Nov 30, 2022
// rablogging.com_GGINT //
प्रेम

सायको - भाग १३ (निशस्वी - राज स्पेशल )

Read Later
सायको - भाग १३ (निशस्वी - राज स्पेशल )
            मायकेल आणि त्याचे ऑफिसर्स धावतच त्या घराजवळ पोहोचले आणि त्यांनी नॉक केलं. एका तरुण बाईने दार उघडलं. समोर ऑफिसर्स उभे असलेले पाहून तिने त्यांना अदबीने आत बोलावलं. 

“सर, तुम्हाला माझ्याकडून काय मदत हवी आहे ?” 

त्या स्त्रीने नम्रपणे विचारलं. मायकेलने तिला नीट पाहिलं आणि तो पूर्ण घर फिरू लागला. त्याच्या ऑफिसर्सनी तिला सगळं समजावून सांगितलं. त्यामुळे ती ही काही बोलली नाही. घराला पेंट वगैरे नवीनच केला होता. फर्निचर पण नवीन बसवलेलं दिसत होत. ‘ती’ च्या अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा तिथे दिसत नव्हत्या. तो ऐकत होता. ती स्त्री त्याच्या ऑफिसर्सना स्युझनबद्दल सांगत होती. तिने स्युझनकडूनच हे घर विकत घेतलं होतं. मायकेलने त्या बाईचे आभार मानले आणि तो बाहेर पडला. 

“सर, आपण स्युझनबद्दल अजून शोध घ्यायला पाहिजे.” 

त्याचा एक ऑफिसर लगेच म्हणाला. 

“नाही. ती मास्टरमाईंड आहे हे नक्की. तिला आधीच माहित होत की मी तिचा शोध घेत इथे येईन. त्यामुळे तिने आधीच जागा बदलली. ती चोर नाही आहे. क्रिमिनल आहे. त्यामुळे तिचं खरं नाव स्युझन नाही आहे. ती कोणीही असू शकते पण स्युझन नसणार. आपण ह्या एरियातील सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचा प्रयत्न करूया.” 

तो त्याच्या ऑफिसर्ससहित तिथून बाहेर पडला. तिथे बाजूलाच रस्त्यावरीब चालत जाणाऱ्या रॉबर्टने तिला मेसेज केला. 

“डन !” ~ रॉबर्ट. 

_________________________________________ 

                 निशस्वी कॅबने एका पूलसाईड कॅफेजवळ आली होती. तो खूपच अलिशान आणि निसर्गरम्य कॅफे होता. निशस्वीने आत पाऊल टाकलं तसं एका व्यक्तीने तिला अभिवादन केलं. 

“गुड एव्हनिंग मॅम ! तुम्हाला कोणती सीट हवी आहे ?” 

“मला ती हवी आहे.” 

निशस्वी पूलसाईडला एकदम कोपऱ्यात असणाऱ्या एका सीटकडे इशारा करत म्हणाली.  थोडा एकांत ही मिळेल आणि नजारासुद्धा चांगला दिसेल हा तिचा उद्देश होता. पण त्या व्यक्तीने तिला ती सीट रिसर्व्ह असल्याच सांगितलं. 

“पण ती व्यक्ती इथे नाही आहे ना ? तुम्ही माझ्यासाठी मॅनेज करू शकाल का ? मला फक्त अर्धा तास घालवायचा आहे.” 

“वी कान्ट मॅम.” 

ते दिलगिरी व्यक्त करत म्हणाले.
“यु कॅन !” 

मागून एक स्टर्न आवाज त्यांच्या कानी पडला. तसं निशस्वी आणि ती व्यक्ती मागे वळले. राजला तिथे पाहून निशस्वी चकित झाली होती. 

“मिस निशस्वी, ती सीट मी रिसर्व्ह केली आहे. तुम्हाला आवडेल का मला जॉईन करायला ?” 

“नाही, नको. इट्स ओके. मला दुसरी सीटही चालेल.” 

निशस्वी हलकीशी स्माईल देत म्हणाली. 

“का नाही मिस. निशस्वी ? व्यावसायिक वैर खऱ्या आयुष्यात का आणायचं ना ? मी ही इथे स्ट्रेस्ड लाईफमधून थोडा टाईम स्पेन्ड करायलाच येतो. मी तुम्हांला सहज ऑफर करतोय. तुमची जर खरंच इतकी अडचण असेल तर असूदे.” 

               निशस्वीच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता. तो फक्त ‘एलिगंट’चा एम.डी. आहे म्हणून ती त्याला नकार देत होती का ? पण बिजनेस लाईफचा तिच्या पर्सनल आयुष्यासोबत खरंच काही संबंध नव्हता. 
“काय विचार आहे मग ? करणार आहात जॉईन ?” 

राजने तिच्या चेहऱ्यावर गोंधळ एव्हाना वाचला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक शांतपणा होता. कुठलाही क्रीपी लूक किंवा गर्व नव्हता. निशस्वीने त्याच्याकडे पाहून स्माईल दिली. 

“शुअर. थँक यु.” 

राजने तिला हातानेच पुढे चालण्याचा इशारा केला आणि दोघेही तिथे येऊन बसले. 

“काय ऑर्डर करू तुम्हाला ?” 

“अं.. काहीही चालेल. मी इथे पहिल्यांदाच येतेय. त्यामुळे तुम्ही म्हणाल ते !” 


राजने वेटरला हाक मारली आणि दोन आयरीश कॉफीची ऑर्डर दिली. ऑर्डर देऊन राज शांतपणे नजारा पाहत होता. 

“आपण बोलणार नाही आहोत का ?” 

निशस्वीने आश्चर्याने विचारलं. त्याने तिला जॉईन करायला सांगितलं म्हणजे त्याला बोलायचं असेल असं तिला वाटलं होतं. 

“नक्कीच आपण बोलू शकतो. पण तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला अर्धा तास घालवायचा आहे. त्यामुळे मला वाटलं की तुम्हाला शांतता हवी असेल. मी जॉईन करायला सांगितलंय म्हणजे मी जबरदस्ती तर नाही करणार ना की बोलूया.” 

राज हसत म्हणाला. त्याची स्माईल पाहून निशस्वीला पुन्हा एक अनोखी फीलिंग जाणवली. त्याचे विचार तिला आवडून गेले होते. 

“तुम्ही भारतीय आहात ना ? मग इथे.. म्हणजे एस.ए.मध्ये एवढी मोठी पोस्ट ?” 

“हा. माझे स्किल्स त्यांना पसंत आले होते. त्यामुळे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं होतं. पोस्टबद्दल मला नाही माहित. असेल त्यांच काही कारण.” 

“बिजनेस लाईफबद्दल माझ्यामते आपण नकोच बोलायला. तुम्ही किंवा मी सगळं एकमेकांना शेअर नाही करू शकणार.” 

“वेल, मी पण हाच विचार करत होते.” 

निशस्वी हसत म्हणाली आणि तिच्या गालावर पडलेल्या खळीकडे राजचं लक्ष वेधलं गेलं. पण त्याने स्टेअर करणं टाळलं. कदाचित तिला आवडलं नसतं. त्यांच्यासमोर त्यांची ऑर्डर आली. कॉफीचा सीप घेऊन दोघांनाही थोडं फ्रेश वाटलं. 

“इफ यु डोन्ट माईंड मी, मी विचारू शकते का तुमच्या घरी कोण कोण असतं ?” 

“हो, नक्कीच विचारू शकता. मी आणि माझी आई. माझे वडील एका अपघातामध्ये गेले.” 

“ओह.. आय अम सो सॉरी.” 

“इट्स ओके. तुमच्याहीबद्दल काहीतरी सांगा.” 

“माझ्या घरी मी, माझी आई आणि माझी एक मैत्रीण राहतो. मैत्रीण म्हणजे बहीणच म्हणा. तिचे पालक नाहीत. त्यामुळे ती लहानपणापासून माझ्यासोबत आहे आणि माझे वडील एका क्रिमिनल अटॅकमध्ये मारले गेले.” 

“सो सॉरी. पण मी तुमचं दुःख समजू शकतो. तुमच्यावर सर्व परिवाराची जबाबदारी आहे. तरी तुम्ही खूप छान हॅन्डल करताय.” 

“अगदीच असंही काही नाही. माझी आई निवृत्त शिक्षिका आहे. त्यामुळे तिची पेन्शन असतेच आणि जेनसुद्धा आईला पैसे पाठवते. शेवटी तीसुद्धा तिला आईच मानते. सो येस, वेल सेटल्ड फॅमिली.” 

“नाईस.” 

राजला मनापासून आवडलं होतं तिचं कुटुंब. निशस्वी थोडा वेळ इकडे तिकडे पाहिलं आणि ती परत राजकडे वळली. तो तिच्याचकडे पाहत होता. कॉफी तर कधीच संपली होती. 

“अर्धा तास आधीच झाला आहे. मी निघतेय.” 

“हो, मला पण घरी जायचं आहे.”
इतक्यात वेटर बिल घेऊन आला. 

“मी पे करतो, मग जाऊया.” 

“नाही, नाही. तुम्ही का पे करताय ? उलट मी पेमेंट केलं पाहिजे. रिसर्व्ह असूनसुद्धा तुम्ही मला जॉईन करायला सांगितलं.” 

“इट्स ओके डिअर. मी कधी कोणाला जॉईन करायला सांगितलं नाही. पहिल्यांदाच मी तुम्हांला सोबत बोलावलं. सो लेट मी पे. मला कंपनी मिळावी म्हणून जॉईन करायला सांगितलं होत असं समजा हवं तर.” 

राज हसत म्हणाला आणि लगेच पेमेंट करायला निघूनही गेला. निशस्वीच्या लक्षात येईपर्यंत तो काऊंटरवर पोहोचला होता. निशस्वीने आपली पर्स घेतली व ती ही काउंटरपर्यंत आली. राजने बिल ऑलरेडी पे केलं होतं. 

“तुम्ही कशा जाणार आहात ?” 

“मी कॅब बुक करणार आहे.” 

“जर तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला ड्रॉप करू का ?” 

“नाही. इट्स ओके. मी जाऊ शकते कॅबने. तुम्हांला घरी जायचं होतं ना ?” 

“हो. पण मला एक बुके घ्यायचा आहे. त्यासाठी मी पुढे जाणारच होतो. इट्स ओके जर तुम्हांला विश्वास नसेल.” 

“असं नाही आहे. ओके, मी येते तुमच्यासोबत.” 

               राजच्या चेहऱ्यावर परत तीच किलर स्माईल उमटली. तो आपल्या कारच्या दिशेने चालू लागला. ती ही त्याच्या मागोमाग चालत होती. कारमध्ये बसल्यावर त्याने तिला पत्ता विचारला. 

“स्पार्कल मून..” 

“ओह येस. मला माहित आहे ती सोसायटी.” 

“ओह.. मी विचारू शकते कसं काय ?” 

“माझा पी.ए. आणि जिवलग मित्र जय तिथेच राहतो. ‘ए’ विंगमध्ये.” 

“ओह.. नाईस. मीसुद्धा तिथेच राहते. खरं तर जेनकडेच.. ” 

“ओह..अच्छा.” 

              त्यानंतरची ड्राइव्ह तशी शांतच होती. राजने ‘स्पार्कल मुन’च्या समोर कार थांबवली. निशस्वी कारमधून खाली उतरली. 

“तुम्ही घरी येणार का ? परत एक कॉफी घेऊ.” 

“नाही नको. नंतर कधीतरी.” 

“ऑलराईट. थँक्स तुम्ही मला इथपर्यंत ड्रॉप केलं.” 

“माय प्लेजर. सी यु.” 

              राजने कार स्टार्ट केली. पण तो परत थांबला. निशस्वीही तिथेच थांबली होती. 

“मिस. निशस्वी, तुम्हांला जर मी चुकीचा वाटणार नसेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर एक्सचेंज करूया का ?” 

“शुअर.” 

निशस्वीही हसत म्हणाली. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर एक्सचेंज केले आणि राज निशस्वीचा निरोप निघून गेला. तर निशस्वी फ्लॅटच्या दिशेने चालू लागली. 

_________________________________________

क्रमशः.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now