पुढचं पाऊल...भाग3

Baba, amache baba ek pramanik adhikari hote. tyamule pagara vyatirikt ekahi paisa kadhi gharat aala nahi.

बाबा, आमचे बाबा एक प्रामाणिक अधिकारी होते. त्यामुळे पगारा व्यतिरिक्त एकही पैसा कधी घरात आला नाही. रिटायर्ड झाल्यावर मिळलेली बरीचशी रक्कम आईच्या आजारपणात संपली. खरंतर माझी या लग्नाला पसंती नव्हती पण बाबांना हे स्थळ घालवायचे नव्हते म्हणून ते हुंडा कबूल करून बसले. मी शपथ घातलीय म्हणून नाहीतर त्यांनी राहते घर विकायला काढले होते."

" नको पोरी, आपले घर गमावण्याचे दुखः मी भोगतोय. ते तुझ्या आई बाबांच्या नशिबी नको."

" बाबा हे मुंबईला का गेलेत?"

" नोकरी."

" बाबा, कधी कधी वाटते ,मी आपल्या घरात कोण आहे? तुम्ही बेटी बोलता म्हणून तरी बरं. नाहीतर मी विचार करून मेले असते."

" भरल्या घरात मरणाच्या वार्ता नको पोरी, श्रीकांतने तुला मुंबईला जाताना सांगायला हवं होते. तसं मी त्याला म्हणालो देखील. पण त्याचा तुझा आणि तुझ्या बाबांवरचा राग तसाच आहे. खरंतर त्याला मुंबईत नोकरी करणे आवडत नाही पण या सगळ्याला कारणीभूत तुम्हाला समजतो. तसा तो वाईट नाहीये गं. "

" बाबा कारणीभूत हुंडा पद्धत आहे. त्याने कित्येक संसारांची वाट लावलीय."

" खरं आहे पोरी, पण पुढाकार कोण घेणार? झोपं आता रात्र खूप झालींय".
श्रीपतराव माधवीला असे म्हणाले खरे पण तिला झोप काही येत नव्हती. तिच्या मनात चालेलेले विचार फिरून येणाऱ्या पाखरासारखे पुन्हा पुन्हा येत होते. रात्री खूप उशीरा तिचा डोळा लागला. पहाटे तिला एक स्वप्न पडले. खरंतर ते छान होतं. ती सकाळी उशीरापर्यंत तशीच झोपून राहीली. स्वयंपाक घरातील भांड्याच्या आवाजाने तिने जाग आली. ती लगबगीने उठली. सासरे चहाचे भांडे चुलीवर ठेवत होते.

" बाबा राहूद्या, मी करते. " असे बोलून ती कामाला लागली.

" अगं तुला गाढ झोपलेले पाहून उठवले नाही. मी समजू शकतो. रात्री झोप झाली नसेल."

" बाबा, मला पहाटे एक स्वप्न पडले की आपली ही जमीन फुलझाडांनी भरून गेलीय आणि दूरवर आपला ट्रॅक्टर उभा दिसतोय."

" माधवी, तुमचे स्वप्न खरे होणार आहे. तूमच्या वावरात खरंच फुलं फुलणार आहेत. मला शेती करायची खूप इच्छा आहे. आपण या दीडएकरात भागीदारीमध्ये फुल शेती करू. मार्केटची चिंता नको. माझा चुलत मामा सर्व माल घेईल." नलू एका दमात म्हणाली.

" अगं पण?" माधवी श्रीपतरावांकडे पाहत म्हणाली.

त्यांचा चेहरा काळवंडून गेला होता. त्यांना नलूची गोष्ट फारशी रूचली नसावी.

" पण बिन काही नाही."

" हे सर्व श्रीकांतला नाही आवडणार."

" का? एवढी सोन्यासारखी जमीन असताना त्यांनी मुंबईला जाता नये होतं.. " माधवी म्हणाली.

" खरं आहे, पण त्याची आई याच शेतात सर्प दंशाने गेली. तेव्हापासून त्याने शेती करायला बंदी केलीय. " नलू आणि माधवी श्रीपतरावांकडे पाहत राहील्या. माधवीला खूप वाईट वाटले. पण आपल्या कुटुंबाला सावरायचे असेल तर काहीतरी करायलाच हवं होतं.

माधवीने श्रीपतरावांकडून कशीबशी परवानगी घेऊन फुलशेती करायला सुरूवात केली. भांडवल आणि शेतकी शिक्षण घेतलेल्या नलूचे निर्णय अचूक ठरले. फुलीशेतीसोबत घेतलेले आंतरपीक फायदा करून गेले. त्यात माधवीचे कष्ट आणि मेहनत ही होतीच .
श्रीकांत वर्ष होत आले तरी गावी आला नव्हता. तो ही आपले घर सोडवायच्या इराद्याने काम करत होता. एक दिवस बँक त्याच्या खात्यात अडीच लाख रूपये जमा झाल्यावर तो हडबडला. त्याने लगेच बँकेकडे धाव घेतली. तिथे त्याला कळले कि ते पैसे त्याच्याच बायकोने म्हणजे माधवीने जमा केले होते. त्याने ताबोडतोब आपल्या बाबांना फोन लावला. बाबांशी बोलून झाल्यावर त्याने पहिल्यांदाच माधवीकडे फोन द्यायला सांगितले त्याचा फोन घेताना ती मोहरली. कानावरून मोरपीस फिरावे तसा फोनचा स्पर्श वाटला. पहिल्यांदाच तिची श्रीकांत दखल घेत होता.

"माधवी पैसे तू जमा केलेस?" त्याच्या या वाक्याने ती निराश झाली. तिला वाटले तो तिला 'कशी आहेस? असं विचारेल.

" हो."

" कुठून आणलेस?"

ती गप्पच.

"अगं मी काय विचारतोय."

तरीही ती गप्पच.

" आमच्या सारखे तुझ्या बाबांनी घर तर गहाण ठेवले नाही ना, तसं असेल तर मला हुंडा नकोय."

" मी हा हुंडा दिला नाहीये आणि बाबांनीही तसं काही  केलेले नाहीये. ज्या मातीत आईंचा प्राण गेला त्या मातीने आपले कर्ज फेडलंय."

" म्हणजे ?" प्रतिक्रियेचे तिला आश्चर्य वाटले.

" माधवी मी काहीतरी म्हणालोय."

" हं."

" तुझ्यासाठी काय आणू?

" खूप सारे प्रेम." तिचा कंठ दाटून आला होता.

" हो राणी." हे ऐकल्यावर माधवीच्या स्मितहास्ययावर        अश्रु ओघळले ...

🎭 Series Post

View all