प्रिय सांताक्लॉज

ख्रिसमस फादर.
गोष्ट छोटी डोंगराएवढी.

विषय_ प्रिय सांताक्लॉज .


लाल लाल आणि पांढरी शुभ्र फर,लोकर असलेले सुंदर मऊ मऊ कपडे,आणि तशीच पांढरी शुभ्र दाढी आणि केस असणाऱ्या सांताक्लॉज कडे बघूनच छोट्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकलेला दिसतो....!

खांद्यावर बक्षिसानी भरलेली ,एव्हढी मोठी पोत्यासारखी पिशवी,आणि हातात ख्रिसमसची " टिंग टिंग वाजणारी ,मंजुळ बेल( घंटा), असलेल्या सांताक्लॉजची वाट मुलांसोबत सर्व स्तरातील लोक सामुदायही बघत असतो.....!

सुंदर,सालस नऊ हरणाची रथ गाडी ,ही सांताक्लॉजची सवारी असते.
इ. स. ३०० नंतर , सांताक्लॉजचा जन्म सहा डिसेंबर , मायरा नामक शहरामध्ये ,अतिशय श्रीमंत,नामवंत परिवरामध्ये झाला होता....!

त्यांचे खरे नाव " निकोलस" असे होते.परंतु त्यांच्या सामजिक सेवा कार्यामुळे त्यांना " संत निकोलस," म्हणून ओळखले जाऊ लागले होते.डेन्मार्क शहरामधून , " संत निकोलस,पुढे " सांताक्लॉज " म्हणून प्रसिद्ध झाले....!

सांताक्लॉज स्वतः येशू भक्त आणि उपासक असल्याने ,त्यांची नेहमी इच्छा किंवा मनोकामना असायची की,ख्रिसमस म्हणजे येशूचा जन्म दिवस म्हणून साजरा करत असताना,या दिवशी कोणीही उदास, दुःखी,नाराज असू नये.....

.........त्यासाठी ते स्वतःच त्यांच्या मालमत्तेतून सर्व गरजवंतासाठी खाण्यापिण्याच्या वस्तू,मुलांसाठी खेळणी,मोठ्यांसाठी गरजेच्या वस्तू वाटप करत असत.
त्यांची ही समाजसेवा ,लोकांना दिसू नये आणि त्यास प्रसिध्दी मिळू नये म्हणून ते मध्यरात्रीच्या वेळेतच हे वाटपाचे काम करत असत....!

त्यांच्या अनेक चाहत्यांनी आणि विस्वासनाऱ्यानी त्यांची ही प्रथा पुढेही चालू ठेवली.अशा प्रकारे आजही प्रतेक अशा व्यक्तीच्या रुपात असे सांताक्लॉज दिसून येतात,की जे दुसऱ्यांसाठी मदत करण्याची इच्छा बाळगतात,कोणाचे तरी दुःख विसरण्यासाठी मदत करतात.....!

समाजासाठी त्यांच्यात असणाऱ्या दयाळू आणि उदारपणामुळे आणि छोट्या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू यावे,आनंद यावा म्हणून त्यांनी केलेल्या बक्षीस वाटपामुळे ,सांताक्लॉज आजही तेव्हढेच लोकप्रिय आहेत......!

काही समाज विध्वंसक लोक ,या प्रतिमेला धर्माच्या नावाखाली बदनाम करु पाहतात.पण....
......पण,हे केवळ अशक्य आहे.....!

.. कारण सांताक्लॉजचे कार्य हे आजच्या काळाची गरज निर्माण झाली आहे.....!
ते ठराविक धर्मापुरते नाही तर,प्रतेक धर्माच्या मानवजातीसाठी आजही उपयुक्त आहे....!
आजच्या कलयुगामध्ये जितका अनाचार वाढत जाणार...जितके दुःख ,रोग,आजार,निराशा,वाढत जाणार...जितके प्रतेक धर्माच्या लोकांच्या चेहऱ्यावरचे हसू गमावणार...अशा परिस्थितीमुळे लहानग्या ,कोमल मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू कोमजनार.....

.........तितके जास्तीत जास्त " सांता क्लॉज प्रतेक वर्षी समाजाला वेगवेगळ्या रूपातून प्रगट होताना दिसणार...!
कारण गरज प्रतेकाला आहे.....!
दुखः,त्रास,गरिबी,दारिद्र्य, प्रतेक धर्मात आहे...!
म्हणूनच सांताक्लॉजची वाट प्रतेक न प्रेतक मनुष्यमात्र करताना दिसत आहे....!

दया, करुणा,उदारता,आणि आनंद ह्या मानवी भावना आहेत.ज्यांच्यामध्ये ह्या भावनांना महत्व आहे,ते सर्व सांता क्लॉजचे अनुसरण करतात.जसे या भावना प्रतेक धर्माच्या लोकात आहेत तसेच गरिबी,दुःख, निराशाही प्रतेक धर्माच्या लोकात आहे.म्हणूनच सांता क्लॉजची प्रसिध्दी ठराविक देशापुरती राहिली नाही तर पूर्ण जगभरात त्याची ख्याती झाली आहे......!

Ho...ho...ho...
Jingle Bell, Jingle Bell...
Jingle all the way....
Santa clause is coming along...
Riding on the sleigh......!!!!

सांताक्लॉजला यावे लागेल....!

जिथे जिथे लहान मुले,तिथे तिथे सांताक्लॉज येणार म्हणजे येणारच....!
या जगात सर्वात पवित्र,सर्वात निरागस ,जर काही असेल तर ते म्हणजे केवळ "बालपण" .म्हणूनच सांताक्लॉजला छोटी ,लहानगी मुले खूप आवडायची.त्याच्या मते प्रत्येक लहान मूले हेच अंतःकरणाने आणि मनाने स्वच्छ आणि निरागस असतात..
मग त्यांनी निराश ,उदास का असावे ...??
त्यांना आवडणाऱ्या भेट वस्तू जर त्यांना मिळाल्या तर त्यांच्या चेहऱ्यावरचे खुशीचे भाव हे किती विलोभनीय असते.....!!!


आता याच जन्मात मला परत तसे निरागस बालपण मिळणार नाही....
आणि बालपणी सारख्या एखाद्या खेळण्यासाठी किंवा आवडीच्या वस्तूसाठी सांताक्लॉजकडे काही मागता येणार नाही......
पण,आज जर मला सांताक्लॉजला काही मागण्याची संधी मिळाली तर.....
मी एव्हढेच मागेन की.....
या भूतलावर,दोन सख्या भावांमध्ये दुश्मनी नसावी....
दोन बहीनींमध्ये हेवा, मस्तर,नसावा....
भाऊ आणि बहीण मध्ये भेदभाव नसावा.....
पती आणि पत्नी मध्ये संशयाची भिंत नसावी.....
आणि...कोणत्याही जन्मदात्याच्या शेवटच्या वेळी त्यांचा जीव वाचवन्यासाठी काही न करता येण्याची वेळ कोणत्याच मुलावर, अपत्यावर न यावी.....
......एव्हढेच कर....!!!!!
©® Sush.