पुढचं पाऊल... पर्व 2 रे, भाग 6

Kharedi karun nighehi nighale... asisaheb ghari gelya ani abhinavne madhvi la ghari sodal...

पुढचं पाऊल पर्व  2 रे
भाग 6
आधीच्या भागात ,
आईसाहेब आणि अभिनव माधवीसाठी खरेदी करायला गेले,   माधवी ही तिथे आली...... माधवीने एक छान  वेस्टन वन पीस घालून बघितला त्यावर ती अगदी परीसारखी दिसत होती... अभिनव तर माधवीकडे बघतच राहिला......

आता पुढे,

खरेदी करून तीघेही निघाले.... आई साहेब घरी गेल्या आणि अभिनवने माधवीला घरी सोडलं..... पंधरा-वीस दिवस असेच गेले, रोज भेटणं... बोलणं... हा रोजचाच नित्यक्रम असायचा.... काही दिवसांनी अभिनव आणि माधवीच्या साखरपुड्याची तारीख ठरली....आईसाहेब आणि माधवीचे सासरे यांनी पंडित कडुन साखरपुड्याचा मुहूर्त काढला, पंधरा दिवसानंतर ची तारीख ठरली श्रीकांतला माधवीच्या साखरपुड्याचे कळलं तेव्हा तो संतापला कारण त्याला माधवीचं काही भलं होऊ द्यायचं नव्हतं.... त्यानी अभिनव चे घर गाठलं आणि आईसाहेबांच्या मनात माधवी बद्दल काही नकारात्मक गोष्टी सांगितल्या, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले... पण आईसाहेबांना माधवी बद्दल अभिनव कडून सगळच कळलं होतं त्यामुळे त्यांनी श्रीकांत वर विश्वास नाही ठेवला, त्याला घरातून धुळकावून लावलं..... पण श्रीकांत गप्प बसन्यारातला नव्हता तो काही ना काही घोळ घालणारच.....

" बघतो असा कसा हा साखरपुडा होतोय..." श्रीकांत मनातल्यामनात पुटपुटला .....

साखरपुड्याची तयारी सुरू झाली... ज्वेलरी ,कपडे सगळ्यांची यादी तयार करून घेतली होती आईसाहेबांनी.... माधवी साठी हार्टशेप डायमंड रिंग बनवून घेतली, अभिनव साठी सुद्धा आईसाहेबांनी रिंग बनवली... माधवीच्या सासर्‍यांची डायमंड रिंग पर्यंत मजल नव्हती त्यांनी जमेल तेवढे पैसे पुरवले पण स्टेटसला शोभाव म्हणून आईसाहेबांनी दोघांसाठीही डायमंड रिंग बनवून घेतल्या......

ऑफ ब्लू कलरचा  लाचा माधवीसाठी आणि त्याच मॅचिंग कलरची शेरवानी अभिनव साठी सिलेक्ट केली.....छोट्या छोट्या सगळ्या बारीकसारीक वस्तूंची नीट तयारी करून ठेवलेली, माधवीसाठी लाच्या वरच्या बँगल्स, ज्वेलरी ,नेकलेस आणि अभिनव साठी शेरवानी त्याला मॅचींग मोची इत्यादी सगळी खरेदी करून ठेवली.... साखरपुड्याच्या आदल्या दिवशीच मधु आणि तिचे सासरे अभिनव कडे गेले तिथेच मेहंदीचा कार्यक्रम झाला साखरपुडा चा दिवस उजाडला, सकाळी तिचे आई-बाबा गावावरून आले ते डायरेक्ट अभिनवच्या घरी.... सकाळपासून घरात तयारी सुरू झाली, सजावट पाहुण्यांची लगबग सगळं घर रोषणाईने उजळून निघालं
होतं...... पाहुणे आले , पंडितजी आले थोड्यावेळाने माधवीची एन्ट्री झाली ,असं वाटलं जणू रेड कार्पेट वरून एखादी महाराणी चालतेय, खूप छान दिसत होती माधवी.... दुसऱ्या बाजूने अभिनव आला, दोघे एखाद्या पिक्चर मधील हीरो हीरोइन सारखे दिसत होते ....कार्यक्रम सुरू झाला , पाहुणे मंडळीच येणं सुरु होत...

पाहुण्यांच्या मागे लपत छपत श्रीकांत घुसला,  माधवीच्या आई-बाबांचं लक्ष गेलं आणि त्यांनी त्याला तिथून हाकलून लावलं तरी बाहेर जाऊन त्याने तमाशा केल वॉचमनने त्याला धक्के मारून हाकलून लावलं...

माधवी आणि अभिनवने एकमेकाला डायमंड रिंग घातले आणि साखरपुडा संपन्न झाला, सगळे विधी पार पडले सगळे पाहुणे मंडळीनी माधवीच खूप कौतुक केलं .....माधवीचा दिवस खूप छान गेला तिच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय दिवस होता ....

घरी आल्यानंतर माधवीला राहावलं नाही तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघडले ,आई-बाबांना खूप आनंद झाला आता आपली मुलगी सुखी होणार या विचाराने तेही सुखावले , श्रीपतराव यांच्या डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं.....

रात्री माधवी आईच्या कुशीत जाऊन झोपली ....

"खुश आहेस ना बाळा ...."

" हो ग आई,अभिनव खरंच खूप चांगला आहे ....

हो ग,  दिसतोय तो..

पण मधु बेटा, तू श्रीकांतच्या जरा लांबच राहा, काही न काही खुसपट काढेलच तो, आज आला होता साखरपुडा च्या वेळी ......

माधवी चकित होऊन, काय ?..कधी?..

"आला होता तुझ्या बाबांच आणि माझे लक्ष गेले आणि आम्ही त्याला हाकलून लावलं बाहेर जाऊन पुन्हा तमाशा केला म्हणून मग वॉचमननी हाकलून लावलं .....तू जरा त्यांच्यापासून लांबच राहा...

" आई तू काळजी करू नकोस, अभिनव आहे माझ्यासोबत.... तो असल्यावर मला कशाची चिंता नाही आहे.....

आईच्या चेहऱ्याकडे बघून माधवी,
" नको करूस ग काळजी,.... काय झालं??.अस्वस्थ का झालीस...?

" आम्ही तुझ्या जिवनाच वाटोळं केलं होतं ग , आमच्यामुळे तुझ्या जीवनात दुःख आली होती तुझं लग्न लावण्याचे मोठं पाप आमच्याकडून घडलं ....."

"आई , हे काय बोलतेस....?

" हो ग मला आणि तुझ्या  बाबांना खूप अपराधी वाटतं...


" प्लीज,  असं काही नाहीये ग ....माझ्या नशिबात जे होतं ते झालं आणि आता सगळंच छान होणार आहे कारण आता माझ्या आयुष्यात माझ्यावर खूप प्रेम करणारी व्यक्ती आहे, तू काळजी करू नकोस.......


क्रमशः
©® ऋतुजा वैरागडकर
10-11-2020

🎭 Series Post

View all