प्रोफाइल पिक भाग -८ - अंतिम

He finds old friend through profile pic.


प्रोफाइल पिक- ( भाग ८) अंतिम


लेखिका - स्वाती बालूरकर, सखी

कथा पुढे-


विशाखाचा फ्लॅट  खूप छान लोकॅलिटी मध्ये होता, नवरा ही  एन. आय. एन.  मधे  इतक्या मोठ्या  पदावर  वैज्ञानिक म्हणून कार्यरत होता.
कार पार्क करून ती दोघांना सोबत घेवून वर आली.
४थ्या मजल्यावर फ्लैट होता. प्रशस्त फ्लॅट होता, सगळं आधुनिक, खाली मैदान , वर मोठे कॉरीडोअर वगैरे.
दोघजण आत आले तिने त्यांना सोफ्यावर बसण्याची विनंती केली आणि ती आत गेली.
विहान आणि रोहित बराच वेळ हॉलची सजावट पाहत होते. खूपच कलात्मकतेने आणि लेटेस्ट प्रकारे सजवलेला होता.
लो सीलिंग वरची डिझाइन आणि लाइट रचना आकर्षक होती. समोर टीव्हीसाठी केलेलं वुडवर्क विशेष आकर्षक होतं.
खूप मोठा आणि हवेशीर फ्लॅट होता, ते दोघेजण क्षणभर त्याच्यातच गुंग झाले.
काहीवेळाने एका मुलीने दोघांसाठी पाणी आणून दिले.
विशाखाने आवाज दिला "येतच आहे मी , बी कम्फर्टेबल. येथेच आहे"
हेचअसं केवळ वासवीला भेटण्यासाठी इतक्या वर्षांनी, अनोळखी विशाखाच्या घरी येणं, यांना खूप ऑकवर्ड वाटत होतं परंतु पर्याय नव्हता.
इतक्यात हसतमुखाने विशाखा तिच्या मिस्टरांसोबत आली
त्यांची ओळख करून दिली.
" मीट मिस्टर गुरुनाथन , माय हबी. अँड गुरू दीज गाईस आर बेस्ट फ्रेंड्स ऑफ वासवी अक्का इन हर कॉलेज टाईम!"
"ओह नाईस टू सी यू,बी कम्फर्टेबल !"
"सॉरी , यांना मराठी येत नाही. थोडी थोडी समजते पण बोलत नाहीत." विशाखा हसत म्हणाली.
त्यांनी दोघांशी हात मिळवला.
दोघे काय करतात वगैरे चौकशी केली.

अाणि पाच मिनिटातच "यू कॅरिऑन गाईज आय हॅव सम अपॉइंटमेंट आऊटसाइड , प्लीज डोंट माइंड, कॅरिऑन?"
विशाखा अटेंड देम वेल, असं म्हणून ते निघून गेले.
आता विहानला थोडंसं रिलॅक्स वाटलं.
रोहित पटकन म्हणाला," विशाखाजी बोलवाना वासवीला!"
" अरे हो फ्रेश होऊन येते, येतेच आहे ती!"
इतक्यात, " विशाखा, चहा करायचा की कॉफी गं ?" असा आतून आवाज आला आवाज खूप ओळखीचा वाटला.
विहानने बोट दाखवून विचारले," कोण आहे?"
" एक मिनिट."
विशाखा आतमध्ये गेली आणि येताना सोबत मावशींना घेऊन आली.
तिला पाहताच दोघेजण उभे राहिले .
रोड ,नाजूक आणि तशाच मेनटेन मावशींना पाहून दोघेजण उठले व पटकन समोर वाकले.
त्यांनी आशीर्वादही दिला.
" किती छान वाटलं पोरांनो , इतक्या वर्षांनंतर! तुम्ही ? तू विहान नाही का रे? तुझं नाव मात्र विसरले मी. आणखी एक सतीश पण असायचा ना तुमच्याबरोबर?"
" काकू मी रोहित, छान वाटलं पाहून, कशा आहात तुम्ही!"
" ठीक आहे. तब्येत बरी ठेवावीच लागते. तुम्ही कसे आहात? कुठे असता ?"
दोघेजण ठीक आहोत काकू असं म्हणून जनरल बोलत होते.
"तुम्ही दोघेही अजूनही संपर्कात आहात छान वाटलं."
" अहो काकू आमची शाळेपासूनची मैत्री आहे आणि योगायोगाने नोकरीसुध्दा एकाच कंपनीत करतो आहे."
" हो ना त्यावेळी देखील दोघे जण यायचात नेहमी वासू सोबत !"

थोडावेळ जुजबी बोलल्यानंतर मावशी उगीचच भावनिक झाल्या आणि विशाखाला म्हणाल्या," तू बस मी आहे आतमध्ये. ते काय घेणार आहेत?"
"आताच तर जेवण झालं बाहेर, काहीच इच्छा नाही." दोघे.
"बरोबर पण चहा किंवा कॉफी तर चालू शकते जेवणानंतर!"
" मावशी फिल्टर कॉफीच करायला सांगा शांताला!"
विशाखाने ऑर्डर सोडली.
आता मात्र दोघांना खूप बेचैन व्हायला लागलं इतका सस्पेन्स काय?
कारण आल्या आल्या समोर वासू येईल आणि पाच मिनिटांत भेटून निघूतात असं काहीतरी मनात होतं.
" पण वासवी तिचे मिस्टर ? वासवी ठीक आहे ना ?"
"होना कॉफी येऊद्या आपण भेटू वासवीला. तुम्हाला इतकी काय उत्सुकता आहे जाणते आणि त्यासाठी तर घरी आणलेना."

विशाखा सहज आत गेली आणि दोघांना वाटलं की बहुतेक वासवी बाहेरून येणार आहे.
इतक्यात हलकासा बोललेला आवाज येऊ लागला.
रोहित कान देऊन ऐकत होता, बहुतेक विशाखा फोर्स करत होती, इतक्या वर्षांनी तुला भेटण्यासाठी आलाय तो घरी, चल ना !

"वासवी घरातच आहे ," असं त्याने हळूच विहानच्या हातावर हात ठेवला.
म्हणाला "बहुतेक तिची इच्छा नाही आपल्याला भेटण्याची."
" रोहित असं का असेल? मी काही चुकलोय का किंवा आपण आता इथे आलो ते चुकलंय का ?"
"नाही कळतय, वाट पहावी आता इथपर्यंत आलो आहोत तर भेटल्याशिवाय जायचं कसं? आणि तुला तर जाब विचारायचा होता ना तिला. विचारून घ्या मग आता भेटल्यावर."
" ते बघूयात भेटल्यावर. ती आपल्याला दिसली तरी खूप आहे."
"दिसली तरी म्हणजे?"
हातात कॉफीचा ट्रे घेऊन मावशीआल्या मग आत पाहून विशाखा म्हणाली "शांता तिला घेऊन ये!"
आणि विहानच्या मनात पाल चुकचुकली.
समोर विशाखाच्या मागचा प्रसंग बघून तर तो हादरलाच, त्यांची केअरटेकर असेल बहुतेक ती वासवीची व्हीलचेअर लोटत आणत होती.
त्याची उत्साही, सुंदर, नाजूक ,चपळअसलेली वासवी एकदम रोड कृष आणि निस्तेज दिसत होती.

विहान आणि रोहित कंटीन्यू तिलाच पाहात होते , तिची मात्र आपली नजर झुकलेली होती.
व्हीलचेअर लोटत आणली पण त्यांच्या सोफ्याच्या समोरच्या चेहरा दिसेल अशी थांबवली.
मनात कसलं विचारांचं वादळ माजलं, तरीही ते झाकत विहान औपचारिकतेने म्हणाला " काय मग वासवी कशी आहेस?"
रोहित म्हणाला "वासू ,अगं तुला खूप मिस केलं आम्ही. बारा वर्ष कशी काय संपर्काविना ?"
वासवीच्या डोळ्यातून सतत अश्रूधारा वाहत होत्या. ती काहीच बोलत नव्हती.
तिच्या हाताने, उजव्या हाताने अश्रू पुसण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. शांतणे पटकन खांद्यावरच्या रुमाल तिच्या हातात दिला. तिने डोळे पुसले.
" विशाखा जी हे काय आहे ? हे काय पाहतोय? तुम्ही का नाही सांगितलत आम्हाला?" विहान अगतिकतेने म्हणाला.
"काय झालाय वासवीला?" रोहितने हळूच विचारलं.
मावशीपण एका बाजुला शांत बसल्या होत्या. त्या खूप भावनिक झाल्या.
" विहान आणि रोहित तुम्ही तिला भेटण्यासाठी आलाय. तिच्याशी बोला. ती बोलू शकते व्यवस्थित .ओके मी आतमध्ये आहे. तिला विचारा मनातल्या शंका आता माझं मध्यस्थाचं काम संपलं."
मावशी, विशाखा आणि केअरटेकर देखील आत निघाली.
रोहित म्हणाला," विशाखाजी तुमचा फ्लॅट मला खूप आवडला. दाखवाल का? म्हणजे पाहू शकतो का?"
"अरे व्हाय नॉट ! चला." रोहितही आत गेला.
"बोल विहान?"
अगतिकतेने तो म्हणाला" वासवी ?"
आता हॉलमध्ये कुणी नाही हे पाहून अक्षरश पुढे आला. तिच्यासमोर गुडघ्यावर बसला .
कारण ती सतत खाली पाहत होती.

"विचारू शकतो का हे काय झालंय आणि कधी?"
" मन सिनेमा आठवतो का रे विहान?"
" कसा विसरेन वासू, अजूनही पाहिला की मी इमोशनल होतो. अापण एकत्र पाहिलेला शेवटचा सिनेमा. त्याचं काय?"
" आपल्या आयुष्यात त्याची पुनरावृत्ती झालीय रे!"
" काय ?"
"हो, आपण एक वर्षांनंतर भेटणार होतो त्या गणपतीच्या मंदिरात, डोंगरावरती! त्याच्या आदल्या दिवशी मी तुझ्यासाठी गिफ्ट आणण्यासाठी म्हणून बाजारात गेले. परत येताना माझ्या स्कुटीला एका कारची धडक लागली. मी रस्त्यावर पडले आणि मागून येणाऱ्या ट्रकखाली माझे दोन्ही पाय आले."
"बाप रे ! किती भयानक आहे हे " त्याने पटकन तिचा हात हातात घेतला.
"तत्काळ मेडिकल सेवा मिळाली म्हणून मी वाचले कदाचित."
"प्लीज! असं बोलू नकोस"
" विहान हा दिवस पाहायचा होता, तुला पुन्हा भेटायचं होतं , याच जन्मात! गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत अरे! असा विचार कर!" ती रडत रडत बोलत होती पण चेहर्‍यांवर त्याला भेटल्याचा आनंद पण दिसत होता.
विहान तर तिला पहातच बसला होता ,"मग?"
"मग काय? दोन दिवस बेहोश होते. होश आला व पाय गेल्याचे कळाले. काय करणार होते मी? औषधाच्या प्रभावाने कंबरेच्यावरचा भाग तरी व्यवस्थित काम करतोय.
फिजिओथेरपिस्ट , मसाजने वगैरे उजवा हात बऱ्यापैकी चालतोय. डावा अजूनही जड आहे."
"तू ग्रेट आहेस वासू , हे कसं मान्य केलंस? कल्पना करवत नाही."
" जे बारा वर्षांपासून मी झेलते आहे या आशेत की देवाने जगवले, जिवंत ठेवले तर कदाचित तुझी पुन्हा भेट व्हायची असेल. खरं सांगते विहान मी तुला खूप मिस केलं. पण आता माझ्याकडे कुणाचाच पत्ता , फोन काहीच नव्हतं."
"तेव्हा कुणाकरवी तरी कळवायला हवं होतंस तू."
" माझं आयुष्य क्षणात शुन्य झालं होतं , मी जगेनच की नाही याची खात्री नव्हती. मावशीने घर गावी शिफ्ट केलं. मग तर फक्त जिवंत होते."
"विशाखा?"
"तिने सांगितलंच असेल ना तुला? तिचं लग्न झालं आणि ती मला हैदराबादला घेऊन आली. इथे आल्यानंतर बरीच सुधारणा झाली माझ्या तब्येतीत."
"म्हणजे अशी नव्हतीस तू तेव्हांपासून ?" "हं . प्रचंड नैराश्य आलं होतं. मी बोलायचीच नाही. पण विशाखासोबत राहिल्यापासून बोलायला वगैरे लागले पण हा दुसर्‍यावर ते अवलंबून असलेलं दुःख आहेच ना रे! चोविस तास केअरटेकर ठेवली आहे तिने.
मला नको वाटतं रे कुणाकडून आपलं काम करून घ्यायचं. पण आहे. आता मी खुश आहे!"
विहानच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
तो फक्त तिला एखाद्या देवतेला पाहिल्यासारखं पाहत होता.
" वासू? पण तू मला का नाही कळवलंस? ते भेटायला आलो असतो ,तुझी सेवा केली असती यार!"

" विहान तुझ्याबद्दल घरी काहीच माहीत नव्हतं. आपण भेटल्यानंतर घरी सांगायचं ठरलं होतं ना. मावशीला फक्त एवढेच माहीत होते की तुम्ही दोघे मित्र आहात. मी कशी कळवणार होते तुम्हाला? कुणांद्वारे आणि कळवून काय केलं असतं ? बोल ना?"
तो भावनिक झाला.
" मी खूप निर्दयीपणाने वागले पण पर्याय नव्हता ,कळवलं असतं तर तू लग्न केलं असतंस का? मी अशीच मग माझ्यासाठी तुझं आयुष्य खर्ची घालण्याची इच्छा नव्हती."
"पण ही प्रोफाइल पिक ची कमाल आहे यार , विशाखाने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नसती तर . . . . आपण भेटलो नसतो! थँक्स टू हर!"

"अॅक्चिअली विहान गेल्या काही दिवसांत मला तुला खूप भेटावंसं वाटत होतं किंवा एकदा पाहावं. मग मला विशाखाने सांगितलं की फेसबुकवरती म्हणजे फेसबुकमध्ये जुने लोक शोधू शकतो."
"हो ना, आपण कॉलेजात असताना असं एवढं काही नव्हतं किंवा आपण तितकी प्रगत नसू बहुतेक पण मी तुला खूप शोधलं फेसबुक वर! आणि नंतर तरी मला सांगावसं वाटलं नाही का?"
"विहान , केवळ त्याच विचारानं की तुला त्रास होईल."
" अगं पण तुला किती त्रास झाला ?"
"ते तर नियतीने ठरवलं होतं. त्यात मी बदल करू शकतेका? पण तुझा त्रास मला वाचवायचा होता. छान फॅमिली आहे तुझी. गोंडस मुले दोन. मी पाहिला फोटो !"
" छानच आहे गं ! पण वास्तविक माझ्या मनात तुझीच इमेज होती बायको म्हणून. . . कायम! मी ती सगळी नाती निभावत असलो तरी आतून कुठेतरी एका कोपऱ्यात तू आहेस!"
"विहान का? "
" का असू नये.तुझीच स्वप्न पाहिली होती. तू मनात आहेस पण आता अशा वळणावर भेटलीस आणि अशी भेटलीस. । "
विहान रडायलाच लागला.
" म्हणूनच मी विशाखाला म्हटलं होतं की मला त्याच्यासमोर असं जायचं नाही पण ती ऐकायला तयारच नाही. तुझ्या मनात माझी तशी इमेज होती, तशीच असावी. हिंडणारी, फिरणारी, चंचल, चपळ वासवी! ही अशी अपंग वासवी तू कशी काय लक्षात ठेवशील?"
"हेच तर दु ख आहे म्हणूनच मी तिला न सांगता तुम्हा दोघांना इथे बोलावून घेतलं."
विशाखा व रोहित हॉलमधे आले. विहान उठून सोफ्यांवर बसला.
"विहान एक गोष्ट आहे की इतके दिवस तुला माझ्यावर राग असेल, घृणा असेल किंवा काहीही पण आता किमान मला भेटल्यावर तू मला समजून घेशील!"
"काय वासू ? काय प्रतिसाद देणार मी? तुझी घृणा कशी करेल? हो राग येत होता मला की तू असं का वागलीस!"
रोहित मधेच म्हणाला," राग नाही ग वासवी त्याला तुझे खूप काळजी वाटत होती. तुला शोधेपर्यंत तो स्वतःबद्दलच दोष शोधत होता. पण छोड ना यार आपली मैत्रिण भेटलीय. तू आमच्याशी प्रत्यक्ष बोलतेस हे काय कमी आहे ?"
रोहित ने विहानच्या खांद्यावर हात टाकून पाठीवर थाप दिली.
विशाखा खूप आनंदी दिसत होती कारण वासवीच्या चेहर्‍यांवर एक ग्लो आला होता ज्याची ती कितीतरी वर्षांपासून वाट पहात होती.
मग सगळे हेवे दावे मिटले.
विहान चेहर्‍यांवर पाणी मारून फ्रेश होऊन आला.
फोन नंबरची देवाण घेवाण झाली.
"चला ही दोस्ती तुटायची नाय!"
रोहितने वासवीशी हात मिळवला व विहान ने त्याच्यावर हात ठेवला.
"बिनधास्त गप्पा मारत जा वासू, विह्याची बायको संशयी वगैरे नाहिय. मैत्रिण म्हटल्यावर काही बोलणार नाही.
मी पण विकेंडला कॉल करत जाईन. "
"ताई तुला भेटावं वाटलं तर येतील ते इथे, आपण कधीतरी बाहेरही जाऊ या!" विशाखाने वासवीच्या खांद्यावर हात ठेवला.
"हो गं विशाखा, इतका त्याग केलाय त्याची भरपाई तर करेनच मी. आता आहे त्या अवस्थेत आनंदाने जगणार आहे आणि मनावरचा खूप मोठा ताण गेला आज. थँक्यू फॉर युवर प्रोफाइल पिक अँड फेसबुक अकाउंट!"
विशाखाच्या हाताला जवळ घेत वासवी बोलली.
"चला मग . निघतो आम्ही. सिकंदराबाद स्टेशनहून गाडी आहे आता संध्याकाळी!"
"मी ड्रॉप करू का?"
"नो विशाखाजी! थँक्यू ! वासवी टेक केअर!"
आणि दोन्ही मित्र आनंदाने परत निघाले. प्रोफाइल पिक चं कोडं सुटलं होतं आणि मनातली इतक्या वर्षांची हुरहुर मिटली होती.
समाप्त
लेखिका - स्वाती बालूरकर , सखी
दिनांक १५.०८ .२०२२

🎭 Series Post

View all