पुढचं पाऊल... पर्व 2 रे भाग 5

Madhvi tichya office chya maitrini sobat maternity hospital la jate

पुढचं पाऊल...

पर्व 2 रे भाग 5

आधीच्या भागात ,
आईसाहेब माधवीला न कळवता तिच्या घरी येतात माधवी ला थोडे आश्चर्य वाटते.... आईसाहेब माधवीला लग्न झाल्यानंतर तुझ्या बाबांचं काय ? असा प्रश्‍न करतात....माधवी काही बोलणार तेवढ्यात माधवी ला सुचवतात की लग्नानंतर तिचे बाबा तिच्या सोबतच राहतील आणि हा अभिनव चा निर्णय आहे..... माधवी खूप खुश होते आणि अभिनव ला फोन करून थँक्यू थँक्यू आय लव यू बोलून जाते अभिनव काहीच न बोलता फक्त ऐकत असतो ......

आता पुढे,

माधवी तिच्या ऑफिसच्या मैत्रिणीसोबत मॅटर्निटी हॉस्पिटल ला जाते माधवीच्या मैत्रिणीला मंथली चेकअप करायचं असतं,  दोघीही दुपारी 1- 2 च्या दरम्यान हॉस्पिटलला पोहोचतात चेकअप करून परतणार तेवढ्यात तिला श्रीकांत दिसतो ....तो न बघण्याचं नाटक करून समोर जातो पण मागेहून मोना येते माधवीच्या डोळ्याला डोळा लागतो पटकन आपली नजर खाली झुकवते...

" काय ग, इथे काय करतेस?...
काही नाही.....

"काही नाही..?.अग हे मॅटर्निटी हॉस्पिटल येथे फक्त लग्न झालेल्या बाया येतात तुझं तर अजून लग्नही झालेलं नाही आहे...... का स्वतःच्या जीवाशी खेळतेस?  स्वतःचा नाहीतर फॅमिलीचा तर विचार कर..... जो व्यक्ती आपल्या लग्न झालेल्या बायकोला सोडू शकतो तो तुला कधीही सोडू शकतो......

" हे बघ, हा आमचा पर्सनल मॅटर आहे.... तू यात पडू नकोस....

" मी पडणारच नाही आहे, मला काही गरज नाही आहे, अनुभवाचे बोल म्हणून बोलले ......

दोघीही तिथून निघून जातात, मोनाला श्रीकांतपासून दिवस गेलेले असतात आणि अबोरशन साठी हॉस्पिटलला आलेली असते....

माधवी घरी येऊन , फ्रेश होऊन स्वयंपाक तयार करते.... दारावरची बेल वाजते ती दार उघडते तर समोर श्रीकांत.....

" तुम्ही...?  तुम्ही इथे का आलात ...

" हे घे, पेढे घे.... श्रीकांत बोलला.... तो नशेत होता, उभा असताना गलंडत होता ....

"कसले पेढे....?

" मी बाप होणार आहे, मोनाच्या बाळाचा बाप .....

माधवी: " निर्लज्जपणाची हद्द झाली , तुम्हाला मला इथे येऊन सांगायची लाजही वाटत नाही....

" लाज कसली...? मी बाप होणार आहे.....

तुम्ही बाप व्हा, नाहीतर अजून काही..…मला काय,  तुम्ही इकडे पेढे घेऊन आलात आणि तिकडे मोना अबोर्शन करायला गेली,  जा इथन..... माधवीने त्याला हातांनी झटकुन धाडकन त्याच्या तोंडावर दार लावला..... किचन पर्यंत जात नाही तर पुन्हा दारावरची बेल वाजते .....माधवी न बघता ओरडायला लागते....

" तुम्हाला सांगितलं ना आता, मला तुमचे पेढे नकोत, आता पुन्हा येऊ नका.....

" अग मधु काय झालंय.....?
मान वरती करून बघते तर समोर अभिनव ...

"अरे अभी, तू..... मला वाटलं.....(माधवी बोलता बोलता थांबली)  ....
"काय वाटलं .....?

"काही नाही, जाऊ दे...., तू ये ना .....

अभि आत येतो....

" तू इथे कसा .....? तू तर घरी निघाला होतास ना.....

" हो म्हंटल एकदा तुझी विचारपूस करावी , तू आज हॉस्पिटल ला गेली होतीस ना नयना सोबत (ऑफिस कलीग) काय झालं...... बरं आहे ना तिला .....


"सगळे व्यवस्थित आहे..... तू चहा घेणार....
"हो....

" ओके ,तू बस ....मी आणते ....

"बाबा दिसत नाही .....

"ते खाली बागेत गेलेत.....

" अरे वा....म्हणत अभिनव माधावीच्या मागे मागे किचनमध्ये जातो..... पाठीवर पसरलेले मधूचे केस हळूच बाजूला करतो आणि पुन्हा जवळीक साधतो...

" काय करतोस ?

"काही नाही..... बायकोवर प्रेम करतो.....

" बायको...?बायको व्हायची आहे म्हटल मी .....

"पण होणार ना.....

" त्याला वेळ आहे ....तु जा हॉल मध्ये, मी येते....

दोघांच्याही चहा आणि मस्त गप्पा होतात... अभिनव निघतो...
दोन-तीन दिवसांनी मोना श्रीकांतला काहीही न सांगता अबोरशन करून येते, श्रीकांतला कळत तेव्हा तो थोडा राडा करतो पण मोना त्याला समजावते .....त्यालाही ते नकोच होत पण तो बोलू शकत नव्हता, ओबोरशन च एकूण नंतर तो खुश झाला कारण त्यालाही ते नको होतं जाणून बुजून माधवीला त्रास व्हावा म्हणून तो पेढे घेऊन गेला होता,   पण माधवी ला आता काहीच फरक पडत नाही,  ते काहीही करोत ती अभिनय सोबत खुश आहे.......

दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने आईसाहेबांनी माधवीसाठी निरोप पाठवला की आज खरेदीला जायचंय, गाडी पाठवली आहे ,  तयार होऊन निघ.....माधवी पटापट तयार होते आणि निघते.... काही किलोमीटर अंतर जाऊन गाडी  मोठया शोरूम समोर येऊन थांबते.... माधवी आत जाते सेकंड फ्लोअर वर.....

आई आणि अभिनव माधावीची वाट पहात बसले होते माधवी साठी खरेदी करायला सगळे जमले होते...

" आई साहेब , नमस्कार करते.... हे काय आता कुठली खरेदी....?

" तुझ्यासाठीच खरेदी करायला आलोय....

" माझ्यासाठी पण आता का...?
" अगं काही नाही, छान छान ड्रेस घे तू, तुला ऑफिसला जायला लागतात ना.....

" पण आहे साहेब आहेत माझ्याकडे पुष्कळ ड्रेसेस ....

"ते असतील ग पण आता आमच्या घराण्याची सून होणार आहेस मग तुला त्याचं स्टेटस मध्ये राहावे लागेल नाही का.... काही ऑफिस मध्ये घालायला घे आणि काही पार्टी वेअर ड्रेस घे..... ड्रेस बघणं सुरू झालं.... माधवीने एक पार्टी वेअर ड्रेस ट्राय केला त्या ड्रेस मध्ये माधवी परी दिसत होती,  ड्रेस घालून आली तर अभिनव डोळे फाडुन  पहातच राहिला ....आई साहेबांचे पण डोळे विस्फारले.....

क्रमश:

🎭 Series Post

View all