प्रोफाइल पिक -३

Profile pic of the ex girlfriend.



प्रोफाइल पिक -३

©®स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

हैदराबादहुन परत आल्यापासून महीना  होत आला होता  , फक्त एकदाच मेसेंजर वर विशाखाशी बोलणे  झाले होते.

ऑफिसच्या नवीन ब्रांचच्या कामाने विहान खूप बिझी झाला होता .   

यादरम्यान त्यामुळे फेसबूक उघडणे झालेच नाही.  

रिकामा वेळ असेल तरच माणसाला बाकीच्या गोष्टीत  लक्ष देता येत. 

नव्या ऑफिस चे महत्वाचे काम पूर्ण झाले आणि  विहान व सहकारी मित्र थोडेसे फ्री झाले.


 त्यादिवशी संध्याकाळी  त्याला अचानक कशावरून तरी विशाखा ची आठवण आली आणि त्याच अनुषंगाने वासवीची देखिल ! कॉलेजातल्या दोन मित्रांना वगळता आणखी कुणाला वासवी प्रकरण माहित नव्हतं. सगळ्या गोष्टी तो बायकोला सांगायचा पण  ही गोष्ट आपल्या बायकोबरोबर देखील कधीच शेअर केली नव्हती.

 कुठल्या तरी चानेल वर एक गाणे ऐकून आज त्याच जुन्या आठवणीत रमायला लागला आणि सोबत पाहिलेला मन नावाचा सिनेमा आठवला. 


किती एक रूप होऊन दोघांनीही तो पाहिला होता. “काली नागिन-की जैसी जुल्फे तेरी काली काली” गाण्याची ओळ सिनेमात ऐकून तिच्या त्या लांब वेणीला पकडून डोळा मारलेला तो  एक क्षण आठवला.

 कुठे असेल? कुठे गेली असेल ? कुणाकडूनच तिचा पत्ता  लागत नव्हता.

 आज आठवणींच्या गर्दीत असताना क्षणार्धात त्याला  काही ओळी सुचल्या, थोडासा वेळ असल्या कारणाने त्यांनी पटापट लिहूनही काढल्या .

 लिहून झाल्यावर वाचून पाहिली ती मुक्त कविता , किती सुंदर व्यक्त झाला होता .

 मनात होतं ते सगळं शब्दात उतरलं होतं.

 किती दिवस झाले  काही  पोस्ट करून असा विचार करून त्याने कविता टाईप केली आणि  फेसबुक च्या वाल वर पोस्ट केली. 

त्यानंतर कुटुंबासहित संध्याकाळचा वेळ घालवला आणि रविवार च्या प्रतीक्षेत झोपला देखील.

 रविवारी सकाळची रुटीन कामे ,फॅमिली ची कामे, बाहेरची कामे झाली आणि आणि मित्रांसोबत थोडासा वेळ घालवावा असे वाटले .

 बायकोला सांगितले  मी रोहित कडे जाईल, जेवायला येणार नाही.

 ती समजून गेली.

 रोहित कडे गेल्यावर अरुण, कॉलेजला मित्र सचिन  आणि आणखी एक कलीग चौघेजण गोळा झाले. 

खाण्यासाठी बाहेरून ऑर्डर केलेले.

‘कालची कविता पहिली रे  विहान ! मस्त .” अरुण बोलला .

“नाही ना पहिली , यादरम्यान तू काहीच केलं नाहीस रे महिना झाला  विहान ! चल वाचून तरी दाखव .” रोहितचा तो ओल्या पार्टीचा सुर लागला. 

“सुनाव यार सुनाओ , इर्शाद !” सगळ्यांचा जोर लागला.  

विहानने  आपला फोन उघडला आणि हलव्या आवाजात वाचायला लागला .

 

“ पत्रिकेतल्या त्या घरांमध्ये 

सहचारिणी चे योग असतात म्हणे,

तुझी जागा नव्हतीच का  ग तिथे?

की मला ती बनवता नाही आली?


 पण तू नशिबात नाहीस असेही नाही,

सोबत नसलीस तरीही, 

आयुष्यात होतीस, आहेसच

प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, हो न !

 बर हातातल्या रेषांचं काय?

 त्यातल्या कुठल्या रेषेत तू  होतीस?

 किंवा कुठल्या रेषेमुळे तू सोबत नाहीस

 कळायला हवय ग  मला, आतातरी !


 तू आहेस कुठे तरी आहेस  आणि 

झुरतेस माझ्या साठी अजूनही,

 असं उगाच मनात वाटून घेतो

 माझं समाधान मी करून घेतो!


 तुझ्या सोबत असलेल्या दिवसांपेक्षा

आता तुझ्या नसण्याची हुरहुर

जास्त तीव्र जाणवते मला

असंच वाटतं का काही तुला?


 कळवना कधीतरी, किंवा 

प्रकट हो अचानक,आणि 

विश्वास बसू दे माझा त्या 

पत्रिकेतल्या घरांवर,हातातल्या रेषावर!”

 विहान हळवा झाला . गप्प रंगल्या . 

विहान ने सहजच फेसबुक उघडल आणि नोटीफिकेशन पहिल . विशाखाचा बदललेला डीपी !

उत्सुकता होतीच . 

फोटो पाहून त्याला गरगरायलाच झालं. 

प्रोफाइल  पिक तिचा होता, हो हिचा नव्हता, तिचा होता ! त्याला समजेना तो कुठे आहे . 

रोहितला रात्री दहाला कॉल लावला .  “रोहित त्या जी विशाखाच्या प्रोफाईल वर डीपी बघ. . . वासवीचा फोटो आहे. कॉलेजला असतानाचा. बहुतेक आपण शेवटच्या दिवशी सगळे मिळून हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे काढलेला असावा. पण तिचा फोटो हिच्याकडे कसा काय आला ? आणि तिने तो का लावला?”

रोहित आतल्या खोलीत फोन चर्गिन्गला लावायला गेलेला .

त्याला विहांन ची अगतिकता कळत  होती. सोबत असून तो फोन लावतोय .

विहान व  रोहितने आतल्या खोलीत जाऊ न  पुन्हा पुन्हा पहिला . फोटो वासवीचाच होता .

वेळ न पाहता रात्रि विहान्ने तिला मेसेंजेर वर मेसेज टाकला , 

“डीपी सुंदर आहे , कोण आहे ते ?”

“थैंक यु , असे काय करता मीच आहे !”

“कसे शक्य आहे ?”

उत्तरात तिचा स्माइली आला . ती ऑफलाइन .

विहान  रोहितची  वीकेंड ओली पार्टी एकदम उतरली आणि दोघे विचारातच पडले . 

**************************************

क्रमशः 

लेखिका - स्वाती बालूरकर देशपांडे, सखी

🎭 Series Post

View all