मी पाणी आणतो...

अहो ,मी आणते ना....

गप्प बस, मी आणतो असं म्हणून तो किचनमध्ये जातो तर ही त्याच्या मागेमागे किचनमध्ये घुसते ....माधवी तू चुपचाप बस तिकडे....
अहो तुम्ही ऑफिसमधून आलात तेव्हाच काय खाल्लं नाही आहात आणि माझं हे मधातच आलं , मी बनवते ना पटकन काहीतरी......

नाही ,तु रूम मध्ये जा आणि आराम कर ,मी बनवतो काहीतरी..... एक काम करतो खिचडीच बनवतो तुलाही गरम गरम खिचडी खायला बरं होईल ...

बाबा.. बाबा तुम्ही खिचडी खाल का...की तुमच्या साठी काही दुसरं बनवू...

चालेल मला...
ओके, मग मी बनवतो खिचडी ..….done...

तो पटकन फ्रेश होऊन खिचडी बनवतो, बाबाला वाढतो आणि माधवीसाठी रूम मध्ये प्लेट घेऊन जातो....माधवी ला झोप लागलेली असते...

माधवी उठ... खाऊन घे थोडसं... तुला गोळ्या घ्यायच्या आहेत...

ह....
आरामात...

श्रीकांत माधावीला हातानी घास भरवतो आणि तिच्या डोळ्यातून अश्रू पाझरतात.....

आता हे काय..?
काही नाही...
आता तुला तापातही रडू येतंय..
नाही मी रडत नाही हे समाधानाचे अश्रू आहेत....
समाधानाचे?
दुखाश्रु ,आनंदाश्रू हे ऐकलं होतं आता हे समाधानाश्रु .....
हे काय भलतच असं म्हणून दोघेही हसतात... कितीतरी महिन्यानंतर माधवी खळखळून हसली, तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होत, नवरा आपल्याला त्याच्या हातानी बनवलेल्या खिचडीचा घास भरवतो हे बघून तिला बरं वाटायला लागत.... खिचडी खाते आणि झोपते...

श्रीकांतही सगळं आवरून झोपतो, दुसऱ्या दिवशी...

तुम्ही ऑफिसमध्ये नाही गेलात...
नाही मी दोन दिवसाची रजा टाकली आहे ...
का?
का म्हणजे तुला बरं नाही आहे म्हणून ...
अहो मी बरी आहे एकदम सुट्टी वगैरे काय...
हे बघ तुझा ताप कमी झाला पूर्णपणे निघालेला नाही आहे ,तू आत जाऊन पड.... सगळी कामे मी करतो आणि कधी काही लागलं तर बाबा आहेत माझ्या मदतीला...

काय हो बाबा, करणार ना मदत...
हो हो नक्की ...दोघेही हसतात..
दोन दिवस झालेत माधवीच्या अंगातला ताप निघाला नव्हता औषधाचा डोसही पूर्ण झाला, श्रीकांत पुन्हा तिला दवाखान्यात घेऊन जातो डॉक्टर चेक करतात काही टेस्ट करायला सांगतात ....डॉक्टरच विचारात पडतो  की हिचा ताप उतरत का नाही आहे .....

हे बघा, मी पुन्हा तीन दिवसाचा डोस देतो, रिपोर्ट नॉर्मल आहेत ,,तीन दिवसात जर ताप उतरला नाही तर बघू मग समोर काय करायचं ते..... दोघे घरी येतात ....

ही सहज म्हणून बालकनीत जाते तर हिला पुन्हा तिथे त्या काकू बसलेल्या दिसतात... माधवी चक्कर येऊन पडते तो तीला दोन्ही हातानी उचलून रूम मध्ये घेऊन जातो आणि डॉक्टरांना फोन करतो डॉक्टर चेक करून इंजेक्शन लावतात ,,,थोडा विकनेस आला आहे त्यामुळे चक्कर आली असेल काळजी करण्यासारखे काही नाही.....

तिच्या फोनवर एक फोन येतो, श्रीकांत उचलतो (पलीकडचा आवाज )

हॅलो... मी गौरी बोलते... माधवी आहे का?
हो आहे.... पण ती जरा आराम करते, तिला बरं नाही....

बरं नाही म्हणजे? काय झालं?
तीन दिवसांपासून ताप उतरत नाहीये तिचा....
अरे बापरे ; तुम्ही तुमचा ऍड्रेस देता का? मी येते तिकडे भेटायला....

हो मी मेसेज करतो या नंबर वर ....
श्रीकांत फोन ठेवतो.... कोण मिळाली हिला जीवाभावाची मैत्रीण, तब्येतीचं ऐकून भेटायला येते म्हणाली आणि तेही मुंबईत नवीन शहरात श्रीकांतला आश्चर्य वाटतं कारण माधवी कधी गौरी बद्दल बोलली नव्हती त्याच्याजवळ....

थोड्यावेळाने दाराची बेल वाजते श्रीकांत दार उघडतो....समोर लॅगीन- टॉप घातलेली, केस मोकळे असलेले ,थोडी मॉडल मुलगी उभी असते...

हॅलो मी गौरी ...मी थोड्या वेळापूर्वी फोन केलेला..

ओ.. हाय... याना आत
माधवी ?
हो , आहे ना, रूम मध्ये आहे.... या....

माधवी गौरी आली आहे, गौरी .....ति इथे कशी...

तूच बोल.. मी येतो...  गौरी तू इथे?..

हो ,मगाशी सहजच म्हणून तुझ्या मोबाईलवर कॉल केला तर कळलं तुझी तब्येत बरी नाही, काय गं काय झालं...ती
काही बोलणार इतक्यात श्रीकांत.... चक्कर येऊन पडली बालकनीत .... गौरी कडे बघून हे घ्या पाणी...

बालकणीत? गौरी आश्चर्याने
श्रीकांत जातो ..
काही नाही जरा ताप होता पण तीन दिवस झाले उतरला नाही आहे, सगळ्या टेस्ट ही करून झाल्या सगळं नॉर्मल आहे.... तीन दिवसांनी बघू....
"ही चक्कर ची काय भानगड आहे?".....

अंग मी सहज म्हणून बालकनीत गेले तर मला पुन्हा त्या काकू दिसल्या त्यानंतर काय झालं माहिती नाही जेव्हा जाग आली तेव्हा मी बेडवर होते...

आता हे सिरीयस होत चाललय माधवी.. आपल्याला काहीतरी करायला हवं... कुणाशी तरी बोलायला हवं...

कोणाशी बोलणार सगळे वेडे ठरवतील आपल्याला ....

नाही ,,बघू आपण काय करायचं .. तू आराम कर, तू पूर्णपणे बरी झालीस की मग आपण यावर विचार करू....
कारण हे खूप भयानक आहे आणि हे फक्त तुझ्या बाबतीत घडतं, काहीतरी करायलाच हव...

तू आराम कर,मी निघते, काही लागलं तर फोन कर मला, बाय....

काय ग ही कोण मैत्रीण आणि तेही इकडे......
मॉल मध्ये भेटली मला,जेव्हा तुम्ही मला टाकून गेला होतात न तेव्हा.... असं म्हणून दोघेही हसतात..... अ. ..छान आहे तुझी मैत्रीण ....

अ... मी आहे म्हटलं इथे अजून.... खूप दिवसांनी दोघे असे एकमेकासोबत हसतात..

माधवीला खरच खूप बरं वाटतं श्रीकांत तिची काळजी घेतोय,  त्याच्या मनात तिच्याबद्दल थोडं का होईना पण "softcorner" आहे या विचाराने तिला खूप समाधान मिळाल....

क्रमशः

🎭 Series Post

View all