Feb 24, 2024
वैचारिक

प्रिय

Read Later
प्रिय

प्रिय....!!!!!! 

कुणाला म्हणावे बरं प्रिय ? ? 

प्रत्येकाची व्याख्या नक्कीच वेगळी.!!!! 

जे काही क्षणांसाठी सोबत राहिले त्यांना , की मग जे कायम सोबत राहिले आहेत त्यांना ? 

जे खरंच मनापासून माझे सोबती आहेत त्यांना , की जे दिखाव्याची सोबत करतायत त्यांना ? 

असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. मग याचं उत्तर कुठे बरं शोधावं ? 

 

खरंय ना पण. आजच्या घडीला जवळपास प्रत्येकाला आपण प्रिय म्हणून साद घालतो. काय तर म्हणे "ट्रेंड"चं झालाय तो. 

पुर्वीच्या "ठराविकपणा"ची जागा आता " सर्रासपणा"ने घेतली आहे. बदलत्या काळानुसार होणारचं म्हणा असे. पण खरंच त्या "प्रिय" शब्दात ती उत्कट भावना असते का ? 

बोलायचं म्हणून बोलत आहोत असच काहीसं होत असतं हल्ली. 

 

कितीतरी वर्षांपासून ओळख असलेल्या व्यक्तीहून अगदी काही दिवस आधी आयुष्यात आलेल्या व्यक्तीचं महत्त्व आपल्याला जास्त आहे, असं सुद्धा होतचं की बरेचदा. 

कोणीतरी खुप खास असतं तर कोणी फक्त काही काळासाठी खास राहतं. 

कोणी सुखदुःख वाटून घेत असतं तर कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी सोबतीचा दिखावा करत असतं. 

काही माणसे नेहमी आपल्या सोबत जोडलेली असतात. आपल्या जीवनातील चढउताराचे वाटेकरी असतात. 

कधी कोणीतरी आपला मानसिक आधार बनतं. कधी परिस्थिती कोणाच्या तरी जवळ आणते. 

या सगळ्यात त्या व्यक्तीची आपल्या आयुष्यातील जागा सुद्धा ठरते. 

 

ती व्यक्ती आपले आईबाबा, बहिण-भाऊ, किंवा इतर कोणी नातलग असू शकते. किंवा मग मित्र परिवार अथवा कोणी अनोळखी रस्त्यावरील वाटसरू देखील असू शकते. 

 

प्रत्येकाची स्थिती काही सारखीच नसते. त्यामुळे कोण प्रिय हे ज्याच्या त्याच्या अनुभवावरचं अवलंबून असेल हे नक्की.!!! 

-©®कामिनी खाने

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//