प्रोफाइल पिक भाग -७

He finds his old girlfriend by profile pic.


प्रोफाइल पिक (भाग -७)

कथा पुढे -

तुम्हाला माहितीय का  जेव्हा मी तिला म्हटलं फेसबुकवर जुनी माणसं सापडतात ती म्हणाली आयुष्यातली हरवलेली माणसं पण सापडतात का?  आणि मी तिला प्रॉमिस केलं  तुला कोण हवं आहे ते मी शोधून देईल.  त्यांना कशी कळेल की मी शोधतेय? "

"का  अशी राहीली वासवी? कुणाला शोधलं  तिने?" विहानचा निरागस प्रश्न!


"ताईला शंका होती त्यामुळे भीत भीत तिने मला विचारलं\"  मला फक्त एकाच माणसाला शोधायचं आहे आणि विहान त्यावेळी तिने तुमचं नाव घेतलं!"

विहानचे डोळे ओले झाले आठवणीने.

"त्यामुळे मग मी तिचं फेसबुक अकाऊंट उघडलं नाही. माझ्या अंकाउंटवरच   तुम्हाला शोधण्याचा ट्राय केला. तुमचं नाव आणि आडनाव थोडंसं वेगळं असल्यामुळे तुमचा अकाऊंट सापडायला विशेष त्रास झाला नाही . पण मी ऑफिसमधून आले की ती माझा फोन मागायची.  त्यातलं फेसबुक उघडून तुमची पोस्ट आल्यास चेक करायची किंवा तुमचा प्रोफाईल पिक बघायची."

" ती वाचायची माझ्या तोडक्या मोडक्या कविता?"

"हो.  पोस्ट नसली की बेचैन व्हायची.
चार सहा महिन्यांत ती बरीच कनेक्ट झाली तुमच्याशी आणि मग त्या वेळी तिला मी म्हटलं तुझं अकाऊंट उघडून देते. ती म्हणाली नको  त्यांना मी आठवते तरी का बघुयात . आणि तिच्या सांगण्यावरूनच ही माझ्या प्रोफाईल पिक्चर ला तिचा फोटो लावला . पुढचं तर तुम्हाला माहीतच आहे."

"तुमची खरच मदत झाली विशाखा जी.  विहान तर खूप मिस करतो तिला. त्या फोटोने तो खूप रेस्टलेस झाला होता." विहान ने पटकन वळून त्याला एक चापटी मारली व तिने  ते पाहिलं. 
" पण तुम्ही अजूनही मला काहिच सांगितलं नाही, जे मला अॅक्चुअली ऐकायचं आहे."
"विशाखा जी . . . तुम्हांला वेगळं काय सांगणार मी? समजून घ्या . . . ती भेटेल ना तिलाच एकदा सांगेन सगळं.!" विहानचा सूर अजूनही  ओला व भावनिक होता.

" खरं सांगू , तुम्हाला शोधणे आणि तुम्हा  दोघांची भेट घालून देणे एवढाच उद्देश होता माझा.  तो फोटो,. . .  .  ती खूप आठवण करत असते, तुमचे बरेच किस्से ऐकवत असते मला,  त्यावेळी तुम्ही तिचे सगळ्यात जवळचे मित्र होतात ना विहान  सर ?"

रोहित,  "फक्त मित्र??? अहो मी तर म्हणतो. . . खास मित्र म्हणजे . . . "

विहानने पटकन मागे वळून रोहितला चुप बस असा इशारा केला. चापटही मारली होती.
मग रोहित अगदी शांत झाला.

"अहो विहान सर बोलूद्यात  की त्यांना. मला  काहीच प्रॉब्लेम नाही.  मला माहित आहे तुम्ही किती खास मित्र  होतात ते !"

"विशाखा जी, तुम्हाला माहीत नाही तो काहीही बोलतो म्हणजे आता बोलण्याची वेळ तरी आहे का ?" विहान खजिल स्वरात.

  "तुमचं लग्न झालंय ना विहान सर  तुमचे फॅमिली फोटो  सुद्धा वासवीताईंनी पाहिलेत."

"हो का, मग काही म्हणाली ?"विहान खूप खजील झाला. आता मात्र तो मनातून  बेचैन झाला होता.
" नाही. काय म्हणणार. छान हॅपी फॅमिली  आहे  म्हणाली."

"विशाखा जी , हा कुठला एरिया ? म्हणजे आम्हाला माहित नाही म्हणून ." रोहित मधेच काहितरी विषय बदलासाठी.

"आता हे सगळं सिकंदराबाद आहे. इथून रेल्वे स्टेशन जवळ आहे.  मी मारडपल्ली मधे राहते !"

" पहिल्यांदाच पाहतोय इकडचा एरिया. कामाने येतो  अन इकडूनच परत जातो आम्ही नेहमी. "  रोहित पुन्हा वातावरण नॉर्मल  करण्यासाठी!

विहानच्या मनात काहूर माजलेलं , "तुम्हाला ऐकायचं होतं ना ? मन मोकळं करावं म्हणून सांगतोय विशाखाजी , तिला पाहिल्यावर हे सगळं सांगू शकेन की नाही माहित नाही.  बारा वर्षांपूर्वी आम्ही शेवटचे भेटलो. त्यानंतर घरून लग्नाचं प्रेशर . . !"
"मी विहानला त्या हालतीत पाहिलं आहे. . . ते मन  सिनेमा म्हणालात ना त्यातल्या  अमीरखानसारखा सैरभर  झाला होता तो.  वासवी सापडलीच नाही." रोहित हळूवारपणे म्हणाला.
विहान मनाने  भूतकाळात जाऊन बोलायला लागला.
"वासवीला मी लग्नाच्या वेळी किती शोधलं मी , सगळे स्रोत वापरले पण ती जणु  नव्हतीच ,कुठे गायब झाली होती की ती जणू अंतर्धान पावली होती. पाताळात होती की अजून कुठे लपून बसली होती. अक्षरश माझा असा समज झाला  की देवाने तिला  मला न भेटवताच  तिला नेलं. मनाचं काही बाही समाधान करून घेतलं. घरूनही  आमच्या लग्नाला हरकत नव्हती. पण आपण  विचार करऩ काय होतं  देवाने कोणाच्या गाठी कुठे बांधल्यास ते तर त्यालाच  माहिती , ती नसेलच नशिबात कदाचित म्हणून असं झालं असेल . पण ती होती तुमच्यासोबत विशाखाजी , आता आहे पण मी तिचं काय वाईट केलं म्हणून तिने मला असं सोडलं! "

विशाखाचे डोळे अश्रुने काठोकाठ  भरले होते. सगळं  ऐकत होती, पण काहीच बोलली नाही.

रोहित हळूच म्हणाला  " विहान नको ना यार आता ही भेटणार आहे ती हे काय कमी आहे? तिला शोधून वेडा झाला होतास ना ? मग शोध संपला आता."

विशाखा गालातल्या गालात हसत होती.
तिचं घर आलं व कार पार्किंग  मधे आली.

विशाखाचा फ्लॅट  खूप छान लोकॅलिटी मध्ये होता, नवरा ही  एन आय एन  मधे  इतक्या मोठ्या  पोस्ट  वर  सायंटिस्ट होता.

क्रमशः

©® स्वाती  बालूरकर देशपांडे,सखी.
दिनांक  १० ऑगस्ट २०२२
(प्रतिक्रिया  अवश्य द्या.)