पुढचं पाऊल.... भाग 9

Aai apan ghari jau, as mhanat madhavi ani sarvjan taxi pakdun ghari yetat... fresh hotat ani shrikant chi wat pahat bastat....

आई आपण घरी जाऊ, असं म्हणत माधवी आणि सर्वजण टॅक्सी पकडून घरी येतात... फ्रेश होतात आणि श्रीकांतची वाट पाहत बसतात.....
दुपारची संध्याकाळ झाली पण अजून श्रीकांतचा काही पत्ता नाही,त्याचा फोनही लागत नव्हता..... श्रीकांत अजून ही मॉल मधेच होता, त्याचा हात खेचणारी दुसरी तिसरी कुणी नसून त्याची गर्लफ्रेंड मोना होती.....

सुंदर ,डॅशिंग, हॉट, मोकळे केस, डोळ्यावर गॉगल, छोटे छोटे कपडे,हॉट पॅन्ट अशी बोल्ड दिसणारी मोना श्रीकांत ला आवडायची...

काही महिन्यांपूर्वी, याच मॉलमध्ये श्रीकांत आणि मोनाची भेट झाली,, भेट नाही म्हणता येणार म्हणजे दोघेही एकमेकाला धडकले होते, आणि सॉरी सॉरी म्हणत "लव एट फर्स्ट साईड" डोळ्यात डोळे टाकून बघण वगैरे झालं, त्यानंतर दोघेही आपापले निघून गेले, नंतर एक दिवस अनावधानाने पुन्हा त्यांची भेट झाली ते ही एका कॉफी शॉप मध्ये.....

हे..... हाय.... हँडसम, मी मोना
तुझं नाव.....

मी श्रीकांत....( कॉफीटेबल कडे बघून)

ओके, कॅन आय जॉईन यु.....
हो... हो... याना बसा
तुम्ही मला अहोजाहो करू नका फक्त मोना म्हणा...
मोना... ओके आणि मी पण तुम्हच लॉंग नाव घेणार नाही ओन्ली श्री ..….ये श्री असंच म्हणणार, चालेल ना तुला

हो, का नाही असं म्हणत दोघेही चेअर बसले, इतकी सुंदर मुलगी स्वतःहून आपल्याशी बोलतीये या विचाराने श्रीकांत खूप खुश होता...
काय करतोस तू श्री..
मी एका कंपनीत एम्प्लॉयी आहे आणि तुम्ही... सॉरी तू..

नाही मी काहीच करत नाही म्हणजे मी आधी एका कंपनीत जॉब करत होते पण सध्या मी तो जॉब सोडला मी दुसरीकडे ट्राय करतीय....

ओह ओके..
अस जनरल दोघांचं बोलणं होतं, दोघे एकमेकांना मोबाईल नंबर देतात एकमेकांचा निरोप घेतात आणि निघतात, त्याच रात्री मोना श्रीकांतला फोन करते,
हाय हेलो पासून सुरुवात होते दोघे एकमेकांबद्दल विचारपूस करतात जवळपास रोजच अस मोबाईल वर बोलणं व्हायचं...... आधी दोन-चार दिवसातून भेट व्हायची, आता तर रोजच भेटतात ....ती रात्री रात्री त्याच्या घरी यायची दोन महिन्यापासून हे सुरू होतं ,(आता तुम्हाला विचार पडला असेल की,ही याच्या घरी रात्री रात्री येते तर हिला टोकणार कुणी नाही का , तर ही जॉब च्या निमित्ताने इथे रूम करून एकटीच राहते).….
आणि आजही हेच झालं तिने श्रीकांतला मॉलमध्ये पाहिल आणि त्याला खेचलं स्वताकडे...

मोना...... मोना... हात सोड माझा, काय सुरू आहे ,
तू माझा फोन का नाही उचलला....

नाही ग मोना, माझे बाबा आले आहेत आणि काही नातेवाईक सुद्धा त्यामुळे आता मी तुला जास्त भेटू शकणार नाही...
ती कोण होती?
ती... कोण ती...?
जिच्यासोबत तु मॉल मध्ये आला होतास...
ती... ती माझी चुलत बहीण आहे....
(मोना स्मित हास्य करून) चुलत बहिणीला ला घेऊन आला होतास....
ड्रेस घ्यायचा होता म्हणून घेऊन आलो, तू निघ आता मला निघायचं .सगळे वाट बघत असतील ,जाशील रे एवढी काय घाई आहे ,असं म्हणत ती त्याला सरळ तिच्या घरी घेऊन जाते, तिथे एकमेकांसोबत दोघे वेळ घालवतात, दोघेही ड्रिंक करतात त्याला तिथे झोप लागते आणि तो झोपतो, जेव्हा जाग येते तेव्हा रात्र झालेली असते...

बापरे ......किती वाजलेत ....
अगं बाहेर अंधार झालाय....

नऊ वाजलेत.... नऊ...
तु मला उठवलं का नाही... माझ्याकडे पाहुणे आले आहेत, आता जाम राडा होणार...
एवढा काय घाबरतोस रे ....

घाबरत नाही ग...पण आता सगळ सांभाळून घ्यावं लागतं, चल मी निघतो...असं म्हणत तो निघाला,
इकडे माधवी ,आई-बाबा सगळे काळजी करत बसले होते माधवीचा तर विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली,जीव रडवेला झाला होता तितक्यात दारावरची बेल वाजते ती धावत जाऊन दार उघडते..
समोर श्रीकांत उभा... कुठे होतात, कुठे गेला होतात, तुम्ही मॉलमधून कुठे गेला होतात,अहो बोला दुपारची रात्र झाली कुठे होतात तुम्ही इतका वेळ, श्रीकांत चूप ....
तो काहीच बोलला नाही...

माधवी जरा शांत बसु दे त्यांना...
प्रश्नाचा भडिमार करू नकोस ....असं म्हणत आईनी माधावीला चूप केलं ...
जावईबापू तुम्ही बसा... पाणी दे ग त्यांना...

आई, आपण गप्प बसायचं का काहीच विचारायचं नाही का?
"मी फ्रेश होऊन येतो" असा म्हणत श्रीकांत रूम मध्ये निघून गेला, फ्रेश होऊन झोपला ,रात्रभर कोणी शांत झोपले नाही...
सकाळी उठून माधवी कामाला लागली , श्रीकांतच ऑफिस होतं, सकाळी उठून डबा बनवला ...श्रीकांत तयार होतो, ती चहा नाश्ता देते ...

"हे सगळं करायची गरज नाही आहे, मला याची सवय नाही, मी रोज बाहेरच खातो"

आतापर्यंत ठीक होतं, पण आता मी आले आहे, रोज सगळं मीच बनवून देणार ..
चहा पिता पिता त्याला ठसका लागला ...
अहो...सांभाळून..
रोज हा शब्द कानावर पडला आणि श्रीकांतची धडधड सुरू झाली, नेहमीकरता इकडे आली नसेल ना, असे विचार त्याच्या मनात  सुरू झाले...
अहो, नाश्ता करताय ना ...
हो ...करतो ना... असं म्हणत तो फटाफट फटाफट नाश्ता करतो आणि ऑफिसला निघतो ...

"आई यांनी काल काही सांगितले नाही ,तू का अडवलं मला "
थांब जरा त्यांच्या कलेने होऊ दे ,जास्त त्यांच्या मागे लागली तर हातचे जातील.

ते कुठे गेले होते हे आपल्याला माहिती असायला नको? नक्की हे तिच्याकडे गेले असतील आई, आपण काळजी करायची नाही का?
थांब जरा, धीर धर आणि घाई करू नको त्यांना जर संशय आला तर आपल्याला काहीच माहिती मिळणार नाही ते अलर्ट होतील ....
संध्याकाळी श्रीकांत ऑफिस मधून निघतो, रस्त्यात त्याला मोना गाठते.
हाय... श्री.…
हाय.. बेबी...
कॉफी शॉप ला जाऊया...
नाही ग आज लवकर जाऊ दे, काल तसाही खूप उशीर झाल्यामुळे बाबाच्या ओरडले,आज उशीर व्हायला नको चल मी निघतो.. बाय....
तिथून निघतो...

घरी आला, माधवीनी दरवाजा उघडला, तुम्ही आलात, फ्रेश व्हा मी चहा टाकते...
हो ठीक आहे, मी येतो....
श्रीकांत फ्रेश होऊन येतो.….
श्रीकांत कसं चाललंय तुझं काम?...
छान चाललय  बाबा...
ऑफिस मध्ये सर्व कसे आहेत ,सर्व ठीक आहे ना..
हो बाबा, सर्व ठीक आहे..

काय रे पगार वगैरे देत नाही का तुझ्या ऑफिसमध्ये  बरोबर....बाबा  मिळतो ना महिन्याच्या महिन्याला...

पण का' तुम्ही असं का विचारताय ?

काही नाही रे ,गेल्या सहा महिन्यापासून तू घरी पैसे पाठवले नव्हतेस ना म्हणून विचारलं ...नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना...
सर्व ठीक आहे बाबा, त्याच्या चेहर्‍यावर घाम खूप फुटलेला ,तो विचारात पडला की आता बाबांना काय सांगायचे,बाबांना काय उत्तर द्यायचे ...
आता तो डोक्यात काहीतरी खिचडी पकवणार....

क्रमश:

🎭 Series Post

View all