पुढचं पाऊल... भाग4

Aaj pahilyanda shrikant madhavi la ho rani as bolala ya adhi sadh madhavi ashi suddha hak kadhi marali nahi

( आधीच्या भागात, माधवीने फुल शेती करून अडीच लाख रुपये  श्रीकांत च्या अकाउंट मध्ये  जमा केले होते आणि पहिल्यांदा श्रीकांतने  माधुरीला फोन केला, सगळं बोलणं करून झाल्यानंतर तिला विचारलं ,"तुझ्यासाठी काय आणू?

माधवी:-"खुप सारे प्रेम"

"हो रानी" हे  एकत्याच माधवीला अश्रू उघडले...)

आता पुढे,

 आज पहिल्यांदा श्रीकांत माधवीला हो राणी"असं बोलला या आधी साध माधवी अशीसुद्धा हाक कधी मारली नाही .त्यामुळे हो राणी हे शब्द तिच्या कानात खूप वेळ गुंजत राहिले ...चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले होते ,बाजूला बाबा उभे होते बाबांना कळलं तिच्या मनातलं, पोरीच्या चेहऱ्यावर हसू आलं असं ते स्वतः एकटे पुुटपुटल.. आणी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला ...

लग्नानंतरचा  हा पहिला दिवस तिचा सुखाचा गेला... बाबा ,माधवी आणि नलू  तिघांनीही रात्रीचे जेवण केले आणि झोपले... कित्येक दिवसांनंतर माधवीने  आज शांत झोप घेतली. दुसऱ्या दिवशी बाबांना वैद्य कडे न्यायचे होते, नलू सकाळी गावाला निघून गेली, माधवी आणि बाबा वैद्याकडे गेले, आता बाबांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा व्हायला लागली.… गावाकडचं घर जप्त झाल्यामुळे आता माधवी  आणि बाबांनी शेतातल्या घरात राहण्याचा निर्णय घेतला .....

नलू मधात भेटायला यायची, आता कुठे माधवीचे जीवनात बरे दिवस आले होते .... तिकडे श्रीकांतही मन लावून काम करू लागला.... एक दोन दिवसाआड माधवीला फोन करून तिची विचारपूस करायचाा.. तिलाही बरे वाटायचे....

माधवी नि आता बाराही महिने शेती करण्याचा निर्णय घेतला .. बाजारातून शेती विषयक पुस्तकं आणून त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली....

कोणत्या मास ला कशाची शेती करायची,  कोणते पीक पिकवायचे ,रासायनिक खते इत्यादीचा अभ्यास सुरू केला. जोडीला श्रीपतराव होतेच.. माधवीला फोन करण्याची परमिशन मिळाली, तिने लगेच माहेरी फोन केला... फोन करून सगळं आई बाबांना सांगितलं.... आई-बाबा खूप खुश झाले लेकीचा आवाज ऐकून त्यांनाही गहिवरुन आले.... व्हिडिओकॉल असल्यामुळे एकमेकांचे चेहरे पाहून मायलेकी दोघीही ही ढसाढसा रडल्या....

माधवीला मन हलके झाल्यासारखे वाटले ....माधवीला स्वतःलाच स्वतःचा खूप अभिमान वाटत होता, तशी बाबांची जोड होती तिला.... असेच काही दिवस निघून गेले... माधवी ला आता श्रीकांत ची आठवण येेत होती, 

म्हणजे तस तिला बोलावसं वाटत होतं....

इकडे मात्र श्रीकांतच भलतच सुरू होत.... 

माधवी स्वप्न रंगवू लागली...  त्याच्यावर प्रेम करू लागली.... स्वप्नचा चुराडा होणार होता हे नक्‍की...

🎭 Series Post

View all